पु . ल . तुमच्यासाठी!

महाराष्ट्राचे लाडके दैवत
मनापासुनी हा केला गौरव

‘आपुलकी’ ही साऱ्यांची
उदंड केले प्रेम तुम्हावरी

‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली
‘खिल्ली’ कोटयानी उडवली

‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला
‘वंग-चित्रे’ ना साज चढवला

‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा
‘गणगोत’ सारे जमते तेव्हा

‘बटाटयाची चाळ’ असो
वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो

भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’
‘हसवणूक’ ही झाली न्यारी

आम्हास वाटे ‘अपूर्वाई’
फळास आली आमुची पुण्याई

शब्दरूपी हा खजिना तुमचा
भाग्य आमुचे आम्हा लाभला

अनंत या हो उपकारांची
होऊ कशी मी उतराई

ऋणात राहुनी तुमच्या मी
सदैव ‘गुण गाईन आवडी’

– उल्का कडले

(ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु. ल. ना श्रद्धांजली म्हणून. पु. ल. आणि त्यांचे साहित्य याविषयी वाटणाऱ्या नितांत आदरातून ही कविता सुचली आहे.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु.लंची निरिक्षणशक्ती, प्रवासवर्णनाची हातोटी आणि 'एक शुन्य मी'सारखे सिरीयस लेखन यांचा मी प्रचंड चाहता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'एक शुन्य मी' नाही वाचले अजून.
निरिक्षणशक्ती खरेच अफलातुन!
आज हयात असते तर मोबाइल, इन्टर्नेट, ही नवी पीढी यावर त्यान्च्या खुमासदार शैलीत काय मस्त लिहिले असते असे कायम वाटते - एक निस्सीम चाहती.
असो!
फाउन्टन कम्पनीने 'निवडक पु ल' ही अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप काढली आहे. मस्तच आहे.
व पु कथाकथनाची पण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

मला एके काळी वपु खूप आवडायचे पण पुढे पुढे निबरपणा आला. त्यांचे तत्त्वज्ञान, काव्यमयता आवडेनाशी झाली. आपण बदलतो आणि आधीच्या आवडलेल्या गोष्टींना नावं ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचे तत्त्वज्ञान, काव्यमयता आवडेनाशी झाली. >>

मध्यमवर्गीय जगण्यात कुचंबणा आहे असं हार्शली मांडणार्‍यांतले अग्रणी समजतो मी वपुंना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटते, पुलंच्या लोकप्रियतेचे थोडेसे श्रेय त्या कॅसेटवाल्या अलुरकरालाही दिले पाहिजे.

पुस्तकरुपाने पुल अनेक घरांत गेले असले तरी, पुलंना खर्‍या अर्थाने घराघरात पोचवण्याचे काम त्यांच्या कॅसेट्सने केले!

(हे मत वादग्रस्त म्हणावे काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
पहिला परिचर असामी असामीच्या कॅसेटी ऐकूनच झाला होता. हे गृहस्थ लेखक/ नाटककारपण आहेत हे नंतर कळालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कॅसेट मधुन त्याना ऐकल्यावर पुस्तक वाचताना वेगळा अनुभव मिळतो.
जसे अलुरकर तसेच आप्ले दूरदर्शन देखील. पु ल ना प्रत्यक्श बघुन ऐकतानाचा आनन्द त्यानी दिला.
हे हल्लीच्या टर्म मधे मार्केटिन्ग स्किल म्हणता येइल. पण मुळात प्रॉडक्ट दर्जेदार हवेच. म्हणजे ते इथे होतेच - त्यान्चे लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

सहमत. नेटवर त्यांच्या अनेक क्यासेटी अपलोडवलेल्या आहेत. पुणेकर मुंबैकर वगैरे अनेक पीसेस त्यात पाहण्यात लय मज्या यायची आणि येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फुटकळ नध्यमवर्गीय निरर्थक विनोद करणारा माणुस.

खरेतर बर्‍यापैकी प्रतिभा मिळालेला पण टुच्च्या साहीत्य निर्मीतीत वाया घालवलेली.
फक्त पेटी वाजवली असती वसंतरावांबरोबर तर ती प्रतिभा कारणी लागली असती.

कुठलीही भुमिका नाही वगैरे वगैरे, आता टिका करावी इतकी पण इच्छा होत नाही.

सुनिता बाई होत्या म्हणुन निभावले.

माझे जुनेच मत.

फॉर सम रीझन, मराठी मध्यमवर्गाला ( पुरुषांना ) बावळट, विदुषकी चाळे करणारे, मूर्ख, दिसायला बिलो अ‍ॅव्हरेज असे नायक आवडतात. त्यामुळे पुल हिट झाले.
अगदी चिमणभाऊ च्या व्यक्तीरेखेपासुन चालु आहे. सराफ, बेर्डे, अनासपुरे , दादा कोंडके हे मराठी हीरो तेजायला.

शी.......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी पूर्ण सहमत. पण "मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" हे एक अप्रतिम विडंबन लिहिल्याबद्दल काही गुन्हे तरी माफ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'गुन्हे' माफ केलेत तुम्ही. बाप रे!
हा लहान तोन्डी मोठा घास नाहीय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

अहो उल्काताई - त्या पुस्तकाच्या नावात इतिहास शब्द आहे म्हणुन बॅट्यानी माफ केलेत बाकीचे गुन्हे. नाहीतर ते पण नसते केले.

तुम्ही सुद्धा तुमच्या धाग्या च्या टायटल मधे "इतिहास" शब्द वापरा, बॅट्या फॅन होइल तुमचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोलबंध

अरे मतिमंद श्रेणीदात्या, यात अवांतर काय आहे? खोडसाळ निरर्थक दिली असतीस तर समजले तरी असते. हे काय?

आता या प्रतिसादाला काहीतरी अशीच श्रेणी मिळणार यात संशय नाही.

हे मराठी अर्थाने. हिंदी/उर्दू अर्थाने नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसे समजा. पुल = सूर्य आणि त्यांच्यावर टीका करणारे ते सूर्यावर थुंकणारे इ. शब्दयोजना अजून आली कशी नाही याचं आश्चर्य वाटतं. तद्दन भिकारचोट आदर्श कुरवाळत बसले, खरे पोटेन्शिअल वाया घालवले ही त्यांच्यावर राग असण्याची मेन कारणे आहेत. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुलं त्यांच्या परफॉर्मर आणि बहुपेडी की बहुरूपी काय्शाशा प्रतिमेत अडकले असं म्हणता येईल फार फार तर (थोडक्यात एक ना धड भाराभर...). एका प्रांतात फोकस करते तर कदाचित एवढे लोकप्रिय नसते झाले, पण तरीही त्यांच्या फोकस केलेल्या प्रांतात उच्चतम स्थानाला पोचले असते असे म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय की. याबद्दल मत नाही. माणूस मोठा प्रतिभावान, यात शंका नाही. झालंच तर सुनीताबाईंनी जी काही हेडमास्तरकी गाजवली, त्यामुळे त्यांना झाला तर फायदाच झाला असे म्हणता येईल. पण त्यांचं तथाकथित वैचारिक लिखाण म्हणजे सदाशिवपेठी आड्यन्सला जरा रडवण्याइतपतच काय ते बरं आहे. त्यांना ते जमत नाही. अतिसिम्प्लिफाईड लिहितात, आणि लिखाणातून विद्वत्शत्रुत्वाची पेरणी फार केलेली आहे. थोडक्यात, स्वतः अडाणचोट नसूनही अडाणचोट असणेच भारी असे सूचकपणे गौरवून ठेवले आहे. त्यामुळे ते आजकाल डोक्यात जातात. हे आक्षेप अर्थातच त्यांच्या वैचारिक लेखनापुरते मर्यादित आहेत. बाकी व्यक्तिचित्रण आणि विडंबन यात त्यांचा हातखंडा होता यात संशय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याकाळच्या दृष्यमानते एवढी व प्रकृतीला झेपेल एवढी एखाद्याची नजर गेली म्हणून त्याला आज पश्चातबुद्धीने नावं ठेवणे पटत नाही. आज इथल्या किती लोकांना खात्री आहे की आपण आपल्या काळाच्या पुढे पाहतोय आणि आपली नातवंडे "आमच्या आज्या/आजीला काडीचीही अक्कल नव्हती; भलते अडाणचोट धंदे करण्यात आयुष्य घालवले" असे म्हणणार नाहीत?
आणि विद्वत्शत्रुत्वाची पेरणी मला तरी दिसली नाही; एकअक्षरकळेलतरशपथछाप छद्मविद्वज्जनांची योग्य टिंगल मात्र दिसली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननिंशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आज इथल्या किती लोकांना खात्री आहे की आपण आपल्या काळाच्या पुढे पाहतोय आणि आपली नातवंडे "आमच्या आज्या/आजीला काडीचीही अक्कल नव्हती; भलते अडाणचोट धंदे करण्यात आयुष्य घालवले" असे म्हणणार नाहीत?

काय त्रास आहे. क्षणभर मानून चाला की नातवंडे तशी संभावना करतील. सो व्हॉट? जे आम्हांला वाटतं ते आम्ही बोलतो. पुढे काय होईल ते तेव्हाचे तेव्हा पाहू. आज जे दिसतं/जाणवतं ते बोलतो, हाकानाका.

डोक्यात जायचे कारण म्हणजे पुल हा माणूस खरेच प्रतिभावान होता, अजून बरेच काही करू शकला असता. पण वैचारिक लेखनात साफच गंडला आणि टवाळकी व ओव्हरसिम्प्लिफिकेशनमध्ये समाधान मानता झाला. आणि तेव्हाच्या मानाने वगैरे म्हणणे पटत नाही, कारण अनेक पटीने पुढचा विचार करणारे लोक तेव्हाही होते. वैचारिक लेखनापुरते पाहिले तर इंग्रज = जेते, त्यांचे जे कै आहे ते सर्वच भारी, आपले दैन्य हे सार्वकालिक आहे, इ.इ. सरसकटीकरणवाल्या आणि चुकीच्या गोष्टी दिसतात. आता स्पेसिफिक्स आठवत नाहीत, यावच्छक्य पुस्तकनाम, लेखनाम, पान क्र. निशी शेअर करेन.

आणि माझे सर्व आक्षेप त्यांच्या तथाकथित वैचारिक लेखनाला लागू आहेत हेही मी अगोदरच सांगितले आहे. बाकी विनोद, व्यक्तिचित्रण, विडंबन, इ. प्रांतांत त्यांचा हात धरणारे अतिशयच विरळा हे मान्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुलंनी प्रॉपर वैचारिक लेखन किती केले? ते वैचारिक असल्याचा त्यांचा स्वतःचा दावा होता का?

---------
अवांतर: श्याम बेनेगल फालतू वाटणार्‍यांना पुलं तर अगदीच फालतू वाटणे साहजिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

किती लेखन केले आणि त्याबद्दल लेखकाचा दावा काय होता हे मला तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही. त्या लेखनातून लेखकाचे काय विचार दिसतात हे जास्त महत्त्वाचे वाटते. पण मजा अशी की पुलंच्या विनोदी, विडंबिक, इ. लेखनाचा मी चाहता आहे हे रिपीटेडलि मान्य करूनही लोक त्या एकाच मुद्यावर वारंवार येताहेत.

सवांतरः मी बेनेगलांना फालतू मानत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'ओल्ड मॅन अँड द सी' या अनुवादास अत्यंत कठिण अशा पुस्तकाचा पुलंनी केलेला अनुवाद आवडला होता. कान्होजी आंग्रे या सुमार पुस्तकाचा अनुवाद मूळ पुस्तकापेक्षाही सुंदर होता. रवीन्द्रनाथांचे मला वाटते 'माझे बालपण'सुद्धा अनुवाद म्हणून आवडले होते. आधे अधुरे हासुद्धा हिंदी रंगभूमीला नवीन पण मराठीत तितकेसे नावीन्य नसलेली मूल्ये चित्रित करणारा अनुवाद सुमार ठरता ठरता वाचवला होता त्यांनी.
शिवाय ती फुलराणी, तीन पैशाचा तमाशा ही रूपांतरेही सरस होती. 'देवबाप्पा'चे संगीत अजूनही आवडते. शिवाय त्यांचे संगीतविषयक लेख, गायकांची व्यक्तिचित्रे, त्यांच्या शैलीबद्दलची भाष्ये अत्यंत वाचनीय आहेत. संगीतविषयक ललित लेखन मराठीत फार कमी आहे. गवयांची चरित्रे, आत्मचरित्रे आहेत. गायनाचे रसग्रहण विरळा. 'षडज गांधार' आठवते अर्थात. त्यांच्या संगीतविषयक विखुरलेल्या लिखाणाचे संकलन करून एक स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध व्हायला हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सहमत. विशेषतः क्लासिकल संगीताबद्दल निव्वळ औरंगजेबी लेव्हलचे ज्ञान असलेल्या आम्हांलाही त्यांचे संगीतविषयक, गायक/वादकविषयक लेखन वाचून "काय ते बालगंधर्व! आहाहा!" असे वाटायचे खरे. भले मग स्वतः बालगंधर्व किंवा त्यांच्यानंतरच्या कुणालाही कधी नाटकात पाहिले नसो. तीच गोष्ट "क्षयझ शेठजीच्या वाड्याखालती केसरबाईंचे गायन ऐकत उभारलेला जमाव" आदि वर्णने वाचतानाची. हे सगळे काहीतरी खूप भारी आहे, आणि (उगीचच) अलीकडे तसले काही होत नाही याची तद्दन अज्ञानमूलक वृथा खंतही वाटायची. हे वाटायला लावण्याचे सामर्थ्य पुलंच्या लेखणीत आहे हे कोण नाकारू शकेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय वाट्टेल ते होईल - जॉर्ज व हेलन पापाश्चिविली - या एका अनुवादासाठी पुलंना बाकी काय वाट्टेल ते माफ आहे.
बाकीही पुष्कळ गोष्टी आहेतच. पण त्यात महत्त्वाचं सांगतील असे इतर अनेक रथीमहारथी इथे आहेत. सांगायचा मुद्दा म्हणजे पुलंना लोक देव बनवतात ही त्यांची चूक नव्हे. लोकांचा गाढवपणा आहे. त्यामुळे पुलंनी का म्हणून शिव्या खाव्यात?
मला पुलं आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सांगायचा मुद्दा म्हणजे पुलंना लोक देव बनवतात ही त्यांची चूक नव्हे. लोकांचा गाढवपणा आहे. त्यामुळे पुलंनी का म्हणून शिव्या खाव्यात?

काय संबंध? जे खटकतं त्याकरिता शिव्याही घालू नयेत? उगीच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जे खटकतं त्यासाठी घालाव्यात की. पण लोक त्यांना थोर म्हणतात या कारणासाठी घालू नयेत. (तुम्ही का अंगावर ओढवून घेताहात? 'लोकांनी तेंडुलकरला देव म्हटलं, सबब तेंडुलकर भिकार'छापाच्या आर्ग्युमेंटला आक्षेप आहे. एरवी पुलंबद्दल मलाही अनेक आक्षेप आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जे खटकतं त्यासाठी घालाव्यात की. पण लोक त्यांना थोर म्हणतात या कारणासाठी घालू नयेत.

लोक थोर म्हणतात म्हणून पुलंना शिव्या घातल्या जातात, किंवा घालणे योग्य असे कोण, कधी म्हणाले बॉ? एक आपली सहज पृच्छा.

(तुम्ही का अंगावर ओढवून घेताहात? 'लोकांनी तेंडुलकरला देव म्हटलं, सबब तेंडुलकर भिकार'छापाच्या आर्ग्युमेंटला आक्षेप आहे. एरवी पुलंबद्दल मलाही अनेक आक्षेप आहेत.)

प्रतिवाद करणे = अंगावर ओढवून घेणे हा नवीन उद्बोचक अर्थ कळाला, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यामारी! मला नाहीच करायचा आहे तुझ्या मताचा प्रतिवाद. कम्मालेय बॉ. बाजू घेतली तरी भांडायला येतात लोक.

गब्बर मोड ऑन<आता बॅट्या म्हणेलः प्रतिवाद करणे म्हणजे भांडायला येणे हा नवीन उद्बोधक्/रोचक अर्थ कळाला. धन्यवाद.>गब्बर मोड ऑफ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवडला प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाची गल्ली चुकली काय हो? सदर प्रतिसाद 'त्या' धाग्यावर हवा होता!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे लग्न लावतायत उल्काताई तर आहेर ही इथेच देणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॉर सम रीझन, मराठी मध्यमवर्गाला ( पुरुषांना ) बावळट, विदुषकी चाळे करणारे, मूर्ख, दिसायला बिलो अ‍ॅव्हरेज असे नायक आवडतात.

ROFL
निरीक्षण अचूक आहे. लेटेष्ट बावळा सुपरहीट प्राणी म्हणजे स्वप्निल जोशी. बाकी तुमचे हे वाक्य "माधुरी दीक्षित फक्त ब्राह्मणांना आवडते" या कणेकरी वाक्याच्या तोडीचे आहे.
मराठी बायांबद्दल नंतर कधीतरी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कणेकर गंडलेत. ब्राह्मणेतरांमध्येही चिकार लोकप्रिय आहेत दीक्षितबै. बाकी देश म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे पुणेमुंबई इतकीच ज्यांच्या बुद्धीची झेप आहे त्यांना ते काय झेपणार म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कणेकर गंडलेत हे अगदी मान्य. पण त्या वाक्याच्या तोडीचे वाक्य आहे यात वाद नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे तर नाही, कारण एक वाक्य खरे आहे तर दुसरे चूक. आता डिग्री ऑफ खरेपणा आणि डिग्री ऑफ खोटेपणा यांची तुलना करून पाहिल्यास तोडीची निघावी बहुधा. या सेन्समध्ये अग्री.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सरसकटीकरणात तंतोतंत मॅच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या निमित्ताने अनु रावांनी वाचलेल्या अ-टुच्च्या लेखनाचे दोन-चार नमुने वाचायला मिळाले तर ज्ञानात भर पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या निमित्ताने अनु रावांनी वाचलेल्या अ-टुच्च्या लेखनाचे दोन-चार नमुने वाचायला मिळाले तर ज्ञानात भर पडेल.

ती त्यांची खाजगी बाब असावी, नाही काय?
......

अनु रावांच्या मतांशी मी सहमत नसेनही, परंतु त्यांच्या ती व्यक्त करण्याच्या अधिकाराचे मी प्राणपणाने समर्थन करेन.

..........

तळटीपा:

किंवा असेनही. द्याट इज़ माय पर्सनल बिज़नेस१अ अँड इम्मटीरियल ऐज़ वेल.

१अ फॉर द रेकॉर्ड, पु.ल. मला तितकेही टाकाऊ वाटत नाहीत. एके काळी (तत्कालीन जनरीतीस अनुसरून इतर बहुतांशांप्रमाणेच) प्रेमबीमही केलेय त्यांच्या लिखाणावर१ब. परंतु त्याचवेळी, काँट्ररी टू पॉप्युलर पर्सेप्शन, ही वॉज़ नॉट नेसेसरिली द बेष्ट थिंग द्याट ह्यापन्ड टू द मराठी ल्यांग्विज सिन्स स्लाइस्ड ब्रेड, हेही तितकेच खरे. (किंबहुना, परह्याप्स अनइंटेन्शनली, परंतु त्यांच्या ज्याँरमधील त्यांच्या झालेल्या व्हर्च्युअल मोनॉपलीपायी त्यांच्या भल्या मोठ्या फूटप्रिंटखाली दबून जाऊन मराठी साहित्याचे झाले तर नुकसानच झाले असावे. इतके की, पूर्वसूरींपैकी दिग्गज विनोदकार पॉप्युलर विस्मृतीत गेले, आणि नंतर तितक्या तोडीचे कोणी पैदा झाले नाही. पैदा झाली ती फक्त जळीस्थळीकाष्ठीपाषाणी त्यांची उद्धृते बहुधा औट-ऑफ-कॉण्टेक्ष्ट, चुकीची आणि तीही 'पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे' अशा प्रस्तावनावजा पालुपदासहित फेकत जाणारी एक अत्यंत डोक्यात जाणारी फौज. किंवा कॉटेज इंडष्ट्री म्हणा हवे तर.)

१ब कारण (पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे) शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार? १क

१क परंतु हेही तितकेसे खरे नसावे. कारण पु.लं.वर खार खाऊन असणारी मंडळी भटांत खरे तर विपुल असावीत. परंतु द अनिमॉसिटी वॉज़ परह्याप्स म्यूच्युअल (ऑल्दो सटल), त्यामुळे फेअर इनफ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती त्यांची खाजगी बाब असावी यात संशय नाही आणि त्याविरुद्ध काही सुचवायचा हेतूही नाही. पण ज्या अर्थी त्यांना टुच्चे लेखन म्हणजे काय ते कळले त्याअर्थी त्यांनी अ-टुच्चे लेखन वाचले असावे असा अंदाज करून त्यांनी जे वाचले आहे त्याचा थोडासा अंश वाचायला मिळाला तर मलाही अ-टुच्चे लेखन म्हणजे काय ते कळेल एवढेच जर-तर अशी कारण-कार्य जोडी असलेले ते एक वाक्य आहे. त्यात कोणताही आग्रह वा जबरदस्ती नाही. "आज खूप उष्णता आहे; जर पाऊस पडला तर बरे होईल" असे म्हटले म्हणजे लगेच ढगात जाऊन रासायनिक फवारे सोडून पाऊस पाडण्याचे पुण्य मिळत नाही; किंवा "खूप भूक लागली आहे; एखादी गाय तुकडे-तुकडे होऊन तापलेल्या बार्बेक्यूवर पडली तर छान होईल" असे म्हटले म्हणजे गाय मारण्याचे पाप लागत नाही. तसेच हे. बाकी आपण सूज्ञ आहात.

तळटीपा:
हा बरोबरच असला पाहिजे असे नाही
भटे आहात हे तुम्ही सांगितलेत; पण सूज्ञ आहात असा माझा एक अंदाज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ अनु राव,
तरीच! आश्चर्य वाटत होते की अजुन तुम्ही बोलला कशा नाहीत. किती कडवटपणा, खवचटपणा आहे हो तुमच्या प्रतिसादात. क्वचित असेल तर समजु शकते. पण कायमच. निदान माझ्या प्रत्येक धाग्यावर तर असतोच असतो. स्कोरसाठी, श्रेणीसाठी आणि गुणान्साठी असतो का हा तुमचा अट्टाहास? शी!
आज म्हणजे कहर केलात. पु लना ही नाही सोडलत. इच्छा होत नव्हती तर कशाला तसदी घेतलीत?
ह्यापुढे माझ्या धाग्यावर ही तसदी न घ्याल तर फार बरे होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

असे कसे उल्काताई. चांगल्याला चांगले च म्हणते मी. तुमच्या पाककृतीच्या धाग्यावर मी काही आडवे लावले का तुम्हाला. जे चांगले ते चांगले च ना.

आणि मी काय नावे ठेवली ती पुलंना, तुम्ही नका वाईट वाटुन घेऊ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणालाही नावे ठेवण्यात अमुल्य वेळ वाया घालवण्यापेक्षा काहितरी दुसरे काम कराल तर लोक तुम्हाला नावे नाही ठेवणार.
नावे ठेवणे आणि खवचट बोलणे ह्या इतके सोप्पे आणि निरर्थक दुसरे काम नाही.
त्यात तुमची प्रतिभा का फुकट घालवता?
ताइ म्हणालात तर ताइचे ऐकाल तर आवडेल ताइला. Smile
बाकी न ऐकणारी व्रात्य पोरे कमी नाहीतच ह्या जगात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

बाकी न ऐकणारी व्रात्य पोरे कमी नाहीतच ह्या जगात.

ह्या लिस्ट मधे ऋ, बॅटंमॅन, मन, गब्बरसिंग हे आयडी येतात का? मला फार त्रास देतात ही व्रात्य पोरं.

खरेतर त्यांच्या मुळेच माझी चीडचीड होते आणि मी असे खवचट प्रतिसाद लिहीते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मझ्या वाट्याला फक्त तुम्हीच गेला आहात. तेव्हा मी फक्त तुमच्यावर भाष्य करु शकते.
चीडचीड ज्यान्च्यामुळे होते त्याना धरा आणि आम्हाला सोडा.
इतके दिवस मीही दुर्लक्ष केले पण 'आता पुरे' म्हन्ट्ल्याशिवाय नाही राहवत आहे.
तुम्हाला पु लन्चे लिखाण श्रेष्ठ नाही वाटत मग 'म्या पामर ती काय लिहित असणार'.
तेव्हा माझे लेखन वाचुच नकात. कदचित थोडी चीडचीड कमी होइल तुमची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

मझ्या वाट्याला फक्त तुम्हीच गेला आहात

"वाट्याला" नाही हो "वाटेला"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुतै, तुमची तर्कक्षमता, बुद्धीवाद वगैरे सगळ्यांचा आदर आहे. पण जितेह तिथे बुद्धीवादातला तो कोरडेपणा आणलाच पाहिजे का ? सगळच जर असं रुक्ष रुक्ष, झालं तर चालेल का ? कोरडे तर्क आणि उच्चभ्रु चष्मे जिथे तिथे आवश्यक आहेत का ? "माझी आवड तेवढी श्रेश्ठ आनी बाकीचे पाण्चट,बाश्कळ/उथळ" हा न्याय सगळ्यांनीच एकमेकांना लावला तर कसं होइल ?
तसं तर तुमच्या प्रतिसादांना गांभीर्यानं घेणं मी कधीचच सोडलय तुमेहे हेच करत राहिलात तर नवीन सदस्यही तेच करतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१११११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि,
तू प्रतिसाद संपादित केलास पण तो मी त्याआधीच नेमका वाचला होता. आता मीही झाकली मूठ ठेवते.
मनोबाने माझी बाजू घेतली नसणार हे त्यांच्या पहिल्या वाक्यातच लक्षात आले होते. (नंतर विनोदी श्रेणी बघून खात्री पटली.) पण खोडसाळपणा करताना शेवटची दोन वाक्ये बरोबर लिहिलीत वाटले म्हणून +१ दिले. घाईत १ न मोजता जास्त दिले इतकेच. ११११ भरपूर लिहिले म्हणून प्रतिसाद जास्त आवडला असे नक्कीच नाही. तुझ्या blank प्रतिसादाच्या निमिताने हे स्पष्टीकरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

पाने