महाराष्ट्रात दारुबंदी ?

http://www.dnaindia.com/india/report-after-beef-maharashtra-government-m...

या बातमीचा आशय खरा मानला , तर सरकार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण दारुबंदी लागू करण्याच्या विचारात आहे . मला वाटते असा कोणताही निर्णय घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते .याची कारणे खालीलप्रमाणे -

१. जर कायदेशीर दारुबन्दी झाली ,तर बेकायदेशीर दारुधन्द्याला बरकत येईल ,व भ्रष्टाचार वाढीस लागेल .कारण अट्टल बेवडे आणि विरन्गुळा म्हणून पिणारे आपली तहान कुठेतरी कशीतरी भागवणारच !

२. दारूतून मिळणारा प्रचंड महसूल बुडेल ,त्यामुळे सरकारी व प्रशासनिक खर्च चालवण्यास पैसे अपुरे पडू शकतात. याचे कारण अनधिकॄत आकडेवारी नुसार सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी ४०% उत्पन्न दारू व तंबाखूजन्य पदार्थान्च्या वरिल करांमधून येत असते. साहजिकच विकासकामाना निधिअभावी खीळ बसेल

३.महाराष्त्ट्रात येणार्या पर्यटकांच्याअ सन्ख्येवर विपरीत परिणाम होवून पर्यटन व्यवसायाला फटका बसेल.

४.राजकीय दॄष्ट्या भाजप लाअ हा निर्णय धोकादायक ठरेल कारण दारूबन्द्दी केल्यास पुढील निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

आपली मते अपेक्षित

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मी नक्की मत देणार नाही भाजपाला जर त्यांनी दारूबंदी आणली तर. बाकी कितीही चांगली कामं केली तरी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो. पण तुम्ही पार्टीला बोलावले की येत नाही. ऐनवेळी तुम्हास "गाईचं दूध" आठवतं. मागच्या वेळी तर तुम्ही चक्क विपश्यनेस निघून गेला होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मनोबा आणि बॅट्यासारख्या सनातन्यांबरोबर जावा बार मध्ये आणि मग सांगा तक्रारी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्रींशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी नक्की मत देणार नाही भाजपाला ...... बाकी कितीही चांगली कामं केली तरी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही या धाग्यावर पहिला प्रतिसाद दिलात की येऊन मत देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मीही.

(बुडन हटेला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो. पण येताना पहिल्या धारेची "घेऊन" या. माझ्यासाठी पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Once during prohibition, I was forced to live for days on nothing but food and water. _____ W C Fields

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारू बंदी व्यवस्थित राबविली आणि लोकांनी दारू आणि तंबाकू चे व्यसन तोडले तर सरकारचा खजाना निश्चित भरेल.
आत्ताचेच उदा: दोन दिवसापूर्वी उत्तम नगर मेट्रो स्टेशन पासून घर पर्यंत रिक्षा केला. सहज त्याला विचारले, विमा घेतला का? त्याने म्हंटले होय साहेब. मी म्हणालो बँकेत नेहमी किमान ५०० रुपये तरी ठेवावे लागतील. तो म्हणाला 'क्या मैं महीने में ५०० रुपया जमा नहीं कर सकता. एक बोतल कम पी लूँगा".
एकदा बचत करण्याची सवय लागली की माणसाचे स्वप्न वाढत जातात. दारू एवजी उपभोक्ता वस्तु तो जास्त विकत घेऊ लागेल. रोजगार वाढेल आणि सरकारी खजाना ही.

बाकी दारू एवजी गौ मूत्र (त्याचा स्वाद ही कडूच असतो) तेवढाच आनंद मिळेल Biggrin Biggrin ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बराच डोक्यात जाणारा प्रतिसाद आहे तरीही थोडक्यात काही प्रश्न,

बाकी दारू एवजी गौ मूत्र (त्याचा स्वाद ही कडूच असतो) तेवढाच आनंद मिळेल

तुम्हाला चव कशी माहीत ? (दोन्हीची!)
तुमच्या अनुभवानुसार गौ मूत्र किती पेग नंतर चढतं ते पण सांगा म्हणजे तसा प्रचार करायला..

'क्या मैं महीने में ५०० रुपया जमा नहीं कर सकता. एक बोतल कम पी लूँगा".
एकदा बचत करण्याची सवय लागली की माणसाचे स्वप्न वाढत जातात. दारू एवजी उपभोक्ता वस्तु तो जास्त विकत घेऊ लागेल.

तुमचे अर्थशास्त्राचे ज्ञान कसे आहे ते ठाऊक नाही. आम्हाला पण त्यातलं फारसं काही कळत नाही.. पण इतकं कळतं की हे लॉजिक किती गंडलंय ते. सगळे फक्त आणि फक्त सेविंगच करु लागले तरी अर्थव्यवस्था डब्यात जाईल हो.

बाकी न बोलणेच बरे. असो.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

फक्त चवीपुरते पाहिले तर दावे में दम है असं म्हणता यावं कदाचित. बाकी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रिय अश्वस्थामा
माझे अर्थशास्त्राचे ज्ञान सामान्य व्यक्ती कश्यारीतीने विचार करतो आणि अमलात आणतो, ते ओळखणारे आहे. अतिविद्वान लोकांचे अर्थशास्त्र काय असते मी ओळखत नाही. बाकी लॉजिक म्हणाल तर स्वत: लोक कसे वागतात हे बघितले आहे. उदा: १९९३ मध्ये आमच्या बिंदापूर जवळ झुग्गी वाल्यांना DDA फक्त १८ गज च्या प्लॉट वर एक संडास ते ही फक्त ३ फूट उंचीचे बिना छप्पराचे बांधून दिले (2००० च्या जवळपास). आणि कागदावर बँक कडून १५००० रुपयांच्या कर्जाजी सोय उपलब्ध करून दिले. २०-२५ टक्के लोक विकून गेले असतील हे गृहीत धरले तरी अधिकांश लोकांनी १५००० कर्ज घेऊन घरावर छप्पर टाकले. किती तरी मिस्त्री ठेकेदार झाले. कर्ज फेडण्यासाठी लोकांनी व्यसने सोडली. काही वर्षांतच हात रिक्षांच्या जागी, ऑटोरिक्षा आली. दुकाने उघडल्या गेली. सध्या अधिकांश घरे तीन माळ्याचे झाले आहेत. खाली दुकान आणि वर राहण्याची जागा. लोकांच्या घरी सुख सुविधेच्या वस्तू आल्या आहेत. सारासार विचार केला तर उपभोक्ता वस्तूंचा खप कितीतरी पट वाढला आणि रोजगार ही. अर्थव्यवस्थेला याचा फायदाच झाला. सरकारला कर ही जास्त मिळाले. हेच जर झोपडीत राहिले असते किंवा पूर्णपणे बांधलेले घर दिले असते तर त्यांची आज ही तीच परिस्थिती असती. अधिकांश लोक घर विकून मोकळे झाले असते आणि पुन्हा झुग्गीत आले असते. कुणीही आपले व्यसन सोडले नसते. (असे पूर्वी होत होते, म्हणूनच DDA नंतर अश्या योजना आणल्या). कारण ते सोडण्यासाठी आणि बचत करण्यासाठी प्रेरणा मिळाली नसती. पण १५००० रुपये कर्जाजे ओझे लवकर दूर केल्याने ते स्वत:च्या घराचे (एका खोलीचे का होईना )पूर्णपणे मालिक झाले. आणि एकदा ९९च्या फेर्यात लोक अडकले कि त्यांची भूक वाढत जाते.

लोकांची हीच मनोवृत्ती ओळखून पंत प्रधानांनी विमा योजना आणल्या आहेत. तुम्ही काहीतरी बचत करा, सरकार ही आपले योगदान देईल. (सरकार खैरात वाटणार नाही).

असो, आता तरी तुमच्या ज्ञानात वृद्धी झाली असेल, तर्क (लॉजिक) ही कळले असेल. असे मी समजतो.

बाकी मी कुठल्या ही कडू पेयाचे प्राशन करीत नाही. फक्त कडू पिणार्यांसाठी पर्याय सुचविला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईतजी जाऊ देत. मला आपला प्रतिसाद आवडला. बाकी दारुचे अतिउदात्तीकरण केलेलं कोणालाही खुपत नाही. थोडंसं खच्चीकरण केलं की मात्र टँव टँव सुरु होते. चालायचच आपल्यासारखे लोक म्हणजे - हाय! कंबख्त तूने पी ही नही वाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि ताई, माझा दारूबंदीला विरोध नाही, ज्यांना प्यायची असेल त्यांनी खुशाल प्यावी. पण दारू बंदी केल्याने सरकारी खजान्याला तडा पोहचेल, विकासाची कामे थांबतील असे मूर्खपणाचे विधान करणाऱ्या प्रवृतीला विरोध आहे. प्रत्यक्षात ज्या गरीब माणसाला दारूचे व्यसन नाही, तो आपल्या तटपुंज्या कमाईचा योग्य वापर करतो आणि काही वर्षातच त्याची परिस्थिती सुधारते. त्याचे जीवनस्तर सुधारते आणि त्याचा उपभोक्ता वस्तूंवरचा खर्च ही वाढतो आणि शेवटी फायदा सरकारलाच होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांची हीच मनोवृत्ती ओळखून पंत प्रधानांनी विमा योजना आणल्या आहेत. तुम्ही काहीतरी बचत करा, सरकार ही आपले योगदान देईल. (सरकार खैरात वाटणार नाही).
असो, आता तरी तुमच्या ज्ञानात वृद्धी झाली असेल, तर्क (लॉजिक) ही कळले असेल. असे मी समजतो.

तुम्हाला उपरोध कळाला नसेल असे तुमच्या मराठीच्या टोनवरुन मानतो आणि इतकंच सांगतो की तुमचं अर्थशास्त्रांच किमान लॉजिक देखील गंडलेलं आहे.

लोकांच्या मनोवृत्तीबद्दल तुमची भाष्ये पाहून मला तुमच्या मनोवृत्तीबद्दल कल्पना आलीच त्यामुळे यापुढे असोच.

पंतप्रधानांच्या योजनेबद्दल काहीही आक्षेप नाही (ती नक्कीच चांगली योजना आहे) पण तुम्ही काढलेला अन्वयार्थ थोरच आहे आणि इथे त्याचा दारुशी संबंध देखील थोरच. परत सांगतो, तुमचे दारु आणि गोमूत्राबद्दलचे वक्तव्य खालच्या दर्जाचे वाटले आणि म्हणून तो प्रतिसाद होता. पंतप्रधान वगैरे अवांतर करु नयेत.

बाकी मी कुठल्या ही कडू पेयाचे प्राशन करीत नाही. फक्त कडू पिणार्यांसाठी पर्याय सुचविला आहे.

गुड फॉर यु.
मग जे पितात त्यांना फुकटचा गोमूत्र प्या म्हणून सल्ला द्यायची काय गरज ? तुमचा निरर्थक खवचटपणाच दिसत नाही का त्यातून ?
वर गोमूत्रच का ? यात छुपा अर्थ (गोमूत्र प्या आणि पवित्र व्हा इ.इ.) अभिप्रेत आहे असे समजायचं का ?? तुम्हाला गोमूत्र पवित्र असेल म्हणून काय इतरांना पाजायला जाणार का ?
मी हिंदू असूनही मला ही गोष्ट (गोमूत्र पवित्र वगैरे) मान्य नाही (ज्याला असेल त्याला असो) आणि माझ्या दारु पिणार्‍या मित्रांना म्हणून मी 'कुठलेही मूत्र प्या त्याऐवजी' असे म्हणणार नाही, तसे म्हणण्याचा मला अधिकार नाही. तुम्ही तुमच्या मित्रांना म्हणून बघा हवेतर.

(मी यातले काही करत असेन/नसेन पण,) दारु पिणार्‍या, मासे/मटण खाणार्‍या, बीफ/पोर्क/साप खाणार्‍या (तसेच स्कर्ट घालणार्‍या, फेटा बांधणार्‍या, धोतर नेसणार्‍या, हेल काढून मातृभाषा/इंग्रजी बोलणार्‍या) इ.इ. बेसिसवर लोकांना खाली पहायची (पक्षी: स्वतःला फार उच्च समजायची) वृत्ती चीड आणणारी आहे. आणि असा मानभावीपणा चालवून घेणे देखील पटत नाही.
ज्याला जे करायचे आहे ते त्याने (त्या त्या ठिकाणच्या कायद्याच्या चौकटीत राहून) दुसर्‍याला त्रास न होईल असे करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

(मी यातले काही करत असेन/नसेन पण,) दारु पिणार्‍या, मासे/मटण खाणार्‍या, बीफ/पोर्क/साप खाणार्‍या (तसेच स्कर्ट घालणार्‍या, फेटा बांधणार्‍या, धोतर नेसणार्‍या, हेल काढून मातृभाषा/इंग्रजी बोलणार्‍या) इ.इ. बेसिसवर लोकांना खाली पहायची (पक्षी: स्वतःला फार उच्च समजायची) वृत्ती चीड आणणारी आहे. आणि असा मानभावीपणा चालवून घेणे देखील पटत नाही.
ज्याला जे करायचे आहे ते त्याने (त्या त्या ठिकाणच्या कायद्याच्या चौकटीत राहून) दुसर्‍याला त्रास न होईल असे करावे.

+१ गच्च सहमती...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिका, झारच्या अंमलाखालील रशिया येथपासून आपल्या महाराष्ट्रापर्यंत दारुबंदी वेगवेगळ्या काळात आणली गेली आहे आणि प्रत्येक वेळी तिचा पूर्ण फज्जा उडाल्यामुळे ती शिथिल करण्याची नामुष्कीहि पाहिलेली आहे. तरीहि प्रत्येक सरकारला केव्हातरी हा प्रयोग स्वतः करून पाहण्याचा आणि तोंडघशी पडण्याचा अनुभाव का घ्यावासा वाटतो हे एक कोडेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीहि प्रत्येक सरकारला केव्हातरी हा प्रयोग स्वतः करून पाहण्याचा आणि तोंडघशी पडण्याचा अनुभाव का घ्यावासा वाटतो हे एक कोडेच आहे.

त्याला कारण 'नैतिक किडा!'. असे किडे प्रत्येक पक्षात असतात आणि जेंव्हा कुठल्याही स्वपक्षीय सरकारला ते चावतात तेंव्हा सरकार अशा गोष्टी करू लागतं!!!
संरक्षण, परराष्ट्र्व्यवहार इत्यादि सामान्य जनतेशी डायरेक्ट संबंध नसलेली कामं सोडली तर सामान्य जनतेच्या बाबतीत सरकारचं काम काय तर प्रत्येक कमवत्या माणसा/व्यवसायाकडून चोख कर वसूल करायचा आणि मग त्या पैशातून इन्फ्रास्ट्रक्चर (पाणी, वीज, रस्ते इत्यादि.) बांधायचं.
जेंव्हा हे करायचं सोडून सरकार नसत्या गोष्टी लादायला जातं; मग ती दारू/ मटका/ तंबाखूबंदी असो, किंवा रेडियो/दूरदर्शन चालवून त्यातून सरकार प्रोपगॅन्डा करणं असो, तेंव्हा कुठलंही सरकार तोंडावर हापटतंच!!
आणि ते तसं हापटायला हवं!!

कोल्हटकरसाहेब, तुम्ही आम्हाला जेष्ठ आहांत म्हणून तुमच्यासाठी नाही, पण
इतर ऐसीकरांसाठी गृहपाठः तेंव्हा मुलांनो सांगा बरं, सध्याच्या सत्ताधारी पक्षातले असले किडे कोण?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0