"नवे, जखमी , आधुनिकोत्तर"

प्रचंड हिरव्या काचेच्या पात्याने आसपासच्या वस्तीला खापकन
मधेच तोडून आमची गुलाबी बिल्डिंग दिमाखात तळपत असते: अब्जाधीशांस
शोभेल अशी . गुलाबी दगडही वस्तीपासून पूर्ण वेगळाच . (मार्च महिन्यात ते
फुलं तयार असलेल्या झाडांच्या कुंड्या लावतात सर्वत्र:
थांबायला वेळ नसतो कोणाला .)

आपली नवी महागडी ब्रीफकेस पोटाशी धरून थरथरत
इंटरव्ह्यू साठी अनेक जण येतात . आमच्या रिसेप्शनिस्टला
त्यांची कणव असते . आल्या आल्या बाथरूम दाखविते त्यांना .
ते ओशाळे हसतात . प्रचंड फाशीस्ट हॉल मध्ये उंच पाठीच्या दणकट
खुर्च्या त्यांची वाट पाहत असतात .
नरबळी अनेक दिले जातात . बाहेर पडताना ते
रिसेप्शनिस्ट कडे पाहून नकारार्थी मान हलवितात, घाम पुसतात ,
पुन्हा बाथरूमला जातात . छत्री विसरतात .

चिन्यांचे मात्र वेगळेच असते . नव्यानेच अमेरिकन डिग्री
घेतलेल्या चिनी मुली उत्तम टेस्ट चे ब्लेझर घालून ,
डिझायनर चष्म्यातून फटाफट उत्तरे देतात .
परवानगीशिवाय अचानक उठून फळ्यावर
लिहितातही .

नोकऱ्या त्यांनाच जातात .

प्लास्टिकचे चे पांढरे स्वच्छ डबे घेऊन मग त्या नोकरीवर येऊ लागतात .
मायक्रोवेव्ह उघडल्यावर जम्बो प्रॉन्स चा वास सर्वत्र दरवळतो .
"घ्या च्यायला!" भारतीय नाके मुरडत म्हणतात ,
" अजून एक !"
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अस फुल्या फुल्या फुलराणी फुलबाज्या ज्या शेवटी दिल्या आहेत त्या चालत नाही बर्का आधुनिकोत्तर मध्ये
अरे मिलिन्दा आपल्या जोश्याच्या मन्याच्या कविता नाही का वाचल्यास
त्या फुल्या म्हणजे दांभिक नकली मध्यमवर्गीय बुरसटलेल्या संकुचित प्रतिगामी जुनाट पिसाट मानसिकतेच्या निदर्शक आहेत हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

We’ve all heard that a million monkeys banging on a million typewriters will eventually reproduce the entire works of Shakespeare. Now, thanks to the Internet, we know this is not true.

हाण्ण!! काय स्वाक्षरी मस्त आहे तेजायला. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काढल्या.धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आवडली .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंके बरेच धनिक असतात असे ऐकून आहे. पण स्वतःच्या अपत्यांना व्यवस्थित ड्राइव्ह ही करतात. त्यामुळे श्रीमंत + कष्टाळू असा यशाचा फॉर्म्युला असतो त्यांचेकडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0