फुसके बार – २० जानेवारी २०१६ - रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे - राजकारण्यांचा आवडता फड

रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे
राजकारण्यांचा आवडता फड

.
हैद्राबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या ही नि:संशय दु:खद व दुर्दैवी घटना आहे. ज्या डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापलेल्या संघटनेचा तो सदस्य होता, अशा रोहितने त्यांचे निर्धाराने झगडण्याचे तत्व न अंगिकारता हे दुर्दैवी पाऊल का उचलावे यात मी जात नाही.

या निमित्ताने त्याच्या दलित असण्याचे भांडवल करत आंदोलने सुरू झाली आहेत, आणखी किती दिवस ‘दलितां’नी ‘सवर्णा’कडून अन्याय सहन करायचा वगैरे वल्गना करणे चालू आहे.

हा युवक आंदोलन चालवत होता. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाच्या संघटनेचा नेता होता. याकूब मेमनला फाशी देण्याला त्याच्या संघटनेने विरोध केला होता. काही जण तो याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध नव्हे तर एकूणच फाशीच्या शिक्षेविरूद्ध आंदोलन करत होता अशी (त्याच्या वतीने) पळवाट काढत आहेत. त्यांना हे माहित नाही की फाशीची शिक्षा रद्द करा असे म्हणणारेही दहशतवाद किंवा तत्सम गुन्ह्याखाली झालेल्या गुन्ह्यांना फाशीतून वगळू नये असे म्हणतात. त्यामुळे असे म्हणण्याला काही अर्थ नाही. तर त्यावरून अभाविप आणि त्याच्या संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणे झाली होती. त्यांनी तेथील अभाविपच्या शाखेचा अध्यक्ष सुशीलकुमार याला त्याच्या होस्टेलच्या खोलीत मारहाण केल्याचा आरोप होता. मुळात मारहाण झालीच नव्हती इथपासून आरोप-प्रत्यारोप झाले.

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय?

रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे वाचण्यात आले. रोहित कोणत्या चळवळीत भाग घेतो याची त्याच्या घरच्यांना कल्पना होती का? त्यांनी त्याला चांगले शिकणे ही प्राथमिकता आहे असे समजावले होते का? त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या असणार. हॉस्टेलमधून काढल्यावर बाहेर राहण्याची जागा नाही, रोजच्या खर्चाची सोय कशी करायची, रोज कोणापुढे हात कसे पसरायचे यातून येणारी अस्वस्थता नक्कीच समजू शकतो. या महिनाअखेरीस रोहितचा वाढदिवस (असणार) होता. पण मला शिष्यवृत्ती मिळत नाहीये, मी तुम्हाला पार्टी कशी देऊ, असे तो मित्रांना म्हणाला. पण संघटना म्हणून चालवणा-यांनी आपली परिस्थिती कोणती आहे, कशी आहे याचे भान नको का ठेवायला? असे म्हटले की लगेच कोणी चळवळी करणे हा आमचा हक्कच आहे वगैरे म्हणायला नको. याकूब मेमनची फाशी तुमच्याशी संबंधित आहे का? तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे का? असेल तर हरकत नाही. पण मग त्याविरूद्ध मत असणारेही तुम्हाला भेटतील. तेव्हा मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापन केलेल्या तुमच्या चळवळीच्या नावाचे भांडवल करू नका. स्वत:च्या दलित असण्याचे ‘भांडवल’ या भलत्याच मुद्द्यासाठी करू नका. तुम्ही केवळ तुम्हाला जे वाटते ते मांडत आहात हे कळू शकते, पण ‘भांडवल’ करण्याबद्दल जे लिहिले आहे ते तुम्ही विद्यार्थी नव्हे, तुमच्या नावाने इतर जण करत आहेत. तुमच्या आंदोलनात रोहित एकटाच होता का? त्याच्या आर्थिक परिस्थितीची व त्यामुळे त्याच्यावर आलेल्या ताणाची तुम्हाला माहिती नव्हती का? त्याला सांभाळून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तो असे काही पाऊल उचलेल याची आम्हाला माहितीच नव्हती असे आता म्हणत आहात, तर त्याच्या मृत्युला तुम्हीदेखील जबाबदार नाहीत का? जी आंदोलने करता ती तुम्हाला झेपतात का ते तरी पाहिलेत का? तेव्हा तुम्ही याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन केलेत, तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. ते तुम्ही ‘दलित’ म्हणून तर केले नाहीत ना? पण आता तुमच्या दलित असण्याचे भांडवल इतर जण करत आहेत.

काही लोक असे काही झाले की गेल्या काही वर्षांमध्ये किती हुशार दलितांनी आत्महत्या केल्या याची जंत्री देतात; एवढेच नाही तर त्यावरून स्वत:च्या अजेंड्याला सोयीस्कर निष्कर्ष काढतात. आणि कोणी अशा खोडसाळ व एकांगी पोस्ट आपल्याला पाठवल्या की आपण स्वत: त्यावर विचार न करता त्या प्रसारित/फॉरवर्डही करतो. तुम्हाला किती दलित दाखवू की जे अतिशय स्पर्धात्मक वातावरणातही प्रगती करतात. तिथे मात्र त्यांचे नाणे खणखणीत होते, म्हणून तिथले ‘सवर्ण’ त्यांना अडवू शकले नाहीत असे म्हणायचे, आणि ज्यांनी आत्महत्या केल्या ते मात्र याच ‘सवर्ण’ समाजाचे बळी? अहो, भेदाभेद कोठे होत नाही? मराठ्यांनी ब्राह्मणांचा करायचा, दलितांचा करायचा, जेथे करणे शक्य आहे तेथे ब्राह्मणांनी दलितांचा दुस्वास करायचा, दलितांनी ब्राह्मणांविरूद्ध उघडउघड बोलायचे, श्रीमंतांनी गरीबांचा करायचा, असे कित्येक प्रकार चालतात. माझ्या दारासमोर गाडी पार्क केल्यामुळे येण्याजाण्याला अडथळा निर्माण झाला म्हणून त्या गाडीच्या चाकातली हवा सोडली. तेव्हा माझ्यावर अॅट्रॉसिटीखाली कारवाई करेन असे दटावणारा एक नग मला भेटला होता. हे फारच किरकोळ उदाहरण झाले. पण तुमच्या ज्या भावना आहेत त्याची ही दुसरी बाजू माहित तरी आहे का? मागासवर्गीय असणे हेही अलीकडे हत्यार म्हणून वापरले जाते हे वास्तव माहित आहे का आणि ते मानता का? पण लगेच रोहितची आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे वगैरे वल्गना करण्यापर्यंत मजल जाते काही जणांची. या आंदोलनकर्त्यांवर दलित म्हणून डुख धरून परीक्षेत सतत नापास करण्याचे प्रकरण आहे की दलित आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर खोलीत कोणी दुसरे रहायला तयार नाही? मग आत्महत्या केली या कारणाने लगेच त्यांचे दलित असणे कसे आठवते? लगेच त्याची आत्महत्या नव्हे, तो खून आहे वगैरे डायलॉगबाजी कशी आठवते?

बरे, आता याबाबतच्या तथ्यांवर नजर टाकू. रोहित, आंदोलनातील त्याचे सहकारी, विद्यापीठातील त्यांचे अध्यापक, मंत्री यांची जात काढणे मला प्रशस्त वाटत नाही. पण यात जातीय अँगल व जातीय अभिनिवेश आणणारे फार पाहिले आहेत म्हणून याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

अभाविपच्या सुशील कुमार या स्थानिक अध्यक्षाने याकूब मेमन फाशी प्रकरणानंतर या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या सदस्यांना फेसबुकवर गुंड असे म्हटले. त्यावरून चिडून संघटनेचे तीसएक सदस्य कुमारच्या खोलीत गेले व त्याला मारहाण केली. कुमारकडून त्यांना गुंड म्हटल्याबद्दल लेखी माफीदेखील लिहून घेण्यात आली. हा प्रकार झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. तरीही ज्यांना हे नाकारायचे आहे त्यांनी तसे खुशाल करावे.

मारहाणीच्या तक्रारीनंतर तेव्हाचे कुलगुरू शर्मा यांनी चौकशीनंतर संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यास नकार दिला. मात्र त्यांनी आणखी एक चौकशी समिती नेमली. त्याच सुमारास त्यांच्या जागी आताचे कुलगुरू अप्पाराव आले. त्यामुळे शर्मा यांनी नेमलेल्या चौकशी समितीचे पुढे काही झाले नाही.

दलितांमध्ये स्वाभिमान जागवण्याच्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या उपक्रमांना नव्या कुलगुरूंनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही रोहितने त्यांचे आभार मानले होते. अर्थात त्याच पत्रात वर म्हटल्याप्रमाणे त्याने उपरोधाने व रागाने फासासाठी दोर किंवा विषाची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एकदा काही कारणाने खंडित झाली की ती पूर्ववत होण्यास नोकरशाहीमुळे काही काळ लागतो. अनेकदा ही थकलेली शिष्यवृत्ती एकरकमीही मिळते असे विद्यापीठाचे लोक सांगतात.

सुइसाइड नोटमधली रोहितची भाषा पाहिली की तो एक विचारी मुलगा असल्याचे जाणवते. कुलगुरूंना लिहिलेल्य पत्रात माझ्यासाठी फास घ्यायला दोरीची सोय करा किंवा विष तरी आणून द्या असे म्हणणारा हा युवक प्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत मात्र कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. (त्याच्या त्या चिठ्ठीत कोणालाही दोषी धरलेले नाही, म्हणून आम्ही त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही असे म्हणणारेही काल टीव्हीवर पाहिले.) तो उगाचच या तीस जणांच्या घोळक्यात अडकला असे झाले असेल का? ज्याला आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असणे म्हणतो. संवेदनशील असलेल्या त्याच्याबरोबर आक्रमक वृत्ती असलेल्यावरही कारवाई झाली तरी त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याइतके ते एवढे मनाला लावून घेतले नाही? ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यापैकी प्रशांत हा विद्यार्थी त्या तीसएक जणांच्या घोळख्याचा म्होरक्या होता. रोहितच्या मानाने त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे?

डॉ. आलोक पांडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत संघटनेच्या या पाच जणांनी सुशीलकुमार याला मारहाण केल्याचा इन्कार केला. आम्हाला गुंड म्हणण्यावरून आम्ही सुशीलकुमारकडे गेलो व त्याच्याकडून लेखी माफीपत्र घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी करताना पुढे आलेल्या पुराव्यांवरून व दिल्या गेलेल्या साक्षींवरून अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याइतपत नाही तरी मारहाण झाली होती हे तथ्य समोर आले. एक उदाहरण म्हणून विचारतो, या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?

सुशील कुमार याने दलितांबद्दल काढलेल्या काही अनुद्गारांचा उल्लेख एका ठिकाणी वाचण्यात आला. पण त्याचे संदर्भ व तपशील मिळत नाहीत.

या प्रकरणी सुशीलकुमारचे कोणी नातेवाईक आणि स्वत: हे विद्यार्थी यांनी परस्परांविरूद्ध न्यायालयात गेले आहेत. ते प्रकरण प्रलंबित आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या पाच विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी संघटनेतील विद्यार्थ्यांची बैठक चालू असताना रोहित मधूनच म्हणजे दुपारी चारच्या सुमारास बैठक सोडून निघून गेला आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याच्यासाठी शोधाशोध केल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे कळले. त्या बैठकीत असे काय झाले की रोहितने हे पाऊल उचलले? निराशाजनक सूर उमटला होता का, जसे की काहीही मार्ग निघू शकणार नाही? नक्की काय झाले हे कसे कळू शकेल? कोण सांगू शकेल?

या विद्यापीठात किती तरी इतर दलित विद्यार्थी असतील. त्यांच्या ‘दलित’ असण्यामुळे त्यांना विद्यापीठातील प्राध्यापकांकडून काही वेगळी म्हणजे भेदभावाची वागणूक मिळते का अशा स्वरूपाची काही चौकशी कोणी केली आहे का?

केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे स्वत: मागासवर्गीय आहेत असे दिसते. याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन करणा-या या संघटनेच्या विद्यार्थ्याना देशविरोधी संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र त्यांनी स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाला पाठवले. ते पत्र कुलगुरूंना पाठवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांच्या पत्रावर काय कारवाई झाली हे विचारणारी तीन स्मरणपत्रे मंत्रालयाकडून कुलगुरूंना पाठवली गेली. आंदोलक व राजकारणी याला दबाव टाकणे म्हणत आहेत, तर मंत्रालय सर्वच पत्रव्यवहाराच्या बाबतीत तशी पद्धत असल्याचे म्हणत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे जातीय दृष्टीकोनातून पाहणा-यांना दत्तात्रय यांचेही मागासवर्गीय असणे याबाबतीत चालणार नाही. कारण ते पडले भाजपचे मागासवर्गीय. म्हणजे बाटलेले. ते काय ‘दलितांचे’ हित पाहणार? दलितांचे ‘खरे’ हित पाहणा-याने कसे उठता बसता डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायला हवा. तरच काही जणांचे समाधान होते. वर म्हटल्याप्रमाणे चौकशी समितीमध्ये दलित प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व होते असे दिसते. रोहितच्याच एका पत्रात कुलगुरूंच्या भुमिकेबद्दल त्याने चांगले लिहिले होते. आता तर त्यांचाही बळी मागितला जात आहे.

विद्यालयांमधून होणारी राजकीय आंदोलने हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. शिक्षणाशी संबंधित विषय सोडून कोणत्याप्रकारच्या आंदोलनांना कॉलेज-विद्यापीठांमध्ये परवानगी दिली जावी हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. पण त्यावर कधीही काही निर्णय किंवा एकवाक्यता होत नाही.

हैद्राबाद विद्यापीठात गेल्या पाच वर्षात रोहितसह पाच मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सर्वच मुले त्यांच्या कुटुंबातील प्रथमच शिकणारी अशी मुले आहेत असे कळते. हे सारे बळी आंदोलनापोटीच झाले आहेत का? की नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये येणारी अडचण हे मोठे कारण असावे? मुंबई आयआयटीमध्येही काही दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे आपण वाचतो. या पार्श्वभुमीवर केवळ दलित असलेल्याच नव्हे, पण अभ्यासात कच्चे असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्याची काही व्यवस्था आहे का? या मुलांच्या या व इतर अडचणी समजून घेण्याची अशी काही यंत्रणा असेल तर त्यांना केवळ त्यांच्या मित्रांच्या संगतीत वहावत जाण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध राहील. कॉलेजमध्येच विद्यार्थी कल्याण (वेलफेअर) समिती नेमून एखाद्या (सह्रदयी) प्राध्यापकाकडे याबाबतची जबाबदारी सोपवून दलित, इतर मागासवर्गीय, तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष ठेवून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकेल. आताच्या प्रकरणातही प्रशासनाचा कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांशी कारवाई होण्याआधी काही संवाद असेल की नाही माहित नाही, बहुधा नसेलच, कारवाईनंतर तर तो पूर्णपणे तुटला असणार. एखाद्या गरीब विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती पूर्णपणे व बराच काळ थांबल्यावर त्याच्यापुढे दुसरा काहीही सकारात्मक पर्याय न ठेवता येणे हे व्यवस्थेचेच अपयश नाही का? भारतातले विद्यार्थी परदेशात गेल्यावर तेथे त्यांचा रोजचा खर्च निघण्याइतपत कामे कॉलेजमार्फत वा विद्यापीठामार्फत त्यांच्यावर सोपवली जातात. आपल्याकडे असे होतकरू विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी काही व्यवस्था निर्माण करता येईल का?

अशा संवेदनशील मुद्द्यावर राजकारणी मोठ्या जोमाने राजकारण करतील यात शंका नाही. केजरीवाल व ओवैसी यांनी ते दाखवले आहेच. कॉंग्रेसच्या पप्पूकडून दुसरी काही अपेक्षा नव्हतीच. मायावती व ममता त्यांची पथके पाठवली आहेत. लालू-मुलायमही रिंगणात उडी न घेता मागे राहण्याचे पाप करणार नाहीत. दलितांच्या नावाने मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची संधी कोण कसे सोडतील?

या निमित्ताने कवी अशोक वाजपायी यांनी त्यांना हैद्राबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी.लिट. परत करण्याची घोषणा केली आहे. या मुलांवर कोणत्या कारणाने कारवाई केली गेली किंवा एकूण हे प्रकरण काय आहे याची त्यांना माहिती नाही आणि तरीही त्यांनी हे पाऊल उचलले आहे असे इंडिया टुडेवर ते सांगत आहेत. पुरस्कार किंवा पदवी परतीचा किडा चावलेले अनेक जण आपल्याला या विद्यापीठाकडून काही मिळाले होते का हे आता नक्कीच धुंडाळतील.

या सर्वात शक्यता आहे ती अशी की दबावामुळे कोणी तरी बकरा निश्चित शोधला जाईल. कदाचित चौकशीनंतर आणखी नवी तथ्ये समोर येतील. वर सुशीलकुमार याने दलितांविरूद्ध काही अनुद्गार काढल्याचा उल्लेख आहे. मी तर म्हणतो, ते जर खरे असेल, तर जरूर त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करा. परंतु शक्यता अशी आहे की अशा प्रकारांवरून नेहमीच होणा-या राजकारणामुळे मूळ प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष जाणारच नाही. कारण कोणाची तशी इच्छा नाही. दलितांसाठी काही तरी केल्याचे खोटे समाधान मात्र आंदोलकांना व त्याहीपेक्षा राजकारण्यांना मिळेल.

आज रोहित, उद्या आणखी कोणी. दलित किंवा दलित नसलेला. पुढचा विचार करून यावर कायमस्वरूपी विचार करून जे कोणी स्वभावाने हळवे जीव असतील, ते वाचवण्यासाठी प्रयत्न करायला सवड आहे कोणाला?

या पोस्टला फुसके बार म्हणवत नाही. पण या सदराचे नाव बदलेपर्यत तरी तसेच ठेवतो.
फुसके बार – २० जानेवारी २०१६

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (7 votes)

ग र ळ. साळसूद गरळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला. असा लेख लिहिणाऱ्या मनुष्यानेच या धाग्यात केलेली विधानं -

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले.

आपले धागे स्वतंत्र न ठेवता दुसऱ्या धाग्यात प्रतिसाद म्हणून डकवले तर आपलं 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे' असा आक्रोश करणाऱ्या सदस्याला राजकीय विचार मांडणाऱ्या विद्यार्थ्याला वसतिगृहातून हाकललं, त्याची विद्यावृत्ती थांबवली तर काय म्हणावंसं वाटतं -

संघटना म्हणून चालवणा-यांनी आपली परिस्थिती कोणती आहे, कशी आहे याचे भान नको का ठेवायला? असे म्हटले की लगेच कोणी चळवळी करणे हा आमचा हक्कच आहे वगैरे म्हणायला नको. याकूब मेमनची फाशी तुमच्याशी संबंधित आहे का? तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे का? असेल तर हरकत नाही. पण मग त्याविरूद्ध मत असणारेही तुम्हाला भेटतील.

माझ्या या प्रतिसादालाही काही भरीव, सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. मनुष्यांमध्ये विसंगती असतात, काहींमध्ये मोजक्या आणि दुर्लक्षणीय असतात; काहींमध्ये भगभगीत आणि भीषण विसंगती असतात आणि काही या दोन टोकांच्या अध्येमध्ये असतात. आपण याची जाणीव ठेवली की असल्या प्रकारांची मौज वाटायला लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मने मारण्याची शिक्षकांची कला याचा गाभा तुच्या लक्षातच अालेला नाही. मुलांवर झालेली कारवाईही शिस्तभंग किंवा तत्सम प्रकाराची आहे. मुळात या मुलांनी मारहाण केलीच नाही असे म्हटले, तरी आताच्या कुलगुरूंच्या आधी झालेल्या चौकशीत ती झाली होती हे समोर अाले होते. त्याची शिष्यव्ृत्ती थांबवण्याच्या परिणामांबद्दलही लिहिलेले आहे. त्यामुळे तुम्ही या विषयाची उल्लेख पोस्ट्स एकत्र हलवण्याच्या संदर्भात करता यावरूनच झेप कळली. फार बोलत नाही. माझ्या पोस्ट्सचा अभ्यास करून हे भलतेच लिहायचे असेल तर तसे केले नाही तरी चालेल. पण तुम्ही स्वयंभू. तुमची असंबद्धता दाखवण्यात व दाखवत राहण्यात कमी कसे पडणार. चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुलकर्णी,

पीएचडि स्टुडंटला 'स्टायपेंड' मिळतो. शिश्यवृत्ती नाही.

काय फरक अस्तो?

त्यांची झेप डिट्टेलवार समजवून सांगतो, नीट समजवून घ्या.

हे फेसबुक नाही. ही तुमची वॉल नाही. हे फेसबुक असते तरी तुम्ही फेसबुकचे "मालक" नाहीत. इथल्या त्या "आहेत".

त री ही

तुमची फडफड व इथले लिखाण अजूनही सुरू आहे, यावरून तुमची अन त्यांची झेप आमच्यासारख्यांना दिसते. मात्र तुम्ही तुमच्या फड्तूस धाग्यावर प्रतिसाद लिहिणार्‍यांना उन्मत्तपणे "तुमची अक्कल तुमच्यापाशी ठेवा" "इथे लिहू नका" वगैरे सुनावत असता.

आरसा आहे का आरसा? तोंड पहा जरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डॉक, पीएचडी कोणाकडे आहे आणि मालक कोण आहे हे अगदी निराळे प्रश्न आहेत.

गोष्टीत कोणीतरी मुलगा शाळेतल्या शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे गुंड बनतो आणि मारला जातो त्याबद्दल कुलकर्णींना सहानुभूती वाटते. पण विचारी, अभ्यास करणारा मुलगा आत्महत्येसारखी टोकाची कृती करतो याबद्दल त्यांना सहानुभूती वाटत नाही. त्याबद्दल काय म्हणणं तर आत्महत्या झाली हे वाईटच पण चूक त्याचीच होती!

पीएचडी करणारे बहुतेक लोक निदान २३-२४ वर्षांचे असतात. रोहितचं वय जरा जास्तच असावं कारण त्याचं पीएचडीचं काम नुकतंच सुरू झालेलं नव्हतं असं समजतंय. या वयाच्या लोकांना राजकीय मतं असू नयेत अशी अपेक्षा आहे? त्यातून ही मुलं संशोधन करणारी, म्हणजे अभ्यासू, वाचन-विचार करणारी! म्हणजे शाळा-शिक्षकांनी मुलांची मनं मारली नसतील तर मग त्यांनी पीएचडी करायला लागल्यावर मनं आणि मतं मारायची का? अठरा वर्षापासून निवडणूकांमध्ये मत देता येतं पण पीएचडी करत असाल तर मात्र तुम्ही मद्दडपणा अंगात बाळगून, आजूबाजूच्या जगाचा विचार करायचा नाही?

रोहितने आत्महत्या करायला नको होती. त्याचा जीव गेलाच पण त्यातून काही साध्य होईल, भरीव काही निपजेल असं दिसत नाही. रोहित मात्र जीवानिशी गेला.

(माझ्या सुदैवाने मँचेस्टर विद्यापीठाने आणि माझ्या सहाध्यायांनीही मला वर्षभर, औपचारिक तक्रारी करण्याच्या स्थानावर बसवून घेतलं. आम्ही राहायचो त्या विद्यापीठाच्या घरात काही सुधारणा करणं अपेक्षित आहे असं म्हटल्यावर त्यांनी सुधारणाही करून दिल्या. "तुम्हाला पैसे देतो आणखी सुविधा कशाला हव्यात" असली उत्तरं आणि अॅटिट्यूड औषधालाही दिला नाही. अगदी व्हीजावर त्या देशात राहणाऱ्या, परदेशी आणि गोरी कातडी नसणाऱ्या मुलीलाही अशी उत्तरं कधीही मिळाली नाहीत. "करायच्येत काय असली थेरं" असं आपल्याच लोकांना म्हणत आपण आपली संस्कृती काय हे दाखवतोय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(अमुक जातीचा अस्ल्याने) "स्कॉलरशिप" मिळते आहे (हमरे टुकडोंपे पल रहे हो) तर मग 'चड्डीत र्‍हा ना भो' असले उपदेश करणार्‍या "समतोल" भासणार्‍या पोस्टी टाकणारे हे महोदय आहेत. पीएचडी स्टुडंटचा स्टायपेंड म्हणजे पगार असतो, व तो का मिळतो, हे त्यांना समजण्याच्या पलिकडचे आहे.

त्यांच्या आकलनातल्या चुका, डिस्क्रिपन्सीज दाखवून देणारे लोक, इक्वल फूटींगवर त्यांच्याशी वाद-प्रतिवाद करू शकतात हे त्यांना मान्यच नाही. मी माझ्य्या "वॉल"वर प्रवचन देणार, मला हवा तसा रिस्पॉन्स आला तर "चर्चा" करणार असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही, ते मसंसारखे वेगळे मेडियम फेसबुक वॉलसारखे वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रतिवाद करणार्‍यांना उन्मत्त प्रतिसाद देत आहेत. उचलली जीभ प्रकारची स्टेटमेंट्स करून संदर्भ विचारलेत, तर "घ्या शोधून गूगलवर" असली उत्तरे देत आहेत.

सुरूवातीला बेनिफिट ऑफ डाऊट देऊन यांच्याशी नीट बोलायचा प्रयत्न करून झाला. तुम्ही कितीही लॉजिकल प्रतिवाद करायचा यत्न केलात, तरी त्याम्च्यासमोर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे मी हे असले हलकटपणे लिहितो आहे. Smile

(रच्याकने: मिपाने यांच्या बाबतीत केले ते उत्तम केले असे म्हणतो. मात्र, ते केल्यामुळे तिथल्या संपादक मंडळाला हाकलून लावले गेले असेही यांचे म्हणणे आहे, ते अलाहिदा Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

(अमुक जातीचा अस्ल्याने) "स्कॉलरशिप" मिळते आहे (हमरे टुकडोंपे पल रहे हो) तर मग 'चड्डीत र्‍हा ना भो' असले उपदेश करणार्‍या

असा उपदेश मला दिसला नाही. फेसबुकवर जाऊन त्यांच्या पोस्टस पाहून आले व त्यांची प्रतिक्रियाही. अर्थात बाजू कोणाचीच घ्यायची इच्छा नाही फक्त एक नीरीक्षण मांडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकावर कशाला? हाच लेख वाचून काय वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रवाहाविरुद्ध लेख आहे. मत वेगळे व्यक्त केले आहे. परंतु हेदेखील म्हटले आहे -

वर सुशीलकुमार याने दलितांविरूद्ध काही अनुद्गार काढल्याचा उल्लेख आहे. मी तर म्हणतो, ते जर खरे असेल, तर जरूर त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करा.

थोडा डेव्हिल्स अ‍ॅड्व्होकेट टाइप लेख आहे.
.
पण मला दलितांविरुद्ध आघाडी उभारल्याचे वाटले नाही. रोहीतच्या पत्रामध्ये जातीचा उल्लेख नाही. कदाचित त्याला खरच जातीपातीचा त्रास झाला असेल, आपल्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणूनही त्याने उल्लेख असेल. पण या "कदाचित-कदाचित" च्या पलिकडे सत्य हे आहे की जातीचा उल्लेख नाही.
अधिक तपास व्हावा व त्याला अन्याय झाला असेल, तर न्याय मिळावा हीच इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा म्हणत, तुम्हालाही लेबल लावायची तीव्र इच्छा होते आहे, पण तुमच्या काँटेक्स्ट्स तशा नाहीत. तेव्हा ते मी करणार नाही. Smile

प्लीज, पुन्हा एकदा लेख वाचून प्रिमायस तपासा. मायबोलीवर हाच लेख व यांच्या काही प्रतिक्रिया इथे आहेत : http://www.maayboli.com/node/57261?page=3#new त्याही पहा. फेसबुकावरही पहा.

प्रतिवाद करताना हे लेखकमहोदय,

तेव्हा तुमचे तोंड आता पुरेसे काळे झाल्याचे नीट न वाचता तुमच्यासारख्या माझ्यावर केवळ आरोप करण्यात रस असलेल्या मनोवृत्तीच्या माणसाला कळायचेही नाही. तेव्हा थोडी जरी शरम असेल तर येथे पुन्हा घाण करायला येऊ नका. परंतु निर्लज्जाला काहीही सांगून फायदा नसतो हेही मला एव्हाना कळले आहे.

अशी संयत व संतुलित भाषा वापरत असतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मायबोलीवरील कपोचे नावाचे महाभाग तुम्हीच का? ते तेथे त्यांचे नाव सांगत नाहीत आणि तुम्ही येथे. बाकी मी कोठे काय लिहितो हे पहायला बराच वेळ आहेसे दिसते तुमच्याकडे. तुमच्यावर यापुढे वेळ घालवणार नाही.
नमस्कार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार.

या वाक्यांचा अर्थ नक्की काय निराळा आहे? आमच्या (करदात्यांच्या) पैशांवर जगत आहात आणि आम्हाला गैरसोयीची, किंवा आवडणार नाही अशी, किंवा अभ्यासेतर कामं करताच कशी! विद्यार्थ्यांनी चोवीस तास पीएचडीचं काम करणं अपेक्षित आहे काय? माणसं एवढी कप्पेबंद असायची अपेक्षा कशाच्या जोरावर?

अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई नाही आणि आंबेडकर सर्कलच्या विद्यार्थ्यांना तंबूत रहावं लागत होतं. यात जातीयता दिसत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वॉव! काय मस्त तर्क आहे!

अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई नाही आणि आंबेडकर सर्कलच्या विद्यार्थ्यांना तंबूत रहावं लागत होतं. यात जातीयता दिसत नाही?

बॉम्ब स्फोटातील जखमीना औषधोपचार आणि याकुबला मात्र फाशी.

यात जातीयता दिसत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही जणांना जराही गुंतागुंत समजत नाही. त्यांच्यासाठी थोडं तक्तीकरण. ते पाहून तरी दोन्ही बाबींमधली साम्यं आणि फरक नीट समजून घेतली जावीत अशी आशा. (दोन्ही ठिकाणी धर्माचा नि जातीचा जराही संबंध नाही, ही एक गंमतच आहे. पण ती सगळ्यांना नाही कळत खरी. ;-))
***

स्फोटात जखमी -> दुर्घटनाग्रस्त -> उपचार आणि नुकसानभरपाई आणि सुरक्षिततेच्या उपायांत सुधारणा
स्फोटात सहभागी -> आरोपी / गुन्हेगार
आरोपी -> शिक्षा होणे योग्य वा अयोग्य, किती योग्य वा अयोग्य यावर चर्चा / काथ्याकूट / गदारोळ
गुन्हेगार ->
शिक्षा -> फाशी / जन्मठेप (गुन्ह्याच्या प्रमाणात / आंतरराष्ट्रीय डावपेचांना वा मान्यकांना अनुसरून / कायद्यानुसार)
***

विद्यार्थी -> राजकीय कार्यकर्ता / नुसता विद्यार्थी
राजकीय कार्यकर्ता -> समान न्याय (शिक्षणाचा आणि/किंवा शैक्षणिक सुविधांचा (आणि लागू असल्यास आरक्षणाचा / शिष्यवृत्ती / अभ्यासवृत्तीचा हक्क) मिळवून देणे, राजकीय मतांचा हक्क बजावू देणे, एकाच गुन्ह्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षा असणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकाच गुन्ह्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षा असणे

बरोब्बर बोललात, मेघना भुस्कुटे.

मला हेच म्हणायचं आहे.

वेगवेगळे गुन्हे ( वेगवेगळ्या वर्तनपद्धती म्हणूयात हवं तर,) केलेले असताना, ""अभाविपच्या कार्यकर्त्यांवर" कारवाई नाही आणि "आंबेडकर सर्कलच्या विद्यार्थ्यांना" तंबूत रहावं लागत होतं. यात जातीयता दिसत नाही" असं त्यांची वर्तनपद्धती समजून न घेता म्हणणं म्हणजेच जातीयता का असा विचार मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीनुसार आधीच्या समितीनं 'मारहाण झालेली दिसत नाही' असा निकाल देऊन आंबेडकर सर्कलच्या विद्यार्थ्यांची निर्दोष मुक्तता केली होती. तो निर्णय नंतर फिरवण्यात आला. मधल्या काळात काय बदललं, अभाविपच्या विद्यार्थी कम कार्यकर्त्यावर झालेल्या अ‍ॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेचा संबंध आंबेडकर सर्कलच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या वादाशी कसा जोडला गेला, विद्यापीठबाह्य हस्तक्षेप का नि कसकसे झाले - या सगळ्यांत जातीयता नाही असं छातीठोकपणे म्हणणं; हे मात्र फारच आधुनिक आणि समताप्रिय आहे बरीक, असा विचार माझ्या मनात आला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्ही एका गुन्ह्यासाठी समान शिक्षा म्हणत आहात. तीसेक विद्यार्थी एका विद्य्रार्थ्याच्या खोलीवर गेले. त्यांनी त्याला मारहाण केली असा आरोप आहे. त्या एका मुलाने त्यांना केली असा नाही. आता तुम्ही म्हणाल मारहाणीचा आरोपच खोटा आहे. ज्या डॉ. पांडे यांच्या चौकशीसमितीने अहवाल दिले त्यात पहिल्यात दोन्ही बाजूंना कडक ताकिद देऊन सोडावे- कारण त्यावेळी सुशीलकुमार हॉस्पिटलमध्ये असल्याने त्याचा जबाब घेता आला नव्हता- असा निर्णय दिला. पण नंतर मारहाण झाली असा निष्कर्ष काढला होता. हा बदल सुशीलकुमारच्या जबाबानंतर झाला का माहित नाही. खरे खोटे काय ते चौकशीनंतर समोर येईलच, पण समान शिक्षेचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून.

हे लिहितानाच इतर चार विद्यार्थ्यांचे सस्पेंशन मागे घेतल्याची बातमी आली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक, आपण एकमेकांशी बोलायला हे धागे वापरायचे. मराठी संस्थळं आणि फेसबुक, लेखनाची जबाबदारी वगैरे गोष्टी आपल्याला समजतात ... असं आपण समजतो ना! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"राजकीय मतं असू नयेत अशी अपेक्षा आहे" असे कोठे म्हटले? तसे करायचे तर त्याला दुस-याकडून राजकीय पातळीवर विरोध झाला तर त्याचा सामना करायची तयारी हवी असे म्हटले आहे. वाचले का?
मला रोहितबद्दल सहानुभूती वाटत नाही हे तुमचे मत माझ्यावर लादू नका. पोस्टची दुसरीतिसरी ओळ वाचा. अर्थात तुम्ही भलतेच समज करून घ्यायचे ठरवले तर मी तुम्हाला माझ्या पोस्टमधील ओळी संदर्भासाठी वा पुराव्यासाठी दाखवत बसणार नाही. म्हणूनच आधी म्हतले, की तुम्हाला दुस-या पोस्टचा गाभाच कळलेला नाही तरी येथे त्याची तुलना करत आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा "गाभा" काय केल्या लोकांना समजत नाही हा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे.

या पोस्टीचा नै अन त्याही नै.

आन तुम्ही ठरिवलंय का अधिक इस्कटून सांगणार नै. अधिक लिहिनार नै.

आता आमी चांडाळानी कुनाच्या तोंडाकडं बगावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विद्यावृ्ती थांबवणं, वसतिगृहाबाहेर काढून तंबूत रहायला भाग पाडणं, सबसिडाईज्ड कँटिनमध्ये प्रवेश नाकारून बाहेर पूर्ण पैसे मोजून खायला लावणं, व्यवस्थापकीय इमारतींमध्ये प्रवेश नाकारणं जेणेकरून संवैधानिक मार्गाने लढता येणार नाही याची काळजी घेणं, केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या निलंबनासाठी एकामागोमाग एक पत्रं पाठवणं याला राजकीय विरोध म्हणता तुम्ही? राजकारण, राजकीय मतं आणि राजकीय विरोध यांच्याबद्दल तुमच्या व्याख्या काय? किमान काही उदाहरणं तरी?

आणि हे सगळा दबाव का, तर याकूब मेननच्या आणि एकूणच फाशीच्या शिक्षेला विरोध केला म्हणून? मुजफ्फरनगरच्या दंगलींबद्दल काही बोललं म्हणून? राज्यकर्त्यांची किंवा न्यायपालिकेची काही मतं, निर्णय न पटणं आणि त्याविरोधात काही बोलणं हा राजद्रोह होता का?

सुशील कुमारशी या विद्यार्थ्यांशी झटापट झाली असेलही; पण सुशील कुमार या झटापटीमुळे इस्पितळात पोहोचला नाही. तरीही "तो मेला असता तर ..." हे असं लेखन जबाबदार म्हणायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कलटी होण्याबद्दलच्या तुमच्या प्रश्नाला वर उत्तर दिलेच आहे. तरी तुम्ही तसे करणार नाही याची खात्री आहेच. आणखीही कमेंट्स आहेत तुमच्या. आणखी लिहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरशाची गरज तुम्हाला आहे.
माझे धागे फडतुस असतीलही. पण तुम्ही कुत्र्यासारखे का घोटाळत अाहात इथे काही असल्यासारखे किंवा तुमच्या भाषेत फडफडत आहात इथे? मी आमंत्रण दिले आहे का तुम्हाला इथल्या मालकांच्या जागेवरील माझ्या पोस्टवर येण्याचे?
इथले मालक आणि मी पाहून घेऊ. मालक माझ्याशी व मी त्यांच्याशी बोलायला समर्थ आहोत. तुम्ही मध्ये शहाणपणा करू नका.
हे सगळे मालकांच्याच साक्षीने चाललेले आहे हे विशेष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथले मालक आणि मी पाहून घेऊ. मालक माझ्याशी व मी त्यांच्याशी बोलायला समर्थ आहोत. तुम्ही मध्ये शहाणपणा करू नका.

इथल्या व्यवस्थापकांनी तुम्हाला अनेक वेळा भाषा आवरण्याबद्दल तंबी दिलेली आहे. तुमच्या लिखाणात एक अरेरावी दिसते, इतरांना तुच्छ लेखण्याचा हेतू दिसतो, आणि एकंदरीत त्रागा जाणवतो. आणि सर्वात मुख्य म्हणजे 'आपण विरुद्ध इतर' अशा भांडणाला सदोदित तयार असल्याची भूमिका दिसते. व्यवस्थापकांच्या मर्जीविरुद्ध तुम्ही तुमचं सदर कायम स्वतंत्र लेख म्हणून छापत आहात. तो व्यवस्थापकीय सोयीसाठी एकत्रित केल्यावर 'सेन्सॉरशिप' असल्याचाही ओरड तुमच्याकडून येते.

घाटपांडेंसारख्या सदस्याने तुम्हाला अतिशय चांगूलपणाने सल्ला दिलेला होता, की जरा मिळवून-जुळवून घ्या. तर ते करण्याऐवजी तुम्ही उद्दाम भाषा वापरून इतर सदस्यांशी भांडणं करत आहात. ऐसीचं वातावरण त्यामुळे बिघडत असल्याचं इतर सदस्यांनी कळवलेलं आहे. कृपया हे थांबवा.

कृपया तुमचं फुसके बार हे सदर एकत्रित केलेल्या धाग्यावर प्रसिद्ध करत जा.

(व्यवस्थापक) राजेश घासकडवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा. तुम्हाला पटेलच वा पटावे असे लिहू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग कल्टी कधी मारताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

इच्छा असेलच, तर ती तुम्ही मारायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माबोवर अ‍ॅडमिन यांनी नावानिशी प्रेमपत्र दिलंय तुम्हाला.
वाचलंत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आधी तुम्ही तुमची ओळख सांगा. तुम्हीच का ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण अभ्यासात कच्चे असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्याची काही व्यवस्था आहे का?

आय आय टी मध्ये आहे. पण मुख्य विद्यार्थी एकटे रहातात. त्यांना स्वतःला स्वतःचे सिम्पटम्स (रोगाची लक्षणे/ वागणूकीतील अ‍ॅबनॉर्मल बदल) नीट माहीत नसतात/लक्षात येत नाहीत. एकटे असल्याने दुसरा कोणी त्यांच्या वतीने फर्मली हे सांगू शकत नाही की काय अ‍ॅबनॉर्मल वाटते आहे. या कारणांमुळे समुपदेशन यशस्वी होऊ शकत नाही.
मानसिक रोगांमधील मुख्य घटक आहे, कुटुंबातील जवळची व्यक्ती व तिच्या लक्षात आलेल्या अ‍ॅबनॉर्मॅलिटीज. रुग्णाला तर आपण स्वतः रुग्ण आहोत हे गावीही नसतं. किंबहुना नैराश्य/उन्माद्/वैफल्य कोणत्याही तडाक्यात तर अजिबात कळत नाही की काहीतरी चुकते आहे.
.
अनेक लोक मला माहीत आहेत जे "डॉक्टरांकडे कधीही न गेल्याचा" डंका पिटतात .... क्वचित जवळून पाहीले तर हे लक्षात येते की त्यांनी आसपासच्या लोकांचे आयुष्य मिझरेबल केलेले आहे आणि समुपदेशन्/मानसोपचारतज्ञाची गरज त्यांना ही आहे.
.
रुग्णाला हे कधीच कळत नाही की तो रुग्ण आहे. तो नेहमी त्रासाचे कारण बाहेरच शोधत रहातो/ आरोपत रहातो. पण, ते इतकं त्याचं स्वत:च्या केमिस्ट्रीशी निगडीत असतं, औषधांनी ब्रेन केमिस्ट्री बदलायचा अवकाश, संपूर्ण जगच बदलते. खचलेपण जाते, उभारी येते, हिंमत येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. मुळात अशी व्यव्स्था अाहे हे महत्त्वाचे. ती कशी सुधारता येईल हेही पहायला हवे. हा विषय गुंतागुंतीचा आहे हे खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:Sp

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या मुलाची ही सुसाइड नोट वाचुन प्रथमदर्शनी तरी हा मुलगा संवेदनशील विचारी वाटतो.
Good morning,
I would not be around when you read this letter. Don’t get angry on me. I know some of you truly cared for me, loved me and treated me very well. I have no complaints on anyone. It was always with myself I had problems. I feel a growing gap between my soul and my body. And I have become a monster. I always wanted to be a writer. A writer of science, like Carl Sagan. At last, this is the only letter I am getting to write.
I always wanted to be a writer. A writer of science, like Carl Sagan.
I loved Science, Stars, Nature, but then I loved people without knowing that people have long since divorced from nature. Our feelings are second handed. Our love is constructed. Our beliefs colored. Our originality valid through artificial art. It has become truly difficult to love without getting hurt.
The value of a man was reduced to his immediate identity and nearest possibility. To a vote. To a number. To a thing. Never was a man treated as a mind
. As a glorious thing made up of star dust. In every field, in studies, in streets, in politics, and in dying and living.
I am writing this kind of letter for the first time. My first time of a final letter. Forgive me if I fail to make sense.
My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.
May be I was wrong, all the while, in understanding world. In understanding love, pain, life, death. There was no urgency. But I always was rushing. Desperate to start a life. All the while, some people, for them, life itself is curse. My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.
I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this.
People may dub me as a coward. And selfish, or stupid once I am gone. I am not bothered about what I am called. I don’t believe in after-death stories, ghosts, or spirits. If there is anything at all I believe, I believe that I can travel to the stars. And know about the other worlds.
If you, who is reading this letter can do anything for me, I have to get 7 months of my fellowship, one lakh and seventy five thousand rupees. Please see to it that my family is paid that. I have to give some 40 thousand to Ramji. He never asked them back. But please pay that to him from that.
Let my funeral be silent and smooth. Behave like I just appeared and gone. Do not shed tears for me. Know that I am happy dead than being alive.
“From shadows to the stars.”
Uma anna, sorry for using your room for this thing.
To ASA family, sorry for disappointing all of you. You loved me very much. I wish all the very best for the future.
For one last time,
Jai Bheem
I forgot to write the formalities. No one is responsible for my this act of killing myself.
No one has instigated me, whether by their acts or by their words to this act.
This is my decision and I am the only one responsible for this.
Do not trouble my friends and enemies on this after I am gone.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो तसा वाटतोच. अशा हळव्या स्वभावामुळेच त्याला हे सारे झेपले नाही का असे वाटले. ज्या मारहाण प्रकरणावरून हे सारे झाल्याचे दिसते, त्याचा प्रकाश हा नेता मात्र अजिबात तसा दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय?

हे अभाविपला लागू होते का? सुशीलकुमारसुद्धा विद्यार्थी असून त्याचा उल्लेख मात्र अभाविप अध्यक्ष असाच करताय तुम्ही.
स्वतःचा दुटप्पीपणा तुम्हाला दिसण्याची अपेक्षा नाही म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला सुशीलकुमारबद्दल काही प्रेम नाही हे मी आधीच लिहिले आहे. तो अभाविप संघटनेचा स्थानिक अध्यक्ष असल्याचा उल्लेख वाचला म्हणून तसा उल्लेख केला आहे. राजकारणाबद्दल जे रोहित व त्याच्या मित्रांबद्दल जे लिहिले आहे, तेच अभाविपच्या विद्यार्थ्यांनाही लागू होते. रोहितचा विषय चालू आहे म्हणून सगळे विस्ताराने लिहिता येत नाही. हे समजून घेता आल्यास माझ्यावर दुटप्पीपणाचा आरोप करणार नाहीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे या धाग्यावरून -
मार्गदर्शक तत्त्वे

- लेखन करताना दर्जाला व साहित्यमूल्यांना महत्त्व द्यावे. खेळ, करमणूक, गप्पाटप्पा व दंगा यांसाठी स्वतंत्र सदर असल्यामुळे ललित लेखनात व चर्चांमध्ये अवांतर विषय टाळावेत.
- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे. लेखनवस्तूच्या गरजेनुसार काही प्रमाणात अशिष्ट मानलेले शब्दप्रयोग येऊ शकतात. तसे वापरण्याची गरज आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी लेखकाची असेल.
- प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे लेखकांनी ध्यानात ठेवावे. अशा टीकेकडे खिलाडू वृत्तीने, तीतून शिकण्याच्या उद्दिष्टाने पाहावे.
- वाचकांनी साईटवरील लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत करावी. त्यासाठी दर्जा मोजण्याची सुविधा पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. हे साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व लेखनाला श्रेणी देण्याची सुविधा अनेक जुन्याजाणत्या सदस्यांना दिलेली आहे.
- प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.
- सर्वोत्कृष्ट लेखनाची तसेच नियमितपणे उत्तम लेखन करणाऱ्यांची विशेष नोंद घेण्याबाबत व्यवस्थापन प्रयत्नशील राहील.
- चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.
- अर्वाच्य, असांसदीय शब्दप्रयोग चर्चांना व्यक्तिगत पातळीवर नेऊ शकतात, तेव्हा असे प्रयोग टाळावेत.
- चर्चाप्रस्तावकावर चर्चा योग्य दिशेने चालवण्याची जबाबदारी असावी. त्यासाठी सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. चर्चेच्या शेवटी प्रस्तावकाने चर्चेचा सारांश वा फलित लिहिणे अपेक्षित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याबद्दल धन्यवाद.
तुमच्यासह या किंवा माझ्या इतर पोस्टवरील काही प्रतिसाद या स्पिरिटमध्ये आहेत का किंवा असतात का ते पाहू शकता. ती माझी एकट्याचीच जबाबदारी नाही.
यातल्या एका गोष्टीबद्दल मी तुम्हाला आधीही लिहिले होते. 'कठोर टीका' हा खुप व्हेग शब्द आहे. याउलट लेखनाबद्दल कितीही कठोरपणे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते मुद्देसूद पण योग्य सौम्य शब्दात लिहिते येते हे अनेक सदस्य दाखवतात.काहीजण 'कठोर' याचा अर्थ दुखावणारी टीका असा घेऊ शकतात म्हणून. आनि वर अशी कठोर टीकाही खिलाडूपणाने घ्यायची हे अति होते.
वर एक वाक्य आहे. "जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते" शिष्ठपणा हा शब्द आगाऊपणा असा घेतला जातो. त्याऐवजी 'शिष्टाचाराची' किांवा 'सभ्यपणाची' हा शब्द योग्य वाटतो का पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राकुंच्या प्रतिसादांना "निरार्थक" अशी श्रेणी का देतात लोक? ते उगाचच झाकले जातात.

इतके निखळ मनोरंजन करणारे कोणाचेच प्रतिसाद नसतात. खरे तर राकुंच्या प्रतिसादांना एका वेगळ्या धाग्यावर हलवले पाहिजे, म्हणजे माझे खुप च सोय होइल.

@राकु - तुम्ही दुसर्‍यांच्या धाग्यावर पण प्रतिसाद द्या न प्लिज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुमचे मनोरंजन होते' याचा अर्थ तुमच्या इतर कमेंटवरच व्यवस्थित दाखवलेला आहे. तो तुम्हाला समजला नसेल असे म्हणवत नाही. तरीही येथे येऊन असे लिहिता हे तुमचे धाडस अगदी वाखाणण्यासारखे आहे. याला म्हणतात - कोडगेपणा किंवा निलाजरेपणा - करत रहा.
तुमचे भलेही मनोरंजन होत असेल. या गंभीर विषयावरून मनोरंजन होत असेल तर तुमच्यात काही तरी गडबड आहे. तपासून घ्या.
वर प्रतिसाद देताना जी पथ्ये पाळायची त्याबद्दल येथील मालकांनी एक कमेंटमध्ये दाखवली आहेत. तुमच्या कमेंटमध्ये ती पाळली आहेत का तुम्हालाच पाहता येईल. यापुढे काही पटले नसेल तरी योग्य शब्दात कमेंट केलीत तरच त्याला नीट उत्तर मिळेल.
हे शेवटचे सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिसे तू कबूल कर ले, वो अदा कहां से लाऊ
तेरे दिल को जो लुभा ले, वो सदा कहां से लाउ

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बस. आणखी काही नको. मी स्मायली वापरत नाही इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

* वेगवेगळ्या विचारधारेतल्या विद्यार्थी चळवळी/ संघटनांचा नारा 'लडाई पढाई साथ साथ' किंवा 'लडो पढाई करने को, पढो समाज बदलने को' अशा अर्थाचा असतो. अभ्यास सोडून चळवळी करा असे कोणी म्हणत नाही.
* विद्यार्थ्याने शिक्षणकाळात फक्त पुस्तकांत/ प्रयोगशाळेत डोके खुपसून बसावे का? आसपासच्या जगात काय चालले आहे त्याच्याशी त्याचे देणेघेणे नसावे का? समाजात न मिसळणार्‍या अभ्यासकांना आपण 'हस्तिदंती मनोर्‍यावर बसणारे' म्हणवून हिणवणार नाही काय?
* (उच्च) शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या शिक्षणामुळे सुजाण नागरिक(ही) व्हावा अशी आपली अपेक्षा नसते का? विद्यार्थी हा समाजाचा एक भाग आहे. एक समाजघटक/ नागरिक म्हणून त्याने सामाजिक, राजकीय बाबींवर त्याने विचार करावा, तो मांडावा, चर्चा कराव्यात, न्यायाची मागणी करावी, त्यासाठी संघर्ष करावा यात चुकीचे काय?
* पीएचडीसाठी मिळणारे विद्यावेतन ही रमण्यातली दक्षिणा नसते. भारतीय विद्यापीठांत हे विद्यावेतन आपोआप विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होत नाही. विद्यार्थ्याला (दरमहा) अर्ज करावा लागतो. विद्यार्थ्याची पुरेशी प्रगती झाली असेल तर गाइड आणि विभागाध्यक्ष त्या अर्जावर सही करतात. त्यामुळे शिष्यवृती अभ्यास केल्यावरच मिळते. त्याचा 'राजकीय स्वरूपाच्या गोष्टी' करण्या न करण्याशी काय संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्याही मृत्यूची अशी चर्चा होणे हे खरेच खूप दुर्दैवी आहे.

रोहितच्या मृत्यूला तो दलित असणे आणि केवळ त्यामुळेच त्याला अपमानास्पद वागणूक मिळणे आणि त्यामुळे त्याला नैराश्य येणे हेच एक आणि एकमेव कारण होते काय? तसे असेल तरच 'दलित विद्यार्थ्याची आत्महत्या' हे शीर्षक योग्य ठरेल असे माझे मत आहे. असे नसेल तर वारंवार तसा उल्लेख करून सर्वसामान्य लोकांचा समूह म्हणून आपणात फूट पाडण्याच्या सोयीस्कर राजकारणाला आपण बळी पडत आहोत असे वाटते.तसेच रोहितच्या आत्मघाताशी दैनंदिन आयुष्यासंदर्भात त्याच्या दलितत्वाचा संबंध नसेल तर तटस्थ निरीक्षक म्हणून पाहता माझ्यादृष्टीने हे प्रकरण व त्यावरची चर्चा ही निव्वळ राजकीय ठरते.

तसेच एका कायदेशीर बाबीची माहितीही कुणाकडे असेल तर शेअर करावी.(माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवरही ही माहिती महत्वाची आहे) आंतरजातीय विवाहातून जन्मलेल्या व्यक्तींना आपली जात(एकतर वडीलांची किंवा आईची)अशी 'ठरवण्या'चा अधिकार आहे का? या बातमीतून तरी तसेच ध्वनित होते. तीत लेखक म्हणतो-

Rohith was a Dalit, he chose to take up his mother's caste since his father had deserted them.

अवांतर:जातीची चर्चा केलेली मला आवडत नाही.पण जन्मासोबत येणारी जात ही संविधानातल्या तरतुदींमुळे आणि आजवरच्या राजकारणामुळे आपल्यात इन्स्टॉल केल्या गेली आहे.आपण ती कितीही दुर्लक्षण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची दुनिया तुम्हाला तिची सतत आठवण करून देत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

मुळात तो दलित आहे की नाही ही तुम्ही म्हणता त्या कारणामुळे चाललेली टीव्हीवरची चर्चा मीदेखील पाहिली होती. पण मुळात त्याची जात हा मुद्दा नसल्याने मी त्याचा उल्लेख केला नाही.
आज इतर चौघांवरील कारवाई मागे घेतल्यामुळे 'पहा, आधीची कारवाई चुकीची होती, हेच यावरून सिद्ध होते' असे म्हणणारेही भेटतील, किंवा 'त्यावरून झालेले आंदोलन चिघळू नये म्हणून ही भूमिका घ्यावी लागली' असे विद्यापीठाचे अधिकारी म्हणतील. या सर्वात दलित व गरीब विद्यार्थ्यांना गरज असलेल्या समुपदेशनाच्या, विद्यार्थ्यांनी (मग ते कोणीही असोत) राजकीय आंदोलने करावीत का, हे मूलभूत प्रश्न मागे पडतील. दुर्दैवाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या बातम्या तुम्हाला उपयुक्त वाटतात का ते पहा:
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/intercaste-child-can-ge...

http://timesofindia.indiatimes.com/india/SC-gives-mothers-ST-status-to-a...

अजून एक इथे दुवा आहे, त्यावरील पुढील परिच्छेद तुम्हाला रोचक वाटू शकेल:

The issue "If a woman who by birth belongs to a scheduled caste or a scheduled tribe marries to a man belonging to a forward caste, whether on marriage she ceases to belong to the scheduled caste or the scheduled tribe?" came up for consideration before the Full Bench of the Bombay High Court in Rajendra Shrivastava vs. State of Maharashtra, (2010) 112 Bom LR 762 and the Full Bench held as follows:-

"When a woman born in a scheduled caste or a scheduled tribe marries to a person belonging to a forward caste, her caste by birth does not change by virtue of the marriage. A person born as a member of a scheduled caste or a scheduled tribe has to suffer from disadvantages, disabilities and indignities only by virtue of belonging to the particular caste which he or she acquires involuntarily on birth. The suffering of such a person by virtue of caste is not wiped out by a marriage with the person belonging to a forward caste. The label attached to a person born into a scheduled caste or a scheduled tribe continues notwithstanding the marriage. No material has been placed before us by the applicant so as to point out that the caste of a person can be changed either by custom, usage, religious sanction or provision of law."

The Hon'ble Supreme Court of India in Rameshbhai Dabhai Naika Vs State of Gujarat & Others ( CIVIL APPEAL NO. 654 OF 2012- Decided on January 18, 2012) was pleased to endorse the above view of the Full Bench Judgment of the Bombay High Court. The Supreme Court was also pleased to observe that the view expressed earlier by the Supreme Court in Valsamma judgment that in an inter-caste marriage or a marriage between a tribal and a non-tribal the woman must in all cases take her caste from the husband, as a rule of Constitutional Law is a proposition, the correctness of which is not free from doubt."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल आभार!

पण वर बातमीत दिलेल्या केसेस फार स्पेसिफिक वाटतात,अपवादात्मक वाटतात.सर्वसाधारणपणे जात ठरवण्याचा अधिकार आंतरजातीय अपत्याला नाही हेच दिसते.माझा अनुभव सांगायचा तर घरी मी कुठलीही धार्मिक परंपरा पाळत असलो तरी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मी माझी जात लिहू इच्छित नाही असे मी आणि माझ्या पालकांनी कळवल्यावरसुद्धा शाळेने सक्तीने जातीचा उल्लेख करायला लावला.तीच गोष्ट सरकारी नोकरीत रुजू होतानाची.सरकारी नोकरीत रुजू होताना ईश्वराला साक्षी ठेवून संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ लिखित स्वरूपात घ्यावी लागते. ईश्वरावर विश्वास नसेल तर स्वत:च्या विवेकबुद्धीला साक्षी ठेऊन तशी शपथ घेता येते,इतके आपले संविधान पुरोगामी आहे.मात्र जात लिहिणे नोकरशाहीकडून सक्तीचे करण्यात येते.असो.

मध्यंतरी प्रकाश आंबेडकरांनी शाळेच्या दाखल्यावरून जातीचा उल्लेख गाळण्याची सूचना केली होती.त्याचे 'पुरोगामी' लोकांनी कितपत स्वागत केले काही कल्पना नाही. आताही जातीअंताच्या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देताना दिसतात.तोच जातिअंताचा एकमेव मार्ग आहे असे सांगतात.परंतु आंतरजातीय अपत्याला कुठलीही जात चिकटवू नये अशी कायदेशीर तरतूद करावी का असे विचारल्यावर मात्र त्याचा विरोध करतात.कारण लोकांना प्रेमविवाह तर करायचे आहेत पण आरक्षणाचे फायदेही सोडायचे नाहीयेत. जसे,आज माझा उपास आहे पण उपासाला साबुदाण्याची खिचडी चालते असे आपण म्हणतो आणि खातोही.अशी तरतूद केली तर खरोखर किती लोक आंतरजातीय विवाहाला तयार होतील याबद्दल शंका वाटते.अशी तरतूद केल्यावरही आंतरजातीय विवाह करणार्‍यांची संख्या किती राहील यावर या चळवळीचे यश मोजता येईल. ते खरे सामाजिक परिवर्तन म्हणता येईल. आंतरजातीय विवाह करून सामाजिक पातळीवरील 'समरसता' साधण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी ठरत असलो तरी सरकारी तंत्र , एस्टॅब्लिशमेंट आपल्याला आपली जात त्यागू देत नाही हा एक विरोधाभास आहे.कथित पुरोगामीही त्याविरोधात ठोस भूमिका घेताना दिसत नाही. आपल्या क्लासिक ढोंगीपणाचे हे अजून एक उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

तुम्ही उपप्रतिसाद देईपर्यंत वरचा प्रतिसाद वाढवला आहे. तो ही बघा

शाळेत जातीचा उल्लेख नको ही सुचना स्वागतार्ह आहे. सध्या पुण्यात काही शाळा आहेत ज्या सदर गोष्ट काही वर्षे राबवत आहे. जातीय आरक्षणाच्या बाबतीत जातीचा दाखला द्यावा लागतो मात्र फॉर्मवर जात विचारली जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात "हिंदू- नॉन बीसी" इतकाच उल्लेख आहे मागासवर्गीयांच्या दाखल्यात विशिष्ट जात लिहिलेली असे किंवा कसे ते ठाऊक नाही. मुलीच्या दाखल्यात मात्र जात लिहिलेली आहे. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या दाखल्यात (आणि बहुधा प्रगति-पुस्तकावरपण) स्पष्ट जात लिहिली होती. हिन्दू-अमुक अमुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१ / - १

माझ्या दाखल्यात केवळ धर्म हिंदु आणि 'कॅटेगरी' "ओपन" असे आहे.
मुलीच्या प्रवेश फॉर्म्समध्ये धर्म व जात दोन्हीची माहिती विचारलेली नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुलकर्णी तुमचे इतर लेख मी आवडीने वाचले होते. मात्र हा लेख निव्वळ गरळ आहे.
ठीक आहे जातीय नाही तर नाही. नाहीतरी हा मुद्दा जातीय नाही हे महामहोपाध्याय इराणीबाईंनीच जाहीर केल्याने तसे नाही हे सर्वांनाच मान्य होण्यास हरकत नाही. कदाचित रोहित वेमुलाने गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून विद्यापीठात यावे किंवा गेलाबाजार विद्यापीठातील नळावर पाणी पिऊ नये अशा स्पष्ट स्वरुपाची शिक्षा केली असती तर हा जातीय मुद्दा आहे असे स्पष्टपणे लक्षात आले असते.

मात्र याही पलीकडे जाऊन या अभाविपला देशभक्तीचा ठेका कुणी दिलाय याबद्दल काय म्हणायचंय? याकूब मेननच्या फाशीबाबत इथं विस्तारानं चर्चा झाली होती. इंटेलिजंट सर्विसेसचे माजी अधिकारी, सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश अशा विविध पार्श्वभूमीच्या लोकांनी मेननच्या फाशीबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले होते. आता देशासाठी तीस पस्तीस वर्षे दिलेल्या या लोकांना केवळ मेननच्या फाशीबाबत वेगळे मत दिल्याने देशद्रोही म्हणायचे आणि गावभर सिगरेट फुंकत रस्त्यावर पचापचा गुटखा थुंकणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांना केवळ अभाविपचे लेबल लावले म्हणून देशभक्त म्हणायचे हे कुठले समीकरण आहे? अभाविपकडे काय देशभक्ती मोजायचे काही अॅनालायझर आहे काय की एखाद्या अभाविपच्या कार्यकर्त्याच्या ओंजळीत मुतल्यावर ताबडतोब तीन औंस देशभक्ती किंवा ५६ इंची देशभक्ती असं ताबडतोब कळतं ते?

मुळात १९४२ च्या चलेजाव चळवळीत जेव्हा संपूर्ण देश भेदभाव विसरुन गांधीसोबत आंदोलनात उतरला होता तेव्हा जाणीवपूर्वक या लढ्यापासून बाजूला राहणाऱ्या रा.स्व. संघाची अभाविप ही वैचारिक अवलाद आहे. त्यांनी देशभक्तीचा फोका मारणे हाच एक विनोद आहे. काहीही रचनात्मक काम न करता समाजात कायम दुही पाडत राहणे हा एकमेव कार्यक्रम राबवणे आणि कुणी प्रश्न उपस्थित केला की वनवासी कल्याण आश्रमाची फुसकुली सोडणे एवढेच त्यांना जमत आले आहे.

विद्यार्थ्यांच्या दोन गटांमधल्या स्थानिक स्वरुपाच्या भांडणांमध्ये केंद्रसरकारच्या मंत्रालयाला पाच पाच वेळा फॉलो अप करावासा वाटतो यातही काही वावगं दिसलं नाही हे आणखीच मजेशीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी यात अभाविपची बाजू घेतलेली तुम्हाला कोठे दिसले? तुम्ही राजकीय आंदोलने करत असाल तर मग त्याकडे त्या द्ृष्टीने पाहिले पाहिजे एवढेच मी म्हणत आहे. तुम्ही विद्यार्थी म्हनून तेथे राहता, आणि मुझफ्फरनगर, याकूब मेमन, दलित-मुस्लिम ऐक्य (यात कोणाची भूमिका योग्य-अयोग्य हा पूर्णपणे वेगळा मुद्दा) या मुद्द्यांवर दुस-यांकडून विरोध होणा-या गोष्टी आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? अहो, राष्ट्रगीतासाठी उबे राहणे हाही अपराध नाही असे तेथे म्हणले जाते, तेथे याकूब मेमनचे काय घेऊन बसलात? पण यावरून वाद होऊ शकतो याची कल्पना आपल्याला का नसावी? मी अभाविपची बाजू घेत नाही. पण केरळ, बंगालमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना ठार करण्यात आलेले आहे याचीही तुम्हाला कल्पना असावी.
तुम्ही उल्लेखलेले ५६", वनवासी कल्याण, वगैरे मुद्द्यांचा येथे संबंध नाही, म्हणून त्याबद्दल बोलत नाही.
गळ्यात मडके वगैरे कल्पना तुम्हाला सुचतात कशा? दलितांवर 'दलित' म्हणून अन्याय व अत्याचाराच्या घटना होतातच. ते नाकारणे कसे शक्य आहे? परंतु प्रत्येक घटना जिच्यात दलित व्यक्ती गुंतलेली आहे, ती दलितविरोधी कशी म्हणता येईल?
तुम्ही पाहिले असेल तर हैद्राबाद विद्यापीठाने या पाच विद्यार्थांची शिश्यव्ृत्ती सात-अाठ महिन्यांपासून बंद केली असा आरोप केला गेला. आजच्या टीव्हीवरील चर्चेत ऐकले की याचा व आंदोलनाचा काहीही संबंध नाही आणि कितीतरी विद्यार्थ्याची स्कॉलरशिप थकलेली आहे. तेथील रचनेत काहीतरी बदल झाल्यामुले हे झाल्याचे कळते. यापेक्षा अधिक तपशील माझ्याकडे नाही. तरीदेखील दलिता'च्या पोटावर पाय असा त्याचा प्रचार केला गेल्याचे तुम्ही ऐकले असेल. यावरून तुम्हाला कसा प्रचार केला जातो हे लक्षात यायला हवे.
चार-पाच वेला पाठवलेल्या स्मरणपत्रांच्या बाबतीतही असाच अपप्रचार केला गेला. कोणाही खासदाराने एखादे प्रकरण मंत्रालयाकडे चौकशीसाठी पाठवले गेले की त्यांच्याकडून ते संबंधित विभागाकडे पाठवले जाते व त्यावर उत्तर येईपर्यत त्याबद्दल स्मरणपत्रे पाठवली जातात. कालच मंत्र्यांनी कॉंग्रेसच्या एका खासदाराने २०१४मध्ये पाठवलेल्या अशाच एका पत्राचा पाठपुरावा केल्याचेही पुढे आले आहे. अर्थात या दोन पत्रांचा संदर्भ वेगळा असला, तरी प्रोसिजर काय असते हे सरकारने सांगितले. तेव्हा कोणाची बाजू घेण्याचे कारण नाही. पण जो दुष्परचार आहे तो तसा आहे हे मान्य करायला काय हरकत आहे?
आजच इतर चार विद्यार्थांवरची कारवाई मागे घेतल्याचे मी येथेच दुस-या कमेंटमध्ये लिहिले आहे. याहीपुढे जाऊन नुकसानभरपाई, कोणाची तरी गच्छंती यावर हे प्रकरण मिटले, तर मी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा होईल असे तुम्हाला वाटते का? म्हणजे यात सामील झालेल्या राजकीय पक्षांच्या राजकारणातून कोणाचे भले होण्यासारखे आहे असे वाटले का तुम्हाला? म्हणजे मग असे वळण लागण्यावरून काय होते, की पुन्हा कोणी दलित आत्महत्या-खून यांनी मरतो का, व त्यातून काही राजकीय फायदा उठवता येतो का यावर ही सगळीच राजकीय गिधाडे टपून बसलेली असतात हे वास्तव तुमच्या लक्षात येते का? आयआयटीतला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे, कोट्यासारख्या ठिकाणचे प्रेशर सहन न झाल्यामुळे किंवा असे राजकीय स्वरूपाचे आंदोलन करून आत्महत्या करणारा यांमध्ये माझ्यासाठी काहीही फरक नाही. मला या सर्वांबद्दलच वाईट वाटते. यात कोठेही कोणाच्या जातीचा प्रश्न नाही. मागासवर्गीय व गरीब अशा मुलांपुढची आव्हाने इतर मुलांपेक्षा वेगळी व मोठी असतात. रोहितच्याआधीही किती दलितांनी तेथेच आत्महत्या केल्या? गेल्या दहा वर्षांमध्ये याबद्दल काही उपायय़ोजना केली गेली का? हे न पाहता प्रासंगिक कारणाने तुम्हाला केवळ अभाविप/भाजप/संघ यांच्यावर टीका करायची असेल तर ती जरूर करा पण ती येथे लागू होते का हेही तुमचे तुम्ही पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. भूमिकेचा विरोध होणं आणि राष्ट्रदोही म्हणणं यांत फरक आहे. (उदाहरणार्थ - ह्या धाग्यावर तुमच्या भूमिकेला विरोध होत आहे; तुम्हाला कोणीही राष्ट्रद्रोही आणि/किंवा ऐसीद्वेष्टे म्हणत नाहीये.)
२. राष्ट्रगीतासाठी उभं (न) राहणं, केरळ-बंगालमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारणं याचा इथे काहीही संबंध नाही.
३. फक्त विद्यावृत्ती (शिष्यवृत्ती हा शब्दतरी नीट लिहाल का, भलते शब्द डोक्यात येतात) थांबवण्याबद्दल कोणीही बोलत नाही, कँटीनमध्ये, वसतिगृहात आणि प्रशासकीय इमारतींमध्ये प्रवेश नाकारणं असेही मुद्दे त्याच जोडीला आहेत.

आणि या प्रतिसादाला उत्तर देणार का? विशेषतः या आक्षेपाला?
सुशील कुमारशी या विद्यार्थ्यांशी झटापट झाली असेलही; पण सुशील कुमार या झटापटीमुळे इस्पितळात पोहोचला नाही. तरीही "तो मेला असता तर ..." हे असं लेखन जबाबदार म्हणायचं?

-- (सदस्या) अदिती

---

ऐसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून - चर्चाप्रस्तावकावर चर्चा योग्य दिशेने चालवण्याची जबाबदारी असावी. त्यासाठी सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. चर्चेच्या शेवटी प्रस्तावकाने चर्चेचा सारांश वा फलित लिहिणे अपेक्षित आहे.
ही जबाबदारी तुम्ही नीट पार पाडत आहात असं वाटत नाही.

-- (व्यवस्थापक) अदिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही विद्यार्थी म्हनून तेथे राहता, आणि मुझफ्फरनगर, याकूब मेमन, दलित-मुस्लिम ऐक्य (यात कोणाची भूमिका योग्य-अयोग्य हा पूर्णपणे वेगळा मुद्दा) या मुद्द्यांवर दुस-यांकडून विरोध होणा-या गोष्टी आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? अहो, राष्ट्रगीतासाठी उबे राहणे हाही अपराध नाही असे तेथे म्हणले जाते, तेथे याकूब मेमनचे काय घेऊन बसलात? पण यावरून वाद होऊ शकतो याची कल्पना आपल्याला का नसावी? मी अभाविपची बाजू घेत नाही. पण केरळ, बंगालमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना ठार करण्यात आलेले आहे याचीही तुम्हाला कल्पना असावी.

विद्यार्थी म्हणून राहणाऱ्या अभाविप, भारतीय विद्यार्थी सेना, एनएसयुआय अशा सर्व विद्यार्थी संघटना या राजकीय आंदोलनांमध्ये भाग घेतात. एखाद्या मुद्द्यांवरुन दोन संघटनांमध्ये वाद होऊ शकतो. असा स्थानिक पातळीवरील वाद केंद्रीय मनुष्यबळ खात्याने कारवाईची मागणी करण्याइतका गंभीर का वाटला? केरळ, बंगालमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात आले तिथे केंद्र सरकारने काही हस्तक्षेप केला होता का?

चार-पाच वेला पाठवलेल्या स्मरणपत्रांच्या बाबतीतही असाच अपप्रचार केला गेला. कोणाही खासदाराने एखादे प्रकरण मंत्रालयाकडे चौकशीसाठी पाठवले गेले की त्यांच्याकडून ते संबंधित विभागाकडे पाठवले जाते व त्यावर उत्तर येईपर्यत त्याबद्दल स्मरणपत्रे पाठवली जातात. कालच मंत्र्यांनी कॉंग्रेसच्या एका खासदाराने २०१४मध्ये पाठवलेल्या अशाच एका पत्राचा पाठपुरावा केल्याचेही पुढे आले आहे. अर्थात या दोन पत्रांचा संदर्भ वेगळा असला, तरी प्रोसिजर काय असते हे सरकारने सांगितले. तेव्हा कोणाची बाजू घेण्याचे कारण नाही. पण जो दुष्परचार आहे तो तसा आहे हे मान्य करायला काय हरकत आहे?

काँग्रेसच्या खासदाराने पाठवलेल्या पत्रावर मनुष्यबळ खाते बसून राहिले असा आरोप त्या खासदाराने केला आहे. http://www.newindianexpress.com/nation/Irani-Sat-on-my-Letter-Since-2014...
त्याचबरोबर विद्यापीठाने स्वतंत्रपणे कारवाई केली असा स्मृती इराणी यांचा दावा चुकीचा असल्याचे मत विद्यापीठाच्या डीनने आता दिले आहे
http://www.ndtv.com/india-news/smriti-irani-incorrect-i-did-not-endorse-...

ही प्रासंगिक कारणाने केलेली टीका नसून सध्या तथाकथित देशभक्तांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव आणि सुळसुळाट कसा त्रासदायक ठरतोय हे दाखवण्याची इच्छा आहे. आपल्या उपराष्ट्रपतींपासून अगदी विरोधी मत मांडणाऱ्या कोणालाही देशद्रोही लेबल लावण्याची जी साथ आली आहे त्याचाच परिपाक या घटनेत दिसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विद्यापीठातील दलित शिक्षक आणि सपोर्ट स्टाफने राजीनामे दिले आहेत. त्यात आणखी महत्त्वाची बाब म्हणजे दलित कर्मचाऱ्यांची नावं नवी दिल्लीला पाठवून दिलीत. या दलित कर्मचाऱ्यांवर केंद्र सरकारचे लक्ष आहे अशी माहिती विद्यापीठ प्रशासनानेच त्यांना दिली आहे.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/dalit-professors...

Dalit faculty members have been keeping a low profile after Rohith’s death and fear that they are being watched by the university administration.

“We have been sent feelers from the University Administration that names of 50 prominent Dalit teachers, officers and students have been sent to New Delhi and we are all under watch,” Captain Dr Kumar told The Indian Express before resigning.

म्हणजे दलितविरोधी राजकारण कोण करतंय ते बघा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खालील लेखात भाजपेयी, इराणी आणि इतरांचा चांगला पंचनामा केला आहे.
http://indianexpress.com/article/blogs/rohith-dalit-suicide-hyderabad-un...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल फेसबुकवर रोहितचा व्हीडीओ फिरत होता, सोयीस्कररित्या संकलित केलेला. भाजपेयी किती खालच्या थराला जाऊ शकतात याची कल्पनाही करता येत नाही. (आणि धागालेखन अजूनही तावच्या तावभर, नवे धागे काढत सत्य नाकारत आहेत. नक्की कोणत्या नंदनवनात राहतात, कोण जाणे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखकाला रोहितच्या पार्टी देण्याबद्द्लचं विधान माहिती आहे पण त्याच्या अनेक फेबु पोस्टवर त्याला डाचणारा अंतर्विरोधाबद्द्ल जे लिहीलय ते माहित नाही? आपल्याला सोईस्कर ते उचलायचं आणि त्यावरच लेख पाडायचे हे ही राजकारणच आहे, मग भलेही तो माणूस राजनीती करत नसो. या समाजातल्या राजकारणी वृतीचा कोणाही संवेदनाशील माणसाला त्रास होतो. तो भलेही चुकीच्या संघटनेच्या गळी लागला असेल पण हुशार मुलांना समजावणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे हे विद्यापीठाचे/प्राध्यापक इत्यादींचे कर्तव्य नाही काय? माणूस चूकीच्या देशेने का जात असेना त्यामागे त्याच स्वतःचं लॉजिक असतं. पण आम्हाला त्याचं काय? आम्हाला गणपतीचं धड, कुंकू लावणे, विटाळ पाळणे अश्या गोष्टींमागचं लॉजिक शोधण्यापुढे इतर गोष्टी पहायला वेळ कुठेय.
अभाविप ही काही संतांची संघटना नाहे पण त्यातले अडाणी गुंड चालतात आणि एखादा हुशार स्वतःच्या मेरिटवर पुढे जाऊन काही करु पहाणारा विद्यार्थी आमच्या व्यवस्थेत जीव देतो हे सुन्न करणारं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Rohith Vemula - An unfinished portrait

रोहितची जात काय होती, त्याच्या घरात काय घडत होतं ... याबद्दल कसलाही थिल्लरपणा न करता लिहिलेलं व्यक्तिचित्र. असा समजूतदार लेख प्रकाशित होण्यामागचं कारण ..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचनीय लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि तरीही तो दलित नव्हता अशा बातम्या येत आहेत.

>> हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या आत्महत्या केलेल्या संशोधकाची आई आणि आजी या दोघींनीही त्यांची जात वड्डेरा असल्याचे जाहीर केली असल्याचा दावा एका गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. वड्डेरा ही जात दलित वर्गात मोडत नसून, ती मागास वर्गातील आहे. हा अहवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. <<

गुप्तचर विभाग आणि सुरक्षा सल्लागार पेपर वाचत असतील का, असा एक प्रश्नही ह्या निमित्तानं पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोहितच्या आत्महत्येनंतर चार दिवस वाट बघून नंतर मोदींनी ट्वीट केलं. याकूबला फाशी दिली हे चूक होतं, असं म्हणणं म्हणजे देशद्रोह नाही अशा अर्थाची काहीही विधानं विद्यमान सरकारकडून आलेली नाहीत. केलं काय तर, जी पाच विद्यार्थ्यांवर जी अन्याय्य कारवाई झालेली होती ती मागे घेतली. आणि आता मेलेल्या माणसाच्या जातीबद्दल रिपोर्ट्स देणंघेणं सुरू आहे. तेही विषारी प्रकारचे.

याचा अर्थ नक्की काय लावायचा? आमच्या राजकीय समर्थकांशी पंगा घेतलात तर ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोहितच्या शोकांतिकेच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयीचे दोन लेख -
Fraternity and the republic - Mukul Kesavan
Crossing caste lines - K Satyanarayana

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||