डोंगर आणि ढग

आकाशातले भले मोठ्ठे ढग,
कधी अचानक खाली येतात…
उंच एकट्या डोंगराशी,
हळूच गप्पा मारू लागतात…

उंच उंच डोंगरावरची,
उंच उंच झाडं…
भल्या थोरल्या ढगांसमोर,
इवली इवली झाडं…

सळसळणाऱ्या पानांमधून,
झाडं गलका करू लागतात…
उधाणलेल्या वाऱ्यासंगे,
ढगांकडे हट्ट धरतात…

फांदीवरचा उनाड कोकीळ,
हिरवं गाणं लिहू लागतो…
बांबूंमध्ये घुमत वारा,
दडले सूर शोधू पाहतो…

दूर दरीत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी,
मग डोंगराकडे धावत येतात…
अन थेंबांचा ठेका धरत,
मोहरणारे सूर जुळतात…!!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

व्वा...!
आज चिक्कार पाऊस पडतोय आणि तुमची ही कविता..!
क्या बात है..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बांबूंमध्ये घुमत वारा,
दडले सूर शोधू पाहतो…

मस्त आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सळसळणाऱ्या पानांमधून,
झाडं गलका करू लागतात…

या ओळी फार आवडल्या. शिक्षक येण्याआधीचा, शाळेच्या वर्गातला गलका आठवला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर आहे कविता. पावसाचा आवाज ऐकत वाचायला अजून छान वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0