Skip to main content

सोपान

यायचा हाती कसा हा गंध पळता
रानवार्‍याच्या पुढे मागे न करता

खिन्नता दाटून आली उतरताना
पाहिजे होता तुझा आलेख चढता

अवकळा आली कशाने ह्या घराला
कोण आहे येथला कर्ता सवरता

नाटकामध्ये तसे काहीच नव्ह्ते
वाटला रोमांचकारी मंच हलता

पायरी बदलायची नाही कुणाला
पाहिजे सोपान सार्‍यांना सरकता

-विजय दिनकर पाटील

तिरशिंगराव Mon, 27/07/2015 - 13:50

कविता आवडली.

मन भटके, विचारांत गुंतता
साष्टांग नमस्कार पुरता
तो सोपान संपता,संपता!

.शुचि. Mon, 27/07/2015 - 18:47

आवडली.

अवकळा आली कशाने ह्या घराला
कोण आहे येथला कर्ता सवरता

:(
.

पायरी बदलायची नाही कुणाला
पाहिजे सोपान सार्‍यांना सरकता

चपखल.