"जेसन आणि बेडूक"

सिलिकॉन दरी मध्ये / वसे तो जेसन
शिका हा लेसन / तरुणींनो
त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त
संगणकी रक्त/ खेळतसे
एका सकाळी तो/ रस्त्याने चालला
बेडूक बोलला / शेजारून
"अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही
बेडकाचे देही/ शापग्रस्त
मला उचलून / स्वगृही नेशील
आणिक घेशील / चुंबन ते
प्रगटेल माझे / मानवी शरीर
"कामा" स उशीर / मग नाही
जन्मभर तुझी/ होईन मी कांता
आनंदा अनंता/ मुकु नको "
जेसनने त्याला / मग उचलला
आणिक ठेविला / खिशामाजी
घरामध्ये त्याला / दिले छोटे घर
खायलाही चार / किडे बिडे
आठवडे झाले/ कित्येक दिसांचे
पण चुंबनाचे / नाव नाही
बेडूक अखेर/ झालासे हताश
स्वरात निराश / प्रश्न करी
"अरे प्रिय मित्रा/ चुंबनाचे काय
धरिते मी पाय/ आता तुझे.
कर मला पुन्हा/ अरे अहंमन्या
सुंदर ती कन्या/ लवकर
देईन तुजला / असा कामानंद
सोड बाकी छंद / कुचकामी"
ऐका तरुणींनो / काय तो वदला
संगणकामधला / अभियंता
"नव्याने मिळाला / मला हा प्रोजेक्ट
कोटींचे बजेट / डॉलरचे
मरायला इथे/ मला नाही वेळ
चुंबनाचे खेळ / कशासाठी?
किडे बिडे देतो/ सुखामध्ये रहा
समोरचा पहा / टीव्ही सुद्धा"
रागाने मग तो/ बेडूकही कापे
आणिक संतापे/ प्रश्न करी
"विवाही जीवन / मनात नव्हते
आणले ते इथे / कशासाठी?"
जेसन वदला / "त्यात काय चूक
बोलता बेडूक/ दुजा नसे!"

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

कै च्या कै काव्य Smile
आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकदम खंग्री कविता. मी ऐकून आहे की केशवसुतांच्या एका कवितेत आपल्या गावाबद्दल लिहिताना गायीम्हशींचा उल्लेख झाला तेव्हा लोकांनी 'गायीम्हशी या काय कवितेत आणण्याच्या गोष्टी आहेत का?' असं म्हणून नाकं मुरडली होती. इथे तर चुंबनोत्सुक बेडुक आणून त्या कक्षा विस्तारलेल्या आहेत, आणि नाकांना मुरडण्यासाठी आणखीनच वाकडं करण्याची गरज निर्माण केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL भारी कविता आहे! बाकी तो सिलिकॉन व्हॅलीत वसलेला जेसन हाच का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL लय भारी.

लाखोनी डॉलर/ करुनिया अर्न
पाहुनिया पोर्न/ सुखिया झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

यावरुन या गोष्टीची एक रशियन व्हर्जन आठवली. (रशियन म्हंटलं की जनता मान्य करते) त्यात बेडकाचा मुका घेतल्यावर राजपुत्र मरतो, मग सगळं राज्य राजकन्येचं होतं.
त्याहिशोबानं कवितेचा शेवट योग्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर लिहिलंय!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहाहा! भारी आहे हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंची आठवण झाली. त्यांना 'ते' घुबड, असं काहीतरी का म्हणालं नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी. लय भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

थोर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉटस् अ‍ॅप वरती ढकलपत्र म्हणून आले होते हे. साधारण मजकूर असा होता -- http://jokes.cc.com/funny-work/k7op88/the-engineer-and-the-frog
.
.
पण मराठीकरण कहर भन्नाट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!