मदत हवी आहे - भारतीय इंग्रजी रंजक पुस्तकं

केवळ हलकंफुलकं वाचण्यात रस असणार्‍या एका परदेशी मित्राला काही भारतीय लेखकांच्या इंग्रजी लिखाणासाठी शिफारशी हव्या आहेत. कुणी काही सुचवू शकेल का?

 • पुस्तक इंग्रजीत हवं. भाषांतरित चालेल.
 • लेखक भारतीय वंशाचा असावा. थोडक्यात, कीटिंगच्या इन्स्पेक्टर घोटे कादंबर्‍या चालणार नाहीत.
 • पुस्तकातलं वातावरण प्रामुख्यानं देशी असावं.
 • लिखाण हलकंफुलकं आणि रंजक हवं.
 • रहस्यकथा, तपासकथा, थरारकथा वगैरेंना प्राधान्य.
 • परदेशात अ‍ॅमेझॉन वगैरे प्रमाण स्रोतांकडे उपलब्ध असलं तर उत्तम; पण अन्यथा भारतातून ये-जा करणार्‍यांमार्फत मागवता येईल असं असावं. (थोडक्यात, क्रॉसवर्ड, लँडमार्क किंवा फ्लिपकार्ट वगैरे ठिकाणी उपलब्ध असलं तरी चालेल.)
 • कृपया तातडीनं पुस्तकं सुचवा. मी या बाबतीत ढ आहे (पक्षी: भारतीय + इंग्रजी + रंजक हे मिश्रण! कोणतेही दोन गुणविशेष निवडले तर मला काही तरी झेपेल, पण हे तीन म्हणजे 'डेडली कॉम्बिनेशन' आहे.)

  field_vote: 
  2.5
  Your rating: None Average: 2.5 (2 votes)

  प्रतिक्रिया

  आर. के. नारायण यांची स्वामी, मालगुडी डेज इत्यादी पुस्तकं चालतील का?

  बाकी चेतन भगत आणि अरूंधती रॉय सोडून इतर भारतीयांना इंग्लिश येतं का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  ---

  सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  रस्किन बाँडचं कोणतंही पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  “I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
  ― Sartre

  श्री. रस्किन बाँड हे 'लेखक भारतीय वंशाचा असावा' ही पूर्वअट तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करू शकतील का, याबद्दल साशंक आहे.

  (अर्थात, हे केवळ एक तांत्रिक खुसपट आहे, हे आगाऊ मान्य.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  रस्किन बोंड माझ्या मते भारतीय लेखक आहे. तो भारतीय वंशाचा नसला तरी त्याची अख्खी हयात भारतात गेलेली आहे; शिवाय 'साहित्य अकादमी', पद्म पुरस्कार वगैरे त्याच्या खाती जमा आहेतच. त्यामुळे 'वंशशुचिता' बाजूला ठेवून या नियमातून मी त्याला सूट देईन. वंशशुचितेपेक्षा 'भारतीयत्व' असा काहीतरी निकष ठेवायचं माझ्या मनात होतं, पण मग रश्दी, रोहिंटन मिस्त्रीसारख्या लेखकांचा अपवाद करायला लागला असताच. एकंदरीत, निकष सैल आहेत हे नोंदवू इच्छितो. त्यामुळे तुमच्या मते 'भारतीय लेखन' म्हणून जे सुचवायचं असेल ते खुशाल सुचवा.

  बाकी मुद्द्यांना जमेल तेव्हा उत्तरं देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - चिंतातुर जंतू Worried
  "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
  भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  पुस्तके सुचवण्यास हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  Inscrutable Americans -- लेखकः अनुराग माथुर. एक जॉजाऊ नावाच्या तालुक्याच्या-गावातील मुलगा अमेरिकेला जातो त्याचे अत्यंत खुमासदार, विनोदी वर्णन असलेले पुस्तक आहे. मी भेट द्यायचे असल्यास हे अनेकदा दिले आहे. बर्‍याच जणांना आवडते.
  नाहितर मग एव्हरग्रीन आर. के. नारायण (स्वामी, मालगुडी बरोबरच द इंग्लिश टिचर, द एकोनीमिस्ट वगैरे ) आहेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - ऋ
  -------
  लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  Inscrutable Americans -- लेखकः अनुराग माथुर.
  The Immortals of Meluha - अमीश त्रिपाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  १) अ सुटेबल बॉय - विक्रम सेठ
  २) २ स्टेट्स - चेतन भगत
  ३) रेव्होल्युशन २०२० - चेतन भगत

  अरुंधती रॉय यांच गाॅड ऑफ स्माॅल थिंग्स इंग्रजीतून वाचल पण मला खूप कंटाळवाण वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  श्री. संजय सोनवणी यांच्या ३ कादंबर्‍या एकदम थरारपूर्ण आहेत.
  अ‍ॅमेझॉनवर या ३ इंग्रजी कादंबर्‍या उपलब्ध आहेत.

  अ‍ॅमेझॉनवर या तिन्ही कादंबर्‍यांचे कस्टमर रिव्ह्यूज पण आहेत. त्यांची तुमच्या मित्राला नक्की मदत होईल Smile

  Last Of The Wanderers

  The Jungle

  On The Brink Of Death

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  हा खरोखर डेडली प्रश्न आहे. अगदी अमेरिकेतल्या एका विद्यापीठात वसाहतोत्तर साहित्याच्या वर्गात विचारल्या सारखा. वरवर अगदी साधा वाटणारा, पण किती किती मूलभूत प्रश्न उभा करणारा!

  वांशिक अट का? जास्त ऑथेंटिक वाटेल म्हणून? भारतीय वांशिक म्हणजे नक्की काय? हा तर आर्यांच्या उगमस्थानापासून ते आजच्या भारताच्या सीमेवरच्या सगळ्या वादांना समावून घेणारा प्रश्न. रोहिंटन मिस्त्री, रश्दी सारखे वांशिक-पण-पर्देशस्थ किंवा ऑफ-इंडियन-ऑरिजिनचे चालतील का? का खराखुरा देशी पाहिजे, म्हणजे खराखुरा नक्की काय हे सांगणे पाठोपाठ आलेच. हे उचित आहे, म्हणजे देशी वातावरण हे नक्की काय हे समजून पुस्तक सुचविता येईल...

  हलकेफुलके आणि रंजक हे काँबिनेशनही डेडली. हलके म्हटले तर भगत इ. आहेतच, पण फुलके आणि रंजकही पाहिजे म्हटले तर आली पंचाइत! वर सूटेबल बॉय कोणी सुचविले, पण रंचक आवर्जून असले तरी पुस्तक हलके नक्कीच नाही, आकारानेही मेलं जडच आहे. तीच परिस्थिती विक्रम चंद्राच्या सेक्रेड गेम्स ची. ३०० पानांनी लांबले, नाहीतर चांगली हलकी-फुलकी आणि रंजक गोष्ट, वर रहस्यकथा, तपासकथा, थरारकथा वगैरेंना प्राधान्य हे ही यादीत टिक करता येते. चंद्रा स्वत: परदेशस्थ असले तरी नो प्रॉब्लेम, पुस्तकातली शहरी-देशी वातावरण छानच जमले आहे. अ‍ॅमझॉन, टिक. सेक्रेड गेम्स पेलवले तर त्याचेच लव अँड लाँगिंग इन बाँबे ही आहे.

  भाषांतरित, देशी, रंजक पण नॉट-जड = बंगाली लघुकथालेखक राजशेखर बसू उर्फ परशूराम यांच्या कथा - नमुन्याखातर दोन येथे वाचता येतील. "आनंदीबाई इत्यादी" हा त्यांचा (साहित्य अकादमी पुरस्कृत) कथासंग्रह इंग्रजी अनुवादात चक्क अ‍ॅमझॉनवर आहे!

  (थोडीशी 'गालात जीभ' समजून वाचावे:-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  रोचना, तुमचा 'गालात जीभ' प्रतिसाद प्रचंड आवडला.
  त्याच चालीवर खुशवंत सिंघांचे (भारतीय वांशिक) 'ट्रेन टू पाकिस्तान' हे पुस्तक 'रंजक' म्हणून सुचवते. ते वजनानेही हलके आहे पण ते वाचायला 'हलके' आहे की नाही हे वाचणाऱ्याच्या द्रुष्टीकोनावर अवलंबून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  प्रतिसाद हलक्यानेच (पक्षी: लाइटली) घेतला, म्हणून आवडला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - चिंतातुर जंतू Worried
  "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
  भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  थोडक्यात तुम्हाला हुच्च लेखकांची हुच्च पुस्तकं हवीत तर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  ------------------------
  घणघणतो घंटानाद

  "Picture Imperfect and Other Byomkesh Bakshi Mysteries"
  हे द्या. अ‍ॅमेझॉनवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  पुस्तकातलं वातावरण प्रामुख्यानं देशी असावं.
  लिखाण हलकंफुलकं आणि रंजक हवं.
  रहस्यकथा, तपासकथा, थरारकथा वगैरेंना प्राधान्य.
  परदेशात अ‍ॅमेझॉन वगैरे प्रमाण स्रोतांकडे उपलब्ध असलं तर उत्तम; पण अन्यथा भारतातून ये-जा करणार्‍यांमार्फत मागवता येईल असं असावं. (थोडक्यात, क्रॉसवर्ड, लँडमार्क किंवा फ्लिपकार्ट वगैरे ठिकाणी उपलब्ध असलं तरी चालेल.)

  उर्दूचे प्रकांड विद्वान आणि विचक्षण समीक्षक शम्सऊर्रहमान फारु़क़ी ह्यांनी इब्ने सफीच्या 'जासूसी दुनिया'चे भाषांतर केले आहे. एकूण चार पुस्तके आहेत. तुमच्या निकषांवर बहुधा फिट्ट बसणारी आहेत. ऍमझॉनवर, फ्लिपकार्टवर उपलब्ध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  फेलुदा - सत्यजित राय
  खुश्वन्त सिन्घ यन्चि काहि पुस्तके..
  रण्जित लाल यन्चि द क्रो क्रोनिकल्स, द लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स ऑफ आल्तुफाल्तु ,..
  रस्किन बॉन्ड यन्चि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  मी लायब्ररीतून 'बूकर'ला नामांकन असलेलं अमिताव घोष यांचं 'सी ऑफ पॉपिज्' (Sea of poppies) आणलंय. काही केल्या माझी ते वाचायला लिंक लागत नाहिये पण त्या पुस्तकाबद्दल बरंच ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  ==================================
  इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
  शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

  Manohar Malgonkar (मनोहर ?माळगांवकर ?मालगोणकर) यांची गुप्तहेर/रसस्यमय पुस्तके आहेत. लहानपणी "बँडीकूट रन" नावाचे पुस्तक वाचले होते. काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर उपलब्ध आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  सुधा मूर्तीं हे नाव समाविष्ट करता येईल

  चेतन भगतच लेटेष्ट रिवोल्यूशन २०२० सध्या वाचत आहे
  पेपरबँग पुस्तक म्हणून चांगल आहे

  अरविद अडिगाच व्हाईट टायगर वाचायच आहे पण बरच ऐकलल आहे

  किरण देसाईच इनहेरिटन्स ऑफ लाँस देखील वाचायच्या यादीत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  .

  चेतन भगतच्या पुस्तकांची 'रंजकता' चांगली आहे याच्याशी सहमत.
  अडीगा मला तितकासा (खरंतर अजिबात) नाही आवडला
  सुधामुर्ती आणि रंजकता? बात कुछ जम्या नही! Wink

  अर्थात प्रत्येकाच्या आवडीनुसार हे सापेक्ष आहे. तेव्हा हे लेखन वाईट आहेत असं नाही.. फक्त मला (फारसे) आवडत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - ऋ
  -------
  लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  सुधा मूर्तीविषयी थोडी सहमत आहे
  डाँलरबहू आणि बकुळ वाचताना थोडा कंटाळा येतोच

  पण चिंजंच्या निकषानुसार लेखक देशी असावा आणि वातावरण देशी असाव म्हणून त्यांच नाव सुचवलं
  त्यांच्या पुस्तकात प्रामुख्याने धारवाड तसच कर्नाटकी संस्कृतीच वातावरण असतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  .

  चेतन भगतच्या पुस्तकांची 'रंजकता' चांगली आहे याच्याशी सहमत.

  चेतन भगतचे केवळ 'टू स्टेट्स' वाचले आहे, परंतु त्यावरून त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या लिखाणाबद्दल फारसे चांगले मत बनू शकले नाही. निदान 'टू स्टेट्स'करिता तरी मी 'रंजक' हा शब्द वापरणार नाही; 'स्वस्त' ('चीप' अशा अर्थी, आणि तेही पुस्तकाच्या किमतीच्या संदर्भात नव्हे!) हे विशेषण योजण्याचा मोह मात्र अनावर होतो.

  एकंदरीत हे पुस्तक वाचून लेखकाबद्दलचे माझे मत 'स्वतःला फार हुशार समजणारा, ट्रॅश लिहिणारा महामूर्ख माणूस' असे झाले; प्रामाणिक मताबद्दल क्षमस्व. (असे मत का झाले, याबद्दल लिहिण्यासारखे भरपूर आहे, परंतु त्याकरिता लघुनिबंध लिहावा लागेल, आणि तूर्तास तेवढे कष्ट घेण्याची इच्छाही नाही आणि ते 'वर्थ'ही वाटत नाही. पण झालीच उपरती तर पुढेमागे बघू.)

  (उलटपक्षी, 'थ्री इडियट्स' हा चित्रपट एकंदर कथानकामुळे, त्याच्या सादरीकरणामुळे आणि मुख्यतः आमीर खानमुळे आवडला - हो, आमची आवड अश्शीच आहे, त्याला काय करणार? हा चित्रपट चेतन भगतच्या 'फाइव्ह पॉइंट समवन'वर आधारित आहे, असे ऐकून आहे. पुस्तक वाचलेले नाही, पण आता 'टू स्टेट्स' वाचल्यावर पुन्हा चेतन भगतचे कोठलेही पुस्तक वाचण्याची इच्छा होत नाही.)

  ('टू स्टेट्स' या पुस्तकाबद्दल मनापासून काय वाटते हे जर प्रामाणिकपणे आणि सविस्तर लिहू लागलो, तर ते पार्लमेंटरी ठरणार नाही याची भीतीच नव्हे, तर खात्री आहे.)

  अडीगा मला तितकासा (खरंतर अजिबात) नाही आवडला

  अडिगांचा 'पांढरा वाघ' मला बरा वाटला. रादर आवडला. पण अर्थातच तो प्रत्येकालाच आवडेल असा नाही, कोणाला न आवडणे शक्य आहे, हे समजू शकतो.

  असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  चेतनच्या 'टु स्टेट्स' बद्दल सहमत Smile
  त्याचे 'फाइव्ह पॉइंट समवन' मला रंजक वाटले. त्यापुढील प्रकाशने रंजकतेमधे उतरत्या क्रमाने व विक्रीयोग्यता व उथळतेमधे चढत्या क्रमाने लावावीत. अगदी लेटेस्ट पुस्तक अजून वाचलेले नाही तेव्हा ते गैरलागू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - ऋ
  -------
  लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  चेतन भगत फेनॉमेनन बद्दल मला फार कुतूहल आणि आश्चर्य आहे. म्हणून एकदा ५.कोणीतरी वाचायला घेतले, पण दीड पानांपेक्षा वाचू शकलेच नाही. त्यानंतर ३ वेड्यांचा पिक्चर बघण्याचे धाडसच केले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  एकाच धाग्यावर चेतन भगत आणि किरण नगरकर यांची नावं पाहून गंमत वाटली. 'फाइव्ह पॉईंट समवन' अनेकांना त्यातल्या आय.आय.टी.च्या वातावरणाच्या हलक्याफुलक्या चित्रणामुळे रंजक वाटत असावं. 'सात सक्कं त्रेचाळीस'मधला काही भाग हा आय.आय.टी.सदृश एका संस्थेत घडतो. तिथल्या वातावरणात कादंबरीच्या नायकाची होणारी स्थिती भयावह आहे. (मी अशी खरी उदाहरणं पाहिलेली असल्यामुळे कदाचित) मला तो भाग खूप परिणामकारक वाटला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - चिंतातुर जंतू Worried
  "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
  भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  ५.कोणीतरी हे पुस्तक विद्यार्थीदशेत वाचल्यामुळे (मनातल्या मनात "हे काय सुरू आहे" असा विचार करत) वाचलं होतं. किंवा वाचवलं गेलं. त्यापुढे चेतन भगतची पुस्तकं म्हटली की "मला इंग्लिशसुद्धा येतं, मी त्याची पुस्तकं का वाचू?" असाच प्रश्न पडतो.

  'तीन वेड्यां'चा पिच्चर अगदीच टुकार नाही. बसमधून प्रवास करताना वगैरे लागला असेल तर अगदी डोळे मिटून, कानात प्लग्ज घालून बसण्याची गरज नाही. बरी करमणूक आहे. विद्यार्थ्याची ग्राफिक आत्महत्या आणि प्रसूतीचा सीन अनुक्रमे पूर्ण आणि थोडे कापले असते तर बरंच बरं झालं असतं. सलमान खानला टफ फाईट देण्याचा प्रयत्न करणारे, लाटण्याचे विविध उपयोगही दाखवले नसते तरी चाललं असतं. पण डोक्याला फार ताप करून घ्यायचा नसेल तर 'तीन वेडे' तशी बरी करमणूक करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  ---

  सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  अनुवाद केलेली पुस्तकं म्हणून किरण नगरकर यांची खाली उल्लेख केलेली पुस्तकं कदाचित आवडतील.

  The Extras (2012)
  Seven Sixes Are Forty Three(1974)
  Ravan and Eddie (1995)
  Cuckold (1997)
  God's Little Soldier (2006)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  सात सक्कम त्रेचाळीस मूळ मराठी आहे, पण बाकीची सगळी इंग्रजीतलीच आहेत, ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  सात सक्कम त्रेचाळीस मूळ मराठी आहे, पण बाकीची सगळी इंग्रजीतलीच आहेत, ना?

  बरोबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - चिंतातुर जंतू Worried
  "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
  भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  मला सात सक्कम आणि रावण-एडी खूप आवडले होते, पण कायकी कक्कोल्ड भयंकर बोर वाटलं. एक्स्ट्रास हे रावण-एडीचाच भाग-२ आहे असे ऐकले आहे, पण अजून पाहिले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  माझ्या माहितीप्रमाणे Seven Sixes Are Forty Three(1974), Ravan and Eddie (1995), Cuckold (1997) ही पुस्तकं मराठीतही वाचायला मिळतील. अनुवाद मूळ इंग्रजीतून मराठी की मूळ मराठीतून इंग्रजीत हे जाणकार सांगू शकतील. The Extras (2012) अलिकडेच प्रकाशित झाले आहे. God's Little Soldier (2006) याबद्दल काही माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  धाग्यात आलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त मला मिळालेल्या इतर काही शिफारशी:

  A Nice Quiet Holiday - Aditya Sudarshan
  Dreams for the Dying - C.K. Meena
  Piggies On The Railway: A Kasthuri Kumar Mystery - Smita Jain
  Monochrome Madonna - Kalpana Swaminathan
  The Englishman’s Cameo - Madhulika Liddle
  The 65 Lakh Heist and Daylight Robbery – मूळ हिंदी लेखकः सुरेंद्र मोहन पटनाईक. इंग्रजी भाषांतरः सुदर्शन पुरोहित.

  प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - चिंतातुर जंतू Worried
  "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
  भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  या पैकी एकाही पुस्तकाचे नाव आधी ऐकले नव्हते! सगळ्याच रहस्यकथा आहेत असे दिसते - या पैकी कोणत्या लेखकाबद्दल खास सिफारिश आहे का?

  कल्पना स्वामिनाथन चे एक पुस्तक मी आधी वाचलंय असं वाटतं, आता नाव आठवत नाही. मढ आयलंडवरच्या बंगल्यावर मुंबईचे काही हाय-सो मंडळी एकत्र पार्टीला जमल्यावर होणारा खून, इत्यादी. अ‍ॅगथा ख्रिस्टी सारखी सुरुवात झाल्यावर मधेच कुठेतरी शोभा डे मार्गे कथानक वळले आणि मग कोसळले, एवढेच आता आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  अरे अरे असं पुस्तकं विचारून नुसते आभार उपयोगी नाहीत, चिंजं!! (असे कसे सोडू Wink ).. आता यापैकी कुठले घेतलेत तेही लिहा आणि ते वाचुन त्याचा परिचयही लिहा अशी इनंती! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - ऋ
  -------
  लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज्स. इन्स्क्रूटेबल अमेरीकन माझ्यामते आता वाचण्यात मजा नाही. नेमसेक, झुंपा लहीरी, सुद्धा चांगलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  >>या पैकी एकाही पुस्तकाचे नाव आधी ऐकले नव्हते! सगळ्याच रहस्यकथा आहेत असे दिसते - या पैकी कोणत्या लेखकाबद्दल खास सिफारिश आहे का?

  मी यातलं काहीच वाचलेलं नाही. मूळ धाग्यात म्हटल्याप्रमाणे मी या कॅटेगरीत 'ढ' आहे. गेल्या काही वर्षांत 'मेट्रो रीड्स'सारख्या उपक्रमांद्वारे तरुण, शहरी वाचकांना चटपटीत (भारतीय) इंग्रजी लिखाण उपलब्ध करून दिलं गेलं. माझ्या आसपासच्या तरुण-तरुणींमध्ये ते चेतन भगतइतकं लोकप्रिय नसलं तरी बर्‍यापैकी वाचलं जातंय असं दिसतंय. काहीशा अशाच धर्तीवर इंग्रजीत रहस्यकथा लिहिल्या जाऊ लागल्या असंही दिसतंय. 'हिंदू'मध्ये त्याविषयी आलेला एक लेख संदर्भ म्हणूनः http://www.thehindu.com/life-and-style/metroplus/article504497.ece

  जाता जाता: सुरेंद्र मोहन पटनाईक हे आपल्या अर्नाळकर किंवा गुरुनाथ नाईकांसारखे हिंदीतले कल्ट लेखक असावेत. रेल्वे स्टेशनांवर वगैरे त्यांच्या कादंबर्‍या (हिंदीत) विकायला असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  - चिंतातुर जंतू Worried
  "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
  भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||