....विश्वाची उलगड होते.....

....विश्वाची उलगड होते.....

केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते..
केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते..

पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते.
मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते.

तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते!
मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते.

मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही
तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.**

असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते...
नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते

धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी.
निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते...

सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते
मी तुझा पुजारी बनतो...पूजाही काकड होते

- कानडाऊ योगेशु

** : प.पू. घासुगुर्जींना समर्पित. Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.:
क्या बात है! मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

धन्यवाद मिलिन्दभाऊ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवघ्या,विश्वाची उलगड होते.

सत्य! कारण कविकरता, अवघे विश्वच ती असते मग तिच्या मीठीत का नाही विश्वाची उलगड होणार Wink
___

धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी.
निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते...

यातील होळीचा उल्लेख आवडला नाही. होळी मला वाटतं वाईटाची करतात. मी असे लिहीले असते-

धग ती नव्हतीच वणव्याची,श्वासाची ऊब असावी.
निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नही चाफ्याचे पडते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचितै,

यातील होळीचा उल्लेख आवडला नाही. होळी मला वाटतं वाईटाची करतात. मी असे लिहीले असते-

तुम्ही चाफ्याचा केलेला उल्लेख अप्रतिमच. आवडला.
मी ही इथे कुठला शब्द नक्की योजावा ह्यावर बराच अडलो होतो.खालच्या ओळीत धुळवड शब्द असल्याने होळीचा रेफरन्स असणे मस्टच होते. मग होळी कशाची? वासनेची? मोहाची? इ.इ. पण असे काही लिहिले असते तर एक्तर ते जास्तच बाळबोध वाटले असते व वृत्तात ही बसत नव्हते.
उदा.

मोहाचा वणवा नव्हता, मोहाची होळी होती

असे काहीसे.
पण खरेतर मोहाची होळी करणे मलाही विचित्र वाटले. हवाहवासा मोह आहे हा कशाला होळी करा. म्ह्णुन ही वाक्यरचनाही टाळली.
वणवा सगळेच भस्मसात करतो पण होळी हा मात्र तसा प्रकार नाही. किती भडकु द्यायची हे इथे आपल्याला कंट्रोल करता येते.

दिलखुलास प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या तरी विश्वाची उलगड होते, काही काळानंतर संसार निरर्थक आहे, याची पण उलगड होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0