पहिले बाजीराव पेशवे - अपराजित सेनापती
पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला. त्यांचे वडिल बाळाजी विश्वनाथ, आई राधाबाई, व भाऊ चिमाजीअप्पा. पेशवे बाळाजी विश्वनाथांच्या मृत्युनंतर केवळ वयाच्या 20 व्या वर्षी शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे, शिक्के व कट्यार बाजीरावांना दिली. हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे होते.
पहिल्या बाजीरावांनी 40 वर्षाच्या आयुष्यात, 20 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक लढाया लढल्या व सर्व जिंकल्या. वेगवान हालचाल हीच त्यांची प्रभावी रणनीती होती. शत्रू सावध होण्यापुर्वीच हल्ला करून त्याला प्रतिकार करायला वेळच मिळू द्यायचा नाही. उभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावांनीच पुण्याला शनिवारवाडा बांधला व पुण्याला महत्त्व मिळवून दिले.
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" याने छत्रसाल बुंदेल्यावर स्वारी करून त्याला शरण आणले. तेव्हा छत्रसालने बाजीरावांकडे मदत मागितली. पत्र मिळाल्यावर लगेच ३५-४० हजारांची फ़ौज घेउन बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेले. ही हालचाल इतकी झटपट केली की बाजीराव धडकेपर्यंत बंगेशला कळलेच नाही व बेसावध बंगेश एका गढीत अडकला. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्नाचा मुलूख व आपल्या उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली.
बाजीरावांना पहिली पत्नी काशीबाईपासून नानासाहेब, रघुनाथराव व जनार्दनराव हे 3 व मस्तानीपासून समशेरबहाद्दर उर्फ कुष्णराव हा 1 असे 4 मुले झाली.
रावेरखेडी या गावी विषमज्वराने 28 एप्रिल 1740 रोजी बाजीरावांचे निधन झाले.. बाजीरावांचे 6 फूट उंच, पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व होते..बाजीरावांना खोटेपणा, अन्याय, ऐषाराम अजिबात खपत नसे. उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते.
थोरल्या बाजीराव पेशव्यांबद्दल
थोरल्या बाजीराव पेशव्यांबद्दल एकमेव उत्तम पुस्तक म्हणजे व्ही.जी.दिघे यांचे 'पेशवा बाजीराव द १ & दि मराठा एक्स्पान्शन' हे आहे, ते वाचावे अशी विनंती. खालील लिंकेवरून उतरवून घेता येईल.
http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/13175
अवांतरः माँटगोमेरीच्या पुस्तकात हा रेफरन्स कै. निनाद बेडेकर यांजकडून स्वहस्ते पाहण्याचे भाग्य लाभलेले आहे. बाजीरावांचे हस्ताक्षर असलेले फर्मानही मूळ कॉपीसकट तिथेच पाहिले.
या पुस्तकाच्या लिंक करता
या पुस्तकाच्या लिंक करता धन्यवाद.
सुंदर आणि माहितीपुर्ण लिंक
सुंदर आणि माहितीपुर्ण लिंक. वाचतो आहे.
एक निरिक्षण : १९४४ ची मराठी भाषा आणी आजच्या मराठी भाषेत बराच फरक वाटतो. पण तुम्ही दिलेल्या पुस्तकातील इंग्रजी आणि आज वापरले जाणारे इंग्रजी यात मलातरी फारसी तफावत आढळली नाही. असे का याचा विचार करतोय. (अपवाद फक्त Shall and will वापरण्याच्या). आम्ही I आणी We च्या पुढे will चुकून वापरले तरी आमचे शिक्षक आम्हाला फटकवून काढायचे. आज मात्र Shall चा उपयोग फारच मर्यादित झाला आहे.
शॅल च्या वापराबद्दल सहमत.
शॅल च्या वापराबद्दल सहमत. बाकी कुठल्या भाषेत किती फरक पडला हे थोडेसे त्या त्या भाषेच्या एक्स्पोजरशी संबंधित असावेसे वाटते. आपण मराठी म्हणून ते जास्त जाणवते असे असेल. किंवा खरेच फरकही असेल. इन दॅट केस मग असे म्हणता येईल की मराठी रिसिव्हिंग एंडला होती, गिव्हिंग एंडला नव्हती त्यामुळे तिच्यात फरक जास्त पडला.
याबद्दल एका इंग्रजाने एक रोचक
याबद्दल एका इंग्रजाने एक रोचक निरिक्षण नोंदवले.
तर तो म्हणे तुम्ही भारतात इंग्रजी शिकलेले बोलताना बरीचशी इंग्रजी ५० च्या दशकात होती तशी वापरता असं वाटतं. आताचे भाषिक विनोद (श्लेष आणि इतर तर्हा) अथवा आताच्या भाषेतले बरेचशा गोष्टी तुमच्या भाषेत आढळत नाहीत. अजून एक म्हणजे की आपण भारतीय अजूनही बर्याच जड शब्दांचा वापर करतो जे की इथली कोणतीच जनता वापरत नाही. (ठळक फरक मला भारतातले इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना आता जाणवतो.)
(तो पंचविशीत असेल आणि हे सहज निरिक्षण होतं, तो काही यातला अभ्यासू वगैरे नव्हे. म्हणून देखील त्याचं म्हणणं रोचक वाटलं.)
शाळेतली भाषा ही इंग्रज
शाळेतली भाषा ही इंग्रज वापरतात ती इंग्रजी शिकतात लोक पण व्यहारात सिनेमा/टीव्हीमुळे अमेरिकन अशी खिचडी दिसते.
याचं एक कारण आपल्याला
याचं एक कारण आपल्याला इंग्रजीतला कलोक्वियल भाग कधीच शिकवला गेला/जात नाही हे असावं.
कारण आपली 'रिसीव्ह्ड' इंग्रजी
कारण आपली 'रिसीव्ह्ड' इंग्रजी ही डायनॅमिक नसून स्टॅटिक आहे. त्यात जी भर घातली जातेय ती भारतीयीकरणाचीच आहे तस्मात १९५० नंतरच्या ब्रिटनमधील भाषेशी मेळ न खाणे क्रमप्राप्तच आहे, नै का?
अर्थात.. मान्यच. माझी
अर्थात.. मान्यच.
माझी प्रतिक्रिया या खालील निरिक्षणाच्या अनुषंगाने होती.
बादवे, आता बर्याच ठिकाणी indian english हा ऑप्शन पहायला मिळतो आजकाल. ते तू म्हणाला तसं भारतीयीकरणाचेच फलित म्हणायचं. :)
पेशवे शूर होते,पण बायकांच्या
पेशवे शूर होते,पण बायकांच्या नादी लागून नैतीकता गमावून बसले.'**पाई पेशवाई गेली 'अशी प्रसिद्ध म्हण आहेच.
एकापेक्षा अधिक लग्ने करणे हे
एकापेक्षा अधिक लग्ने करणे हे अनैतिक असेल तर मग तुम्ही कुणावर आरोप करताय कळतंय का? :)
बाकी ती म्हण ब्रिगेडच्या हेडक्वार्टर्समध्ये ऐकली असेल ना?
लग्न करने म्हणजे अनैतीकता
लग्न करने म्हणजे अनैतीकता नव्हे हो,तर जनकल्याण सोडून घटकंचुकीचे खेळ खेळत बसणे हे गैर आहे.
बायका ठेवणे हे गैर असेल तर
बायका ठेवणे हे गैर असेल तर मोजके अपवाद वगळता सगळ्यांनीच तो प्रकार केलेला आहे.
बाकी घटकंचुकीच्या कथांसोबत घसरगुंडीच्या कथाही आहेत त्यांबद्दल काय म्हणणं आहे?
घटकंचुकी बद्दल एकले आहे,हे
घटकंचुकी बद्दल एकले आहे,हे घसरगुंडी काय प्रकरण आहे? इथे देणे इष्ट नसल्यास ,खरड टाकल्यास आभारी राहीन.
समस्त पश्चिम महाराष्ट्रात,
समस्त पश्चिम महाराष्ट्रात, त्यातही दक्षिण महाराष्ट्रात ह्या कथा मशहूर आहेत अन त्यातही बहुजन समाजात फेमस आहेत. साडेतीन टक्केवाल्यांमध्ये नव्हे.
या कथा पेशव्यांशी संबंधित नसल्याने तुम्ही दुर्लक्ष केले असावे किंवा वेड पांघरून पेडगावला जात असाल. :)
हे घसरगुंडी काय प्रकरण
ऑ, घसरगुंडी माहीती नाही तुम्हास. फारच ब्वॉ सात्विक तुम्ही. हाय कंबख्त तूने पीही नही. :-)
कोल्हापुरात कोणासही विचारा. अगदी चौथी पाचवीतले पोर सुद्धा सांगेल ... रसभरीत वर्णन करून. :-)
लग्न करने म्हणजे अनैतीकता
लग्न करने म्हणजे अनैतीकता नव्हे हो,तर जनकल्याण सोडून घटकंचुकीचे खेळ खेळत बसणे हे गैर आहे.
वा! काय बाणेदार प्रतिसाद
वा! काय बाणेदार प्रतिसाद आहे!!! ;)
पण बायकांच्या नादी लागून
नैतिकतेची इतकी सैल व्याख्या ???
ज्या जनतेचं भलं करावं अशी राज्यकर्त्यांकडून अपेक्षा असते त्या जनतेत ४०% ते ५५% स्त्रियाच असतात. मग ४०% ते ५५% लोकसंख्येच्या नादी लागणे व त्यांचं भलं व्हावं म्हणून ध्यास असणे हे अनैतिक म्हणावे का ??
( मी तुमच्या मुद्द्याचा विपर्यास करतोय असे म्हणणार का तुम्ही ? )
माफ करा पण पेशवे काही स्त्री
माफ करा पण पेशवे काही स्त्री सबलीकरण करत होते असा काही गैरसमज झाला असल्यास तो दूर करायला हवा आपण,पेशव्यांसाठी स्त्री फक्त उपभोगाची वस्तू होती.
त्या काळात कोण सबलीकरण करत
त्या काळात कोण सबलीकरण करत होते म्हणे मग?
मी ऑलमोस्ट असे वाचले बॅट्या
मी ऑलमोस्ट असे वाचले बॅट्या सानुनासिक आवाजात, पगडी घालून, म्हणतो आहे की त्या काळात "स्त्रियांचे सबलीकरण" वगैरे असली थेरे नव्हती हो. ;)
काय हे शुचिमामी, सानुनासिक
काय हे शुचिमामी, सानुनासिक आवाज म्हणता आणि तरी लिखाणात अनुस्वार गाळता. कुते फेदल हि पपे =))
पेशव्यांसाठी स्त्री फक्त
ऑ
बायकांच्या नादी लागणे व स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे असे समजणे ही दोन परस्पर विरुद्ध टोकं नसतीलही पण मोठ्या प्रमाणावर एकमेकांच्या विपरीत आहेत की नाही ?
समर्पक.
थोरले बाजीरावांचा स्मृती लेख आवडला . श्री.बॅटमॅन यांनी दिलेल्या पुस्तकाची लिंक सवडीने वाचेन.
लेखक ---- ऍड. विक्रम श्रीराम
हे कोण?
सर!
सर २.०!
आभार.
प्रतिसाद खवचट म्हणावा का माहितीपूर्ण?
हे घसरगुंडी काय प्रकरण
बाजीरावाने मस्तानीसाठी पर्वतीच्या पायथ्याला खास घसरगुंडी उभरली होती, अशी वदन्ता आहे. या घसरगुंडीच्या वापरच्या कथा संपुर्ण महाराष्ट्रात मशहूर आहेत. खरे खोटे देव जाणे.
सर्व पेशवे स्त्रीलंपट व
सर्व पेशवे स्त्रीलंपट व बहुपत्नी होते हे चुकीचे आहे. बाळाजी विश्वनाथ व त्याची दाेन मुले, पहिला बाजीराव व चिमाजीअप्पा हे पराक्रमी होते. पहिल्या बाजीरावला मस्तानी मुळे मनस्ताप झाला पण तो स्त्रीलंपट नव्हता. 40 वर्षाच्या आयुष्यात 20 वर्षाच्या कारकीर्दीत 41 लढाया केल्या एकाही लढाईत पराभव झाला नाही. त्याचा भाऊ चिमाजी अप्पा सुध्दा पराक्रमी होता. पहिल्या बाजीरावची दोन मुले नानासाहेब व राघोबादादा, नानासाहेब पराक्रमी होते. राघोबादादा पराक्रमी होता पण स्वत:ला पेशवे पद न मिळाल्यामुळे नाराज होता व आनंदीबाई व सल्लागारांचा सल्ला ऐकत. पण पेशव्यामधे मोठ्या मुलाला पेशवे पद देण्याची पध्दत होती. नानासाहेबला तीन मुले विश्वासराव, माधवराव व नारायणराव. विश्वासराव व चिमाजी अप्पाचा मुलगा सदाशिवभाऊ पानिपत मध्ये मारले गेले. माधवराव सत्तेवर आला तो पराक्रमी होता पण त्याला 40 वर्षाचे आयुष्य लाभले. नारायणरावाचा वध राघोबादाच्या पत्रात ध चा म आनंदीबाईने केल्यामुऴे झाला. नारायणरावच्या मुलाला सवाई माधवराव लहान असल्यामुळे नाना फडणीस यांनी बाराभाई च्या मदतीने पेशवाई चालविली. पण राघोबादादाचा मुलगा दुसरा बाजीराव मात्र स्त्रीलंपट व पळपुटा होता.
>>पण पेशव्यामधे मोठ्या मुलाला
>>पण पेशव्यामधे मोठ्या मुलाला पेशवे पद देण्याची पध्दत होती.
पेशवेपद छत्रपती देत असत ना?
बराेबर, पेशवे राजे नव्हते
बराेबर, पेशवे राजे नव्हते प्रत्येक गोष्टीत छत्रपतीची परवानगी घेत पण नावापुरती.
मुळात बाळाजी विश्ननाथ, पहिले बाजीराव, चिमाजीअप्पा, नानासाहेब, रघुनाथराव, माधवराव हे पराक्रमी होते.
माधवरावांचे आयुष्य २७ वर्षे होते... ४० नाही..
माधवराव पेशवे हे वयाच्या २७व्या वर्षी राजयकक्षमा (पोटातील आतड्यांचा क्षय) होऊन वारले.
पेशवे बायकांमुळे राज्य गमाऊन बसले
पेशवे बायकांमुळे राज्य गमाऊन बसले हे चुक आहे.
पहिला बाजीराव मस्तानीच्या
पहिल्या बाजीरावांनी आयुष्याच्या 40.वर्षातील 20 वर्षाच्या कारकीर्दीत 40 लढाया केल्या. अंदाजे एका वर्षात 2 लढाया आणि स्वत: लढाईवर लढत. त्यांना जास्त वेऴच कुठ होता मस्तानीशी प्रेम करत बसायला.
मित्र मैत्रिणींनो काहीही
मित्र मैत्रिणींनो काहीही प्रतिसाद देवून महान पराक्रमी पहिल्या बाजीरावाची बदनामी करू नका. मी तुम्हाला माझ्या पुढील लेखात शिवीजीच्या स्वराज्य कार्यात काेणी मदत केली काेणी विरोध केला हे सांगेन
तोपर्यंत हा लेख नीट वाचून
तोपर्यंत हा लेख नीट वाचून ठेवा. प्रश्न विचारले जातील. ;)
दिघेंच्या पुस्तकाची पीडीएफ उतरवून घेतली आहे. धन्यवाद.
बस कर पगले, अब रुलायेगा क्या!
बस कर पगले, अब रुलायेगा क्या!
कभी कभी रोना भी सहद के लिए
कभी कभी रोना भी सहद के लिए अछ्चा होता है.
कभी कभी रोना भी सहद के लिए
कभी कभी रोना भी सहद के लिए अछ्चा होता है.
कधी येतोय हा लेख?
आम्ही उत्सुक आहोत...
लाटकर साहेब, हे जे कोणी ऍड.
लाटकर साहेब,
हे जे कोणी ऍड. विक्रम श्रीराम एडके त्यांची परवानगी घेतलीयेत का त्यांचे लेखन इथे चिकटवायला?
बाकी चालु द्या!
मुघल आणि राजपूत राजांच्या हरम
मुघल आणि राजपूत राजांच्या हरम किती राण्या राहायचा याचा विचार केला तर पेशवे फारच सात्विक होते, असेल म्हणावे लागेल. बाकी पहिल्या बाजीरावाला प्रेम करायला किती वेळ मिळाला असेल, सतत घुड दौड आणि युद्ध यातच त्यांचा वेळ गेला. एक मस्तानी तिला हि ते न्याय देऊ शकले नाही.
बाकी पहिल्या बाजीरावाला प्रेम
यग्झाक्टली.
प्रेम करायला किती वेळ मिळाला असेल ?
असं काही नाही हो काका ! आमच्याकडे काही म्हणी आहेत. 'क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा' किंवा मग 'आवड असली की सवड होतेच'.
पेशव्याच्या बाबतीत माझा
पेशव्याच्या बाबतीत माझा शेवटचा प्रतिसाद, त्यानंतर पेशव्यांच्या बाबतीत काही लिहले तरी मी प्रतिसाद लिहणार नाही.
शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या निधना नंतर स्वराज्यात धामधुमी सुरू झाली. आैरंगजेबाने महाराजांचे स्वराज्य बुडविण्यासाठी दक्षिणेत कुच केले. शाहु महाराज उत्तरेकडून सुटून दक्षिणेत आले. शाहु महाराज व ताराबाईत सत्तेसाठी भांडणे हाेऊ लागली. ताराबाईंनी सर्व सरदार एकत्र करून शाहु महाराजांच्या विरूद्ध आघाडी उघडली. ताराबाईना निजामसुद्धा शाहु महाराजांच्या विरूद्ध साथ देवू लागला. त्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी धनाजी जाधव व कान्होजी आंग्रेनां शाहु महाराजांच्या पक्षात आणून ताराबाई बरोबर लढाई करून त्यांचा पराभव करून ताराबाईनां नजरकैदेत टाकले. तसेच निजामीाचा बदोबस्त करून शाहु महाराजांची सत्ता बळकट केली. शाहु महाराजांनी बाळीजी विश्वनाथांना पेशवे पद दिले. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्युनंतर शाहु महाराजांनी सर्वांच्या विरोधाला न जुमानता बाळाजी विश्वनाथांच्या कठीण काळात केलेल्या मदतीची आठवण ठेवून त्यांचा मुलगा पहिल्या बाजीरावांना पेशवे पद दिले. पहिला बाजीरावांनी पराक्रम करून मराठी स्वराज्य दिल्ली पर्यंत वाढविले. त्यांचा भाऊ चिमाजीअप्पाही प्रराक्रमी होते त्यांनी डच, पोर्तुगीजांचा पराभव करून तिकडे मराठी स्वराज्य वाढविले. त्यानंतर पहिल्या बाजीरावची मुले नानासाहेब व रघुनाथरावांनी प्रराक्रम करून मराठी स्वराज्य अटके पर्यंत वाढविले. पानिपत मध्ये नानासाहेबांचा मुलगा विश्वासराव व चिमाजीअप्पाचा मुलगा सदाशिवभाऊ मारले गेले. त्यानंतर माधवराव पेशवे झाले त्यांनी काही काळ स्वराज्य चालविले. पण त्यांचा 40 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा भाऊ नारायणरावांचा गारद्या कडून वध केला. त्यांनंतर नारायणरावाचा मुलगा सवाई माधवरावला गादीवर बसवून नाना फडणीसांनी बाराभाईच्या मदतीने स्वराज्य चालविले. व नंतर इंग्रज आले.
विकीपिडीया वर घटकंचुकी प्रकार
विकीपिडीया वर घटकंचुकी प्रकार कळाला. पण तेथे घसरगुंडी प्रकाराची माहिती कळली नाही.
सर्वांची उत्सुकता ताणून न धरता एकदाचे सांगुनच टाका.
पहिले बाजीराव पराक्रमी होते
पहिले बाजीराव पराक्रमी होते हे आपणा सर्वांना मााहित आहे. पहिल्या बाजीरावांनी मराठ्यांचे (येथे मराठा जात नव्हे तर सर्व जाती धर्माचे स्वराज्य) स्वराज्य दिल्ली पर्यंत वाढविले. पहिले बाजीराव मस्तानी मध्ये मग्न राहिले असते तर 20 वर्षाच्या कारकीर्दीतील एकही लढाई कसे काय हरले नसतील. प्रत्येक लढाईत बाजीराव स्वत: लढाई करत. त्यांचा मृत्यू सुद्धा तहामध्ये निळालेल्या भागाची सोय करण्यासाठी गेले तेव्हा झाला. तरी पहिले बाजीराव म्हणले की फक्त मस्तानी आठवते त्यांचा पपराक्रम आठवत नाही हे बाजीरावांचे दुर्दव आहे
रच्याकने, परवा ट्रेलर पाहिला
रच्याकने, परवा ट्रेलर पाहिला बाजीराव-मस्तानीचा.
https://youtu.be/NDEExEhvk1Y
बघावासा वाटला शिणुमा. संजय लीला भंसाळीचा असून.
+१
हेच म्हणतो. बाकी कशाकरिता नाही तरी इतिहास संवर्धनाकरिता एकदा टोकन हजेरी तरी लावली पाहिजे असे मत आहे. त्या निमित्ताने शिवाजी सोडूनही काही पराक्रमी मराठे होते हे कळेल.
शिवाजी सोडूनही काही पराक्रमी मराठे होते
महाराजांचा एकेरी उल्लेख करताय ? तुमची जी 'मनस्थिती' आहे तिची 'मनःशांती' विशिष्ठ अडल्ट मंत्र जे की 18+ साठी असतात आणि सोबत तुमच्या शरीराची माॅलीश करायला हवी.
मला धनुष्यातून सुटण्यास प्रवृत्त करू नका
---'ब्रह्मास्त्र'
अलेलेले, घाबल्लो बलं का!
ब्रह्मास्त्रात काय दम आहे हे पाहूच, पण त्याअगोदर हा माज गजानन मेहेंदळे सरांसमोर करून दाखवावा अशी नम्र विनंती आहे. त्यांनीही एकेरी उल्लेख केलेला आहे.
बाकी असा फालतूचा माज करणार्यांनी शिवचरित्राचे एक पान तरी वाचले असेल किंवा नाही याची शंकाच आहे.
बॅट्या - तो ट्रोल ड्युआयडी
बॅट्या - तो ट्रोल ड्युआयडी आहे. तू कशाला तुझी मनशांती डचमळवतोयस?
त्याने *** खाल्ला म्हणून तू खाणार काय?
आणि राहिला प्रश्न शिवचरित्राचे पान वाचण्याचा,
मी नाटकामध्ये शिवरायांची भूमिका केली होती.
आणि अर्थात त्याआधी त्यांचा पूर्ण अभ्यास केला होता.आणि फालतूचा माज मला नाही तो आपल्याच प्रतिक्रियांवरून कळतो.
आणखीन एक-शिवाजीमहाराज सोडून बाकी सगळे षंढ होते असे कोणी म्हटलयं का?
मग का उगाच त्रागा करून घेताय?
(माझी प्रतिक्रिया निरर्थक काय?आणि निरर्थक प्रतिकियेला आलेले प्रतिउत्तर हे मार्मिक कसे असू शकते?......एक गाणं आठवलं....गोलमाल है भाई सब गोलमाल है---)
----ब्रह्मास्त्र
हा हा हा, नाटकात भूमिका
हा हा हा, नाटकात भूमिका करणार्यांनी सर्वज्ञतेचा आव आणावा हे बाकी रोचक आहे.
त्यांना कदाचित उत्तेजनार्थ
त्यांना कदाचित उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं असावं....
आवारा
असल्या सुमार लेखनातून ऐसी सुटणार नाही हे आलंच. असो. प्रतिसाद बरयाचदा माहितीपूर्ण असतात यावरच समाधान मानावे हेच बरे.
नुकताच हाय वे चित्रपट पाहिला. मराठी संकेतस्थळ आणि "आपुले मरण पाहिले म्या" हा डायलॉग मारणारा त्याला प्रत्युत्तर देणारा यांच्यात निव्वळ सारखेपणा आहे. (संजोपरावांची परवानगी मागून : पब्लिक आयेलि है बॉस!)