पायजमा

(शाळेमध्ये असताना शांता शेळके यांची "पैठणी" खुपच आवडली होती. त्याचेच हे विडंबनामृत. लाभ घ्यावा. चुभुद्याघ्या)

फडताळात एक गठुडं आहे,
त्याच्या खाली अगदी तळाला
जिथे आहेत् भरपुर चिंध्या
मफलर चड्डी घोंगडं नाडा
त्यातच आहे अस्ताव्यस्त
बावरुन पसरलेला एक पायजमा

चटेरीपटेरी फुलबॉटम
रंग त्याचा काळपट भुरटा
माझ्या आज्ज्याने लग्नामध्ये
हा पायजमा घातला होता
पडला होता सा-यांच्या पाया
कमरेवर खेचत हाच पायजमा

पायजमाच्या अवती भवती
दरवळणारा उग्र वास
जाणीवे नेणीवेची ओळख
अजिबातच नाही त्यास
चिकन मटन खेकड्यांतुन
वरपत गेल्या किती गटारी
पायजम्याने पाहीले
ना शाकाहारी... ना मांसाहारी
मावा चुन्यात माखली बोटे
पायजम्याला केव्हाच पुसली
ढाब्या गुत्त्याची सुरेल मैफिल
टपरी आडुन दणकुन हसली.

वर्षा मागुन वर्षे गेली,
बाई बाटलीचा सराव झाला
नवा कोरा तंग कपडा
खपून मळून ढिला पडला
पायजम्याच्या चिरकुटातून
सगळे प्रताप उघडे पडले
विधुरपणी मरण आले,
आजोबा माझे एकदाचे खपले

कधीतरी हा पायजमा
हातात धरतो अगदी बावचळुन
खरबरीत सुकट स्पर्शामधे
आज्जा भेटतो मला जवळून
मधली वर्षे ऊडुन जातात
तारस्वरांचा जुळतो धागा
पायजम्याच्या चटेरी पट्ट्यांनो
आज्ज्याला माझा साष्टांग सांगा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ती "पैठणी" इतकी गोड कविता आहे त्यामुळे ही एकदम अशी .... म्हणजे सांगत अयेत नाही कशी वाटली ते. Smile
पण एक स्वतंत्र कविता म्हणून ठीक आहे.

पायजम्याच्या चटेरी पट्ट्यांनो
आज्ज्याला माझा साष्टांग सांगा

चट्टेपट्टे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0