स्वगत
स्वगत
"पक्ष्यांचे होकायंत्र,
प्रतिभेचा प्रवाह,
स्थलांतरित मनोरथ,
नियती करते ते चिंतन,
प्रतिमेचे सूत्र ,
absurdity of stunted growth models ....
हे सगळ का,केव्हापासून,कशातून ...."
"अशा जाड गडद अंधाराचा पडदा फाडायचा
आणि संगती-symmetry लावून
दृश्य-तर्काची दृष्टांत-निर्मिती करायची
ही कलावंताची जबाबदारी आणि काम ......."
- जयंत.
हं
मला यातला आशय काव्यात्म वाटला.
मला वाटला नाही.कविता छंदोबद्ध असावीच असा आग्रह कालबाह्य झाल्याला आता कित्येक वर्षे लोटली आहेत.
'माझ्यामते यमकपूर्ती किंवा पादपूर्ती केल्यामुळे काव्यरचना पक्की होत नसते'असे मी आधीच्या एका प्रतिसादात म्हटले आहे. त्यामुळे तुमचे वरील विधान माझ्यासाठी अनावश्यक. ( काहीशे वर्ष जुन्या शेक्सपिअरच्या नाटकांतले मॉनलॉग्ज काव्यात्म आहेत. किंबहुना त्या कविताच आहेत.)
मला ही अभिव्यक्ती काव्यात्म वाटली.
मला वाटली नाही. ही अभिव्यक्ती मला कलावंताचे काम समजावून सांगणारी वाक्ये वाटली.
त्यामुळे चुकून काही झाले आहे असे वाटत नाही.
चुकून झाले असते तर बरे झाले असते.
विचार पटले पण आकृती पटली नाही
स्वगतातातले विचार पटले. म्हणजे प्रलयवजा अव्यवस्थेतून तर्क-दृष्टांतांची व्यवस्था निर्माण करण्याचे मोठेच कार्य आहे. ते स्फूर्तिदायक आहे, आणि ते बहुधा कलावंताचेही आहे.
परंतु हे कथन मला फारच प्रशिक्षणवजा वाटले. म्हणजे कवीचा अनुभव बघून मलाच पुन्हा त्या कथनाचा साक्षात्कार झाला, किंवा मी कवीची अनुभूती जगलो, असा अनुभव आला नाही. हा स्वगताच्या आकृतीचा म्हणा, किंवा (सदस्य क्रेमर यांचे आभार) शब्दसमृद्धतेमुळे म्हणा, परिणाम असावा.
तरी काव्यास साजेशी भव्यता आहे, ती जाणवली.
तुमच्या आणखी कविता वाचायला मिळतील, अशी आशा आहे, शुभेच्छा आहेत.
अवांतर
हे लेखन जयंत जोशींचेच आहे का ते माहित नाही परंतु वरील स्वाक्षरीवरून ते जयंत यांचे लेखन आहे हे कळते. जयंत जोशी हेच जयंत नसतील तर त्यांना येथे आमंत्रण देऊन बोलावणे ठीक वाटते. जेणेकरून स्वतःचे साहित्य ते स्वतः प्रकाशित करतील. जयंत जोशी हे जयंत नसले तरीही इतर कोणी त्यांचे साहित्य परवानगीशिवाय प्रकाशित करू नये असे वाटते.
प्रेरणा
वेगवेगळ्या निसर्गदत्त प्रेरणा टिपून, त्याची विणलेली रंगीबेरंगी गोधडी आवडली. कलाकाराच्या सभोवती घडणार्या घटनांचे, परिस्थितीचे प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीतून पडत असते पण ते घडण्यापूर्वी कलाकाराच्या अमूर्त मनाच्या अल्केमीतून त्याचा प्रवास होत होत सुवर्णरुपात त्याचे स्थित्यंतर झालेले असते.
कविता
कविता चित्रमय शैलीतली वाटली. तुमच्याकडून आणखी लिखाणाच्या प्रतीक्षेत.