Skip to main content

प्रश्नास उत्तर की -- [खेळ]

हा एक खेळ आहे.

एक व्यक्ती सुरुवात करते एखादा प्रश्न विचारून. त्याला उत्तर म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न विचारायचा. त्याला "उत्तर" म्हणून अजून एक नवीन प्रश्न विचारला जाईल. अप टू इनफीनिटी ..!

उदा.
१. तू कोण आहेस?
२. तुला काय करायचे?

------------

तुमच्यासाठी पहिला प्रश्न: आज कोणता वार आहे?
.
.
.
-------------

बॅटमॅन Tue, 19/04/2016 - 15:41

या धाग्यावर मनोबाची अनुपस्थिती का बरं? हे म्हणजे अर्थशास्त्राच्या धाग्यावर गब्बरने मौन पाळण्यापैकी आहे.

नगरीनिरंजन Tue, 19/04/2016 - 16:54

In reply to by बॅटमॅन

मनोबांनी प्रश्न विचारण्याच्या शास्त्राचा अभ्यास केला असे म्हणायचे आहे की गब्बरसिंग अर्थशास्त्राच्या धाग्यावर काहीही बोलतात असे म्हणायचे आहे?

रेड बुल Tue, 19/04/2016 - 17:14

यु सेय समथिंग टु योर पोटेन्सिअल डेट्मेट, दॅट मस्ट एंडप विद द क्वेश्चन ओन्ल्यी... एंड सो हिस्/हर रिप्लाय. धिस इज हाउ थिंन्ग्स गेट शेपप. दे सए.

-प्रणव- Tue, 19/04/2016 - 20:20

In reply to by मेघना भुस्कुटे

(सिरियस उत्तर) तुम्हाला वाटल्यास काही काळानंतर एखादा प्रश्न परत विचारू शकता नवीन धागा काढून. मी आज पहिल्यांदाच ट्राय केलं. बॅलन्स जमला तर मजा येते!

राजेश घासकडवी Sat, 23/04/2016 - 10:05

In reply to by -प्रणव-

च्यायला, खेळ सुरू झाला नाही तोच विजेती म्हणून घोषित? मेघना भुस्कुटेंचा काहीतरी वशिला आहे की काय?

-प्रणव- Sat, 23/04/2016 - 11:10

In reply to by राजेश घासकडवी

त्यांच्या प्रश्नाला समर्पक "उत्तर" सुचत नव्हते म्हणून केलं. तुम्हाला वाटत असेल तर त्या प्रश्नाला प्रत्युत्तर देऊ शकता. त्यात काय! (?)

.शुचि. Tue, 19/04/2016 - 20:23

मी कोवळी उन्हे-विजय तेंडुलकरांचे पुस्तक वाचले होते त्यात अशा टाइपचे एक ललीत होते. मी एक शब्द बोलणार तुम्ही पट्ट्कन तुम्हाला त्या शब्दावरुन आठवेल तो शब्द सांगायचा. :)
मुलगी लहान असताना आम्ही तो खेळ खेळायचो.

जंगलीजवानी Mon, 25/04/2016 - 11:12

In reply to by .शुचि.

भलत्याच गोष्टी मान्य न करायला आम्ही काय भलतेच हे आहोत असं भलतसलत तुमच्या मनात तरी कस आलं? ;)

ऋषिकेश Mon, 25/04/2016 - 12:24

In reply to by -प्रणव-

कशाच्या वापराने किंवा न वापराने काय होते त्यासंबंधी माहितीपुर्ण असा हा धागा तुम्ही वाचला नाहीये का?