कोडे- चाचे व नाणी

नॅश इक्विलिब्रिअम वरती एक मस्त कोडं वाचलं. मला उत्तर माहीत नाही. प्लीज खूप विचार करुन वाद-प्रतिवाद करावा कारण प्रचंड क्लिष्ट कोडं आहे.

५ एकदम तर्कट चाचे आहेत, A, B, C, D and E. त्यांना १०० सोन्याची नाणी सापडली आहेत. अन त्यांना ती वाटायची आहेत.

त्यांच्यात श्रेणीरचना आहे:
A हा B पेक्षा सिनीयर
B हा C पेक्षा सिनीयर
C हा D पेक्षा सिनीयर
D हा E पेक्षा सिनीयर
___________________

खेळाचे नियम -
(१) सर्वात सिनीअर चाचा वाटणी कशी करायची ते मांडणार
(२) बाकी सर्वजण मत देणार - ती वाटाणी मान्य की अमान्य
......(२.१) जर टाय झाला तर मांडणी मांडलेला चाचा "Casting vote" देणार
......(२.२) जर मागणी मान्य झाली तर, नाणी वाटली जाणार अन खेळ संपला
......(२.३) पण जर मागणी मान्यच झाली नाही तर "मांडणी मांडलेला = सर्वात सिनीअर" चाचा समुद्रात फेकला जाणार अन मग पुढचा सिनीअर चाचा परत नवी मांडणी मांडाणार.

________________

गृहीतके-
(१) प्रत्येक चाचा जिवंत रहाण्याकरता धडपडणार.
(२) प्रत्येक चाचा सर्वाधिक नाणी हापसायचा प्रयत्न करणार
(३) प्रत्येक जण एक दुसर्‍याला समुद्रात फेकायचा प्रयत्न करणार
(४) कोणी एकमेकांवर विश्वास टाकणार नाही की वचने देणार नाही.

साभार - http://en.wikipedia.org/wiki/Pirate_game

field_vote: 
0
No votes yet

कळलं मला. ते विकीवरती दिलेलं उत्तर बरोबर आहे असं वाटतय.
__________
(१)जर फक्त D आणि E उरले (बाकीचे समुद्रात फेकले गेले आहेत), तर D म्हणेल 100 त्यला स्वतःला आणि शून्य E करता. मग त्याला "कास्टिंग मतदानाचा" हक्क प्राप्त होइल व मांडणी मग हीच फायनल होइल..

(२) जर (C, D and E) उरले, C ला माहीत आहे की D हा E ला पुढच्या राऊंड मध्ये शून्य देइल; म्हणून मग तो E ला या राऊंड मध्ये एका नाण्याची ऑफर देईल ज्यायोगे E चे मत त्याला(C ला) मिळेल, त्यामुळे पुढील वाटणी फायनल होइल C:99, D:0, E:1.

(३) जर B, C, D and E उरले तर, तो D ला एका नाण्याची ऑफर देईल . कारण "casting vote", मिळण्याकरता त्याला D ची मदत पुरेशी आहे. तो पुढील मांडणी प्रपोझ करेल - B:99, C:0, D:1, E:0.

(४) A हे सर्व जाणून असेलच, त्याला फक्त C व E ची मदत लागेल अन मग खालील मांडाणी सर्वांच्या भल्याची होईल.

A: 98 coins
B: 0 coins
C: 1 coin
D: 0 coins
E: 1 coin

मुद्दाम नंबर टाकलेत. जर शंका असेल तर नंबराचा संदर्भ देऊन विचारता यावी.

निळे, गेल्या ब्लू आयलँडार पझल धाग्यात तुम्ही टक्कर दिली होती. - http://www.misalpav.com/node/16043
या धाग्याचा ही विचार कराल अशी आशा करते. Wink