पांडूरंग माझा गरीब राहू द्या

पांडूरंग माझा गरीब राहू द्या

पांडूरंग माझा गरीब राहू द्या
गरीब राहू द्या
गरीबांना पाहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या ||धृ||

नका अर्पू त्याला सोने अन नाणे
त्याला नसे त्याचे देणे घेणे
आपलीच श्रीमंती
आपलीच श्रीमंती
उगा जगाला का दावता ||१||

नका लावू त्याला सुखाचे डोहाळे
नका करू त्याचे उत्सवी सोहळे
तोच दाता असता
तोच दाता असता
कशाला त्याला देणगी तुम्ही देता? ||२||

भक्तासाठी देव पहा थांबला विटेवरी
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले कटेवरी
नको दुजे काही देणे
नको दुजे काही देणे
काही न घेण्यासाठी बध्द करी हाता ||३||

- पाभे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगले विचार - भावना मांडल्या आहेत.
भोवतालच्या लखलखाटात हरवलेल्या देवाला गरीब ठेवण्याची कल्पना आवडली

मात्र मिटरमे थोडा गडबड लगा.. तीनही कडवी एकच चालीत म्हणता येणार नाहित बहुदा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>> तीनही कडवी एकच चालीत म्हणता येणार नाहित बहुदा!
ऋषिकेश, येथे प्रयत्न केला आहे. कृपया ऐका अन सांगा:

http://www.filesavr.com/7L1GFKQ52D40CZ7
किंवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही