Skip to main content

झुळुक

काचेची फुलदाणी
संगमरवरी वाडा
आठवणींचा शेंबुड
घालतोय राडा

पसरट टेबल
गुलाबी पर्स
मोगऱ्याचा गंध
सांडतोय सारा

मखमली पडदे
नाजुक किणकीण
परीटघडीचा
चोळामोळा

टपोर थेंब
गालावर खळी
विरघळुन गेला
लोण्याचा गोळा

लहरी पाखरु
आभाळात घिरट्या
उत्तुंग पर्वत
आणि डोंगराच्या कडा

भरदुपारी ऊन्हात
पडतोय सडा
आठवणींचा शेंबुड
घालतोय राडा

तिरशिंगराव Sun, 22/11/2015 - 13:05

आठवणींचा 'शेंबूड' खटकतोय. कवितेचा विषय पहाता, 'आठवणींचे वीर्य' शोभून दिसले असते.

तिरशिंगराव Sun, 22/11/2015 - 16:27

स्वारी, पण तो तेवढा शब्द सोडला तर कविता चांगली वाटली.
दिलखुलास प्रतिसादाबद्दल धन्यवाद.