काय करावे मन तळमळते !

साधे सोपे सहज शब्द ते
एकापुढती एक ठेवले ,
कांगावा काही ना करता
निमुटपणे ते कविता बनले !

याला तुम्ही कविता म्हणता ?
-उसळुन सारे धावत आले ,
शांतच होती माझी कविता
घाव किती अंगावर पडले !

अगम्य असभ्य शब्द कोषिचे
एकापुढती एक ठेविले ,
डोक्यावरती घेऊन सारे
कविता सापडली म्हणाले !

ही कविता की ती कविता मज
अजूनही पुरते ना कळते ,
भीत रहावे - लढत रहावे -
काय करावे मन तळमळते !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फारच छान शब्दांची करामत केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

कधी चपखल प्रास, कधी हवाहवासा अनुप्रास वगैरेंनी नटलेली कविता आवडली.
स्वतः म्हणताना शेवटच्या कडव्यात जरा अडखळलो, एखादी मात्रा जास्त आहे का हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काळ अनंत आहे, आणि पृथ्वी विपुल आहे. कवीचे शब्द डोक्यावर घेऊन कविता सापडल्याचा आनंद होणारा रसिक कुठेतरी, कधीतरी उद्भवेलच, अशी आशा कवीने ठेवावी.

आज आणि येथे कोणीच नाही, असेही नाही. कवीला स्वतःला ती कविता सापडल्याचे स्वान्तसुख होते आहेच ना? त्याचा आनंद अव्हेरू नये.

(पण ज्या व्यक्तींना आपल्या कवितेपेक्षा वेगळ्या कविता आवडतात, आपल्या कविता आवडत नाहीत अगदी त्या म्हणजे त्याच व्यक्तींना आपली कविता आवडली पाहिजे, अशी कवीची तळमळ आहे का? कशाला उगाच? त्या लोकांची रुची भिन्न आहे म्हणून सोडून द्यावे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0