EAST INDIA COMPANY भाग-१

भुमिका

सर्वात अगोदर मी इतिहास या विषयाचा तज्ञ नाही त्यामुळे या लेखनात काही चुका उणीवा असण्याची शक्यता आहे. त्या जाणकारांनी सुधारुन दिल्यास त्यांचा आभारी राहील. या विषयाचे चर्चा प्रतिसादातुन अधिकाधिक अचुक आकलन व्हावे व आवडता विषय तुम्हा मित्रांशी शेअर करावा इतकाच या लेखनाचा हेतु आहे. दुसरी बाब हा लेख कंपनीचा संपुर्ण सलग सुव्यवस्थित इतिहास मांडण्याचा प्रयत्न नसुन (कारण साध आहे माझी तेवढी क्षमताच नाही ) केवळ काही निवडक मुद्दे घेऊन त्या संदर्भात व त्या अनुषंगाने इतर काही मांडणी करण्याचा साधा प्रयत्न आहे. या विवेचनाने कोणाला अधिक खोलात जाऊन एखाद्या विषयाचा शोध घ्यावासा वाटला तर बर वाटेल. सर्वसाधारणपणे भारतीय संदर्भात कंपनीचे व त्यामागील लोकांचे व त्यांच्या समाजाचे वेगळेपण जिथे जिथे ठळकपणे जाणवते ते ते बिंदु पकडुन दोन भिन्न वेगवेगळ्या कोणावर असलेल्या समाजातल्या व्यक्तींची कृती व प्रतिसाद व त्यामागील "प्रोसेस" अधिकाधिक समजुन घेण्या हा माझ्या कुवतीनुसार प्रयत्न आहे. .तर या विषयावर लिहीण्यात एक मोठी अडचण अशी आहे की कंपनीचा कालखंड फ़ार दिर्घ आहे व अनेक बदलांतुन कंपनी बदलत गेलेली आहे. तर जर तपशील वाढवला ताणला तर लिखाण संस्थळ मर्यादा भंग करुन टाकते ( त्याअगोदर माझी मर्यादा आहेच ) व तपशील घटवला तर अर्थ व सत्य निसटायची भिती. उदा. एक विधान केल की कंपनीत ५०० पाऊंड चा मिनीमम स्टॉक बाळगणारी व्यक्ती व्होटींग साठी पात्र असे. तर हे एक अर्धसत्य आहे. कारण एका काळानंतर ही मर्यादा १००० पर्यंत वाढवण्यात आली. ही वाढविण्यामागे काही महत्वाची कारणे व धोरणे होती. व ती एक स्टोरी आहे. पण अस प्रत्येक वेळेस इतक्या तपशीलात जाण शक्य नाही. शेवटी मग जमेल तितक संतुलन साधत राहण हेच आपल्या हातात आहे. व पुर्ण आकलनासाठी मुळ पुस्तकांच्या वाचनाला पर्याय नाहीच. तर .

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि रॉयल चार्टर.

२० मे १८७४ रोजी दुपारी १.३० वाजता कंपनी च्या आयुष्यातील अखेरची कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्सची मीटींग सुरु झाली. कंपनीच्या खात्यात शेवटची ३२००० पाउंड्स रक्कम शिल्लक होती. स्थापनेच्या वेळी साधारण पावणे तीनशे वर्षापुर्वी गुंतवणुकदारांनी ३०००० पाउंड्स भांडवल उभारुन सुरुवात केली होती. तर हाउसकीपर, डायरेक्टर्स फ़ी, अकाउंटंट इ. चे पेमेंट अदा करुन मींटींग व कंपनी संपली. लाखोंच्या आयुष्यावर परीणाम करणारी कंपनीची चाके शेवटी एकदाची थांबली. तर ३१ डिसेंबर १६०० ला कंपनीची स्थापना रॉयल चार्टर ने एलिझाबेथ (प्रथम) राणी ने केली. नाव होते " द गव्हर्नर अ‍ॅन्ड कंपनी ऑफ़ मर्चंट्स ऑफ़ लंडन ट्रेडिंग टु द इस्ट इंडिज " नाव माहीतीपुर्ण आहे. वास्को द गामा ने भारताचा नव्या सागरी मार्गाने "शोध" लावल्यानंतर चा काळ युरोपच्या काही देशांसाठी लॉटरी लागल्यासारखा होता. या भारतच नव्हे आशियाच्या या संपुर्ण भुभागाशी व्यापार करण्यास उतावीळ असलेल्या देशांनी आपापल्या शैलीने व्यापार करण्याचे मार्ग शोधले. राजसत्तेने" क्राऊन" ने चार्टर (सनद) देऊन कंपनी स्थापन करण्याची तत्काली्न इंग्लडमध्ये जुनी परंपरा होती. उदा.ऑक्सफ़र्ड केंब्रीज ही विद्यापीठे, रॉयल चार्टर ने स्थापन झालेली होती. चार्टर मिळालेल्या कंपनीत खासगी आणि जनता दोन्हींचे सहसा हितसंबंध गुंतलेले असणे आवश्यक असे. कंपनी च्या "एशिया ट्रेड" च्या केकमध्ये इंग्लड ला वाटा अपेक्षीत होता. चार्टर कायमस्वरुपी मिळत नसे ती साधारण दर २० वर्षांनी रीन्युअल करावे लागत असे. रीन्युअलसाठी कंपनीला स्वत:ची उपयुक्तता, व देशासाठीचे योगदान सिद्ध करावे लागत असे. चार्टर्ड कॉर्पोरेशन च आणखी एक उदाहरण म्हणजे ब्रीटीश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन ( २००७ मध्ये रीन्युअल साठी सादर झालेली ).अजुन एक रॉयल अफ़्रिकन कंपनी प्रामुख्याने अफ़्रिकन गुलामांचा व्यापार करण्यासाठी १६७२ मध्ये स्थापन झालेली ज्यात ब्रिटीश राजपरीवाराची प्रमुख गुंतवणुक होती. ( त्याच्या फ़ार पुर्वी १५६२ मध्ये ३०० गुलाम सिएरा लिओन मधुन पकडुन त्यांना कॅरेबीअन मध्ये विकुन इंग्लीश गुलाम व्यापाराची मुहुर्तमेढ रोवणारा कॅप्टन जॉन हॉकीन्स हा त्याच एलिझाबेथ (प्रथम) राणी कडुन " नाइटहुड " ने गौरविण्यात आलेला होता ; तो स्वत:च्या कोट ऑफ़ आर्म्स वर गळ्यात साखळी बांधलेल्या अफ़्रिकन स्त्रीचे प्रतीक/ चित्र अभिमानाने मिरवत असे ) कंपनीला मिळालेल्या चार्टरची खासियत म्हणजे कंपनीला मिळालेली केप ऑफ़ गुड होप पलीकडच्या सर्व देशांशी व्यापार करण्याची विशेष मोनोपली.कंपनी ला मिळालेली व्यापार करण्याची मोनोपली हा एक स्वतंत्र दिर्घ मुद्दा आहे तो आपण नंतर बघु. तर सुरुवातीच्या काळात प्रत्येक सागरी मोहीमेसाठी स्वतंत्र जॉइंट स्टॉक स्थापन केला जात असे. त्यात व्यापारी गुंतवणुकदार त्या त्या वेळच्या मोहीमेच्या यशापयशाचा उत्पन्नाचा विचार करुन अंदाज बांधुन गुंतवणुक करत असे. व व्हॉयेज बाय व्हॉयेज नफ़ा विभागुन घेतला जात असे. हा प्रकार १६५७ मध्ये संपुष्टात आला व कंपनीचा एक परमंनंट जॉइंट स्टॉक स्थापन करण्यात आला. हा एक महत्वाचा टप्पा होता. जॉइंट स्टॉक मॉडेल वापरणारी ही बहुधा जगातली पहीली कंपनी होती. पहीली असो वा नसो हा फ़ॉर्म वेगळा व काळाच्या तुलनेत अत्याधुनिक होता.

१६५७ मधील परमनंट जॉइंट स्टॉक फ़ॉर्मेशन ने भांडवलाची उभारणी

हा फ़ॉर्म वापरण्यास अनेक कारणे होती. त्या काळात इंग्लंड ते एशिया/भारत व्यापार करण मोठ आव्हान होत. एकतर अंतर जुन्या जहाजांना एक अप डाऊन फ़ेरी करण्यास किमान दोन ते त्यापेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागत असे.(स्टीमर शीप्सने पुढे हा काळ ३ ते ४ महीन्यांवर आणायला अजुन फ़ार अवकाश होता) कंपनीची जहाजे सहसा मार्च ते जुन दरम्यान वसंत ऋतुत थेम्स पासुन प्रवास सुरु करत, सेंट हेलेना वर सफ़री ला आवश्यक सामग्री दानापानी भरण्यास थांबत तिथुन त्यांना पुढील प्रवासासाठी वायव्येकडील मॉन्सुनचे वारे गाठण्यासाठी केप ऑफ़ गुड होप ला ऑगस्ट पर्यंत कसेही करुन पोहोचणे भाग असे हे साध्य झाल तर मग कुठे ते भारताच्या मालाबार वा कोरोमंडल किनार्‍यावर डिसेंबर पर्यंत पोहोचु शकत.मद्रास मुंबईला माल खाली केल्यावर ते सहसा कलकत्ता वा बंदर अब्बास च्या दिशेने कुच करत. घरवापसीचा प्रवास डिसेंबर मध्य ते फ़ेब्रुवारीपर्यंत नैॠत्यकडील मोसमी वारे गाठुन सुरु होत असे.कंपनीचा नियमच होता जहाजांनी भारताचा पश्चिमकिनारा १० डिसेंबरपर्यंत व पुर्व भारत १० जानेवारी पर्यंत सोडुन परतीचा प्रवास सुरु करायलाच हवा.. दुसर जान माल की रीस्क मोठी होती. दिर्घ प्रवासात आरोग्य सुविधांच्या अभावी व प्रतिकुल हवामानाने अनेक लोक मोहीमेत मृत्युमुखी पडत. जहाजे वादळात/ सागरी चाच्यां च्या हातात सापडण्याचा धोका, शिवाय प्रतिस्पर्धी डच इ. कंपन्याकडुनही वारंवार हल्ले होत असत, शिवाय भारत चायना इ. त व्यापार करण्यासाठी मुख्य चलन सिल्व्हरची गरज असे. इतर कुठलेही चलन सहसा इथे स्वीकारले जात नसे. सिल्व्हर स्टॉक उभा करणे हा एक मोठा भांडवली खर्च होता. मोठ्या जहाजांचा/ स्टाफ़ चा खर्च ( कंपनी ची टीपीकल जहाजे प्रचंड होती ८०० ते १२०० टन पर्यंत ) एक आकडेवारी पहा एका टीपीकल कंपनी शीप च्या खर्चाचे स्ट्रक्चर थोड लक्षात येइल.
टनेज-८०० टन क्रु साइज -१०० (हा टन मॅन रेशो या लायनीत महत्वाचा क्रायटेरीया )
कॅपीटल कॉस्ट ८.० रीपेयर्स १.३० स्टोअर्स-२.० सीमेन-१.९१ , ऑफ़ीसर्स -१.९१ फ़ुड-१.९१ इन्शुरन्स-१.६० पोर्ट चार्जेस-०.२५ (सर्व चार्जेस पाऊंड पर टन) तर टोटल येते १८.८९ पाउंड पर टन. ही कॉस्ट सर्वसाधारण होती. कंपनी चा टन मॅन रेशो नेहमीच इतर कंपन्याच्या तुलनेत जास्त असे भारत चायनासाठीच्या जहाजांसाठी रेशो १२ पर्यंत नेहमी पोहोचत असे. एका आकडेवारी नुसार १७८३ ते १७९२ दरम्यान व्हीओसी (डच कंपनी) व इस्ट इंडिया कंपनी च्या ६०० ते ८९९ टनेज श्रेणीत व्हीओसी च्या १०६ च्या तुलनेत इआयसी ची तब्बल १९५ जहाजे होती. १२०० + टन च्या श्रेणीत १ च्या तुलनेत ७ जहाजे होती. कंपनीकडे प्रचंड साइज ला पर्याय नव्हता कारण त्यांना डच फ़्रेंच इ. शी एक प्रकारे युद्धजन्य स्थितीत स्पर्धा करणे भाग होते. मालाची सुरक्षितता महत्वाची होती. इ. वर पुन्हा मोहीम नफ़्यात जाईलच याचीही शाश्वती नसे. त्यामुळे तत्कालीन ब्रिटीश मोठ्या भागीदारी फ़र्म्स, मर्चंट गिल्ड्स सुद्धा इतकी मोठी भांडवलाची रीस्क घ्यायला कचरत असत. मात्र जॉइंट स्टॉक या फ़ॉर्म मध्ये हीच रीस्क अनेक स्टॉकहोल्डर्स मध्ये विभागली गेल्याने, व मोठे भांडवल उभारता येणे शक्य झाल्याने व त्याहुन महत्वाच निर्णय संचालन अनुभवी व्यावसायिकांकडे सोपवण्याची सुविधा इ. बाबींमुळे या लांब पल्याच्या रीस्की एशियन ट्रेड साठी जॉइंट स्टॉक हा अत्याधुनिक फ़ॉर्म अत्यंत कुशलतेने राबवण्यात आला. यामागे प्रचंड एशियन कमॉडीटीज ( टी- पॉर्सेलीन- सिल्क- कॉटन- स्पाइसेस इ.) च्या व्यापारातुन येणारा हाय मार्जीनचा नफ़ा हे आकर्षण होतच.( ट्रेड कमॉडिटीज आपण नंतर विस्ताराने बघु ) व. इंग्लडच्या तेव्हाच्या तुलनेने प्रगत प्रगल्भ अर्थव्यवस्थेची हा फ़ॉर्म हे एक निदर्शक आहे.

शेअरबाजार व जॉइंटस्टॉक्स लीस्टींग

शिवाय इथे शेअरबाजार होता. तर इथुन परमनंट जॉइंट स्टॉक च्या स्थापनेपासुन (टाइम रीमांइडर- शिवरायांच वय तेव्हा २७ वर्ष होत थॉमस रो ने मुगल सम्राट जहांगीर कडुन फ़रमान मिळवुन सुरु केलेल्या सुरत फ़ॅक्टरी ला अस्तित्वात येउन ४२ वर्षे झालेली होती. ) या काळात कंपनीच्या स्टॉक च्या मुल्यमापनाची व ट्रेडिंग ची सुरुवात रीतसर झाली. १६९० पासुन पुढील १८० वर्षांपर्यंत लंडनच्या रॉयल एक्सचेंज ते स्टॉक एक्सचेंज पर्यंत कंपनीचा शेअर मार्केटवर प्रभाव दाखवु लागला. त्या काळात १६९५ पर्यंत १४० जॉइन्ट स्टॉक कंपन्या इंग्लड मध्ये स्थापन झालेल्या त्यात फ़क्त २० पेक्षा कमी रॉयल चार्टर ने झालेल्या कंपन्या होत्या. आणखी १७२० मध्ये नविन कंपन्याच्या लीस्टींगची लाटच जणु इंग्लडमध्ये आली त्यात अजुन १७४ कंपन्यांची भर पडली. मात्र सर्व कंपन्या टिकु शकल्या नाहीत उदा. एक मोठी कंपनी "साउथ सी कंपनी" बुडाल्या नंतर तर "बबल अ‍ॅक्ट" नावाचा कायदा इंग्लंडमध्ये लागु करण्यात आला. त्यानुसार जॉइंट स्टॉक कंपनी ची स्थापना करण्यासाठी ब्रिटीश संसदेची परवानगी अनिवार्य करण्यात आली हा कायदा पुढे तब्बल १०५ वर्ष लागु होता. मी तुलनेसाठी भारतात पहीली कुठली जॉइन्ट स्टॉक कंपनी रीतसर केव्हा स्थापन झाली हे उत्सुकतेने गुगलुन बघितलं मात्र काही सापडल नाही. बहुधा डिएसपी मेरील लिंच मधील डी.एस.पी. ही पहीली भारतीय जॉइन्ट स्टॉक लिस्टेड कंपनी आहे जाणकारांनी कृपया प्रकाश टाकवा.. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज जर पहीला एक्स्चेंज असेल तर त्याची वडा च्या झाडाखालील सुरुवात ही तुलनेने फ़ारच उशीरा झाली असे दिसुन येते. आज जरी वरील कंपनीच्या या बाबी शेअर्स डायरेक्टर्स फ़ार विशेष वाटत नसल्या तरी ज्या काळात या वापरल्या जात होत्या त्या वेळी त्या अत्याधुनिक होत्या.

खेळत्या भांडवलासाठी " इंडिया बॉन्ड्स " चा वापर

जॉइन्ट स्टॉक ने सुरुवातीच उभ केलेल भांडवल होत ३.२ मिलीयन पाउंड त्यात १७८६ ते १७९३ मध्ये तीन ट्प्यात वाढ होत ते ६ मिलीयन पाउंड्स पर्यंत पोहोचल. तरीही कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजपुर्तीसाठी हे पुरेस नव्हतं, तर ही वर्कींग कॅपीटल ची उभारणी करण्यासाठी कंपनी बॉन्ड्स इश्यु करत असे हे बॉन्ड्स १०० पाउंडच्या च्या पटीत असत. त्यावर सुरुवातीला कंपनी ६ टक्के दराने व्याज देत असे. पुढे व्याज दर ३ ते ४ टक्यावर स्थिरावला. प्रत्येकी मार्च सप्टेंबर मध्ये हे बॉन्ड्स एनकॅश वा रीन्यु करण्याची मुभा होती. शिवाय हे बॉन्ड्स ट्रान्सफ़रेबरल होते. हे "इंडिया बॉन्ड्स " जनतेत तुफ़ान लोकप्रीय होते. कीती ? थॉमस मॉर्टीमर ची नोंद पहावी " इंडिया बॉन्ड्स आर द मोस्ट कन्व्हेनियंट अ‍ॅन्ड प्रॉफ़िटेबल सिक्युरीटी अ पर्सन कॅन बी पझेस्ड ऑफ़, हु हॅज एनी क्वांटीटी ऑफ़ कॅश अनएम्प्लॉइड ,बट वुइच ही नोज नॉट हाऊ सुन ही मे हॅव ओकेजन फ़ॉर" पुढे देअर इज अ‍ॅज लीटील ट्रबल वुइथ अ‍ॅन इंडिया बॉन्ड अ‍ॅज वुइथ बॅंक नोट. ही लिक्वीड गुंतवणुक तेव्हा आकर्षक होती. कंपनीला १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत बॉन्डद्वारे पैसा उभा करण्यास ६ मिलीयन पाउंड ची मर्यादा होती. त्याच्या जवळपास अनेकदा पोहोचत कंपनीने त्या काळातील पतबाजाराला उत्तम चालना दिली. तेव्हाच्या इंग्लंडमधील बॅकींग व इन्शुरन्स कंपन्यामध्ये शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी हे बॉन्ड हा एक आवडता पर्याय होता. पुढे १७७३ च्या रेग्युलेटींग अ‍ॅक्ट ने कंपनीच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केल्यावर "इंडिया बॉन्डस "वर संसदेची अनेक बंधने व मर्यादा आल्या पण ती झाली पुढची गोष्ट. तर या एका मार्गाने कंपनीने आपली भांडवली गरज भागवली

बॅंक ऑफ़ इंग्लंड चे कर्ज व इंटरेस्ट बेअरींग लोन्स चा वापर

बॉन्ड ने वर्कींग कॅपिटलची गरजपुर्ती होत असली तरी पुन्हा कंपनीच्या प्रचंड कारभारासाठी त्यांना रोख रकमेची मोठी गरज लागतच असे. त्यासाठी दुसरा मार्ग होता "इंटरेस्ट बेअरींग लोन्स " कर्जासाठी सुरुवातीच्या काळात बॅंक ऑफ़ इंग्लंड कडुन ओव्हरड्राफ़्ट सुविधेचा मुबलक वापर केला जात असे. शिवाय बॅंकेकडुन कॅश लोन्स ही मिळत असे. मात्र युरोपातील " सेव्हन इयर्स वॉर " मुळे बॅंके वर जेव्हा दबाव वाढला तेव्हा कंपनीला कर्जासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागले. त्यातुन या लोन्स चा मार्ग पुढे आला. बहुतेकदा कंपनीशीच संबंधित असलेल्या श्रीमंत व्यक्तींकडुन कर्ज घेतले जात असे. काही वेळा तर कंपनीचे डायरेक्टर्स च कंपनीला कर्ज देत असत. यावर कंपनी व्याज देत असे. हा सर्व काळ साधारण १७६० पर्यंतचा हे कृपया लक्षात घ्या. जेव्हा यानंतर पुढे कंपनी भारतात व्यापारी पासुन राज्यकर्त्याच्या भुमिकेत जात होती.या संक्रमण काळात कंपनीला ब्रिटन सरकार, स्टॉकहोल्डर्स, आणि होल्डर्स ऑफ़ बिल ऑफ़ एक्सचेंज ना ( हे बिल्स भारत चायनात इश्यु केलेले असत ते आपण पुढे बघु ) पेमेंट अदा करण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर ठाकले. हा काळ साधारण १७६९ ते १७७२ दरम्यानचा मोठा उलथापालथीचा होता. या काळात बॅक ऑफ़ इंग्लंड वरील डिपेन्डन्स मोठ्या प्रमाणात वाढला. कर्जाची रक्कम ५.२ मिलीयन पाउंड्स पर्यंत पोचली. आणि नेमक याच काळात एक दुसरी मोठी एइर बॅक १९७२ मध्ये दिवाळखोरीत निघाली. याच्या परीणामस्वरुप बॅंक ऑफ़ इंग्लंड ने सावधगिरीचे धोरण बाळगत कंपनीला कर्ज पुरवण्यात हात आखडता घेतला. कंपनीने टाळमटाळीचे धोरण स्वीकारत अगोदर सरकारी भरणा लांबवला नंतर डिव्हीडंड रेट साडेबारा वरुन ६ वर खाली आणत शेअरहोल्डर्स ना धक्का दिला. शेवटी परीस्थीती हाताबाहेर गेल्यावर लॉर्ड नॉर्थ (हा राजसत्तेच्या बाजुने निष्ठावंत होता ) च्या सुधारणा विधेयका समोर मान तुकवत १४ लाख पाउंडस चे सरकारी कर्ज नाइलाजाने स्वीकारले.

कंपनीचे स्टॉक्स आणि स्टॉकहोल्डर्स

१६९८ च्या रीन्युअल चार्टर नुसार कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी कुठलीही बंधने नव्हती. इंग्लडच्या नागरीकांबरोबरच विदेशी नागरीक, संस्था, महीला इ कुणीही.शेअर विकत घेऊ शकत असे. त्यामुळे कंपनीच्या मालकांमध्ये मोठे वैविध्य होते. कंपनीचा शेअर १८ व्या शतकाच्या सुरुवातीपासुन गुंतवणुकदारांचा मोठा आवडता झालेला होता. १७४८ च्या सुमारास विदेशी गुंतवणुकदारांचा हिस्सा २० % पर्यंत वाढला होता. यात प्रामुख्याने डच स्टॉकहोल्डर्स चा समावेश होता. त्याव्यतीरीक्त अमेरीकन युरोपीयन व्यापारी व काही शेअर होल्डर्स भारतातही होते.
स्त्रीयांची संख्याही लक्षणीय होती मात्र त्यांचा डायरेक्टर्स निवडणुकीतील मतदानातला सहभाग नगण्य असे. हा एक तक्ता पहा

Size of Holding No. Of Accounts % Amount of Stock %
500 1350 47.8 675000 21.2
501-999 123 4.4 84941 2.7
1000 295 10.4 295000 9.2
1000-5000 600 21.2 1385086 43.4
5001-10000 55 1.9 402557 12.6
10001-20000 11 0.4 142700 4.5
20000 > 3 0.1 124266 3.9
TOTAL 2826 100 3188028 100

एकंदरीत कंपनीच्या शेअरहोल्डर्स चे अवलोकन केल्यास एक दिसुन येत की. लहान स्टॉकहोल्डर्स ची संख्या जे ५०० ते कमी चा स्टॉक बाळगुन होते त्यांचे प्रमाण ६० टक्क्या च्याही वर होते. काही वर्ष हे प्रमाण ४० ते ६० च्या दरम्यान टिकलेले होते. स्टॉक होल्डर्स मध्ये अनेक साधारण नागरीकांचा समावेश होता. किराणा मालाचा दुकानदार , स्टेशनर , स्त्रीया , कंपनीचे कारकुन इ. कंपनीचे भारत चायनात असणारे कर्मचारी , सैनिक इ. शिवाय अभ्यासकांनुसार स्टॉकहोल्डर्समध्ये जरी प्रामुख्याने लंडन मधील शहरी नागरीकांचा अधिक भरणा होता तरी क्रमाने यात इंग्लडच्या इतर ग्रामीण भागातील व आयरीश स्कॉटीश प्रांतातील स्टॉकहोल्डर्सचाही समावेश झाला. हा त्याकाळी संपुर्ण इंग्लंडमध्ये वेगाने पसरत असलेल्या आर्थिक विकासाचा एक साइड इफ़ेक्ट होता. त्या समाजातला लहानातला लहान घटकही सहज एका ईस्ट इंडिया सारख्या एका मोठ्या व्यापारी व्हेंचर मध्ये लहान का होइना हिस्सा घेऊ शकत असे. ही मुभा मिळणे ही मोठी गोष्ट होती. याशिवाय काही संस्थाही शेअरहोल्डर्स होत्या उदा. ऑक्सफ़र्ड केंब्रीज यांची ही गुंतवणुक होती. यात एक दखल घेण्याजोगी संस्था म्हणजे इंग्लंडच्या "विव्हर्स असोसिएशन्स" चे शेअर्स. अजुन जहाज व्यावसायिकांचे ( ज्यांचा मुख्य व्यवसाय कंपनीला भाड्याने जहाजे पुरविणे होता) ही एक स्ट्रॉंग लॉबी होती.

१७६५ नंतर जसजशी कंपनी राजकीय दृष्ट्या शक्तीशाली होत गेली तशी इंग्लंडच्या अनेक खासदारांनी कंपनी चे शेअर्स विकत घेण्याचा सपाटा लावला. यात कंपनीवर आपले राजकीय वर्चस्व हवे हा हेतु होता. वेगवेगळ्या हेतुंनी प्रेरीत ही जनता होती. काहींना डायरेक्टर्स ना निवड्णुकीत मदत करुन कंपनीच्या स्टाफ़ वर स्वत: वा नातेवाइकांची वर्णी लावायची असे. ( डायरेक्टर्स ना क्लर्क कर्मचारी नेमण्याचा विशेष हक्क "पॅट्रोनेज" प्राप्त होता. प्रत्येक डायरेक्टर ला कर्मचारी नॉमिनेट करता येत असे. हे मोठी पॉवर होती ) मात्र थोडक्यात सर्वांना बहती गंगा मे हात धोना था. आपले शरत पाटील कंपनीच्या या तळागाळातील शेअर होल्डर्स चा संदर्भ धरुन एक तुलनात्मक मांडणी करतात व भारतीय भांडवल कसे जातीबद्ध होते त्यामुळे भारतात एक एक इंडीव्हीज्युअल वीरजी व्होरा वा सुरतच्या मुल्ला फ़ॅमीली, किंवा सागरी व्यापार करणारे पारशी व्यापारी इ. सारखे शक्तीशाली खासगी भांडवलदार असुनही आर्थिक विकासाला मर्यादा कशी आली इ.इ. ती मुळातुन वाचण्यासारखी आहे असो.)

स्टॉक स्पेक्युलेशन्स आणि लाभांश वाटप

कंपनीने सातत्याने अनेक वर्षे किमान ८ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात यश मिळवले होते. पुढे लाभांशाची मर्यादा १७९३ मध्ये नफ़ेखोरील आळा घालण्यासाठी साडे दहा टक्के इतकी निश्चीत करण्यात आली. तरी त्या काळातील उदा. बॅंक ऑफ़ इंग्लड च्या लाभांश दराच्या तुलनेत हा जास्त होता. लाभांशामुळे सुरक्षित नियमीत उत्पन्नाचा एक आकर्षक मार्ग म्हणुन कंपनीच्या शेअर कडे बघितले जात असे. सुरुवातीच्या काळात जरी शेअर मध्ये फ़ारशी उलाढाल होत नव्हती तरी उत्तरोउत्तर यात (१७६० नंतर ) जोरदार उलाढाल, स्पेक्युलेशन सुरु झाले. उदा. १९-एप्रिल -१७६६ मध्ये जेव्हा क्लाइव्ह ने बंगाल बिहार ओरीसा ची " दिवाणी" मुघल बादशाह कडुन मिळवल्याची ( टॅक्स कलेक्शनचा हक्क) बातमी जेव्हा लंडनमध्ये पोहोचली तेव्हा शेअरचा भाव १६५ पाउंड होता.. निसंशयपणे ही एक मोठी बातमी होती. कंपनीच्या हातात मोठे " घबाड " लागले होते. परीणामी देशी विदेशी गुंतवणुकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने कंपनीच्या शेअरचा भाव जुन -१९६७ मधे १८७ पर्यंत पोहोचला. लगेच पुढील सप्टेंबर च्या क्वार्टर मीटींग मध्ये शेअरहोल्डर्स नी डायरेक्टर्स च्या विरोधाला न जुमानता लाभांश चा दर १० टक्के पर्यत मंजुर करुन घेतला. क्रिसमस पर्यंत शेअर च्या दराने २२३ पाउंड पर्यंत उसळी मारली. पुढे १७६८-६९ व १७७२-७३ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्पेक्युलेशन सुरु झाले की थॉमस मॉर्टीमर म्हणतो " ईस्ट इंडिया स्टॉक हॅड बीन द मोस्ट डेंजरस ऑफ़ एनी फ़ंड ऑन अकाउंट ऑफ़ इट्स एक्स्ट्रीम व्हेरीएशन्स " पुढे भारतातुन येत असलेल्या विवीध ब्रेकींग न्युज चा असर ईस्ट इंडियाच्या शेअरवर मोठ्या प्रमाणावर होत असे. उदा. टिपु सुलतान च्या पराजयाची न्युज. तिसर्‍या व अखेरच्या "अ‍ॅंग्लो-मराठा" युद्धातील विजयाची न्युज या शेअरच्या भावावर मोठा असर करणार्‍या बातम्या होत्या.

कंपनीची सर्वसाधारण प्रशासकीय रचना

कंपनीची थोडी सर्वसाधारण प्रशासकीय रचना समजुन घेऊ कालागणिक झालेले बारीक सारीक बदल टाळुन सर्वसाधारण दिर्घ काळ ही रचना अस्तित्वात होती ती काहीशी अश्या स्वरुपात होती.

१- कोर्ट ऑफ़ प्रोप्रायटर्स -

यात शेअरहोल्डर्स चा प्रोप्रायटर्स चा समावेश होता. किमान १००० पाउंड चा स्टॉक बाळगणारे या वर्गात येत. ते मतदानास पात्र होते. प्रो रेटा बेसीस ने १००० ला १, ३०००-ला २, ६००० ला-३ आणि १०००० पाउंड पेक्षा अधिक स्टॉक बाळगणारा ४ मते देऊ शकत असे. व्होटींगला पात्र होण्यासाठी मीटींग पुर्वी किमान १ वर्ष हा स्टॉक त्याच्याजवळ असण्याची अट होती. मार्च-जुन-सप्टेंबर-डीसेंबर मध्ये वर्षातुन ४ वेळा प्रोप्रायटर्सच्या रेग्युलर मीटींग होत असत. याशिवाय ९ स्टॉकहोल्डर्स मिळुन कधीही कोर्ट चे स्पेशल सेशन बोलावु शकत. यांना डायरीक्टर निवडणे, लाभांश जाहीर करणे, कंपनीचे बाय लॉज बनविणे वा बदलणे. हे अधिकार होते.

२- कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स-

यांची संख्या २४ निश्चीत केलेली होती. डायरेक्टर होण्यासाठी काही अटी होत्या उदा. मिनीमम २००० पाउंड चा स्टॉक असणे, ग्रेट बिटनचे नागरीकत्व असणे, तो बॅंक ऑफ़ इंग्लंड वा साउथ सी कंपनी च्या बोर्डवर नसणे.इ.. कंपनी च्या कामकाजाचे व्यापार व्यवस्थापनाचे व इ. निर्णयाचे पुर्ण अधिकार या २४ व्यक्तींच्या ग्रुप कडे होते यांचा एक मु्ख्य चेअरमन असे. ही मंडळी चायनीज टी ट्रेड पासुन बंगाल मधील युद्धा संदर्भात ते अमेरीकेतील व्यापारा पर्यंत सर्व निर्णय घेत असत. या कंपनीची विशाल भौगोलीक रेंज व असंख्य प्रकारच्या अ‍ॅक्टीव्हीटीज बघता ही पोस्ट भलतीच आव्हानात्मक होती. हे खरे सुत्रधार होते. दर चार वर्षांनी पुन्हा नेमणुकीसाठी एक वर्षाचा गॅप कंपलसरी होता.

३- द बोर्ड ऑफ़ कमिशनर्स फ़ॉर द अफ़ेअर्स ऑफ़ इंडिया ( बोर्ड ऑफ़ कंट्रोल )

विलीयम पिट ने १७८४ मध्ये " बेटर रेग्युलेशन ऑफ़ द गव्हर्मेंट ऑफ़ इंडिया" साठी संसदेत बिल सादर केले. या अनुसार राजा ने पाच सदस्यांचा " बोर्ड ऑफ़ कंट्रोल" व्हाइटहॉल मध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या "बोर्ड ऑफ़ कंट्रोल" ला कंपनीच्या कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स च्या कारभारावर संपुर्ण नियंत्रण आणण्यासाठी सर्व अधिकार देण्यात आले.

The powers of the board are, " To superintend, direct, and contrl all acts, operations, and concerns , which in wise relate to the civil or military government or the revenues of the British territorial possessions in the East indies, in the manner hereinafter directed "

कंपनी च्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे कंपनीवर आणी तिच्या कारभारात क्रमाक्रमाने इंग्लीश पार्लीयामेंट व क्राऊन च नियंत्रण व हस्तक्षेप वाढवत आणला गेला. प्रत्येक चार्टर रिन्युअल च्या वेळी कंपनीच्या स्वातंत्र्याचा क्रमाक्रमाने संकोच करण्यात आला. कारण कंपनीने प्लासी नंतर धारण केलेल्या राजकीय रुपाने, रेव्हेन्यु कलेक्शनतील सहभागाने व कंपनीला बंगालच्या दुष्काळ व इ बाबी .हाताळतांना आलेल्या अपयशाने शिवाय आर्थिक अपयशाने सर्व्हंट्स च्या अनियंत्रीत भ्रष्टाचार इ. कारणांनी तिचे "अफ़ेयर्स" पार्लियामेंट व क्राऊन कडुन नियंत्रीत करण्याची गरज व मागणी जोर धरत होती. कंपनीच्या विरोधकांना कंपनीवर सरकारचे संपुर्ण नियंत्रण हवे होते. यातुनच नॉर्थच्या रेग्युलेटींग अ‍ॅक्ट ने अगोदर भारतातुन येणारे सर्व डिसपॅचेस तसेच कंपनीने इंडियन स्टेट्स ला सर्व्हंट्स ना पाठवलेल्या सर्व सुचना आदेश इ.मिनीस्टर्स च्या स्कृटीनी साठी पाठविण्याचा नियम करण्यात आला. तसेच कंपनीला फ़ायनान्शीयल्स संदर्भातील सर्व निर्णय " ट्रेझरी" कडे मंजुरीसाठी पाठविणेही बंधनकारक करण्यात आले. व यातुनच पुढे १७८८ पासुन कंपनीचे अ‍ॅन्युअल "ईस्ट इंडिया" बजेट "हाऊस ऑफ़ कॉमन्स " समोर सादर करण्यास सुरुवात झाली. कंपनीवर येत असलेल्या या पार्लियामेंट/ क्राऊन च्या नियंत्रणाला व हस्तक्षेपाला स्टॉकहोल्डर्स जोरदार विरोध करत असत. पण कंपनीच्या आर्थिक अपयशाने सरकारी मदतीच्या बदल्यात नियंत्रण स्वीकारणे भाग होते. बोर्ड ऑफ़ डायरेक्टर्स एकीकडे बोर्ड ऑफ़ कंट्रोल दुसरीकडे व तिसरी बाजु स्टॉकहोल्डर्स असा तिहेरी पॉवर स्ट्रगल कंपनीत चालत होता. शेवटी अर्थातच पार्लीयामेंट व क्राऊन ने कंपनीवर अंतिम वर्चस्व प्रस्थापित केले ती पुढची गोष्ट.

४- कमिटीज.

डायरेक्टर्सना मदत करण्यासाठी मग निरनिराळ्या कमिट्यांची नेमणुक त्यांच्याकडुन केली जात असे प्रत्येक कमिटीवर किमान एक डायरेक्टर असे.या कमिट्यांची नावेच बोलकी आहेत. या कमिट्या आपापली कामे करुन कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स ला रिपोर्ट करत असत व या संदर्भातील सर्व निर्णय घेत असत.. या कमिट्या अशा होत्या.

१- करस्पॉन्डन्स कमिटी ८- वेअर हाउस कमिटी
२- ट्रेझरी कमिटी ९- इंडिया हाऊस कमिटी
३- गव्हर्मेंट ट्रुप्स अ‍ॅन्ड स्टोअर्स कमिटी १०- शिपींग
४- अकाऊंट्स कमिटी ११- प्रायव्हॆट ट्रेड कमिटी
५- लीगल प्रोसीडिंग्ज कमिटी १२- सिव्हील कॉलेज कमिटी
६- मिलीटरी प्रोसीडिंग्ज कमिटी १३- मिलीटरी कॉलेज कमिटी
७- बायींग कमिटी १४- सिक्रेट कमिटी

भारत चायना इ. आशियातुन कंपनीने आयात केलेल्या मालाचा प्रचंड साठा कुठे ठेवायचा हा यक्षप्रश्न १७६५ च्या "दिवाणी" मिळवल्यानंतर झालेल्या घडामोडीत पुढे आला. कंपनीचे प्रचंड गोडाऊन्स लंडन मध्ये लाइम स्ट्रीट, फ़ेनचर्च स्ट्रीट इ. ठीकाणी अगोदरच होते. मात्र दिवाणी नंतर बंगाल मधुन मिळालेल्या उत्पन्नाला (सिल्व्हर) चलनाला ब्रिटनमध्ये डायरेक्ट फ़ॉर्म मध्ये आणणं रीस्की व अव्यवहारीक होतं. त्याएवजी त्या उत्पन्नातुन मोठ्या प्रमाणावर सुरुवातीला मुख्यत: टेक्सटाइल खरेदी कंपनीने सुरु केली. मालखरेदी च्या माध्यमातुन बंगाल मध्ये मिळवलेल्या संपत्तीचा ओघ लंडनकडे वळवायला सुरुवात झाली. तेव्हा जागा अक्षरश: अपुरी पडु लागली. या प्रचंड क्वांटीटी च्या मालाचा साठा करण्यासाठी मग कंपनीने, टॉवर ऑफ़ लंडन जवळ " बेंगाल वेअरहाऊस " ची निर्मीती केली. इथे ढाका मलमल, कॅलिकोज, रॉ सिल्क चायनातुन आणलेल्या चहा चा मोठा साठा करण्यास सुरुवात केली. लंडनच्या चोरांच "बेंगाल वेअरहाऊस" आकर्षणाच केंद्र बनल.ही सहा मजली इमारत भव्य सुंदर व २०० वर्ष टिकेल इतकी दणकट होती. जॉन मॅसेफ़िल्ड नावाचा इंग्लीश कवी जेव्हा ही इमारत आतला माल बघुन आला तेव्हा त्याने या वेअरहाऊस वर ही कविता लिहीली.

You showed me nutmegs and nutmeg husks, Ostrich feathers and elephant tusks
Hundreds of tons of costly tea, packed in wood by the Cingalee
And a myriad drugs which disagree, Cinamon, myrrh, and mace you showed,
Golden paradise birds that glowed, And a billion cloves in an odorous mount,
And choice port wine from a bright glass fount . You showed, for a most delightful hour.
The wealth of the world, and London,s power.!

अगोदर भारतीय व्यापाराची १९१३ मध्ये नंतर १९३३ मध्ये चायना टी ट्रेड ची शेवटची मोनोपली कंपनीकडुन काढुन घेण्यात आल्यावर व्यापार हळहळु कमी होत गेल्यावर कंपनीने आपले सर्व वेअरहाउसेस विकुन टाकले. आजही "बेंगाल वेअरहाऊस" ची इमारत वापरात आहे. तर या अशा सर्व वेअरहाउससेस ची निगा देखभाल मालाचा हिशोब इ. ठेवण्यासाठी " वेअरहाउस कमिटी" काम करत असे.

कंपनीत आवश्यक असणार्‍या सिव्हील आणि मिलीटरी या दोन्ही प्रकारच्या पदांच्या उमेदवारांच्या भरतीसाठी कंपनीने दोन कॉलेजेस इंग्लड मध्ये चालवली होती. इथे विद्यार्थ्यांना कंपनीकडुन ट्रेनींग दिली जात असे. यांची नावे अशी.

१- Hailebury College
2- The Adiscombe Academy.

युद्धाच्या व इतरही काळात कंपनीची राजकीय व मिलीट्री स्ट्रॅटेजी ठरविण्यात व महत्वपुर्ण गोपनीय माहीती डेटा सातत्याने मिळवुन विश्लेषण करण्याच काम "सिक्रेट कमिटी "कडे सोपवलेलं असे. एक प्रकारच गुप्तहेर खात्यासारख काम ही कमिटी करत असे. सिक्रेट कमिटीची सर्व कागदपत्रे वेळोवेळे केलेले रीपोर्टींग अजुनही "इंडिया ऑफ़ीस रेकॉर्ड्स" मध्ये आहेत.
इंडिया ऑफ़ीस रेकॉर्ड्स मध्ये कंपनी संदर्भातील प्रत्येक कागदपत्रे व्यवस्थित आजही जपुन ठेवलेली आहेत.

करस्पॉन्डन्स हा एक मोठा विषय होता. इंडियन प्रेसीडेन्सीज व लंडनच्या ईस्ट इंडिया हाऊस मधील पत्रव्यव्हार अतीप्रचंड प्रमाणात वाढत गेला. कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स बारीक सारीक तपशीलासहीत प्रेसीडेन्सीच्या गव्हर्नर कंपनी सर्व्हंट्स इ. साठी व्यापार विषयक धोरणे, आदेश इ. लिहुन पाठवत असे. दळणवळण अत्यंत स्लो असल्याने एक एक पत्र पोहोचण्यास काही महीन्यांपासुन ते वर्षाचा दिर्घ कालावधी लागत असे. एक अजुन मार्ग होता अर्जंट मेसेज पाठवण्यासाठी या " ओव्हरलॅंड मेल रुट " चा वापर केला जात असे. १७७० नंतर इंडियन नेव्ही कडुन बॉम्बे ते बसरा पर्यंत पत्रे नेली जात असत. तेथुन पुढे उंटावरुन ही पत्रे अलेप्पो पर्यंत नेली जात तिथुन पुढे घोड्यावरुन कॉन्स्ट्न्टीनोपल पर्यंत नेली जात असत. पण हा फ़ारच महागडा मार्ग होता तो केवळ अती आणीबाणीच्या स्थितीत वापरला जात असे. मला या भारत ते इंग्लंड ओव्हरलॅन्ड रुट विषयी फ़ार उत्सुकता आहे याचा पुर्वी व्यापारासाठी कसा वापर होत असे. यात कोणकोणते ट्प्पी शहरे येत. हे अजुन डिटेल जाणुन घ्यावेसे वाटते कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. ( टेलीग्राफ़ ला अजुन अवकाश होता १८५७ च्या युद्धात तो भारतात पहील्यांदा वापरला जाणार होता त्याचा मोठा फ़ायदा युद्धात होणार होता) १७९३ ते १८१२ या कालावधीत भारतातुन आलेल्या "डिसपॅचेस" ची संख्या ९०६४ लेदर बांधणीचे फ़ोलियो भरतील इतकी होती. त्यात १८१४ ते १८२९ दरम्यान ही संख्या १२४१४ पर्यंत पोहोचली. याविषयी पुढे विस्ताराने बघु तर हा करस्पॉन्ड्स सांभाळण्यासाठी येणारी पत्रे वाचुन समरी तयार करणे, विषयवार लावणे. सादर करणे, संपुर्ण पत्रव्यवहार व्यवस्थित सांभाळणे इ. या संदर्भातील निर्णय व कामे " करस्पॉन्डस कमिटी " करत असे. ईस्ट इंडिया हाऊस मध्ये यासाठी एक स्वतंत्र "एक्झामिनर डिपार्टमेंट" होत.

५- भारतीय प्रेसीडेन्सीज ची प्रशासकीय रचना

भारताची विभागणी तीन प्रेसीडेन्सीज मध्ये बेंगाल , मद्रास आणि बॉम्बे मध्ये केली.गेली. ( यावरुन बहुधा कलकत्याच्या कॉलेजच नाव प्रेसीडेन्सी कॉलेज ) इथे प्रत्येक प्रेसीडेन्सीसाठी " गव्हर्नर" ची नेमणूक होत असे. बंगाल चा गर्व्हनर जनरल प्रमुख व त्याच्या नियंत्रणात इतर दोन गव्हर्नर ( हा वेळोवेळी केलेल्या सुधारणांचा भाग होता) गव्हर्नर जनरल ची नेमणुक कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स कडुन होत असे मात्र यासाठी क्राऊन ची परवानगी बंधनकारक होती. गव्हर्नर जनरल ला मदत मार्गदर्शन करण्यासाठी "सुप्रीम कौन्सील" असे. यात चार सदस्यांचा भरणा असे त्यापैकी ३ सदस्य हे कंपनी सर्व्हीस मध्ये १० वर्षापेक्षा अधिक काळ व्यतीत केलेले असत चौथा त्या शिवाय आणि भारतीय सैन्याचा कमांडर-इन-चीफ़ हा एक्स ऑफ़ीशीओ मेंबर असे. गव्हर्नर जनरल ला फ़ुल फ़्लेज्ड अधिकार होते. (ही रचना सर्वसाधारण दिर्घ कालासाठी यात वेळोवेळी बदल आहेतच हे प्रत्येक बाबतीत लक्षात ठेवावे ) या गव्हर्नज जनरल च ऑफ़ीशीयल स्टाफ़ चार विभागात असे
१- फ़ॉरेन डिपार्टमेंट ( ज्यावर ब्रीटीश अंमल नव्हता असे भारतातील तेव्हाचे इतर स्वतंत्र राज्य या संदर्भात)
२- होम डिपार्टमेंट- न्यायिक आणि रेव्हेन्यु बाबीं संदर्भात
३- फ़ायनान्शीयल डिपार्टमेंट
४- मिलीटरी डिपार्टमेंट
सर्व रेव्हेन्य कलेक्शन सुप्रीम गव्हर्नमेंट ऑफ़ इंडिया च्या नावाखाली जमा केले जात असे. याचा भरणा व नियंत्रण " सुप्रीम ट्रेझरी" कडुन केले जात असे. एका प्रांतातुन कमी आलेल्या रेव्हेन्यचा भरणा दुसर्‍या प्रांतातुन वसुल केला जात असे. आणि संपुर्ण " इंडिया रेव्हेन्यु" हा एखाद्या प्रांताने युद्धासाठी घेतलेल्या कर्जाची परतफ़ेड करण्यासाठी जबाबदार असे. भारतात वेळोवेळी कंपनीने केलेल्या युद्धाचा खर्च क्राऊन आणि पार्लियामेंट कंपनीच्या नावावर डेबीट टाकत असे. हे " कर्ज" कंपनीला भारतातुन मिळवलेल्या रेव्हेन्यु व कंपनीच्या एकुण व्यापारातुन कमावलेल्या नफ़्यातुन परत फ़ेडाव लागत असे. "इंडिया डेब्ट" हे एक अती रोचक वेगळच प्रकरण आहे.

६- रायटर्स , फ़ॅक्टर्स, ज्युनियर आणि सिनीयर मर्चंट्स

कंपनीचा प्रचंड कागदी कारभार चालविण्यासाठी क्लर्क्स ची एक मोठी फ़ौज होती. सर्वात ज्युनियर क्लर्क "रायटर" म्हणुन सुरुवात करत असे. ( कलकत्याची फ़ेमस रायटर्स बिल्डींग ) किमान ५ वर्षे या पदावर काम केल्यावर "फ़ॅक्टर" या पदावर प्रमोशन होत असे. तीन वर्षानंतर ज्युनियर व मग सिनीयर मर्चंट अशी पदोन्नती असे. तपशीलवार जॉब स्पेसीफ़ीकेशन असलेला करार बॉन्ड करुन घेऊनच मग कंपनीत नोकरी मिळत असे. गैरव्यवहारासाठी डच्चु मिळण्याची कारवाईची तरतुद होती. १७६४ मध्ये कंपनीने एका ठराविक पातळीच्या वर "गिफ़्टस" स्वीकारण्यास कंपनी सर्व्हंट्स ना बंदी घातली. हा बहुधा आधुनिक जगातला पहीला कॉर्पोरेट कोड ऑफ़ एथिक्स असावा. कंपनीच्या ओव्हरसीज स्टाफ़ ला पगार जरी कमी असला तरी सर्वात महत्वाच एक इन्सेटीव्ह होत. ते म्हणजे कंपनीच्या नोकरांना "प्रायव्हेट ट्रेड" याला प्रिव्हीलेज ट्रेड म्हटल जात असे ते ऑन ड्युटी असतांनाही करण्याची कंपनीकडुन परवानगी होती. हे कंपनीत करीयर करु पाहत असलेल्या धाडसी होतकरु ब्रिटीश तरुणांसाठी मोठ आकर्षण होत. कंपनीच्या जहाजावर कर्मचार्‍याच्या त्यांच्या रॅंक नुसार एक ठराविक वजनापर्यंत माल ठेवण्याची कॅरी करण्याची "सुविधा" दिली जात असे. त्याचा वापर कंपनीच्या जोडीने कर्मचारी स्वत"च्या व्यापारासाठी करत असत. उदा. चायनातुन पोर्सेलीन विकत घेऊन लंडन मध्ये विकणे, भारतातुन माल घेउन विकणे इ. वा इंडियन माल चायनात इ. छोटा व्यापार कंपनीच्या मोठ्या व्यापाराच्या समांतर चालु असे. यात इंग्लंडहुन चायनात ही काही "नॉव्हेल्टीज" वस्तु नेऊन विकणे इ. ही होत असे. एक तुलना म्हणुन डचांच्या व्हिओसी या इस्ट इंडिया कंपनीत नोकरांना या प्रायव्हेट ट्रेड वर पुर्णपणे बंदी होती.

१७८० ते १८२० या काळात कंपनीच्या क्लर्क्स ची अ‍ॅव्हरेज रीयल इनकम ६०० पाउंड वार्षिक पर्यंत पोचत असे. हे त्या काळच्या इंग्लड मधील क्लर्क्स ग्रेड च सर्वाधिक उत्पन्न होत. कंपनीकडुन क्लर्क्स ला पेन्शन व फ़िक्स्ड टर्म अ‍ॅन्युइटीज मिळत असे.१७८९ मध्ये ६४ कर्मचार्‍यांना एकुण १३००० पाउंड्स पेक्षा अधिक रक्कम या प्रकारे वाटण्यात आली होती. या पेन्शनमुळे कंपनीची "होम सर्व्हीस" ओव्हरसीज इतकीच लोकप्रिय होती. इंडिया हाऊस मध्ये नोकरी मिळण मोठी आनंदाची बाब होती. कामाची सिस्टीम मात्र फ़ार रीजीड होती. डिपार्टमेंट्स सहसा बदलत नसे. अनेकांची संपुर्ण आयुष्य एकाच खात्यात काम करत संपत असे. त्यामुळे ते एकेका विशिष्ट कामात जरी फ़ार तरबेज झाले तरी कंपनीच्या इतर डिपार्टमेंट्स संदर्भात ते पुर्णपणे अनभिज्ञ असत. तरी या क्लर्क्स मध्ये काही टॅलेंटेड हुशार मंडळीही होती. उदा. एक चार्ल्स कार्टराइट ने इंग्लीश इंम्पोर्ट ड्युटीज चा व स्मगलींग चा सखोल अभ्यास करुन अनेक महत्वाची पत्रके प्रकाशीत केली. वेअरहाउस कमिटी वरील एक क्लर्क रॉबर्ट विस्सेट ने कंपनीच्या व्यापार व इनर वर्कींग्ज वर काही उत्तम पुस्तके लिहीली. आणि कंपनी सेक्रेटरी पिटर उबेरनेही चायना ट्रेड सहीत "जनरल हिस्टरी ऑफ़ ब्रिटीश इंडिया " इ,. महत्वपुर्ण व्यासंगी ग्रंथाची निर्मीती केली. थॉमस लव्ह पिकॉक हा लेखक कवी कंपनीच्या सर्व्हीस मध्ये होता. अजुन एक मोठ उदाहरण म्हणजे इतिहासकार जेम्स मिल. आणि त्याचा सुपुत्र जॉन स्टुअर्ट मिल हे प्रसिद्ध युटीलीटेरीयन अ‍ॅक्टीव्हीस्ट होते. अनेक भारतीय राजकारण्यांवर यांच्या उपयुक्ततावादाचा प्रभाव होता. चार्ल्स लॅम्ब हा "एस्सेज ऑफ़ एलीया" चा लेखक आणि वर्डस्वर्थ ,कोलरीज इ, रोमॅंटीक्स चा खास मित्र हा कंपनीच्या अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये १७९२ पासुन पुढे ३३ वर्ष इथेच काम करत होता. येथील मिळत असलेल्या सुकुन की कमाईसाठी तो कृतज्ञ होता मात्र ऑफ़ीसातील बोअरडम रटाळ रुटीन त्याला हैराण करत असे. त्याचा कवी मित्र सॅम्युअल टेलर कोलरीज ने त्याला १७९७ मध्ये एक कविता अर्पण केली त्यात तो मजेशीर म्हणतो " This lime tree bower, To my gentle- hearted charles, " who had " pined and hungered after Nature, many a year, in the great City pent !!

"The East Offering Her Riches to Britannia"

लंडनच्या लीडनहॉल स्ट्रीट वर असलेल्या "इस्ट इंडिया हाऊस " च्या भव्य इमारतीतुन कंपनीचा कारभार चालत असे. हा लंडन शहराचा एक लॅन्डमार्क बनलेला होता. इथे असलेला खलाशी व दोन डॉल्फ़िन माशांचा पुतळा कंपनीच सागरी व्यापाराशी असलेल नातं मिरवत असे.१७२९ मध्ये याच रिनोव्हेशन झाल्यानंतर इथे काही पेंटीग्ज लावण्यात आल्या. त्या कंपनीच्या विविध देशांत जगभरात पसरलेल्या कंपनीच्या "ट्रेंडिग पोस्ट्स" दर्शविणार्‍या पेंटींग्ज होत्या. यात अटलांटीक मधील "सेंट हेलेना" ते अफ़्रिकेतील "केप टाऊन" ते वेस्ट कोस्ट ऑफ़ इंडियातील बॉम्बे तेलीचेरी यांचा समावेश होता. कंपनीची भौगोलिक व्याप्ती आश्चर्यजनक होती बसरा मध्ये ही कंपनीची "फ़ॅक्टरी" होती.. कंपनीच्या भव्य कारभाराला साजेशी २०० फ़ुट लांब एक भव्य इमारत येथेच बांधण्यात आली. १७७८ मध्ये ऑनरेबल ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर्सनी "इंडिया हाऊस " मध्ये १० फ़ुट आडवी व ८ फ़ुट उंच एक भव्य पेंटिंग लावुन घेतली. Spiridione Roma या इटालियन चित्रकारा कडुन खास बनवुन घेतलेल्या या पेंटींगचे नाव होते. "The East Offering Her Riches to Britannia" ही एक प्रतिकात्मक पेंटींग बघण्यासारखी आहे. यात एक दृश्य दाखवलेले आहे. त्यात एका उच्चासनावर " ब्रिटानीया" गोरीपान ब्रिटानीया बसलेली आहे. तीच्या समोर खाली झुकुन उभी असलेली एक कृष्णवर्णीय स्त्री " इंडिया" हिरे मोती माणिकांनी भरलेली परडी धरुन उभी आहे. "इंडिया" भारताचे प्रतीक च्या चेह‍र्‍यावरील भाव विलक्षण रेखाटलेले आहेत. त्याकडे "ब्रिटानीया" मोठ्या तोर्‍याने काहीशा मग्रुर बेफ़िकीरीने बघुन काही तरी घेण्याचा विचारात आहे. काळ्या स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री " चायना" मोठा मिंग व्हेस व चहाचा क्रेस्ट घेऊन ( चायना टी ट्रेड चा संदर्भ ) भेट देण्यास उभी आहे. त्यामागे कॉटन बेल्स घेऊन एक माणुस दिसत आहे. या सर्वांना डायरेक्शन देण्याचे काम " मर्क्युरी" हा रोमन देव ( व्यापाराचा देव मेसेंजर गॉड ) करत आहे. जणु "हे राज्य व्हावे ही मर्क्युरींची च इच्छा आहे "असे सुचवित आहे. ब्रिटानीया च्या पायाशी ब्रिटीश साम्राज्याच्या शक्तीच प्रतीक सिंह बसलेला आहे. त्याच्या शेजारी म्हातारा थेम्स बाबा (लंडन शहराच प्रतीक: बसलेला आहे. दुर समुद्रात एक कंपनीचे जहाज ( ज्यावर कंपनीचा झेंडा ज्यावर सेंट जॉर्ज चा क्रॉस आणि स्ट्राइप्स दिसत आहे ) पेंटिंग्ज मागील प्रतीक व त्यामागची साम्राज्यवादी मग्रुरी व तुच्छतावाद उघड आहे. ही पेंटींग डायरेक्टर्सनी कंपनीच्या रेव्हेन्यु कमिटी रुम च्या सिलींग वर लावलेले होते हे अजुन एक विशेष.

प्रतिके महत्वाची होती प्रतिके नेहमीच महत्वाची असतात नाही का ?

1

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

छान लेख....

---------------------------
बरीचशी माहिती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पुढची म्हणजे प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांचं राज्य स्थापन झाल्यानंतरची आहे. पहिल्या शंभर वर्षांविषयी अधिक माहिती वाचायला आवडेल. भारतात "राज्य स्थापन करण्याची" गरज इंग्रजांना नेमकी केव्हा जाणवली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वागत मारवा.बरेच दिवसांनी अगदी वेगळाच विषय आणलात.शांतपणे वाचेन पुन्हा एकदा.सहमत किंवा असहमत म्हणण्याइतकंही ज्ञान नाही.एक त्रयस्थ आणि देशभक्तीच्या भोवय्रातून बाहेर राहून केलेलं लिखाण वाचायला मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख उत्तम आहे. नीट खोलवर जाऊन वाचला पाहिजे पुनरेकवार. सध्या ही केवळ पोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम माहितीपूर्ण लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडीचा विषय! धन्यवाद मारवा!

____________

सविस्तर प्रतिसाद जमेल तेव्हा देईन.

____________
तूर्तासः

भारतातला पहिला कंपनी कायदा १८५० साली बनवण्यात आला. त्या कायद्याअंतर्गत रजिस्टर झालेली पहिली कोणतीतरी रेल्वे कंपनी होती.

भारतातल्या कंपनी कायद्याचा अतिरोचक इतिहास घोष-चंद्रात्रे यांच्या प्र-चं-ड मोठ्या पुस्तकात आहे. हे अनेकखंडी पुस्तक बॅक-टु-बॅक वाचलेला माणूस अस्तित्त्वात नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अत्यंत माहितीपूर्ण आणि तरीही रसाळ लेख.जरा सुद्धा कंटाळा आला नाही. पुढील भागाची वाट पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातल्या कंपनी कायद्याचा अतिरोचक इतिहास घोष-चंद्रात्रे यांच्या प्र-चं-ड मोठ्या पुस्तकात आहे. हे अनेकखंडी पुस्तक बॅक-टु-बॅक वाचलेला माणूस अस्तित्त्वात नसावा.

एक्सेप्ट चंद्रात्रे, दॅट इज़.

बाकी हे कुठलं पुस्तक म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कंपनी कायद्याचं रेफरन्स बुक आहे.

K.M. Ghosh & Dr. K.R. Chandratre's Company Law: With Secretarial Practice

टोटल सहा-सात हजार पानं आहेत. आता चंद्रात्रे सर सत्तरीच्या घरात असतील. (घोष कधीच कै झाले.) तरी वेळोवेळी अपडेट होत असतं.

अवांतर: चंद्रात्रे सरांची एक महत्त्वाची सूचना / आग्रह / लोकजागृती / चळवळ आहे की "कंपनी कायदा सोप्या इंग्रजीत असावा".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चंद्रात्रे सरांची एक महत्त्वाची सूचना / आग्रह / लोकजागृती / चळवळ आहे की "कंपनी कायदा सोप्या इंग्रजीत असावा".

ही लिबर्टेरियन विचारसरणीच्या बुनियादींच्या अनेक वीटांपैकी एक वीट आहे.

डॉड-फ्रँक कायदा २३०० पाने आहे असे ऐकून आहे. हा कायदा मुख्यत्वे फायनान्शियल क्षेत्रातील कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला होता. डॉड फ्रँक या दोघांनी तरी ही २३०० पानं वाचलियेत की नाही ते ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे अत्यंत रोचक आहे.
पुढिल लेखांकाच्या प्रतिक्षेत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख तपशीलवार व म्हणून शॉल्लेट आहेच.

धाग्याचे शीर्षक "ब्रिटिश" इस्ट इंडिया कंपनी असे करणे योग्य होईल का ? कारण डच इस्ट इंडिया कंपनी पण होती, फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी पण होती, स्वीडीश वगैरे इस्ट इंडिया कंपनी पण होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या! बोगस सगळे! इंडिया नामक काही अस्तित्वातच नव्हतं ब्रिटिशांचं राज्य यायच्या आधी. माझे लेख वाचत चला! असल्या चुका होणार नाहीत पुन्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते पोष्टरबॉय पण असंच म्हणतात.

http://www.eopinions.in/new-video-tarek-fateh-calls-dissolution-india-mu...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते म्हणताहेत की हा व्हिडो डॉक्टर्ड आहे म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेच म्हणतो. डच कंपनीचा इतिहासही काहीसा असाच आहे. त्यावरही महाभयानक अतिप्रचंड मट्रियल उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्रिटीश शब्द वापरायचा अगदी हेच ठरवल होत पण ऐन वेळी अती उत्साहात राहुन गेल.
तस प्रत्येक कंपनीच नाव वेगळीच होती.
उदा डच-Vereenigde Oost-Indische Compagn
फ्रेंच-Compagnie française pour le commerce des Indes orientales)
पण साहेब यांना डच इस्ट इंडिया फ्रेंच इस्ट इंडिया असे म्हणत असे. ओरीजीनल नावाने फ्रेंच नाही मात्र व्हीओसी नाव अनेक पुस्तकात येत.
साहेबाच्या कंपनीला डिफ्रंशीएट करण्यासाठी एक बेस्ट पर्याय म्हणजे ही John Company नावानेही अनेकदा संबोधली जाते का ते माहीत नाही.
पण हे एक फेमस ऐतिहासिक कार्टुन बघा

1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहेबाच्या कंपनीला डिफ्रंशीएट करण्यासाठी एक बेस्ट पर्याय म्हणजे ही John Company नावानेही अनेकदा संबोधली जाते का ते माहीत नाही.

आणि वलंदेज कंपनीला jan company असेही म्हटल्या जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणुन ते तपन रायचौधरी Jan Company in Coromandel, 1605-1690 या नावाने सर्च मारल तर दाखवत आहे.
इंट्रेस्टींग हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख.
संदर्भासाठी वापरलेल्या पुस्तकांची नावे द्याल का प्लीज?

कंपनीत आवश्यक असणार्‍या सिव्हील आणि मिलीटरी या दोन्ही प्रकारच्या पदांच्या उमेदवारांच्या भरतीसाठी कंपनीने दोन कॉलेजेस इंग्लड मध्ये चालवली होती. इथे विद्यार्थ्यांना कंपनीकडुन ट्रेनींग दिली जात असे.

याच कारणासाठी (नव्याने भरती केलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी - विशेषतः भारतीय भाषा शिकवण्यासाठी) कलकत्त्यात कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम्स आणि तेव्हाच्या मद्रासमध्ये कॉलेज ऑफ फोर्ट सेंट जॉर्ज स्थापन करण्यात आले होते. भारतातील अनेक भाषांचे पहिलेवहिले कोश, व्याकरणे या विद्यार्थ्यांसाठी म्हणून तयार करण्यात आली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ दर लेखांकाच्या शेवटी संदर्भयादी दिलीत तर उत्तम नपेक्षा शेवटाच्या भागाखाली जरूर द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतातील अनेक भाषांचे पहिलेवहिले कोश, व्याकरणे या विद्यार्थ्यांसाठी म्हणून तयार करण्यात आली होती.

मराठी व्याकरणाबद्दल कृ० श्री० अर्जुनवाडकर यांचे ग्रंथ अत्युत्तम आहेत. दणदणीत शिफारस. त्याद्वारेच कळालं की १८२६ साली पाणिनीच्या धर्तीवर मराठीचं 'महाराष्ट्रप्रयोगचंद्रिका' नामक संस्कॄत भाषेत व्याकरण लिहिलं गेलं होतं. सुदैवानं त्याची पीडीएफही उपलब्ध आहे.

http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/3361

अर्जुनवाडकर या ग्रंथाचा उल्लेख करतात याचं कारणही रोचक आहे. मराठी शब्दांचा संधी होत नाही असं म्हणणार्‍या यच्चयावत् व्याकरणकारांची त्यांनी जी साले काढलीत त्याला तोड नाही. त्या पार्श्वभूमीवर या ग्रंथात मात्र संधी झाल्याची उदाहरणे दिलेली आहेत, उदा. पाट ढकल = पाड्ढकल असे बोलले जाते. पण लिपी-ऑब्सेस्ड वैयाकरणांना ते झेपेल तर शपथ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहा! साच्छेळ्या शेताच्छिरल्या Wink
अर्जुनवाडकरांचा व्याकरण व व्याकरणकारांवरचा ग्रंथ तर उत्तम आहेच. काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात संस्कृत सरस्वती: काल, आज, उद्या असा काहीतरी दीर्घ लेख आला होता, तोही उत्कृष्ट होता. त्यांची लेखनशैली आणि शास्त्रीयदृष्ट्या रोखठोक विचार करण्याच्या पद्धती याबद्दल मला अतीव आदर आहे.
प्रयोगचंद्रिका वाचलं आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, अग्दी अग्दी Wink बाकी प्रयोगचंद्रिका पूर्ण वाचलं नाही, चाळलं आहे मात्र. वाचलं पाहिजे.

लेख पाहिला पाहिजे. अर्जुनवाडकरांचा दृष्टिकोन अतिशय शास्त्रीय, स्वच्छ आणि बिनचूक आहे. त्यांची शुद्धलेखनविषयक लेखमाला इथे वाचता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखमालेच्या दुव्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोष्ट वेल्कम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्व पुस्तकांची सुची लेखमालेच्या शेवटी देतो. सध्या कंटाळा आहे व आता दुसरा भाग लिहायचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व पुस्तकांची सुची लेखमालेच्या शेवटी देतो. सध्या कंटाळा आहे व आता दुसरा भाग लिहायचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0