" भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! "

सर्वधर्मसमभाव सुखाने रमतो येथे
माणुसकीला जपण्या जो तो बघतो येथे
अतिथी आदर सन्मानाने घडतो येथे
भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! |१|

प्रतिकूल निसर्गातही चढाई शत्रूवरती
जवान जखमी होउन लढतो सीमेवरती
बलिदानाचा गर्व सांडतो भूमीवरती
येथ जन्मलो, येथ वाढलो, बाळगतो अभिमान ! |२|

सणवारांचे महत्व जपणे आहे एकीसाठी
लहान मोठा भेद विसरणे जाणिव नित्यासाठी
वैरभाव मतभेद विसरणे घडता भेटीगाठी
संस्कारांचे वैभव अमुचे, बाळगतो अभिमान ! |३|

तिरंग्यास घेऊन धावतो बालक हाती जेव्हां
ऊर भरुन येतसे पित्याचा पाहुन हर्षे तेव्हां
सार्थक झाले जन्माचे अभिमानही दाटे तेव्हां
आदर्श मानव मी देशाचा, बाळगतो अभिमान ! |४|

field_vote: 
0
No votes yet