अत्तर

https://s-media-cache-ak0.pinimg.com/236x/97/32/33/973233454ab146ab544c0aca302d8603.jpg

.
ही कथा आहे दोघांची पण मुख्यत्वे तिची. दिसायला ती एक सर्वसामान्य मुलगी होती. तुम्ही शॅलो हल सिनेमा पाहीला आहे का? शॅलो हल सिनेमात प्रत्येकजण व्यक्ती मूळ रुपात दिसते. ज्या व्यक्तीचे जसे अंतरंग त्या अंतरंगाच्या सौंदर्यानुसार तिचे सौंदर्य. असे जर अंतचक्षूंने कोणी मधुराच्या अंतरंगात डोकावले असते तर त्या व्यक्तीला मधुरा अतिशय गोड, सुंदर व भाबडी, खरं तर प्रेमाच्या प्रेमात पडलेली मुलगी आहे हे लक्षात आले असते. या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. काही व्यक्तींचे अंतरंग दिलखेचक असेल कोणाचे जिप्सी सौंदर्य असेल कोणी सूर्यफुलासम टवटवीत असेल तर कोणी तळ्यावरील आल्हाददायक सूर्योदयासारखे भव्य आणि स्वर्गिय असेल. मधुरा ही मात्र व्हायोलेटच्या फुलांच्या modest, नीटस फुलगुच्छासारखी होती. काव्यमय, भावुक अंतरंग असलेली अशी व्यक्ती होती. या आकाशी-व्हायोलेट काव्यमय फुलांच्या गुच्छात बारकाईने पहाता काही अजुन तुरे आढळले असते. निस्वार्थी प्रेमाची बेबी पिंक गुलाबकळी, भक्तीचे, समर्पणाचे शुभ्र कमळ , कोमल इवले इवले बेबी ब्रेथ फुलांनचे तुरे आणि तारुण्यातील इच्छांची पोपटी कातरलेली पाने.
तिच्या, विशी-तीशीपर्यंत तर सारे काही आलबेल होते. व्हायोलेटच्या गुच्छावरती स्वप्नाजलाचे रीतसर शिंपण होई व ते परत टवटवीत होत, जोमाने, जीवनेच्छेने सूर्यप्रकाशाकडे चेहरा करुन डोलत.
.
जशी जशी चाळीशी आली, तशी तिला तिच्या घुसमटीची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. हेच आयुष्य आहे का? प्रेमशिवाय असेच सुकुन जायचे का? कधीही प्रेमात न पडलेल्या तिच्या मनाने हट्ट करण्यास सुरुवात केली. आता नाही तर कधीही नाही. कधी भेटणार माझा प्रियकर? इतकी वाट पहायला कसे कोणी लावू शकते? का नाही सापडत आपल्याला आपला सखा. साधारण त्याच सुमारास ,दर शुक्रवारी संध्याकाळी काही तास ती पबमध्ये एकाकी व्यतित करु लागली होती. या पबमध्ये अनेक लोक येत. सडेफटिंग, जोडपी, वृद्ध स्त्री-पुरुष, पुरंध्री, तरुण, मध्यमवयीन सर्व प्रकारचे लोक येत. आर्थिक, सामाजिक सर्व थरांतून हे लोक आलेले असत. व्हर्जिन पिनॅकोलाडा सिप करत एका कोपर्यात बसून गर्दी बघणे व पार्श्वभूमीवर लागलेल्या मंद सुरावटींचा आस्वाद घेणे, हा तिचा दर शुक्रवारचा सायंकाळचा प्रोग्रॅम होऊ लागला होता. त्या गर्दीलाही एक ऊर्जा होती. आनंदी,ऊबदार, स्वच्छंद, खेळकर ऊर्जा. आणि त्या ऊर्जेच्या कल्लोळात ती तिचे एकाकीपण विसरू शकत होती. अनेक चेहरे त्या पबचे शुक्रवारचे रेग्युलर मेंबर होते आणि ती चेहर्यांनीच ओळखू लागली होती.बरं तिला हेदेखील माहीत होते की ही गर्दी दुरुन मोहक भासते परंतु जर तिच्यात शिरायचे म्हटले तर स्वतःला हँडल करता येण्याइतकी चलाखी हवी. जी आमच्या नायिकेत नव्हती.
.
मात्र एकदा एका पुरुषाचे लक्ष तिच्याकडे गेले. व एका कोपर्यात बसलेल्या तिच्या निकट जाऊन त्याने तिच्याशी ओळख करायच्या मिषाने हात पुढे केला. इतकी वर्षे मधुराचा विश्वास होता की आपला प्रियकर जेव्हा आपल्या समोर येइल तेव्हा आपल्याला काहीतरी अंतःप्रेरणेने कळेल की हाच तो. या तरुणाबाबत तर तसे काहीच झाले नाही तेव्हा unguarded , careless निश्चिंतीने तिनेही हात पुढे करुन हस्तांदोलन केले. इतकी वर्षे गेली कित्येक स्त्री-पुरुष आले गेले, हासुद्धा त्यातलाच एक होता की. तेव्हा मैत्री करण्यात एवढा विचार तो काय करायचा. एक नवीन मानवी-स्वभाव जवळून पहाण्याची सुसंधी. रोजच्या चाकोरीबद्ध आयुष्यातील एक परिचित. त्या च्या हस्तस्पर्शाने कादंबरीत लिहीतात तसा काटा वगैरे तिच्या शरीरावरती फुलला नाही. पण तिचे मन नकळत register करुन गेले की त्याची पकड आश्वासक आणि हवी तितकी कणखर आहे. त्याला तिच्या हस्तांदोलनाबद्दल काय वाटले हे कळण्याचा ना मार्ग होता ना तिला ते जाणून घेण्याची निकड भासली. हळूहळू प्रत्येक शुक्रवारी दोघे या पबमध्ये एकाच वेळी, येउन गप्पा मारू लागले. गर्दीतून वेगळे बसून गप्पा मारताना किती विषय होते त्याच्याकडे बोलण्यासारखे, किती कुतूहल होते त्याला तिच्याबद्दल. स्त्रियांना स्वतःबदल बरेच काही बोलायचे असते, हे जाणून होता की काय तो? कारण प्रत्येक भेटीतील ६५% वेळ ती बोलत असे व तो ऐकत असे. तो अतिशय चांगला श्रोता होता. बरे असेही नाही की तो ढोंग करत असे, तो खरच तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करे. एखाद्या व्यक्तीला मनोमन जाणून घेणे म्हणजे अलगद, त्या व्यक्तीच्याही परवानगीने तिला विवस्त्र करणे असते की काय? त्याने तिच्या मनावरील एकेक आवरण दूर करणे असे तिचे अंतरंग जाणून घेणे बरे का वाटावे तिला? आणि तसे मनाने विवस्त्र होण्यातही आपल्याला आनंद का वाटावा, याचा मधुरा विचार करत असे. कदाचित त्याने तिला दिलेले एकाग्र अवधान (attention) हा जादूचा भाग असेल.

My hands
open the curtains of your being
clothe you in a further nudity
uncover the bodies of your body
My hands
invent another body for your body
- Octavio Paz

प्रत्येक नात्यातील सूक्ष्म मनोव्यापार ताबडतोब त्याच क्षणी जाणून घेता येतात असे काही नसते. ना तसा अट्टाहास करणार्यातील ती होती. ती फक्त त्याचे अवधान समरसून आकंठ उपभोगत होती. हा साधासा आनंद घेण्याने, देण्याने असे मोठे काय बिघडणार होते? ती थोडीच त्याच्याबरोबर एकांतात जात होती की तिने घाबरावे. ती तर गर्दीत होती, पबच्या ऊबदार, आनंदी गर्दीत आणि तो होता गर्दीतला एक चेहरा. तसाही प्रेम शोधण्याचा तिचा उत्साह मावळतच चालला होता. त्यामुळे एखाद्या शोडष वर्षीय तरुणीप्रमाणे, बावरण्याचे काही प्रयोजन नव्हते.She was in control. तिचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण होते.
.
नियंत्रण? खरच? दिवस गेले आणि हळूहळू त्याचे अस्तित्व हेच तिचे पबमध्ये जाण्याचे मुख्य कारण बनू लागले होते, तिच्याही नकळत. एखाद्या शुक्रवारी तो आला नाही तर आता तिची घालमेल होऊ लागली, तिचा सोमवार का मरगळलेला जाऊ लागला होता. दोघांचे पबमधील आवडते गाणे होते फ्रॅन्क सिनात्राचे-

Every kiss, every hug seems to act just like a drug
You're getting to be a habit with me
Let me stay in your arms I'm addicted to your charms
You're getting to be a habit with me

एकदा सलग २ शुक्रवार तो आलाच नाही. तीसर्या शुक्रवारी मात्र तो दिसला आणि तिने ऊठून धावत जाऊन त्याला ग्रीट केले "कुठे होतास रे? मी वाट पाहीली. गेले २ शुक्रवार आला नाहीस.मला खूप कंटाळा आला. मी तुला मिस केले. एवढे काम होते तुला की आठवड्यातील एक दिवस वेगळा काढता आला नाही?" अरेच्च्या व्हायोलेटच्या लाजाळू गुच्छात एक बाळ सूर्यफुलही होते तर, उत्कट, प्रांजळ, no false pretenses! त्याने ते सूर्यफूल पाहिले. तिला झालेला २ आठवड्यांचा विरह त्याला कळत होता. आणि त्याच्या पुरुषी वृत्तीने ताडले ती बेसावध आहे, desperate आहे, हाच तो दिवस आहे . मनसोक्त गप्पा मारल्यावरती, त्याने जाताजाता सहज तिला विचारले, "उद्या माझ्या घरी डिनरला येशील का? सहजच, अर्थात no force तुला योग्य वाटलं तरच.. मधुरा भोळी होती पण स्त्रीसुलभ सिक्स्थ सेन्स तिलाही होताच की. ती क्षणभर थबकली, विचार करु लागली जावे की न जावे? होकार द्यावा की नकार? पण इतका मनमिळाऊ, सौम्य असा तो , तो थोडी ना तिला सक्ती करत होता. त्याच्यापासून तिला काय धोका होता? काहीच नाही. She was in control. परिस्थितीवर तिचे नियंत्रण होते. तिने खुशीने होकार दिला. आताशा अंतर्मनात खरं तर पबमधील गर्दी नकोशी तिलाही होऊ लागली होती. ऊबदार गर्दी आता अडसर वाटू लागली होती. आनंदी लोक , hyper वाटू लागले होते. अरेच्च्या पब बद्दलचे हे मत आपले कधी बनले? कधी गर्दीतून दूर त्याला भेटण्याची निकड तिला वाटू लागली - तिलाही कळले नाही की नक्की केव्हा आणि कशाचा अडसर ती गर्दी बनत होती? हम्म खरं वाटतय का तुम्हाला तरी, की एका प्रौढ mature स्त्रीला खरच गर्दीचा अडसर नक्की कशात आहे ते कळत नव्हते?
.
दुसर्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता ती त्याच्या घरी गेली. तो स्वयंपाक करीत होता. किती उत्साहाने आणि नीटनेटकेपणाने, asparagus चे तुरे , पातीचा करकरीत कांदा कापत होता, एका बाजूला एका भांड्यात काही शिजत होते तर दुसरीकडे लगबगीने अन्य कोणत्या पदार्थाची तयारी चालली होती. बरे एवढ्या धामधुमीतही त्याने तिची विचारपूस करुन, सी डी लावउन, पुस्तके चाळण्यास देऊन रिलॅक्स होण्यास संगीतले होते. एकीकडे गप्पाही मारत होता. मुख्य तो तिच्याकरता, खास तिच्याकरता म्हणून काही बनवत होता.

We reach across the plates and glasses
sparks arc between our finger tips--
we have to have each other for dessert.
After, back in the kitchen,
you call me to you,
unfold your robe
and draw my hand into our wetness--
I fall onto my knees in worship
and to taste of it.
- jay farbstein

बरं या कवितेचं काय? आत्ता आठवण्याचं प्रयोजन काय? त्याला किचनमध्ये पाहून, हीच कविता आपल्याला का आठवावी? Naah! shrug it off. उगाच घाबरु नकोस. अगं किती साधा, मनमिळाऊ आहे तो. त्याने थोडीच तुला काही अंतर्हेतूने बोलावले असेल? No way. जेवण एन्जॉय कर. Just chill. त्याचा सहवास उपभोग. You are in control of the situation. एका नक्की होते relaxation ती त्याच्याबरोबर नीट अनुभवु शके. किती गप्पिष्ट आणि सहज असावं माणसाने! All guards & barriers down, ती त्याच्यापुढे सहज मोकळी होत असे. तशीच ती आजही झाली.
.
आता जेवणात काय होतं आणि त्यांनी रेड वाईन घेतली की अन्य कोणती या बारकाव्यांत काय ठेवलय? मुद्द्यावर येउ यात. जेवणानंतर, ती संध्याकाळ निव्वळ heady जाणार होती. तो सौम्य आहे की त्याच्यात जरब आहे, तो मनमिळाऊ आहे की चांगला श्रोता असणे , ऐकून घेणे या त्याच्या calculated moves आहेत हे तिला कधीच कळणार नव्हते कारण आजच्या थरारानंतर, सुंदर अनुभवानंतर तिला त्याच्याकडे स्वच्छ खरं तर rational दृष्टीने कधीच पहाता येणार नव्हते. असं काय घडलंत्या संध्याकाळी? डिनरनंतर dessert खात असतेवेळी, त्याने कधी तिचा हात हातात धरला, ती त्याच्या मीठीत कधी बद्ध झाली हे तिला कळलेसुद्धा नाही. दोघांना फार प्रयत्न करावा लागला नाही, इतक्या दिवसांच्या anticipation नंतर दोघांच्यातील आकर्षण तीव्र बनले होते. त्याच्या मिठीत , त्याच्या बाहूपाशात बध्द होता होता तिला एकच कळत होते की तो अतिशय धसमुसळा, सुखावणारा असा कोणीतरी वेगळाच व्यक्ती आहे. पबमध्ये तिला भेटणारा तो, हा तो नाही, त्रिवार नाही. हा तर त्याच्या आवडत्या स्त्रीला लगाम घालणारा, काबूत आणणारा, तिच्यावर स्पर्शसुखाचा वर्षाव करत , तिला भिजवुन टाकणारा कोणी परकाया प्रवेश केलेला Larger than life, धुंदावुन टाकणारा तिचा प्रियकरआहे. हे सर्वच भोवळ आणणारे होते. त्याचे हे transformation कसे कधी झाले . आणि हे आधी कधीच का झाले नाही? हाच का तो फ्रॅन्क सिनात्राची गाणी ऐकून त्यावर मार्मिक टिप्पणी देणारा, हळूवार प्रेमगाण्यांवरती बोलणारा, तिचा प्रत्येक शब्द झेलणारा, ऐकणारा, तिच्यावर अवधानाची वर्षा करणारा. मग हा असा का वागतोय? अचानक हा असा irrationally violently desirable का वाटतोय? He is a beast, he is so clearly an animal हा मला खाऊन टाकेल. मी वेळीच याला slay केले नाही तर हा मला consume करेल. कोणीतरी एक वाचणार यातून. तो किंवा मी. तो ...... की ...... मी? मला हे आवडतय, मला हा कल्लोळ अनावर होतो आहे. सुखाच्या लाटांवर उत्कट लाटा तो हे जे करतो आहे ,हे अतिशय धुंदावणारं आहे, माझ्या राजा नको थांबुस. मला फार फार हवं आहे. मी नाही वाचणार....मला वाचायचही नाही. कोलाहल, शरीरातील कणाकणाने बंड पुकारलेले तिला कळत होते. अमृतकल्लोळ आणि असीम आनंद ......जे काही होता होतं ते heady आणि intoxicating होतं,

You kissed my body to a cloud-
Stratus, cirrus, nimbus,
Gasses swirling,
Furniture for angels,
Punctuation in the changing
Sentence of the sky.
Blown and altered
By the winds of breath,
I float above the landscape
Of our bed.
First cumulo-nimbus,
Then a castle of cumulo-pileus.
I expand, surround you,
Filled with dust and seas,
A plane, a bird,
Turbulence and hail.
I fill with dew.
Light shines through me,
And the earth brightens.
- Alison Stone

मी नाही खाऊन टाकू शकत त्याला मी नाही consume करु शकत he is far too big to be consumed. तो अजस्त्र आहे, आक्रमक आहे तो मृगया करतो आहे, आणि तो आणि त्याचे हे दुखावणं मला हवय. किंबहुना हेच हेच मला हवय. हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक सुखाचा क्षण आहे. हा क्षण अस्साच, इतक्या प्रतीक्षे नंतर इतका तीव्र झालेला भोगण्याकरताच मी जन्म घेतला आहे.
.

her head hanging down and her
tongue long and dark as an anteater’s
going toward his body, she was so clearly an
animal, she was an Indian creeping
naked and noiseless, and when I looked at her
she looked at me so directly, her eyes so
dark, her stare said to me I
belong here, this is mine, I am living out my
true life on this earth.
-Sharon Olds

.
अनेक कविता कोळून प्यालेली ती त्या रात्री पहिल्यांदा कविता जगली, Sharon Olds यांची कविता ती जगली. फुलांच्या गुच्छातील baby breath चे तुरे त्याने अलगद वेगळे केले होते आणि त्यांची जागा धुंद धुमारे फुटलेल्या, मारव्याने, केवड्याने, मोगर्याने घेतली होती.
.
नंतर अनेक शुक्रवार आले, गेले, परत दोघे तासंनतास गप्पा मारु लागले , लोकंही येत जात राहीली. कदाचित लोकांना वाटले किती मैत्री आहे दोघांत, किंवा नसेलही वाटले. वाटले असले तरी काय चूक होते? खरच सुंदर मैत्रीच होती. पण मर्मबंधातील कुपीतील अत्तराचे जे काय दोन चार थेंब होते, फक्त दोघांचे होते. ना त्याचा सुगंध कोणाला अनुभवता येणार होता ना कोणी त्याची कल्पना करु शकणार होतं. हा सुगंध केव्हा लुटायचा, केव्हा त्या सुगंधांत वाहून जायचे ते दोघे ठरविणार होते. तसं पहाता परत वाहून जायचेच असेही बंधन नव्हती, होती ती फक्त एकमेकांकरता आणी निसर्गाकरता, कृतज्ञता. त्यांचं निशब्द, न सांगता एकमेकांना कळणारं deep understanding व प्रेम होते-आहे-राहील.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मला वाटतं स्वप्नाळू मन हेच असं रिअ‍ॅलिटी चे फॅन्टसीला मॅपिंग करणारे निसर्गदत्त अ‍ॅप असते. आणि तसे असल्याने या कथेची नायिका रुपाने, कितीका सर्वसामान्य असेना, तसेच नायकही अगदी ऑफिसात कॉम्प्युटराइज्ड खर्डेघाशी करणारा का असेना. पण दोघेही एकमेकांना खालील पोस्टरप्रमाणे भासतील Wink
.

https://s-media-cache-ak0.pinimg.com/236x/3e/af/32/3eaf32537893f6551973a5f2a872ea58.jpg

.
आय विश आय कुड सेल ड्रीम्स. एक निष्णात रोमँटिक लेखिका व्हायला मला सर्वात जास्त आवडले असते. आता अशी तुटकीफुटकी कथाच वाचकांनी चालवुन घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडलं...

आय विश आय कुड सेल ड्रीम्स. एक निष्णात रोमँटिक लेखिका व्हायला मला सर्वात जास्त आवडले असते.

मग प्रयत्न कर..
'प्रयत्ने प्रणयाचे कोंब रगडीता,
क्षक्षक्ष क्षक्ष'
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा फूलही उगवे Smile
हे फूल मराठी की इंग्रजी ते दुय्यम हाय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फूलही उगवे

लघुगुरू जुळत नाहीत, पुन्हा प्रयत्न कर!!
आणि तुला किंचित अश्लीलतेकडे झुकणार्‍या रोमॅन्टिक कादंबर्‍या लिहिणारी लेखिका व्हायचंय, प्रवीण दवणे नव्हे हे ध्यानात घेऊन प्रयत्न कर!!
Smile
मी आता मिटींगला जातोय, परत येईपर्यंत असाईन्मेंट तयार पाहिजे!
कडक पिडांमास्तर,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्लीलतेकडे झुकणार्‍या रोमॅन्टिक कादंबर्‍या लिहिणारी लेखिका व्हायचंय,

शी! अज्जिबात नाही. काय हे पिडां शोभतं का तुम्हाला असं विचारणं?
मला फक्त झुकणार्‍या नव्हे तर पुरेपूर अश्लील कादंबर्‍या लिहायच्यात. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राइम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!
फॉन्टचा रंग देखील सूचक आहे!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हाईट वॉश म्हणायचय की काय तुम्हाला? - Someone who is looked at as leaving behind or neglecting their culture and assimilating to a white, western culture.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोटीशी कथा जमली आहे चांगली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. काही व्यक्तींचे अंतरंग दिलखेचक असेल कोणाचे जिप्सी सौंदर्य असेल कोणी सूर्यफुलासम टवटवीत असेल तर कोणी तळ्यावरील आल्हाददायक सूर्योदयासारखे भव्य आणि स्वर्गिय असेल. मधुरा ही मात्र व्हायोलेटच्या फुलांच्या modest, नीटस फुलगुच्छासारखी होती. काव्यमय, भावुक अंतरंग असलेली अशी व्यक्ती होती. या आकाशी-व्हायोलेट काव्यमय फुलांच्या गुच्छात बारकाईने पहाता काही अजुन तुरे आढळले असते. निस्वार्थी प्रेमाची बेबी पिंक गुलाबकळी, भक्तीचे, समर्पणाचे शुभ्र कमळ , कोमल इवले इवले बेबी ब्रेथ फुलांनचे तुरे आणि तारुण्यातील इच्छांची पोपटी कातरलेली पाने."

हे आवडलं . मस्त लिहिलंय शुचि .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचरट आणि सखी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सुंदर लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद पटाईतजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर सुरुवातीला अनुवाद वाटला होता ओर्जनल आहे बघून सुखांत झाला म्हणेन.

विशेषत: स्त्रीपुरुष नात्यांच्याबाबत तो तिच्या सारखा नसल्याने त्याच्या प्राणयाबद्दलचे बारकावे व त्यातून तिला त्याच्यामधेच जाणवलेला फरक व त्यावर तिची मानसिकता जबरा टिपली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

धन्यवाद तपकिरी बैल जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलंय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सुंदर लिहिले आहे. Very different...Keep writing Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ppkya, अनुपजी थँक्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0