Skip to main content

तिची(च) कविता

आमचे प्रेरणास्रोत


ती एक आई
दररोज बडवणारी!
ती एक पत्नी
मात देणारी!!
ती एक ज्योती
उठसूठ ज्वाळा बनणारी!
ती एक दीप्ति
सतत तेलतूप मागणारी!!
ती एक कळी
भुंग्यांचा अंत पाहणारी!
ती एक चांदणी
चटक उपाधी लावणारी!!
ती एक शक्ती
सामंतांच्या सिनेमात असणारी!
ती एक सक्ती
सर्वांवर अधिकार गाजवणारी!

राही Sat, 31/10/2015 - 15:37

अष्टदुर्गा बर्‍या साधल्यात.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 31/10/2015 - 22:44

ती एक शक्ती
सामंतांच्या सिनेमात असणारी!

जुने संदर्भ लागले ... योग्य का अयोग्य कोण जाणे!