शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत ज्ञात, अज्ञातांचे योगदान.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत विरोध करणारे घरचे व स्वकीय होते. चंद्रराव मोरे, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, खंडोजी खोपडे, बजाजी निंबाळकर, गायकवाड, गणोजी शिर्क, सुर्याजी पिसाळ इ.
यातील गणोजी शिर्क हा संभाजी महाराजांचा मेव्हणा होता. वतन न मिळाल्यामुळे नाराज होता, मोगल सरदार संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी दक्षिणेत आला तेव्हा मोगलाला मिळाला. त्याने मोगल सरदाराला संगमेश्वरचा आ़डमार्गातला रस्ता दाखवला जो रस्ता फक्त मराठ्यांनाच माहित होता. मोगलांच्या 5000 सैन्याशी संभाजीच्या 200 सैन्या-चा निभाव लागला नाही. मोगलांनी संभाजी महाराजांना कैद करून नंतर त्यांचा वध केला.
--------------------

याउलट शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीत मदत करणारे अठरापगड जातीतील, पुणे, मावळ व कोकण प्रातांतील राजासाठी आपल्या आयुष्याची आहुती देणारे लोक होते.

नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते हे सरनाैबत. यातील प्रतापराव गुजर याने शरण आलेल्या बहिलोलखानाला जीवनदान दिल्यामुळे शिवाजी महाराजांनी बहिलोलखानाला मारल्याशिवाय तोंड दाखवू नका असे सांगितल्यामुळे हा मानी व प्रराक्रमी वीर केवळ 6 साथिदारा बरोबर बहिलोलखानाच्या सैन्यावर तुटून पडला व वीर मरण पक्तरले. त्यावर कुसूमाग्रजांनी ॥ वेडात मराठे वीर दौडले सात ॥ हे काव्य केले.

बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद: पन्हाळगडावरून सिध्दी जोहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी शिवा काशीदने शिवाजी महाराजांचा वेष घालून स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले. बाजीप्रभू देशपांडेने घोडखिंड रोखून स्वत:चे प्राण शिवाजी महाराज विशाळगडावर पोहचल्यावर सोडले.घोडखिंडीचे नाव पावनखिंड झाले.

पंताजी गोपीनाथ, जीवा महाला, संभाजी कावजी: पंताजी गोपीनाथाने अफजलखानाचे मन वळवून भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी घडवून आणली. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघनखे खुपसून त्याला जखमी केले, तेव्हा सय्यदबंडाने शिवाजी महाराजांवर वार केला तेव्हा जिवा महालाने त्याचा हात वरच्यावर उडवला. जखमी अफजलखान पालखीतून पळू लागला तेव्हा संभाजी कावजीने भोयांचे पाय तोडले व अफजलखानाचे मुंडके उडवले. "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण रूढ झाली.

मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या लढाईत दिलेरखानाच्या सैन्याच्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना पराक्रम करत स्वत:चे प्राण सोडले.

हिरोजी फर्जद, मदारी मेहतर: शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता हिरोजी फर्जद शिवाजी महाराजां सारखी दाढी व वेशभुषा करून झोपला व मदारी मेहतर पाय चेपीत बसला.

तानाजी व सुर्याजी मालुसरे: कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी लढताना जखमी होऊन धारातीर्थी पडला. सुर्याजीने पळणार्या मावळ्यांना "तुमचा बाप येथे मरून पडला आहे कोठे पळता किल्ल्याचा दोर कापला आहे" म्हणून लढायला लावले व किल्ला जिंकला."गड आला पण सिंह गेला" ही म्हण रूढ झाली. कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड पडले

बहिर्जी नाईक: शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख. हा शत्रुच्या गोटात शिरून शत्रुची सर्व माहिती शिवाजी महाराजांना पुरवत असे.

कान्होजी जेधे: अफजलखान स्वारीच्या वेळेस अफजलखानाला मिळणार्या मावळातील देशमुखांना शिवाजी महाराजांच्या पक्षात आणले.
संभाजी महाराज वधानंतर व शाहु महाराज सुटून आल्यानंतर बिघडलेल्या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळून बाळाजी विश्वनाथानी धनाजी, आंग्रे इ. ना शाहु महाराजांच्या पक्षात आणले व शाहु महाराजांची सत्ता स्थापन केली. त्यानंतर पहिले बाजीराव, चिमाजीअप्पा, नानासाहेब, रघुनाथराव, माधवराव हे पेशवे व नाना फडणीस मराठ्याचे राज्य वाढविले.
असे ज्ञात व अज्ञात कितीतरी लोकांनी शिवाजीच्या स्वराज्याच्याव उभारणीला प्राणाची आहुती व मदत करून हातभार लावला त्या सर्वाना माझा सलाम!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तानीची काय चूक आहे राव? आणि राघोबाच्या पराक्रमाचं श्रेय आनंदीबाईला देता का? मग त्याची अपयशं तिच्या डोक्यावर फोडायचं काम नाही. बाकी काय पेशव्यांची लाल-गुलाबी करायची ती करा. पण हे चाळे नकोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

यात मस्तानीची काही चुकी नाही. बाजीराव—
मस्तानीचे एकमेकावर प्रेम होते. पहिल्या बाजीरावने मस्तानीला बायकोचा दर्जा दिला. समशेरबहाद्दरला मुलाप्रमाणे वागविले.मनस्ताप घरातील व पुण्यातील कर्मठ लोकांडून झाला.

राधोबादादा प्रराक्रमी होता याअटकेपार झेंडा फडकवला. पराक्रमी असूनही आपल्याला पेशवे पद न मिळाल्याची सल मनात असे. त्यात आनंदीबाई व सखारामबापू लावून देत.

रणजित देसाईचे स्वामी पुस्तक वाचा, आनंदीबाईची कारनामे कलतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> रणजित देसाईचे स्वामी पुस्तक वाचा, आनंदीबाईची कारनामे कलतील. <<

तुमच्या मते रणजित देसाई इतिहासकार आहेत का? त्यांनी लिहिलेले प्रसंग प्रत्यक्षात घडले होते ह्याला पुरावा काय? धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

श्री देसायांचे "स्वामी" वाचण्यापेक्षा त्यांच्या बायकोनी लिहीलेले पुस्तक वाचा लाटकर साहेब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री देसायांचे "स्वामी" वाचण्यापेक्षा त्यांच्या बायकोनी लिहीलेले पुस्तक वाचा लाटकर साहेब

तुम्ही माधवी देसाई यांच्या 'नाच ग घुमा' ह्या पुस्तकाबद्दल बोलत आहात काय?

त्या पूर्वाश्रमीच्या काटकर आणि आमच्या काटकरबाई! आमच्या शाळेत त्या मराठी माध्यमातील वर्गांना इतिहास आणि इंग्रजी माध्यमातील वर्गांना मराठी शिकवीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही कल्याणचे आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी कल्याण नव्हे पण कल्याणजवळील एका कंपनीच्या वसाहतीत बालपण गेले! (नाच ग घुमात थोडे वर्णन आलेच आहे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या शाळेत त्या मराठी माध्यमातील वर्गांना इतिहास

त्याच सुनिल, "नाच ग घुमा" वाल्या.

त्यांनी मुलांना इतिहास शिकवता शिकवता त्यांच्या अहोंना ( हे खास लाटकर साहेबांसाठी ) पण थोडा इतिहास शिकवायला पाहिजे होता असे क्षणभर वाटुन गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजीच्या स्वराज्या बद्दल च्या लेखात मस्तानी आल्यामुळे डोळे पाणवले.
नशिब लेखक तिथेच थांबला, अजुन जरा वाहवला असता तर कोढाळकरांच्या मस्तानी पर्यंत पोचला असता. वर तुलना करुन बाजीरावाची मस्तानी कशी गरम्-गरम आणि कोंढाळकरांची अंमळ जास्तच थंड असते हे ही सांगुन टाकले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम ठ्ठो प्रतिसाद झालाय. ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनु राव

हा मी जो लेख लिहला तो काही मस्तानीच्या रूपाचे व प्रेमाचे वर्णन करण्यासाठी लिहला नाही तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्य वाढीत कोणाकोणाचा सहभाग होता यावर होता.

मला एक कळत नाही इतक्या पराक्रमी पहिल्या बाजीरावचा काय दोष आहे. मस्तानीला त्याने बायको प्रमाणे वागविले. पेशव्यांचा दोष एकच ते बांम्हण होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामशास्त्री प्रभुणे यांची एक कथा होती पाठ्यपुस्तकात. आता आठवत नाही. मला ती आवडायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आनंदीबाईच्या ध चा म करण्यामुळे नारायणरावचा गारदीच्या हाती वध झाला.

ध चा केला असता तर सुमेरसिंग गारद्याने आत्महत्या केली असती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वारले. आवरा. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'वारले'ऐवजी 'वरले' म्हणाला असतात तर जाम मजा आली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या प्रतिसादात विवाहसंस्थेचे छुपे समर्थन दिसते. अश्लील, अश्लील, अश्लील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन्ही प्रतिसादांना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुमच्या मते रणजित देसाई इतिहासकार आहेत का? त्यांनी लिहिलेले प्रसंग प्रत्यक्षात घडले होते ह्याला पुरावा काय?

इतिहासात प्रत्यक्षात काय घडले याचा पुरावा कोणीच देऊ शकणार नाही.

आपल्या भारतीयांच्या आपसातील भांडणे, फितुरी याचा फायदा परकीयांनी बरोबर घेतला. त्यावेळचे सगळे राजे एकत्र येऊन फक्त खैबर खिंड बंद केली असती तर अफगणिस्तान कडून होणारी आक्रमणे बंद किंवा कमी झाली असती.

लिहलेल्या लेखामधील काना, मात्रा, उकार, रस्व यातील चुकाच काढत बसायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते सगळं ठीक आहे पण

पन्हाळगडावरून सिध्दी जोहरच्या वेढ्यातून शिवाजी सुटण्यासाठी शिवा काशीदने शिवाजीचे वेष घालून स्वत:चे प्राण दिले.

हे सिद्दी आहे हो . Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

द ला ध जोडले की द्ध होते

आणि

ध ला द जोडले की ध्द होते

हे लक्षात घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इतिहासात प्रत्यक्षात काय घडले ह्याचा पुरावा कोणीच देऊ शकणार नाही. म्हणूनच अमुक एक माणसाने अमुक एक कृती केली ह्यापेक्षा पॉलिसी डिसिजन्स किंवा अनेक सोर्सने व्हेरिफाय होणाऱ्या घटना ह्यांना इतिहास मानले पाहिजे. म्हणजे अमुक एक माणसाचा खून करवला गेला असं बऱ्यापैकी विश्वासाने म्हणता येऊ शकतं, पण तो 'ध' चा 'मा' करून झाला का 'फो' ची 'पो' करून झाला ह्यावर किती विश्वास ठेवावा ह्याचं प्रमाण रहात नाही. पण जो मूळ लेख आहे तो सांगोवांगी अधिक आहे. इतिहास= ऐतिहासिक कादंबरी=शाहिरी=कथा ह्या सांस्कृतिक थिअरीला खरं मानायचं की हायपोथिसिस टेस्टिंगच्या मार्गाने जाणाऱ्या (अधिकाधिक शक्य विधाने अशा अर्थाने केलेल्या) आणि पुराव्यांच्या अ-भावनिक आधारावर केलेल्या मांडणीला इतिहास म्हणायचं? आणि इतिहास हा प्रेरणेचा डोस आहे असं जे गृहीतक वावरतं आहे त्याचं काय? कारण ते जर मानलं तर इतिहास म्हणजे केवळ पूर्वज उदोउदो आणि चवीला किंचित हळहळ अशीच व्हर्जन प्रसवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजीच्या ???? अरे बाबा तु मराठी आहेस काय ? महाराजांना एकेरी नावाने हाक मारणारा माणूस मराठी नव्हेच. पहिल्या शब्दापाशीच थांबलो आणी मग लेख पुढे वाचलाच नाही. असो. तसा मी 'अस्मिता' वगैरे बाळगणारा माणूस नाही पण शिवाजी हे नाव आणि महाराज हे संबोधन आहे हे काहीही केल्या पचनी पडत नाहीच आणि कुणीही कितीही शाळा घेतली तरी पचवून घेण्याची तयारी नाही. असो !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजीच्या ???? अरे बाबा तु मराठी आहेस काय ? महाराजांना एकेरी नावाने हाक मारणारा माणूस मराठी नव्हेच.

इतिहासाचार्य राजवाडे, मेहेंदळे सर, लोकमान्य टिळक, वगैरे लोक मराठी नसल्याची नव्याने जाणीव करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

रामकृष्णासारख्या देवांना अरेतुरे चालतं तर शिवाजीलाच अनेकवचनाचा अट्टाहास का, याही प्रश्नाचे कॄपया उत्तर द्यावे अशी विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माफ करा ! तुम्ही नाव घेतलेल्या सर्व व्यक्ती कितीही मोठ्या असल्या तरी त्याने माझे मत बदलत नाही. ते तुम्हाला चुकीचे वाटत असले तरी. या नावाशी माझ्या विशिष्ट भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर मी कोणताही वादविवाद आणी तर्क देत नाही. माझे बरेच जालीय प्रतिसाद तुम्ही वाचले असतील. त्यातून तयार होणार्‍या प्रतिमेशी हा प्रतिसाद सुसंगत नाही हे मला माहिती आहे.
धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरकत नाही. फक्त एवढेच सांगतो की इ.स. १९७० पर्यंत हा एकेरी उल्लेख सर्रास चालायचा. तेव्हापर्यंतचे लोक बहुधा मराठी नसतील, शिवद्रोही असतील असे समजायचे, नाही का? मी तुमच्या तर्काला चॅलेंज न करता फक्त त्याचे इंप्लिकेशन सांगतो आहे. अलीकडे साध्या एकवचनी उल्लेखावरूनही पेटणारी, मारहाणीची भाषा करणारी टाळकी पाहिली की हे सांगणे गरजेचे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा जन्म १९७० नंतरचा. हेमंत लाटकरांचाही नसावा बहुतेक. त्यामुळेच बहुधा एकेरी उल्लेख पचनी पडत नसावा. असो. बहुत काय बोलणे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी आत्तापर्यंत सुद्धा एकेरी उल्लेख आहेत. आणि ते सगळे प्रचंड आपुलकीने केलेले आहेत. राम कृष्णांबद्दल तुम्ही म्हणता तसेच. अगदी गोविंद पानसर्‍यांनी पण केलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि जाता जाता हेही सांगायला हरकत नाही की असा एकेरी उल्लेख करणार्‍या अनेक इतिहासकारांनी शिवचरित्राचे जितके संशोधन केले, जितका तो इतिहास जगासमोर आणला त्याच्या सहस्रांशानेही फक्त अनेकवचनासाठी ओरडणार्‍यांनी काम केलेले नाही. काम करणे राहोच, इतिहास वाचण्याचे श्रमही घेतलेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यांचे भाषण ऑगस्ट २०१४ मधले
https://www.youtube.com/watch?v=Vp5KAzVCG1Q

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुत धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो शिवबा! असं म्हणता तुम्ही?
आमचा शिवबा न्हेमीच आमचा र्‍हायलाय आमचे न्हवं.. म्हंजी आम्हाला आदर न्हाय आसं न्हवं, त्यो आम्हाला आमचा आपुलकीचा वाट्टोया म्हनून!

म्हाराज म्हंटाना आपोआप व्हतंय की अहो जावो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पु ल देशपांड्यांनीही तो शिवाजी, हा शिवाजी असा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यांनाही नॉनमराठी वगैरे ठरवलेले पाहिले की अजून उद्बोधन होईल.

मेहेंदळे सरांच्या शिवचरित्राच्या प्रस्तावनेतले पहिली काही वाक्ये खालीलप्रमाणे:

"या शिवचरित्रात सर्वत्र शिवाजीचा उल्लेख एकेरी केलेला आहे. त्यामागे माझी अनादराची भावना आहे असे कोणी समजू नये. आईला, देवांना आपण एकवचनी हाक मारतो त्यामागे आत्मीयतेची भावना असते. तरीही जर कुणाच्या भावना दुखावत असतील तर मी त्यांची माफी मागतो."

१९६०-७० पर्यंत एकेरी उल्लेख सर्रास चालायचा. पुढे पुढे बहुवचनी ब्रिगेडचा जोर झाला आणि हा प्रकार थांबला.

अलीकडे एका तरुण इतिहासकाराने आग्राभेटीबद्दल एक इंग्रजी पुस्तक लिहिले, त्यात Shivaji's visit असा एकेरी उल्लेख का केला म्हणून काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते बोंब मारत होते, मारहाणीची भाषा बोलत होते. त्यांच्या रिकाम्या डोक्यात काय भरायचं आता तुम्हीच सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंग्रजी भाषेत मराठयांचा किंवा आणि कोणाचा इतिहास लिहिणारा असतो त्यांना मी उदार मनाने माफ करतो. Smile
अजोंच्या भाषेत काय ते "भाषिक दौर्बल्य' का काय ते समजून. पण मराठी माणसाने, मग ते टिळक का असेनात, नाही पचनी पडत. असो.
टीप : मात्र ब्रिगेडी विचारांचे मी कोठेही समर्थन करीत नाही व पुढेही करीन असे वाटत नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचा शारिरीक हिंसा हा माझा प्रांतच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी असो, पण इंग्रजी भाषेत आदरार्थी बहुवचन हा प्रकारच नाही त्याला लेखक तरी काय करणार? तेव्हा उदार मनाने माफ करायचे तर इंग्रजीच्या व्याकरणकारांना, लेखकाला नव्हे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मात्र त्यांच्या प्रांतातले राजे आणि राणी असले तर सर, मॅडम, हिज आणि हर हायनेस हे शब्द बरे सापडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं तर, हे पहा मग.

शिवाजी द ग्रेट नामक चारखंडी चरित्र आहे, पैकी २ खंड ऑनलाईन उपलब्ध आहेत. एकवचन वापरूनही आदर कसा काय दाखवला हे कोडेच आहे, नै?

https://archive.org/stream/shivajithegreat035466mbp/shivajithegreat03546...

राज्याभिषेकानंतर ऑलमोस्ट सगळीकडे राजा म्हणूनच त्यांचा समकालीन साधनांत उल्लेख होतो (यात अनेक युरोपियन साधनेही आलीच) हेही जमल्यास पहावे, म्हणजे पूर्वग्रह दूर होतील. शेवटी श्रद्धा काहीही असो, विदा काय आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण सत्याधारित असणे हे असत्याधारित असण्यापेक्षा कधीही चांगले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रद्धा जाणीवपुर्वक बदलू इच्छित नाही हो. उगा जालीय उत्खननाचे श्रम का घेता ? आमचा घडा आम्ही या बाबतीत पालथा ठेवलेला आहे.
कोणा गुजराती कविने म्हटलयं ना की 'श्रद्धानो जो हो विषय तो पुरावानी जरुर नथी ! कुराणमां क्यांय पण पैगंबरनी सही नथी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या श्रद्धेला हात घातलेलाच नाही हो, फक्त जे आक्षेप घेतलेत त्याला काउंटर विदा दिलेला आहे. बाकी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाजीच्या ???? अरे बाबा तु मराठी आहेस काय ? महाराजांना एकेरी नावाने हाक मारणारा माणूस मराठी नव्हेच.

मराठी माणूस नसलो असतो तर हा लेख लिहला असता का?
ज्या माणसावर किंवा देवावर आपण खुप प्रेम करतो त्याला आपण प्रेमाणे एकेरी नावाने हाक मारतो. त्यात आपल्याला त्या व्यक्तीचा अनादर करायचा नसतो.

या साईट वर प्रत्येकाच्या लेखात चुका काढण्यापेक्षा प्रोत्साहन दिले तर अजून लिहण्याचा हुरूप येईल. काना मात्रा, पहिली?दुसरी वेलांट्या या चुका कळतात, पण editing करता येत नसल्यामुळे काही करता येत नाही,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात कधीही आणि प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद येईस्तोवर लेखनात संपादन करता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिवाजीच्या ???? अरे बाबा तु मराठी आहेस काय ? महाराजांना एकेरी नावाने हाक मारणारा माणूस मराठी नव्हेच.

मराठी माणूस नसलो असतो तर हा लेख लिहला असता का रे बाबा.

ज्या सतपुरूषावर किंवा देवावर आपण खुप प्रेम करतो त्याला आपण प्रेमानेे एकेरी नावाने हाक मारतो. त्यात आपल्याला त्या व्यक्तीचा अनादर करायचा नसतो. ही चुक मलाही न सांगता कळली पण आता editing करता येत नाही.

या साईट वर प्रत्येकाच्या लेखात चुका काढण्यापेक्षा प्रोत्साहन दिले तर अजून लिहण्याचा हुरूप येईल. काना मात्रा, पहिली?दुसरी वेलांट्या या चुका कळतात, पण editing करता येत नसल्यामुळे काही करता येत नाही,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुका काढणार्‍यांना आपलं म्हणा हो ! प्रगतीसाठी बरं राहतं ते !

ज्या सतपुरूषावर किंवा देवावर आपण खुप प्रेम करतो त्याला आपण प्रेमानेे एकेरी नावाने हाक मारतो.
प्रेमाचा असाच नियम असेल तर मग आमची पिढी आपल्या वडीलांवर, शाळेतील शि़क्षकांवर, कार्यालयातील जेष्ठांवर प्रेम न करताच वाया गेली असे म्हणण्यास पुरेपुर वाव आहे.
असो. या विषयावर कितीही चर्चा केली तरी आपली कुंडली जुळेलच असे नाही तेव्हा धाग्यापे़क्षा प्रतिसादांवर जास्त चर्चा होऊन धागा हायजॅक करण्याचे पाप माथी घेत नाही.
धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्मराजमुटके आता लेख वाचा.

आदिती थॅक्यू editing ची माहिती सांगितल्या बद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले बाळबोध आणि सर्वांना ठाऊकच असलेले लेखन तुम्ही का पाडता? इथल्या सर्वांना ह्यातील सर्व माहीत आहे.

जाताजाता एक महत्त्वाची दुरुस्ती. 'मोगल सरदाराला संगमनेरचा रस्ता दाखवला?' संगमेश्वरचा! हे संगमेश्वर (ह्यालाच काही जागी 'शृंगारपूर' म्हणतात असे वाटते) खाली दक्षिण कोकणात आहे आणि संगमनेर वर अहमदनगर जिल्ह्यामध्ये.

मुघल सरदाराला अंगमनेरचा रस्ता दाखवण्याची आवश्यकता का पडावी? आयुष्याच्या शेवटच्या २५ वर्षात औरंगझेब स्वतः आणि त्याचे प्रमुख सैन्य महाराष्ट्रातच ठिय्या देऊन बसले होते आणि त्यापैकी कैक वर्षे औरंगझेब अहमदनगरमध्ये आणि आसपास - संगमनेरच्या भागातच - राहिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाळबोघ लेखन: मी काही लेखक नाही आणि तुमच्या सारखा हुश्शार अमेरीकेत असणारा.

संगमनेर: सगंमेश्वर च लिहयाच होत चुकून सगंमनेर झाले.

रस्ता दाखवणे: हे सर्व गुप्त कारस्थांन होते. सरळ रस्त्याने आले असते तर संभाजी महाराज सावध झाले असते. कोकणातून संगमेश्वरला येण्याचा आडमार्ग फक्त मराठ्यांनाच माहित होता. त्या वाटेवरून येतांमा इतका त्रास झाला त्यांचे घोडे, हत्ती, माणसे दरीत पडू लागली. जसा अफजलखान सैन्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी येताना झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले बाळबोध आणि सर्वांना ठाऊकच असलेले लेखन तुम्ही का पाडता? इथल्या सर्वांना ह्यातील सर्व माहीत आहे.

नवीन लेखकांना प्रोत्साहन वगैरेंची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुळशीला आदराने उंच वृंदावनात लावतो परंतू वाढीसाठी शेणखत घालणारा अपमान करतो?बासुंदी घालणारा मान राखतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समर्थ रामदास आणि दादोजी यांचे शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापने योगदान 'शून्य' होते.- ब्रिगेड इतिहासकार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दादो कोंडदेव कुलकर्णी मलठणकर हा शहाजिंच्या सेवेतला एक सामान्य कारकुन होता,तो शिवाजीचा गुरु असल्याचा कोणताही पुरावा नाही.यासंदर्भात नेमलेल्या शाशनाच्या समितीनेही कोंडदेव शिवाजिंचा गुरु न्हवता असा निर्वाळा दिला आहे.
रामदास ठोसर हा एक वैरागी पुरुष होता, त्याची आणि शिवाजीची भेट झाल्याचा उल्लेख समकालीन साधनांमध्ये नाही,१६७४ला भेट झाल्याचा उल्लेख पेशवे कालीन बखरीत आहे .१६७४ पर्यंत शिवाजीचे अवतारकार्य जवळपास पुर्ण झाले होते.
दादो मलठणकर आणि रामदास ठोसर हे शिवाजीचे गुरु न्हव्ते हे सांगायला ब्रिगेडचि गरज नाही,ते आधिपासुनचं सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

तुमच्या प्रतिसादातला जाणीवपूर्वक तुच्छतेचा सूर टाळून जर हेच सांगितलं असतं तर बरं झालं असतं, पण असो.
दादोजी कोंडदेव शिवाजीचे गुरू नव्हते -ह्याची कल्पना आहे. रामदास्वामींबद्दल कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाहि हेच वाटले होते. रामदास शिवाजीचे गुरु असोत वा नसोत पण त्यांचा असा तुच्छतादर्शक उपदेश निश्चितच गर्हणीय आहे. आपल्यापुढे स्पष्ट दिसणारे रामदासांचे कार्य आणि त्यांचे काव्य त्यांचे स्थान पक्के करते. त्याकडे दुर्लक्षकरून आणि त्यांचा असा जाणूनबुजून तुच्छतादर्शक उल्लेख करून ग्रेट थिंकर ह्यांना आपण मोठे फटकळ आणि स्पष्ट बोलणारे आहोत असे दाखवायचे असेल पण ते सूर्यावर थुंकण्यासारखे आहे आणि त्यांच्या small thinking चेच निदर्शक ठरते आहे हे त्यांना कळत नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औरंगजेबाचे वजीर असद खान यांचे सुपुत्र जुल्ल्फिकार खान यांनी औरंजेबाचे चरित्र लिहिले होते. ते शास्त्री भवनच्या पुस्तकालयात वाचले होयते. त्यांनी दोदोजी कोंडके यांना शिवाजीचे गुरु मानले होते. शिवाजी बरोबर त्यांना हि शिव्यांची लाखोली वाहिली होती. ते समकालीन व शत्रू असल्यामुळे चुकीचे लिहिणार नाही. बाकी एक कारकून गुरु का म्हणून राहू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आधीपासूनचं सत्य" हा रोचक प्रकार आहे. जुल्फिकारखानाला माहित नसावा तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या दृष्टिने गुरू या शब्दाची व्याख्या काय आहे.

रामदास स्वामी विषयी किती तुच्छतापुर्वक उद्दगार काढलेत. कुठे फेडाल हे पाप.

दादाजी कोंडदेव व रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते हे आम्हाला माहित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामदास स्वामी विषयी किती तुच्छतापुर्वक उद्दगार
काढलेत. कुठे फेडाल हे पाप.>>>>>>>>>>>>> आमचा पापपुण्य ,कर्मविपाक असल्या गोष्टींवर विश्वास नाही,अनेक बहुजन संतांचा एकेरी उल्लेख केला जातो,जसे की तुक्या,नामा ,चोखा ,तेव्हा तुमच्यासारखे हिडुत्ववादी अपमान झाल्याची बोंब मारत आलेले आठवत नाहित.रामदास ठोसर याचे पुर्ण नाव घेतले आहे ,त्यात अपमाणजनक काहीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हे असे असले वा नसले याने इतिहास अभ्यासकांना नक्की काय फरक पडावा?
सामान्य जनतेचं मरो, त्यांची अस्मितांची गळवे कधी फुटतील नेम नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी एक कारकून गुरु
का म्हणून राहू शकत नाही.>>>>>>>>>.एका कारकुनाला घोडसवारी,तलवारबाजी,भालाफेक,राज्नीती हे सगळे येत होते म्हणे,एवढा जर तो निष्णात असता तर सैन्यात मर्दुमुखी गाजवली असती, कारकुनी करत बसला नसता.जात्यंध अभ्यासकांनी(?) फेकाफेकी करताना निदान तर्कसंगत तरी करायला हवी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मला वाटते 'गुरु' ह्या शब्दाचा अतिव्याप्त अर्थ घेण्याने हे सर्व गैरसमज वाढत असावेत.

शिवाजीला येत असलेले सगळे दादोजीची शिकवणी लावल्याने कळले इतक्या टोकाला जायची आवश्यकता नाही. शहाजीने आपल्या जहागिरीमध्ये जो कारकून - कारभारी - ठेवला होता तो जहागिरदाराच्या (शहाजीच्या) घराण्याचा विश्वासू सेवक होता. बालशिवाजी त्याच्या आसपास खेळत-फिरकत असतांना दादोजीने त्यास प्रेमाने चार चांगले शब्द, गोष्टी सांगितल्या असणे संपूर्ण शक्य आहे. आजही श्रीमंत घरातल्या चाकरांकडून घरातली लहान मुले चांगल्या आणि वाईटहि बाबी शिकतातच. अशा अर्थाने दादोजीने शिवाजीला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या किंवा शिकविल्या असे सुचवण्याने शिवाजीबद्दल अनादर निर्माण होतो असे मानण्याचे कारण नाही.

शहाजीच्या घराच्या अन्तर्गत कारभाराचे काहीच पुरावे आपल्यासमोर आता आपल्यासमोर उरलेले नाहीत. अशा परिस्थितीत हवेत उलटेसुलटे दांडपट्टे फिरवून वादंग का माजवावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक किल्ला किती महत्त्वाचा असतो याची कल्पना महाराजांइतकी अजून कुणाला असेलसे वाटत नाही. आणि असा माणूस चक्क एक किल्ला समर्थांना राहण्यासाठी गिफ्ट देतो म्हणजे त्यांच्याबद्दल त्याच्या मनात काय भावना असेल हेलोकांनी पहावे फक्त. बाकी ग्रेटथुंकरी उद्घोष चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुणीतरी कुणाला काहीतरी गिफ्ट देतो,म्हणून लगेच गिफ्ट घेणारा गुरुपदी बसवावा हे लॉजिक आजच कळले.हिंदुत्ववाद्यांच्या दाव्यामध्ये पुर्वी करमणुक मुल्य होते ,आजकाल ते ही राहीले नाही......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

डू नॉट फीड द ट्रोल्स.
डुकरांशी कुस्ती खेळू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतीवाद करता येत नसेल तर सिंह आणि डुक्कर यांची गोष्ट सांगुण पळ काढायचा.छान उपाय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

शिवाजी महाराजांच्या चरित्रा मधून कोणाकोणाची नावे वगळणार. दादाजी कोंडदेव व रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. ही नावेही काही वर्षांनी वगळण्यासाठी आदोंलने झाली तर आश्चर्य वाटायला नको.
1) गागाभट्ट 2) शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर तीन महिने संभाजी महाराजांना सांभाळणारे दोन ब्राम्हण, ज्यांना नंतर पोलादखानाचा अत्याचार सहन करावा लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मणांमध्ये आपला ब्राह्मण आणि दुसरा ब्राह्मण अशा क्याट्यागरीज असतात.

आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या "ब्राह्मणाचं" नाव पुसण्याचा प्रयत्न कैक दशके चाललाय त्याविरुद्ध कोणा ब्राह्मणांनी (ब्राह्मण म्हणून) आवाज उठवल्याचे ऐकलेले नाही. उलट नाव पुसण्याच्या मोहीमेत ब्राह्मण लोकच पुढे असलेले दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सायबांनो, ते जरा र्‍हाउ दे.
कुरूंदकरांच्या व्याख्यानाची लिंक यूट्यूबवर सापडलीये, ती ऐका. सुंदर भाषण आहे-
https://www.youtube.com/watch?v=GtVmIfIgMsc
----------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..... चुठिपम्हप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.