Skip to main content

ओपिनियन फॉर्मेशन (माहिती हवी आहे)

मी आणि माझा मित्र स्नेहल शेकटकर, नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे,

ही उत्तरे देण्यासाठी स्वत:चे नाव देण्याची गरज नसल्याने इथे व्यक्त केलेली मते पूर्णत: सुरक्षित असतील याची आम्ही हमी देतो. तसेच अर्ध्या सोडवलेल्या प्रश्नावलीचा उपयोग अभ्यासात होणार नसल्याने, सर्व (१०) प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी विनंती करतो. खाली प्रश्नावलीच्या मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही लिंक्स दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एकच लिंक वापरावी. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या निष्कर्षांची माहिती मी इथे लिहीन. धन्यवाद.

मराठी लिंक : https://www.surveymonkey.com/r/SQ5CVJS
इंग्रजी लिंक : https://www.surveymonkey.com/r/WBVHBWK

- अभिजित बेंद्रे, स्नेहल शेकटकर

ऋता Mon, 28/12/2015 - 08:55

शेवटच्या प्रश्नात "अ‍ॅक्विटेड" च्या जागी "अ‍ॅक्वायर्ड" हवं आहे.

ऋषिकेश Mon, 28/12/2015 - 13:35

In reply to by आबा

फक्त त्याच प्रश्नाला इतर मत असल्यास खालील टेक्स्ट बॉक्समध्ये लिहा असा पर्याय एनेबल करता येईल का?
"इतर"चा अर्थ इतर पक्ष असा होतो. यापैकी कोणताही नाही अर्थात "नोटा" वाल्यांचं काय?

आबा Mon, 28/12/2015 - 14:32

In reply to by ऋषिकेश

तसा पर्याय ठेवला नाही यालाही कारण आहे, परंतू बायस नको म्हणून सांगत नाही. रिजल्ट्स आले की ते आपोआप लक्षात येईल. धन्यावाद

चिमणराव Mon, 28/12/2015 - 14:09

"नोटा ही तद्दन फालतूगिरी आहे.'?
सरकारी नोकरीतल्या कर्मचाय्रास अर्धा दिवस लवकर सोडले तर त्याला मत देऊन यावंच लागेल.( खोटी शाई सोडा) परंतू नोटालातरी मत द्यायला हवे ना?

प्रश्न १) मध्ये दुरुस्ती करा आणी संशोधनाचं वारू दौडू द्या.

बाकी ती "survaymonkey" साइटचं नाव किती यथोचित! नाव जाऊ दे रेडिमेड कोडबद्दल धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/12/2015 - 21:53

अभ्यासात मदत म्हणून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. निष्कर्षांबद्दल आणि खरंतर अभ्यास नक्की कसा, काय होतो याबद्दल बरीच उत्सुकता आहे. तुमच्या सवडीनुसार मेथडॉलॉजीबद्दल लिहायला सुरुवात करा.

चिमणराव Tue, 29/12/2015 - 06:08

#निष्कर्षांची वाट पाहतोय.#!!

हाहाहा!
सम्राट: वजिर, प्रजा काय म्हणते?
वजिर: ****,****,####,खाविंद,आपल्या मार्गदर्शनाखाली प्रजा सुखी आहे एवढेच नाही तर बालके दुध पित आहेत.

सुनील Sun, 17/07/2016 - 06:58

प्रश्नपत्रिका सोडवली. निकाल लवकर लावा!!

जयदीप चिपलकट्टी Sun, 17/07/2016 - 08:41

> खाली प्रश्नावलीच्या मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही लिंक्स दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एकच लिंक वापरावी.

मजेदार प्रकार आहे. इंग्रजी आणि मराठी प्रश्नांचे अर्थ मुळीच सारखे नाहीत. हे उदाहरण पाहा:

10. Should the fertile land be allowed to be acquired forcefully by the government for the industrial purpose (by paying the adequate cost)?

10. कारखाने बनवण्यासाठी शेतकर्यांच्या (sic) जमिनी बळजबरीने घेतल्या जाव्यात का? (पैसे देऊन)

एकतर शेतकऱ्याची जमीन नापीक असू शकते, म्हणजे ती ’fertile land’ असेल असं मुळीच नाही. याउलट एखादी जमीन fertile असेल तर ती शेतकऱ्याच्याच मालकीची असेल असं नाही. ती एखाद्या उद्योगाच्या मालकीची असू शकते. ‘पैसे देऊन’ आणि ‘by paying the adequate cost’ ह्या दोन्हीचा अर्थ वेगळा होतो हे तर उघडच आहे. इंग्रजी प्रश्नात सरकारचा उल्लेख आहे, पण मराठी प्रश्नात तो नाही.

आणखी एक उदाहरण द्यायचं तर ‘In the face of an ongoing conflict on the border’ ह्या शब्दप्रयोगाला समांतर असं मराठी प्रश्नात काहीच सापडत नाही. दोन्ही प्रश्नावल्या ताडून पाहिल्या तर अशा ढीगभर चुका सहज सापडतात.

तिरशिंगराव Sun, 17/07/2016 - 12:22

प्रश्नावली मराठीत पूर्ण केली आहे. पण तिचे स्वरूप फारच ठोकळेबाज वाटले. अन्य उत्तरे देण्यासाठी फारच कमी जागा ठेवली आहे.
आमच्या लहानपणी, आमच्यापेक्षा मोठा असा एक मुलगा, आमचे मानसिक रॅगिंग करायचा, तेंव्हा तो जे प्रश्न विचारायचा, त्याप्रकारचे प्रश्न वाटले.
उदाहरणार्थः " काय रे, घरी तुझे लाड होतात नं ?"
आमचे उत्तरः नाही,नाही.
" हाँ, म्हणजे नक्की हाल होतात."