वळूया!

प्लॅस्टिकचं हृदय,
प्लॅस्टिकचेच भळभळणारे रक्त,
दोन शब्द विंदांचे, दोन शब्द पाडगावकरांचे,
एक कल्पना शांताबाईंची, एक यमक गदिमांचे,
अजून काही ह्याचे, तजून काही त्याचे
दुनियेभरचे तरल फरल फोटो
सगळा स्टॉक डब्यात व्यवस्थित भरून ठेवलाय.

सिच्युएशन, मूड, ऑडियन्सचा अंदाज घेऊन
तुपावर बेसन भाजून..

हमखास डोळ्यातून पाणी, हृदयातून हुंकार,
घशातून उसासा, अजून कुठूनतरी अजून काहीतरी
काढायला लावणारे
काव्यबोळे वळायला घ्यायला हवेत..

या.. वळा चार काव्यबोळे..
तुमचेही हात लागूद्यात..
मराठी नेटजगताचं वर्‍हाड मोठं, भिंत मोठी..
सर्वांना पुरायला हवेत.

आणि बेदाण्यासारखा फोटो खोचायला विसरू नका
या लवकर.. सुरू करू काम...

- नी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

छान आहे कविता ..

अवांतर : पूर्वी देवळात किर्तन ऐकत ऐकत बायका कापसाच्या वाती वळत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

हाहाहा, भारी आहे कविता! _^_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रॉपर खवचट आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर खवचटपणा. मस्त जमलाय. लाडू, पेढे, जिलब्या सगळ्यांची मोजदाद यथास्थित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जाल-काव्य सेक्शुअ‍ॅलिटी ही नवीन सेक्शुअ‍ॅलिटी आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

एका पुणेकर क ला ख जोडुन कविता करणार्‍या आणि उगीच आई बाप आजी आजोबा अशी जुनीच रडगाणी गाणार्‍या त्याच्या साथीदाराला घेतलेला चावा आहे का हा??

उत्तम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पेसिफिक कुणाला नाहीये.
ज्याने त्याने आपल्या मनात हवे त्याला चावावे पण..
माझी मुळीच हरकत नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

मजेदार, पण...

चांगले काव्य आणि बोळेवळू काव्यामध्ये हा फरक तात्त्विक नाही. कस कमीअधिक असण्याचा आहे.

आपल्या भाषेतील बहुचर्चित साहित्य आत्मसात करून त्यांचे पडसाद स्वतःच्या रचनेवर पडणारच. दोन शब्द विंदांचे, दोन शब्द पाडगावकरांचे,
एक कल्पना शांताबाईंची, एक यमक गदिमांचे, अजून काही ह्याचे, तजून काही त्याचे
... असे पडसाद येणे अपेक्षितच आहे.

चांगले काव्य स्फुरण्याकरिता बाहेरून काही प्रासंगिक कारण होणार, हेसुद्धा आलेच - सिच्युएशन, मूड,

आणि जर अभिव्यक्ती, रचना म्हणजे संवाद असेल, तर ऐकण्या-वाचणार्‍याचे भान असावेच - ऑडियन्सचा अंदाज घेऊन

चित्रांबाबतही असेच वर्णन करता येईल.

चांगली कविता-चित्र जोडणी आणि उत्कृष्ट कविता-चित्र जोडणी यांच्यात अशी कुठली तात्त्विक धगधगीत अग्निरेखा नाहीच : कौशल्य, जाणीव, आणि मनस्वितेचे प्रमाण कमी-अधिक असते, शून्य नव्हे. त्यामुळे आपल्या समाजातच कलाकृती भिकार टोकापासून विलक्षण टोकापर्यंत, मध्य व्यापून, विखुरलेल्या दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या भाषेतील बहुचर्चित साहित्य आत्मसात करून त्यांचे पडसाद स्वतःच्या रचनेवर पडणारच. <<
पडसाद/ प्रभाव आणि नक्कल यात फरक असतो.

गालिचे गार गार हिरवे तृणांचे मखमाली

असे काव्य लिहिल्यास तो पडसाद वा प्रभाव नसून नुसती टुकार नक्कल असते. असे आपले माझे मत हो.

त्यामुळे आपल्या समाजातच कलाकृती भिकार टोकापासून विलक्षण टोकापर्यंत, मध्य व्यापून, विखुरलेल्या दिसतात.<<
आपल्याच का? जगभरात आहे की हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

>>आपल्या समाजातच
> का...? ... जगभर...
मला सांगायचा होता, त्यापेक्षा काही तरी वेगळा अर्थ तुम्हाला जाणवला असावा.
"आपल्यातच" मधील "च" शब्द "आपल्यातही" मध्ये वेगळी अर्थछटा आणतो, तसा अर्थ बघावा.

"(दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ हा विषय) आपल्याही डोळ्यात कुसळ असते, ते बघ" (१)
"आपल्याच डोळ्यात कुसळ असते, ते बघ." (२)
वरील दोन्ही वाक्यांत असे नाही, आपल्यावेगळ्या डोळ्यात कुसळ नसते. परंतु वाक्य (२) मध्ये "आपल्या डोळ्यातील कुसळ(च) आपल्या कृतीकरिता (अधिक) सुसंदर्भ आहे", ही छटा गडद आहे.

>>पडसाद/ प्रभाव आणि नक्कल यात फरक असतो.
हा फरक गुणात्मक (categorical) नसून, प्रमाणाचा (quantitative) आहे.

>>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा फरक गुणात्मक (categorical) नसून, प्रमाणाचा (quantitative) आहे. <<
कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

हा सोपा प्रतिप्रश्न केवळ शीर्षक म्हणून आहे.

तो वाटल्यास गंभीरपणे घेता येईल - चर्चेत प्रगती होणे असेल तर कोणीच "का?", "कसे?"/ "का नाही?", "कसे नाही?" असा एक-दोन-शब्दी प्रश्न विचारून चालत नाही. त्याचा अर्थ असा होतो की
"तुझे आधीचे वाक्य दुर्लक्षणीय आहे. ते वाक्य जणू बोललाच नाहीस, असे ठरवूच पण त्यावेगळे काही सांगण्याची जबाबदारीही तुझीच आहे." आणि समोरची व्यक्ती पुन्हा काही सांगू लागली की मग तिचे सारांशवाक्य घेऊन "का?" म्हणायला काय जाते? "कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
---

(नीधप म्हणतात)
असे काव्य लिहिल्यास तो पडसाद वा प्रभाव नसून नुसती टुकार नक्कल असते.

कमी-अधिक असे म्हटल्यास फरक केला जातच आहे - द्विभाजन नाही. त्यामुळे वरील वाक्य "कमी-अधिक असते" विरुद्ध भासमान प्रतिवाद आहे. टुकार उदाहरण आणि उच्च उदाहरण दिले, तर द्विभाजन सिद्ध होत नाही. टुकार-आणि-उच्च दरम्यान मधले क्षेत्र नसते, किंवा नगण्य असते, असे दाखवले, तरच द्विभाजनाची पुष्टी होते, "कमी-अधिक"चा प्रतिवाद होतो.

क्वचित "damned spot" किंवा "begat" सारखे एकटा-दुकटे विलक्षण शब्द अनुक्रमे शेक्सपियर किंवा बायबलचे पडसाद उमटवू शकतात.
"पंत- (इथे कुशाभाऊंनी माझ्या पाटीवरुन हातही फिरवला.) पंत, ऎका माझं. दोन घास खाऊन घ्या." (पु ल देशपांडे)
येथे अनेक वाचकांना संदर्भ लागणार नाही, म्हणून पु ल देशपांड्यांनी अक्षरशः निर्देश आणि उद्धरण दिले. (चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर 'एकच प्याला' तल्या 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्ही तुम्हांला सांगु नये; पण तुम्ही दारु सोडा!' ह्या चालीवर सुरुवात केली.) केवळ शब्द मोजून "पडसादाकरिता पुरे की नाही, की पडसाद ओलांडून आता नक्कल झाली" असे सांगता येत नाही.
परंतु हा बहुधा नीधप यांच्या टुकार-दर्शक उदाहरणातला मुद्दा नसावा. म्हणून ठसा फिकट ठेवला आहे.

मी आदलीच वाक्ये थोडी आणखी विस्तारून सांगतो :

आपल्या भाषेतील बहुचर्चित साहित्य आत्मसात करून त्यांचे पडसाद स्वतःच्या रचनेवर पडणारच. दोन शब्द विंदांचे, दोन शब्द पाडगावकरांचे, एक कल्पना शांताबाईंची, एक यमक गदिमांचे, अजून काही ह्याचे, तजून काही त्याचे... असे पडसाद येणे अपेक्षितच आहे.
...
कौशल्य, जाणीव, आणि मनस्वितेचे प्रमाण कमी-अधिक असते, शून्य नव्हे.

जेव्हा रचनाकार आणि आस्वादकाच्या सामायिक स्मृतीतील कृतीची आठवण करून द्यायची असते, तेव्हा लेखकाला त्या आदल्या कृतीतील काही भाग ओळखू येईल असा उच्चारावा लागतो. त्या आदल्या कृतीतील काही विलक्षण शब्दजोडणी, वृत्त, शैली असे काहीतरी लक्षात आले पाहिजे.

कथानकाची उद्धरणे होतात, वृत्ताची उद्धरणे होतात, हे सर्व होते. कमी-अधिक होते. कमी-अधिक म्हणजे एक विलक्षण शब्दाचा कितपत प्रभावी उपयोग होतो.
जाणिवेचे प्रमाणही कमीअधिक असते. "Begat" शब्द वापरून लेखनाला प्राचीन/ग्रांथिक भारदस्तपणा येतो, की भारदस्तपणाचा उपहास केला जातो, की आधी एका प्रकारे भावना सुरू होऊन दुसरीकडे संक्रमित होते - ही जाणिवेची वेगवेगळी प्रमाणे आहेत.
कौशल्याचे प्रमाणही कमीअधिक असते. वाचकात पडसाद उमटतच नाहीत, पुरेसे उमटतात, किंवा इतपट जास्त आठवण देतात, की हातच्या कृतीतला मुद्दा हरवतो. कधीकधी घिसाडघाई जाणवून रसभंग होतो, कधीकधी लगेच रसभंग होत नाही, पण काहीतरी चुकचुकते.
मनस्वितेचे प्रमाणही कमीअधिक असते. एखादा पूजेच्या वेळी टाकणे टाकणारा प्रार्थक, "तिथे कुकरची शिट्टी वाजते आहे, पण देवाला खरेच काही मागायचे आहे" अशी अर्धवट अवस्था असलेला प्रार्थक, आणि तल्लीन झालेला प्रार्थक असे वेगवेगळे प्रमाण असू शकते.

"कमी-अधिक" म्हणजेच quantitative, अमुक "असते-किंवा-नसते" असे categorical नव्हे.
हे असे स्पष्टीकरण.

-------------------
हे सर्व मुद्दे वरील (माझ्या पहिल्या) प्रतिसादात थोडक्यात होतेच. त्यामुळे "कसे?" करिता "कसे नाही?" असा प्रतिप्रश्न करण्यास मी उद्युक्त झालो. पुन्हा नुसतेच "कसे" म्हटल्यास मला काय अर्थ जाणवेल, ते वरती सांगितलेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खवचट .. मस्त!!

हमखास डोळ्यातून पाणी, हृदयातून हुंकार,
घशातून उसासा, अजून कुठूनतरी अजून काहीतरी
काढायला लावणारे

पटकन नटसम्राटच डोळ्यापुढे आला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!