'व्यवस्थापनाचा/मोठा सल्लागार"

बेडूक बैसला / कमळाच्या दळे
भोवताली तळे/ भलेमोठे
खावयास त्याला / भीषण मगरी
आणिक सुसरी/ जमल्या त्या
भयाण त्यांचे ते/ बघोनिया दात
बेडूक मनात / थरथरे
अचानक त्याला/ तळ्याच्या काठून
एका झाडातून / ध्वनी आला
बोलत होते ते/ जाणकार स्वरे
घुबड म्हातारे/ ज्ञानवृद्ध
"व्हायचे नसेल / सुसरीचे भक्ष्य
देवोनिया लक्ष / ऐक माझे
दोन पाऊले ती / जरा मागे जाणे
आणि झेप घेणे / तीराकडे"
बेडकाने मनी / विचार तो केला
याहून वेगळा / मार्ग नाही
वृद्ध घुबडाचे / म्हणणे ऐकावे
आणि वाचवावे / जीवनाला
मग मारे उडी / संपूर्ण त्या बळे
अर्धे सुद्धा तळे / पार नाही
सुटल्या मगरी / त्याकडे वेगात
बेडूक पाण्यात / डुब्या मारी
"अरे मूर्ख घुबडा/ तुझे मी ऐकले
आयुष्य संपले / माझे आता!"
तेंव्हा झाडातून / घुबड बोलले
थंड ऐकू आले / त्याचे शब्द
"व्यवस्थापनाचा / मोठा सल्लागार
देशोदेशी फार / कीर्ती माझी!
माझे काम असे/ संकल्पना देणे
घडवून आणणे / मुळी नाही!"

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

माझे काम असे/ संकल्पना देणे
घडवून आणणे / मुळी नाही!"

च्यायला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0