Skip to main content

दवबिंदु

माझ्या कल्पनेत कोण्या रमलेल्या वनदेवीचा व यक्षाचा रात्रीचा शृंगार आणि सकाळी परतताना त्यांच्या घाईगडबडीत तिचा तुटलेला मोत्यांचा हार तेच सकाळचे दवबिंदू.
http://thumbs.imagekind.com/3809549_650/Cupid-and-Psyche-by-Benjamin-We…
_______
शुभ्र चांदण्या रात्री
परिमळु गंधला गात्री
वनदेवी कुठे रमलेली चांदण झोक्यावरती
.
कुणी यक्ष पायीचा दास
लुटलेला तिच्याचसाठी
लेपितसे रक्तआळीता रेखिव पाऊलांवरती
.
प्रणयास येई मग रंग
शृंगारीत देह तराणे
तृप्तीच्या हुंकारांतून मादक गंधीत गाणे
.
तेजाळून फुलल्या दोन्ही
कमलिनी दोन देठांशी
जडाभार चांदण्या रात्री मीलनदिठी दोन प्राणांची
.
अन तृप्तावलेली, वनदेवी पहाटे घाईघाईत परतताना,
...
सर कंठीचा तुटला की
ओघळती मोतीया दाणे
पहाटेस रानफुलाचे त्या दवांत ओल्या न्हाणे