Skip to main content

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

दिव्यांना नको तू करु मंद राणी
तुला पाहण्याचा मला छंद राणी

पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले
खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी

मला घे मिठीच्याच कैदेत आणि
नको गे करु तू खुले बंध राणी

तुला मी मला तू असे प्राशवावे..
पुरी रात व्हावी मधू धुंद राणी..

तुला लागला सावळा रंग माझा
तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी

- कानडाऊ योगेशु