Skip to main content

आयुष्य एक प्रवास.......

आयुष्य चालत राहते ...

लहानपणीच्या रांगण्या कडुन
कर्तृत्वाच्या चाली कडे
उरलेल्या आठवणी कडून
आजच्या वास्तवाकडे
आयुष्य चालत राहते...

तूटलेल्या स्वप्नाकडून
धेय्याच्या नविन क्षितिजाकडे
हरवलेल्या मानसा न कडून
स्वत : च्या ओळखीकड़े
आयुष्य चालत राहते...

सुख - दुःखा च्या वळणावरती
आशेच्य किरणांवरती
स्वप्नाच्या नविन वाटाण वरती
आयुष्य चालत राहते...

मैत्रीतून प्रेमाकडे
तिमिरातून तेजाकड़े
सूर्यास्ताकडून
सूर्योदयाकडे
आयुष्य चालत राहते.....