नाला इस शोर से क्युं मेरा दुहाई देता - शेख़ इब्राहीम ज़ौक़

जौक यांची एक सुंदर गझल वाचनात आली. संपूर्ण गझलेचा अर्थ मला नीट कळला नाही परंतु जेवढ्या शेरांचा कळला तेवढा देते आहे. जेवढ्यास तेवढेच भाषांतर झाले आहे. जास्त भर घालून रंगविता आले नाही याबद्दल क्षमस्व.
वर दिलेल्या दुव्यातील अन्य शेरांचे अर्थ कोणी लावले व मांडले तर आनंदच होइल.
____________
नाला इस शोर से क्युं मेरा दुहाई देता
ए फलक गर तुझे ऊंचा न सुनाई देता

- हे ईश्वरा,जर तुला कमी ऐकू येत नसते तर, मला इतका ऊंच आवाजात विलाप करावाच लागला नसता.
.
देख छोटोंको है अल्लाह बडाई देता
आंसमां आंख के तिल मे है दिखाइ देता

- डोळ्यांच्या इवल्याशा बाहुलीने सारे आकाश पहाता येत खरोखर ईश्वर क्षुद्रांनाही किती मोठेपणा वेळप्रसंगी बहाल करु शकतो - करतो.
.
लाख देता था फलक आजार गवारा थे मगर
इक तेरा ना मुझे दर्द-ए-जुदाई देता

- ईश्वराने मला लाखो यातना बहाल केल्या असत्या तरी हरकत नव्हती, पण हे तुझ्यापासूनच्या वियोगाचे दु:ख मला व्याकुळ करते, हे तेवढे द्यायला नको होते.
.
दे दुआ वादी-ए-पुर-खार-ए-जुनूं को हर गाम
दाद ये तेरी है ए आबला-पाई देता

- वणवण करुन माझ्या तळपायांवर पडलेले हे घट्टे, व्रण हे तुझ्याच न्यायप्रियतेचेच प्रतिक आहे आणि म्हणूनच काटेकुटे असलेल्या रानटी झाडाझुडपाच्या,खाचाखळग्यांच्या दरीला हे ईश्वरा, मी तुझी कृपाच समजतो
.
मै हूं वोह सैद कि फिर दाम से फँसता जा कर
के कफस से मुझे सय्यद रिहाई देता

- मी असा वेडा बंदी आहे, की जरी पारध्याने मला पिंजर्‍यातून मुक्त केले असते तरी त्या पिंजर्‍यात मी परत मोठ्या आनंदाने परत जाऊन बंदी झालो असतो.
.
देख गर देखना है "जौक" कि वो पर्दा-नशीं
दीदा-ए-रौजन-ए-दिल से है दिखाई देता

- जर पडद्याआड लपलेली ती सौंदर्यवती तुला पहायची असेल तर सामान्य डोळ्यांनी भलेही नाही, पण अंतःचक्षूंनी तू केव्हाही पाहू शकतोच की.

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

उर्दू मध्ये 'शेर' ह्या काव्य प्रकार भयंकर अर्थवाही असतो याचा पुनःप्रत्यय. 'शेरासमोर' चारोळी , हायकू अगदीच अर्थ दुर्बळ !

डोळ्यांच्या इवल्याशा बाहुलीने सारे आकाश पहाता येत खरोखर ईश्वर क्षुद्रांनाही किती मोठेपणा वेळप्रसंगी बहाल करु शकतो - करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! शेराचाच वापर शेरांचे सौंदर्य/महत्तता सांगण्यासाठी - छान वापरलत मनोज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदरच, आवडली. खरंच, सौंदर्य अंत:चक्षुनेच पाहता येते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाला म्हणजे सांडपाणी वाहून नेणारा नाला, इतपतच माहीत आहे. बाकी उर्दू वगैरे काही समजत नाही, त्यामुळे पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव ! व्हाट ए ज़ौक़ !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0