आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.
आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp
Taxonomy upgrade extras
+१
तूर्तास *योगायोगाने* माझी श्रेणीसुविधा बंद पडलेली आहे१, म्हणून, अन्यथा या प्रतिसादास 'मार्मिक' दिली असती.२
सहमत आहे हेवेसांनल.
....................
१ नॉट द्याट आय पर्टिक्युलरली केअर, कारण श्रेणीसुविधेसारखे एकसमयावच्छेदेकरून निरुपयोगी आणि विनोदी असे त्रिभुवनात दुसरे काही नसावे, या आमच्या पुरातन मताशी आम्ही ठाम आहोत. परंतु, अॅट द रिस्क ऑफ रिपीटिंग मैसेल्फ, या सुविधेमागील मनोरंजनमूल्यास त्रिभुवनात तोड नव्हती, हेदेखील तितकेच खरे आहे, त्यामुळे किंचित चुकल्याचुकल्यासारखे वाटते, हे (तुमचाच लाडका शब्द वापरावयाचा झाला तर) अज्जीच नाकारून चालणार नाही. गे-ली१अ बिचारी! :(
असो. आय श्याल बेअर द लॉस विथ फॉर्टिट्यूड (किंवा फॉर्टिच्यूड, तुमच्यात जे काही म्हणत असतील ते).१ब तूर्तास ही केवळ पोच.
१अ मोबाईलवरून टंकताना अवग्रह टंकता येत नाही. नेहमीचे a~ काँबिनेशन चालत नाही. आणि तूर्तास कॉपीपेष्टवण्याकरिता हाताशी एखादा स्पेअर अवग्रह चटकन सापडत नाही. ('म्हातारी उडता न येचि तिजला... फारच थकलीय... आणि वाइफचीही घरात डिलिवरी झालीय...' - पु.ल.) तरी आमची ही हायफन (तिला मराठीत काय म्हणतात ते विसरलो.) तूर्तास गोड मानून घ्यावी, ही विनंती.
१ब करमणुकीचे मार्ग काय, अजूनही सापडतील. "बचेंगे, तो और भी लढेंगे|" - दत्ताजी शिंदे.
२ चलो इस बात पे एक 'माहितीपूर्ण' हो जाए|
...
आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांबद्दल कल्पना नाही. आंतरलैंगिक विवाह ही एक जनुकीय (तथा स्पीशीज़च्या प्रॉपगेशनची) गरज आहे, इतपत आम्ही समजू शकतो.मात्र, त्यांचादेखील (बोले तो, आंतरलैंगिक विवाहांचा) पुरस्कार (प्रमोशन अशा अर्थी) केला जावा, अशा मताचे आम्ही नाही.
जो/जी जे वांच्छील तो/ती ते वरो.
लेखामागची भावना समजली. पण
लेखामागची भावना समजली. पण मुद्दा असा आहे की या लेखातून 'नसलेला प्रश्न सोडवण्याचा उपाय सांगितला आहे का?' हे आधी तपासून बघणं गरजेचं आहे. कारण हे सगळे युक्तिवाद आकड्यांवर आधारित असतात. जर एखाद्या कळपाची, जातीची, समूहाची लोकसंख्या जर 'पुरेशी' मोठी असेल तर दोन डिलिट्रियस जीन एकत्र येण्याची शक्यता हजारांत एक, लाखांत एक वगैरे होऊन नगण्य बनते. हे कसं होतं याचं उदाहरण पाहू.
मेंडेलचा सुप्रसिद्ध प्रयोग. निळी फुलं आणि पांढरी फुलं असलेल्या झाडांचा त्याने संकर केला. फुलांना पांढरा रंग देणारा जीन हा डॉमिनंट जीन होता. याचा अर्थ असा की जर एका पालकाकडून जर पांढऱ्या फुलांचा जीन आला, आणि दुसऱ्या पालकाकडून निळ्या फुलांचा जीन आला तर संततीची फुलं पांढरी असतात. जर दोन्ही पालकांकडून निळा आला तरच संततीची फुलं निळी होतात.
जर निळे आणि पांढरे जीन समसमान प्रमाणात विखुरले असतील तर होणाऱ्या संततीत एक चतुर्थांशांची फुलं निळी होतात. पण जर निळे जीन फक्त १ टक्का असतील, तर दहा हजार झाडांत एक झाड निळ्या फुलांचं होतं.
प्रश्न असा आहे की सध्याचे जे जातीसमूह आहेत त्यांच्यात जातीनिहाय डिलिट्रियस जीन आहेत का? याबद्दल कुठचाही पुरावा लेखात दिलेला नाही. पुरावा सोडा, सांगोवांगीनेही ही गोष्ट प्रचलित नाही. याचं कारण म्हणजे बहुतेक जातभाईंची संख्या ही प्रचंड आहे. त्यामुळे लोकसंख्येत वैविध्य आलेलं आहेच. तसंच प्रत्येकच जातीत, वर्णात वेगवेगळ्या कारणांनी (अनुलोम विवाह, अनौरस संतती, जात खोटी सांगणं वगैरे वगैरे) इतर जातींची गुणसूत्र मिसळलेली आहेत. हे गेली शेकडो वर्षं चालू असल्यामुळे खुले आंतरजातीय विवाह करण्याने जे साध्य होईल असं लेखात म्हटलेलं आहे, ते आधीच साध्य झालेलं आहे.
खरं वैविध्य आहे ते सामाजिक-आर्थिक बाबतीत. आणि सध्याच्या समाजव्यवस्थेत सामाजिक-आर्थिक घटक हे इतके प्रचंड महत्त्वाचे आहेत की त्यामानाने हे तथाकथित जनुकवैविध्य नगण्य महत्त्वाचं आहे.
नॉन-एरगॉडीक मिक्सींग
या उदाहरणात हिरवा आणि पांढरा असे दोनच रंग असल्याने मिक्सींग ट्रेस करता येणं शक्य आहे.
रँडम वेरियबल्सचा संच घेतला तर उत्तर इतकं सरळधोपट असणार नाही, आणि त्यातल्या पुनरावृत्ती सुद्धा डीफ्युजनच्या नियमाप्रमाणे असणार नाहीत
जीन पूल डायव्हर्स केल्यामुळे उपलब्धतेमध्ये वाढ होइल हे खरंच आहे
+१
आंतर्जातीय विवाह अधिक व्हावेत, त्यातून सामाजिक बदल होऊ शकेल, वगैरे, मुद्दे ठीकच आहेत.
परंतु सख्ख्या नातलगांनी (भाऊ-बहीण/आई-पुत्र/बाप-पुत्री) यांनी पुनरुत्पादन टाळावे हे अतिशय पटण्यासारखे आहे. सख्ख्या चुलत/आत्ये/मामे/मावस भावंडांनी वा चुलता-पुतणी/मामा-भाची/आत्या-भाचा/मावशी/भाचा जोड्यांनी एकमेकांसोबत पुनरुत्पादन करू नये, हेसुद्धा वाटल्यास काहीसे पटण्यासारखे आहे.
परंतु नाहीतर जनुकीय गणित हे सामाजिक हेतूंच्यापेक्षा अगदीच नगण्य-दुय्यम होते.
हे बघा
हे बघा http://biology.stackexchange.com/questions/1866/on-the-genetics-behind-…
“if inter-caste marriages in India become common, various… recessive characters will become rarer"
if inter-caste marriages in
if inter-caste marriages in India become common, various… recessive characters will become rarer
याबद्दल वादच नाही. मुद्दा असा आहे की आपण कुठचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी किती 'खर्चाचा' उपाय करतो आहोत. सध्याची परिस्थिती पाहिली तर रिसेसिव्ह जीन्समुळे निर्माण होणारी व्यंगं हे सर्वसाधारण समाजाच्या अनारोग्याच्या तुलनेत नगण्य प्रमाणावर आहे. त्यामुळे हो, तत्त्व म्हणून वरच्या लेखातला मुद्दा मान्य आहे. किंबहुना जातीय भेदभाव किंवा त्यांचा पाया असणाऱ्या आंतर्गत रोटीबेटी व्यवहाराच्या विरुद्ध एक मुद्दा म्हणून जनुकीय युक्तिवाद स्वीकारता येईल. मात्र सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी आंतरजातीय विवाहांचा प्रसार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आणि फायद्याचा हिशोब केला तर जळणाऱ्या घरातली उष्णता कमी करण्यासाठी फायरप्लेसमधली आग विझवा म्हणण्यासारखं आहे. आख्ख्या घराचीच आग विझवण्याची गरज आहे. (हे उदाहरण ताणून खूप चुकीचे निष्कर्ष काढता येतील, पण ते मोठा प्रश्न - लहान प्रश्न या तुलनेच्या मर्यादेतच राहावं अशी इच्छा आहे.)
> मात्र सामाजिक आरोग्य
> मात्र सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी आंतरजातीय विवाहांचा प्रसार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आणि फायद्याचा हिशोब केला तर जळणाऱ्या घरातली उष्णता कमी करण्यासाठी फायरप्लेसमधली आग विझवा म्हणण्यासारखं आहे.
बरोबर आहे. पण हा एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे एवढंच. आणि खर्च म्ह्णाल तर जर दोघेही बरोबरीने जाती/रूढींबद्दल निरुत्साही (apathetic) असतील तर फारसा नाही.
'भासते' योग्य शब्द आहे. तसा
'भासते' योग्य शब्द आहे. तसा भास निर्माण केला जातो. खरंच तसंच असतं असे नाही.
सेक्स + रिप्रॉडक्शन
+ एकत्र राहणे हे प्याकेज इतके शतक टिकलं आहे म्हणजे दोघांनाही फायद्याचं 'भासत' असणार. पण तरी माझे दोन पैसे:
१. सध्याची कुटुंबव्यवस्था (किंवा स्त्रिचे एकपतीव्रता असणे) ही पुरुषांनी त्यांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. They wanted to make sure that the child who inherits is their's.
२. वर्तमानकाळ पाहिला तर नीच्चवर्गातील पुरुषाला आणि उच्चवर्गातील स्त्रिला ही व्यवस्था फायद्याची आहे.
यातल्या काही त्रुटी:
१. बासमती, साखर आणि चहापत्ती वापरून एकच पदार्थ बनवता येत नाही.
२. कोणाला डायबेटीस असतो, किंवा चहा प्यायची सवय नसते तरी प्याकेजच घ्यावं लागतं कारण दुसरा पर्यायच नसतो किंवा सोशली एक्सेप्टेड नसतो.
३. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्याकेजमधे क्वालिटी काँप्रोमाइज होते. जरी ते ग्राहकाला स्वस्त डील भासत असलं तरी ते तसं नसतं.
साखरभात (उगीच आपला बशीभर हं)
साखरभात (उगीच आपला बशीभर हं) आणि (मागाहून बंपर भरुन गरमागरम) चहा असा दुपारी चार वाजताच्या वेळेला करता येईल की बेत.. इच्छा मात्र पाहिजे. तिन्ही गोष्टींचा एकच सिंगल पदार्थ बनावा हे उगीचच गृहीतक.
शिवाय चहात घालायला आलं शेजारुन आणता येईल. एकमेकांच्या उपयोगी पडावं लागतं.
असा प्रश्न पडणे देखिल
असा प्रश्न पडणे देखिल खोडसाळपणाचे आहे. म्हणजे अर्थातच पुरावा मागणे अजिबात सयुक्तिक नाही. धन्यवाद.
==================================================================================================
बाकी लोकांना विज्ञानातले कोणते नेहमी साइट केले जाणारे नियम "अॅक्झिऑम्स" (सिद्धतेची गरज नसलेली, सिद्धता शक्य नसलेली, स्वयंस्पष्ट सत्ये) आहेत याची काही कल्पना नाही. पण समाजशास्त्रातल्या अॅक्झिऑम्सबद्दल मात्र वाखाणण्याजोगा आत्मविश्वास दिसतो.
They wanted to make sure that
They wanted to make sure that the child who inherits is their's.
यात पुरुषांचा हेतू स्त्रीयांवर अन्याय करण्याचा भासत नाही. इतर पुरुषांनी कोणा एका पुरुषावर अन्याय करू नये असा भासतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
हे मेक शोर करण्यासाठी २४ बाय ७ मॉनिटरींगचा मेकॅनिझम काय होता म्हणे?
(यामागे कुठे इथेच वाचलेले -"पुरुष ४२ वर्षे जगणार. स्त्रीया २१ वर्षे जगणार. स्त्रीया पुरुषांच्या ५०% असणार. पुरुष खूप लग्ने करणार. स्त्रीया एकपतिव्रता असणार." - हे सगळे एकत्र घेतले तर समाजात भूकेले पुरुष लांडगे भयंकर प्रमाणात असणार.)
आंतरधर्मीय /वंशीय संकरातुन
आंतरधर्मीय /वंशीय संकरातुन जन्मलेल्या व्यक्ती असतात जास्त आकर्षक आणि genetical fit
http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1265949/Mixed-race-peopl…
आकर्षक, हे ठीक; पण genetically fit हा कल्पनाविलास
दुव्यावरील लेखात "आकर्षक" हा मुद्दा सर्वेक्षणातून मांडला आहे, ते ठीकच.
पण hybrid vigour असे काही असू शकते, असे केवळ तत्त्व सांगितले आहे. हे तत्त्व मनुष्यांच्या आंतरजातीय/आंतरवांशिक पुनरुत्पादनात लागू करण्यालायक आहे का? हा कल्पनाविलास आहे. सर्वेक्षण वा अभ्यास नव्हे.
(उदाहरणांचे प्रमाण तकलादू आहे. एका-एका बराक ओबामा वा टायगर वुड्स च्या तुलनेत त्या-त्या क्षेत्रांत बिगर-मिश्रवांशिकांची संख्या फार मोठी आहे.
ही अजुन एक लिंक नीट्
ही अजुन एक लिंक नीट् वाचा
http://www.wikipedia.org/wiki/Population_bottleneck
population bottleneck (or genetic bottleneck) is a sharp
reduction in the size of a population due to environmental
events (such as earthquakes, floods, fires, disease, or
droughts) or human activities (such as genocide ). Such
events can reduce the variation in the gene pool of a
population; thereafter, a smaller population (of animals/
people) with a correspondingly smaller genetic diversity,
remains to pass on genes to future generations of offspring.
Genetic diversity remains lower, only slowly increasing with
time as random mutations occur. [1] In consequence of such
population size reductions and the loss of genetic variation,
the robustness of the population is reduced and its ability to
survive selecting environmental changes, like climate
change or a shift in available resources, is reduced.
Conversely, depending upon the causes of the bottleneck,
the survivors may have been the fittest individuals, hence
improving the traits within the gene pool while shrinking it.
This genetic drift can change the proportional distribution of
an allele by chance and even lead to fixation or loss of
alleles. Due to the smaller population size after a bottleneck
event, the chance of inbreeding and genetic homogeneity
increases and unfavoured alleles can accumulate.
छान लेख. पण फारच संक्षिप्त
छान लेख. पण फारच संक्षिप्त आहे.