बोस्की-इंटीमेट आणि सी -९०

१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्‍याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली .
दुपारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्‍या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली . मशीदीच्या वळचणीत भरणार्‍या मदरशात अरबी शिकवणारा नविन मास्तर आला.
मग उशीरानी का होईना हळूहळू दुबईच्या वार्‍याची झुळुक भटाब्राह्मणांच्या वाड्यांवर पण आली. आयटीआय मधून टर्नर -फिटर झालेली खरे खांबेट्यांची मुलं दुबईला गेली .
दुबईच्या पैशानी उंच वाटणारं आकाश हाताशी आलं . इंदीराजींची गरीबी हटाव मोहीम राबवूनही गरीबी हटली नाही पण या नव्या श्रम संस्कृतीनी घरावरचं खचत आलेलं आढं पुन्हा उंचावलं . तशी या दरम्यान पूर्वेकडे हाँगकाँग सिंगापूरची हवा पण जोरात होती पण दुबईसारखी मागणी तिकडे नव्हती .तिकडे स्वस्त चिनी कामगार उपलब्ध होते. अतीपूर्वेच्या आघाडीवर सामसूमच होती.
हिंदी -उर्दु बोलणारे मुस्लीम आखाताकडे आणि तैवान चिन कोरीयाचे श्रमबळ हॉगकाँग सिंगापूरकडे . धर्म आणि भाषेच्या वळणानी मनुष्यबळाचे होणार्‍या स्थलांतराचा हा उत्तम नमुना होता.
आखातात गेलेली सगळी मुलं येताना तीन वस्तू आठवणीने आणायची. बोस्कीचं झुळझुळतं कापडं -इंटीमेट स्प्रे आणि सोनीच्या सी -९० च्या कॅसेट. या तिन्ही वस्तू म्हणजे नव श्रीमंताची स्टेटस सिंबॉल . श्रम संस्कृतीचं फॅशन स्टेटमेंट.
कॅसेट आल्या .कॅसेट भरण्याची दुकानं आली. आपसात आवडणार्‍या गाण्यांची देवघेव व्हायला लागली . मग डुप्लिकेट सोनीच्या कॅसेटी आल्या .नल्ला कॅसेटीतून टेप भसाभसा बाहेर पडून टेपरेकॉर्डरच्या हेडला फास लावायची .कॅसेट असली -नकली समजणार्‍याकडे पोरं भक्तीभावानी बघायला लागली . हळूहळू सी ९० जाऊन टीडीकेच्या कॅसेटी आल्या. टीडीके नल्ला मिळायच्या नाहीत म्हणून त्यांचा भाव जास्त असायचा .
काही वर्षानी जंबो रोल भारतात कट व्हायला लागले आणि वर्शन रेकॉर्डींगची एक नवीनच कहाणी सुरु झाली.
पांढरं स्वच्छ झुळझु़ळीत बोस्कीचं कापड खरं म्हणजे कोरीयात तयार व्हायचं पण आपल्याकडे आलं दुबईमार्गे. बोस्की म्हणजे शॅटुंग सिल्कचाच एक प्रकार . पण शॅटुंग खरखरीत आणि जाड असतं बोस्की हलकं आणि पूर्णपणे मानवनिर्मीत धाग्यातून बनवलेलं .त्यामुळे डागळलं तरी थोडासा साबण लावला की परत टवटवीत स्वच्छ दिसायला लागायचं . त्या कपड्याची क्रेझ बरेच दिवस टिकली . हे नाव विस्मरणातही गेलं असतं पण लोकांनी त्यांच्या पॉमेरीयन कुत्र्यांची (मुलींचीही) नाव बोस्की ठेवायला सुरुवात केली आणि बोस्की कायमचं लक्षात राहीलं.पण हळूहळू बोस्कीच्या कापडाची नवाई संपली इंटीमेट चा सुगंधही कंटाळवाणा झाला.
दुबईच्या वार्‍याचा जोर कमी झाला आणि सिलीकॉन वॅलीचे वारे वहायला लागले .
दुबईच्या वार्‍यानी श्रमजीवींचा उध्दार केला आणि सिलीकॉन वॅलीनी बुध्दीजीवींचा .
जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .
एव्हरी अंडरडॉग हॅज हि़ज डे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

शीर्षकामुळे मला आठवण झाली ती "बोस्की गुलजार" या नावाची. आपल्या मुलीला गुलजार बोस्की म्हणतात असं लहानपणी वाचलं होतं, माझ्या डोक्यात बोस्की म्हणजे मुलीचं नाव असंच बसलं.

एकदम रामदासकाका लेखन, जुन्या काळच्या गोष्टी रंगवून सांगणारं. पारवळं म्हणजे नक्की काय? हा शब्द भोंडल्याच्या कोणत्याशा गाण्यातही ऐकलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .

हेच वाक्य इतक्या वेगवेगळ्याप्रकारे ऐकलं होतं तरी सुद्ध्या ह्या रुपात ऐकायला मिळेल अशी कल्पना नव्हती!

बाकी यावरून सिलीकॉन व्हॅली कसकशी दिसत गेली ते आठवलं. आई वडिलांकरता आलेल्या औषधांच्या डब्या, ते पांढरं ट्रिंग करून वाजणारं स्टॉप वॉच, हलक्या आणि साईज बदलता येणार्‍या चकचकीत स्टीलच्या काठ्या. खास अमेरीकन स्टाईलचे लांब पायमोजे (कधीकधी थर्मल्स), अचानक पोलो टिशर्टमध्ये दिसू लागलेले आजोबा, वगैरे.

अभिताभने 'विरुध'मध्ये वठवलेला विद्याधर रामकृष्ण पटवर्धन अन त्याची मराठमोळी बायको सुमित्रा हे इतके अस्सल दादरचे वाटले होते की विचारू नका. तसं वाटायचं कारण बहुतेक ते टिपीकल सिलिकॉन वॅलीचं 'आई-बाबा' पणच असावं. दादरच्या एखाद्या घरात त्या सिनेमातल्या किमान पाच गोष्टी मोजून दाखवू शकेन अशी पैजच लावली होती मी थेटरात मित्रांबरोबर. तो पॅनासॉनिकचा काळा कॉर्डलेस फोन, त्या शर्मिला टागोरच्या 'सेन्ट्रम'च्या मल्टिविटामिनच्या गोळ्या अजूनही लख्ख आठवताहेत, बाकीच्या गोष्टी मात्र विसरलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बोस्कीचं कापड वैगेरे माहीत नाही पण जुन्या आठवणी दिसतात ह्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

साईंटिफिक कॅलक्युलेटर = Casio fx-82 असं समीकरण होतं तेव्हा त्याची आठवण झाली. कुठे गेला माझा देव जाणे. भूतकाळात डोकावून पहायचं डोक्यात सुद्धा न यायचे दिवस होते ते. आता सतराशे साठ गोष्टि 'for memory lane' च्या नावाखाली ठेऊन दे म्हणून मुली मागे लागतात तेव्हा मी ओरडतो खरा. पण मग टाकायला म्हणून काढलेल्या अर्ध्याहून अधिक गोष्टि चुपचाप साठवणीच्या खोलीत नेऊन ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

बरोब्बर! फोर्टात स्मगल्ड माल विकणार्‍या मलबार्‍यांकडे असायचा. बोरीबंदरपासून ते फाउन्टनपर्यंत दोन्ही फूटपाथवर त्यांची दुकाने असायची. सोनीच्या कॅसेट्सही त्यांच्याकडे मिळायच्या. आता ते असतात की नाही कल्पना नाही कारण स्मगल्ड मालाची तेवढी क्रेझही आता नाही. बर्‍याच वर्षात फोर्टात जाणे झाले नाही.

लेख मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख
रामदास काकांचं लेखन म्हणजे प्रश्नच नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

लोकप्रभातला लेख वाचला. आपले लेखन 'सदर' म्हणून नियमित येणार आहे हे वाचून अत्यानंद झाला. आमच्याकडून शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मरणरंजन करावं तर रामदासांनीच. मात्र हा लेख वाचून, चमचमीत भेळ अर्धीच प्लेट खाल्ल्याचं फीलिंग आलं. अजून येऊ द्यात. सिलिकॉन व्हॅलीने भारतात पाठवलेल्या गोष्टींविषयी, आईबापांना घडलेल्या अमेरिका वाऱ्यांविषयी, आणि त्यातून घडलेल्या बदलांविषयी...

नल्ला जाऊदेत, कॅसेट म्हणजे काय हेदेखील आता समजावून सांगण्याची वेळ लवकरच येईलसं दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जो काळ मी पाहिलेला नाही तो काळही डोळ्यापुढे उभा राहिलासा वाटला यातच सारं काहि आलं.. हे असं काहि वाचलं की स्मरणरंजन हवंच हवं (तेही रामदासांकडूनच)! असं वाटतं.
हे सोनेरी वारं महाराष्ट्रात आलं नी गेलं.. मात्र केरळात (आपल्याकडे जशी सिलीकॉन वार्‍यांची आवर्तन चालु असतात तशीच) पिढ्यान्-पिढ्या आवर्तन घडली आहेत. (आधीच सोन्याची आवड होती त्यात) प्रचंड सोनं जवळ असण्याचं फ्याड केरळात दुबैनेच आणलं म्हणतात. दुबैची दारे उघडल्यावर केरळात पडलेला फरक यावर एक मस्त खुसखुशीत लेख एका विमानप्रवासात वाचला होता त्याचीही आठवण झाली. लेखकाचं नाव मात्र विसरलो.

बाकी पारवळं म्हंजे काय हा प्रशन मलाही पडलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पारवळं म्हणजे पारवे पक्षी. विहिरी, दर्ग्यांच्या इमारती, इ.इ. ठिकाणी राहणारे, राखाडी पंख पण निळसर/चमकदार हिरवट रंगाची मान असलेले पक्षी. इकडेतिकडे घाण करण्याबद्दल लै कुख्यात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अच्छा म्हंजे पारशी पोडप्यांसारखे वळचणीवर वागणारे ते Wink आम्ही त्यांना कबुतर म्हणतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रैट्ट यू आर. फक्त इतकेच की कबुतरांचा हाच एक कलर नस्तो, त्या विशिष्ट कलरच्या कबुतरांना पारवळ/पारवा(येकवचन) म्हण्तात्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख लै उशिरा वाचला, परंतु

जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .

हे वाक्य वाचून वा: वा: म्हण्ण्यासाठी हा धागा वर् काढत् आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं