सुर्योदय आणि चंद्रास्त

हिवाळ्यातली एक गुलाबी सकाळ, निरभ्र आकाश. पुर्वेला सुर्य अजून पांघरूणातून डोकं बाहेर काढतो आहे आणि पोर्णिमेचा चंद्र पश्चिमेला अस्ताला जातो आहे. हा क्षण टिपण्याचा मोह झाला नसता तरच नवल.

अपुरा प्रकाश आणि फोनमधला कॅमेरा यामुळे फोटोची 'ग्रेनी' आला आहे. पण खांबावरचा चंद्र, उगवत्या सुर्याची पुर्वेकडून पश्चिमेपर्यंत पसरलेली लाल छटा, दिव्यावरती अजूनही झोपेत असणारा पक्षी यामुळे चित्र इथे देतो आहे. टिप्पण्यांचे स्वागत.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हा क्षण व्यवस्थित पकडल्यासारखा दिसतोय पण फोटोचा आकार आटोपशीर झाल्यास आनंद अधिक घेता येईल असं वाटतं.
काही उपाय करता आला तर बघा की राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

दुरुस्ती केली आहे. वाईड स्क्रीनवरुन अपलोड केल्याने लक्षात आलं नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अमूर्त शक्यतांमुळे, रंगसंगतीमुळे चित्र आवडले.

पण भावले नाही. मला तारा जे काय करतात ते आवडले नाही. (तारा ट्रेस करत दृष्टी खांब-चंद्रापाशी येते, आणि मग त्याच तारा दृष्टीला तसेच पुढे चौकटीच्या कंटाळवाण्या सीमेशी फरफटत नेतात. वाटल्यास कथानक बनवता येते, तरी ते कथानक आवडले नाही.)

चंद्र आणि खांब चित्राच्या मध्यावर घेण्याचा धोका का पत्करला आहे, ते मला कळलेले नाही. (पण धोका पत्करला आहे, म्हणजे जाणूनबुजून काही हेतू असेलच असा कयास आहे.) प्रयोग म्हणून मी चित्राचा उजवीकडचा भाग कातरला, आणि वरची थोडीशी निळी पट्टी कातरली - चंद्र ईशान्य तृतीयांशबिंदूवर आणला, तर मला चित्र अधिक आवडले. तारांना गती आली, आणि दृष्टीला गंतव्य स्थान मिळाले. हे सर्व उघड फायदे फेटाळून चंद्र कंटाळवाण्या मध्यावर योजला आहे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निळ्या, फोटो आवडला.

धनंजय, फोटोग्राफीबद्दल काही लिही म्हणजे आम्हां कॅमेराधारकांना थोडंबहुत समजू लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+९९९९९

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी चित्राचा उजवीकडचा भाग कातरला, आणि वरची थोडीशी निळी पट्टी कातरली - चंद्र ईशान्य तृतीयांशबिंदूवर आणला,

वर्णन केलेले कथानक मला जाणवले नसले तरी असे करुन पाहिल्यावर चित्र जास्त भावले. (कसली तरी आठवण चित्र करून देत आहे असे वाटत आहे, पण कळत नाही.)

चंद्र मध्यावर ठेवण्यामागे काही ठोस विचार नव्हता. बहुतेक एकरुपतेची सवय किंवा क्रॉप करताना खांब आणि चंद्राकडे लक्ष ठेवून कातरल्याने तसे झाले असावे. क्रॉप करताना वेगवेगळा विचार करून पहायला पाहिजे हे प्रकर्षाने जाणवले. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

Sad हाफिसातुन बंदी आहे.. विकांताला बघतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सध्या...झकास...बाकी प्रतिसाद देतोच.

धनंजयने दिलेल्या सुचना योग्यच आहेत, पण त्या सर्व सुवर्ण नियमांखेरीजदेखील हा फोटो जबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो आवडला नाही.विजेच्या तारा आणि खांबामुळे रसभंग होतोय. निव्वळ टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर फोटो अधिक उठावदार झाला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

प्रामाणिक प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

ह्या फोटोच्या विषयात चंद्र, खांब इ. जाणिवपूर्वक निवडला आहे. लॅंडस्केपचा फोटो करता बरच काही बदलावं लागलं असतं. (फोन वरती इतकं झूम नसल्याने ते त्या क्षणी तरी शक्य नव्हतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी या चित्राला नाव इक्विलिब्रियम असं देईन. खांब आणि चंद्र यांचा एक तराजूचा काटा होतो, आणि तारांची पारड्यांना धरणारी दांडी. वजन मुख्यत्वे आकाशाचं आहे. आकाशाच्या समान उतरत्या रंगामुळे इक्विलिब्रियम साधलेला दिसतो. खालच्या दिव्यावरच्या कावळ्यामुळे किंचित ढळलेला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्याही तांत्रीक विश्लेषणाच्या काथ्याकुटाचा विचार न करता फोटो आवडला, मुख्य म्हणजे योग्य वेळ साधण्याची ती वेळ होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आवडणे-नावडणे हे नेहमीच प्राथमिक असते. तांत्रिक विश्लेषण म्हणजे काय? त्या प्राथमिक आवड-नावडीचे पाठीमागून केलेले स्पष्टीकरण असते.

(१) आवडले - क्ष मते (२) नावडले -ज्ञ मते
अशा प्रतिक्रियांचा कौल मिळून नाईल (किंवा कोणालाही) बहुधा समाधान होणार नाही. त्यांचे थोडे अधिक समाधान म्हणून आपण आपल्या प्राथमिक आवड-नावड निर्णयाचे स्पष्टीकरण देऊ करतो.

(पाषाणभेद यांनी म्हटले आहे, की "कोणत्याही तांत्रीक विश्लेषणाच्या काथ्याकुटाचा विचार न करता फोटो आवडला". त्यावरून शंका आली. काही लोक आधी तांत्रिक विश्लेषणाचा काथ्याकूट करून मग आवड-नावड ठरवतात, त्यापेक्षा आपण वेगळे केले, असे तर त्यांना वाटत नाही ना? म्हणून हा प्रतिसाद : सर्व जण त्यांच्यासारखेच विश्लेषणाआधी आवड-नावड भावनेपाशी पोचतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0