"स्त्रीवादाची पश्चिमेतली "तिसरी लाट""

लिंगाधिष्ठीत समाजव्यवस्था , शोषण आणि अत्याचार यांच्या विरोधात उभी राहणारी चळवळ म्हणजे स्त्रीवादी चळवळ होय. याला वैचारिक अधिष्ठान पुरविणारा विचार म्हणजे स्त्रीवाद . स्त्रीवाद तीन सूत्रांवर आधारलेला आहे :
१. मानवी जगाच्या रचनेच्या प्रत्येक पैलूत स्त्रिया महत्वाचे योगदान करतात .
२. समाजाने केलेल्या पद्धतशीर वंचनेमुळे स्त्रियांना आजतागायत आपले योग्य स्थान मिळू शकलेले नाही .
३. स्त्रीवादी चळवळीने वैचारिक संशोधन जरूर करावे , परंतु त्याचा रोख समाज-परिवर्तनाकडे असला पाहिजे .
पाश्चिमात्य देश, विशेषतः अमेरिकेत स्त्रीवादाच्या तीन "लाटा " आल्याचे आढळते . त्यापैकी सध्याच्या, म्हणजे तिसरया लाटेवर या लेखात भर आहे .

१. पहिली लाट : (एकोणिसावे शतक, आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध):
घटस्फोट कायदेशीर होण्याचा आग्रह . अमेरिकन आदिवासी स्त्रियांकडून घेतलेल्या काही संकल्पना : उदा . कुटुंबाची जबाबदारी झटकून टाकणाऱ्या पुरुषावर सामाजिक बहिष्कार टाकणे . मतदानाच्या अधिकाराची मागणी .
२. दुसरी लाट : (१९६० ते १९९०):
या काळात अमेरिकेत विएतनाम युद्ध विरोधी, उपेक्षितांच्या बाजूने, कृष्णवर्णीयांना नागरी हक्क आणि मतदानाचा अधिकार मिळवून देण्याची चळवळ, या जातीचे वातावरण होते . या पार्श्वभूमीवर स्त्रीवादी लढाही फोफावला, अधिक तीव्र झाला . कृष्णवर्णी स्त्रिया, तिसऱ्या जगातील स्त्रिया , इतर अश्वेत स्त्रिया यांना सामावून घेतले गेले . स्त्रीवादी संघर्षाला मार्क्सप्रणीत वर्ग संघर्षाचे परिमाण दिले गेले.
काही महत्वाच्या घटना :
अ. अमेरिकेत नागरी हक्क कायदा-१९६४ पास होणे .
ब. अमेरिकेत "राष्टीय महिला संघटना" स्थापन होणे .
क. महिलांना कायदेशीर गर्भपाताचा हक्क देणारा "रो विरुद्ध वेड " हा कायदा.
ड . बेटी फ्रीडन यांच्या "फ़ेमिनाइन मिस्टिक " या पुस्तकाचे प्रकाशन .

३. तिसरी लाट : १९९० पासून आजपर्यंत :
मुख्य प्रवाहातील पुरुष-सत्ताक माध्यमांनी स्त्रीवाद्यांचे "कर्कश, पुरुष-विरोधी , ब्रा जाळणाऱ्या , लेस्बियन बायका " असे चित्रीकरण समाजमनात ठसविण्यात इतके यश मिळविले की अनेक हुशार मुलीही स्वतःला उघडपणे "स्त्रीवादी " म्हणवून घेणे नाकारू लागल्या . मात्र स्त्रीवादी लढा त्यातील अनेकींना पूर्ण मान्य होता/आहे . काहींना मात्र आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, आता असल्या लढ्याची गरजच काय असेही वाटते आहे .

तिसर्या लाटेतल्या मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात, नैसर्गिकपणे, चारचौघींसारखे जगायचे आहे . लिपस्टिक , सेक्सी ड्रेस, उंच टाचांचे बूट यांना त्यांचा विरोध नाही . हे पाहून दुसऱ्या लाटेतल्या स्त्रिया जरा बुचकळ्यात पडल्या आहेत . त्यांच्या दृष्टीने हे सर्व करणे म्हणजे पुरुषी नजरेला अवास्तव महत्व देणे आहे .

पण यात महत्वाची मेख अशी की स्त्री जीवनाचे कोणते स्वरूप, कोणते पर्याय, एखाद्या स्त्रीने स्वीकारावे हे तिसऱ्या लाटेचा स्त्रीवाद सांगू इच्छित नाही, तर कोणतेही स्वरूप, कोणताही पर्याय स्वीकारण्याचे स्त्रीला स्वातंत्र्य असावे यासाठी तो लढतो .

नैसर्गिक रित्या तरुण स्त्रीला कामसबंध हवेसे वाटणारच- लग्नांतर्गत किंवा लग्नाबाहेरचेही. हे संबंध जीवनाला पोषक , आनंददायी आणि सुरक्षित होण्यासाठी मुलींनी आणि समाजाने काय करावे हा या स्त्रीवादासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे .

कृष्णवर्णी , अश्वेत , तिसऱ्या जगातून आलेल्या स्त्रियांना आपण खरेच सामावून घेत आहोत का असा प्रश्न या वर्तुळांमध्ये नेहमीच विचारला जातो . विद्यापीठीय स्त्रीवादाने सर्वसामान्य स्त्रीच्या गरजा पूर्ण होत नाहीत, त्यासाठी समाजात कार्यकर्त्यांवर आधारित चळवळच उभारावी लागते असे हा स्त्रीवाद मानतो . मात्र वैचारिक संशोधन पुढे चालू ठेवायला त्यांची ना नसते .

आंतरजालीय क्रांतीनंतर कोणतीही मुलगी, गट किंवा संघटना स्वतःची वेब साईट सहजपणे प्रस्थापित करून आपला विचार समाजात मांडू शकतात . पाश्चिमात्य मुलींनी याचा मोठ्या प्रमाणात फायदा उठविला . या वेब साईट्स केवळ वैचारिक न राहता "धमाल' करणाऱ्याही होत्या .

दुसर्या लाटेतल्या अनेक विचारवंत लेखिका अजूनही कार्यरत आहेत . त्यामुळे दुसर्या आणि तिसर्या लाटे मधली सीमारेषा तशी अस्पष्टच आहे . ल्यूस इरीगाराय या लेखिकेने (जन्म १९३०) अत्यंत महत्वाचे विचार मांडले आहेत, त्याचं संक्षिप्त गोषवारा असा की परंपरागत भाषा हे माध्यमच पुरुष-मानसिकता-केंद्रित आहे आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाचे ते महत्वाचे कारण आहे . स्त्रियांनी स्वतःची (मानसिकता मांडू शकणारी ) भाषा पूर्णपणे नव्याने निर्माण करायला पाहिजे , तसेच तिच्यातून स्वतःला देव स्वरुपात परत पहायला शिकले पाहिजे . देव-धर्म हेही पुरुषांच्या ताब्यात असल्यामुळे हे होत नाही आहे .
हे झाल्यावरच स्त्रिया पूर्ण मुक्तपणे, स्वतंत्रपणे, पुरुषांबरोबर एक बरोबरीची सहचरी म्हणून संबंध ठेवण्यास मोकळ्या होतील .
xxx

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

स्त्रियांनी स्वतःची (मानसिकता मांडू शकणारी ) भाषा पूर्णपणे नव्याने निर्माण करायला पाहिजे ,

आणि पूर्णपणे नवीन लिपी देखील!
जोवर पुरुषांना ती भाषा शिकायची सक्ती नसेल तोवर आमचा पूर्ण पाठिंबा!! घाला काय मंगळागौर घालायची ते!!
Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरेतर वेगळा ग्रहच निर्माण करायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरेतर वेगळा ग्रहच निर्माण करायला पाहिजे.

ते सुद्धा एका पुरुषाचे अनुकरण झाले असते. प्रतिसृष्टी....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकांनी अभ्यास न करता एवढे ग्रह निर्माण केले आहेत की आहेत ते ग्रह नष्ट करण्याचं सकारात्मक काम स्त्रीवाद्यांना करावं लागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण पुरुषांचे स्त्रियांविरुद्ध अनेक (पूर्व)ग्रह आहेतच की .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पुरुषांचे स्त्रियांविरोधात ग्रह म्हणण्यापेक्षा अडाण्यांचे स्त्रीवाद/स्त्रीवाद्यांविरोधात ग्रह असं म्हणणं मला अधिक आवडतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ग्रह असणे हे इष्टच असते. पूर्वग्रह असणे हे सुद्धा इष्टच आहे. व्यक्तीला कोणताही पूर्वग्रह नसायला हवा हे (स्त्रीपुरुष)समानतावाद्यांनी सुरु केलेले खूळ आहे. चांगली गोष्ट ही आहे की हे खूळ काही केल्या प्रचलित होत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या संकेतस्थळावर ट, ष , तसेच अक्षरावरचा अर्धचंद्र कसा लिहायचा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

उजव्या बाजूला टंकनसहाय्य असा दुवा आहे, तो उघडून पहा. बाकी तपशील नंतर संगणकावरून टंकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख अर्धवट प्रकाशित झालाय काय? समथिंग मिसिंग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मान्य. लिहितानाच लेख जरा अपुरा झाला आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पुढचे भाग लिहा. तंत्रज्ञानाचा फायदा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या ल्यूस इरीगाराय या फ्रेंच -बेल्जिअन स्त्रीवादी लेखिकेचे लेखन वाचत आहे : ती सध्या अत्यंत महत्वाची मानली जाते . माझ्या लक्षात आले की लेखाचा यापुढचा भाग हा जवळजवळ पूर्णपणे तिला वाहिलेला होईल . त्यापेक्षा मग तिचे विचार मांडणारा वेगळाच लेख लिहावा असा मानस आहे . ("माहेर" च्या मे अंकात तिच्या एका जबरदस्त लेखाचा मराठी अनुवाद आला आहे (मी केलेला नव्हे!).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

इरीगाराय च्या म्हणण्याप्रमाणे इंग्रजी सारखीच मराठी भाषाही पुरुषकेन्द्री (phallocentric) वाटते का असा प्रश्न चार विद्वान बायकांना मी परवाच विचारला होता . त्यात फक्त एका कडव्या स्त्रीवादी बाईचे उत्तर "हो" असे आले. बाकीच्यांची उत्तरे इतकी ठाशीव नव्हती . तुमचे उत्तर ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पूर्वी डॉ. नंदिनी दिवाण यांचे मटात लेख येत. त्यात त्यांनी मराठीतील पुरूषकेंद्री उदा. चे विश्लेषण केले होते. तुम्हाला रस असल्यास शोधा/मी त्यांच्याशी कनेक्ट करून द्यायचा प्रयत्न करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ल्यूस इरिगाराय हिचे फिजिक्सबद्दलचे विचार पहा. डोक्यावर नक्की किती अँगलने पडल्यावर अशी मौक्तिके सुचतात ते एक सिमॉन बोव्हारीणबाईच जाणोत. तुफ्फ्फान हहहहहपुवा.

https://www.youtube.com/watch?v=JNzLeZEZ9fU

आणि तरी तिची तळी उचलणारे लोक आहेत या जगात. मज्जाच आहे. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>एक सिमॉन बोव्हारीणबाईच

चुकून बोहारीण वाचलं (जातीवाचक वगैरे असलं तरी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते सगळं पुरेसं रोचक आणि उद्बोधक आहे. पण एकदा व्हिडिओ पहा अशी विनंती. रिचर्ड डॉकिन्स बोलतोय, कुणी सॅफ्रनक्लॅड संघी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिसर्या लाटेतल्या मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात, नैसर्गिकपणे, चारचौघींसारखे जगायचे आहे . लिपस्टिक , सेक्सी ड्रेस, उंच टाचांचे बूट यांना त्यांचा विरोध नाही . हे पाहून दुसऱ्या लाटेतल्या स्त्रिया जरा बुचकळ्यात पडल्या आहेत . त्यांच्या दृष्टीने हे सर्व करणे म्हणजे पुरुषी नजरेला अवास्तव महत्व देणे आहे .
पण यात महत्वाची मेख अशी की स्त्री जीवनाचे कोणते स्वरूप, कोणते पर्याय, एखाद्या स्त्रीने स्वीकारावे हे तिसऱ्या लाटेचा स्त्रीवाद सांगू इच्छित नाही, तर कोणतेही स्वरूप, कोणताही पर्याय स्वीकारण्याचे स्त्रीला स्वातंत्र्य असावे यासाठी तो लढतो .

वा! सुंदर समर्पक उत्तर. माझी फार पूर्वीपासून शंका होती ती ही की एवढं मुक्त व्हायचय ना, मग रुपाकडे लक्ष नका ना देऊ. येऊ द्या ना ओठांवर लव. नका ना भुवया कोरु.
आता कळलं मी गेल्या पीढीतली आहे हे Wink
.
थोडक्यात हे उत्तर आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पिढी उपलब्ध वेळानुसार बदलते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयला हां कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इरीगाराय च्या म्हणण्याप्रमाणे इंग्रजी सारखीच मराठी भाषाही पुरुष केन्द्री (phallocentric) वाटते का असा प्रश्न चार विद्वान बायकांना मी परवाच विचारला होता . त्यात फक्त एका कडव्या स्त्रीवादी बाईचे उत्तर "हो" असे आले. बाकीच्यांची उत्तरे इतकी ठाशीव नव्हती . तुमचे उत्तर ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हे झाल्यावरच स्त्रिया पूर्ण मुक्तपणे, स्वतंत्रपणे, पुरुषांबरोबर एक बरोबरीची सहचरी म्हणून संबंध ठेवण्यास मोकळ्या होतील .

रंगवलेल्या शब्दांची क्रमवारी अत्यंत आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषाच्या, क्षुल्लकशा शुक्राणु दानाच्या (५ सेकंदाच्या) कार्यानंतर स्त्रीकडेच सर्व उरका येतो. त्यामुळे कोणी का किती का ढाल मारेना, त्याचा जन्म स्त्रीपोटी झालेला असल्याने, ट्रान्झिटिव्हिटी नियमानुसार, श्रेय स्त्रीलाच जाते. मग ते प्रतिसृष्टी असो अथवा काहीही.
.
पण मग कोणीतरी म्हणेलच - म्हणजे खून, दरोडे सर्व वाईट गोष्टींचे अपयशही स्त्रीकडेच जाते का?
तर हो. जो काही करु इच्छितो तो चूकाही करतोच.
.
माया आणि पुरुष मध्येही पुरुष हा अचल, निष्क्रियच असतो. मायेच्या तालावरती जग नाचते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे झाल्यावरच स्त्रिया पूर्ण मुक्तपणे, स्वतंत्रपणे, पुरुषांबरोबर
एक बरोबरीची सहचरी म्हणून संबंध ठेवण्यास मोकळ्या
होतील .

पुरुषांना हां हक्क स्त्रिया केंव्हा देणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

मी स्त्रीवाद किंवा पुरुषवाद अश्या दोन्हीचा विरोधक आहे.
काही जैविक बाबी वगळल्या तर सामाजिक व कायदेशीर निती-नियमांमध्ये लिंगनिरपेक्षतेचा समर्थक आहे.

स्त्रिया स्वतंत्र आहेतच, त्यांना ते द्यायचे म्हणजे काय? कुणी? कसे? स्वातंत्र्य हे मानण्यावर असते ते कुणी दिले म्हणजे घेता येतेच असे नव्हे! त्यांच्या स्वातंत्र्या आड/विरोधी जर काही कायदे असतील तर ते बदलण्यासाअठी आंदोलने वगैरे करणे योग्य. कायदेबाह्य नसलेले सामाजिक नियम तोडायला परवानगी कशाला हवी? हिंमत दाखवा नि तोडा! स्वतंत्र आहातच! समाजाचा नियम बदला नियम बदला असा ओरडा करून नियम बदलत नाहीत. कारम तुम्ही आम्हीच समाज आहोत. तुम्ही बदला नियम काळाच्या ओघात आपोआप बदलेल

आणि स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते. जी या कर्कश स्त्रीवादी स्त्रिया अनेकदा नाकारताना किंवा सोयीस्कररित्या पुरुषांना शरण जाताना दिसतात. त्यामुळे त्यांचा स्त्रीवाद कचकड्याचा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पूर्णपणे सहमत आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> स्त्रिया स्वतंत्र आहेतच, त्यांना ते द्यायचे म्हणजे काय? कुणी? कसे? स्वातंत्र्य हे मानण्यावर असते ते कुणी दिले म्हणजे घेता येतेच असे नव्हे! त्यांच्या स्वातंत्र्या आड/विरोधी जर काही कायदे असतील तर ते बदलण्यासाअठी आंदोलने वगैरे करणे योग्य. कायदेबाह्य नसलेले सामाजिक नियम तोडायला परवानगी कशाला हवी? हिंमत दाखवा नि तोडा! स्वतंत्र आहातच!

हे काही झेपलं नाही. तुम्हाला 'सैराट' आवडला ना? त्यातली आर्ची असं (म्हणजे कायदेबाह्य नसलेले नियम तोडण्याचं) स्वातंत्र्य घेते. पण तिची अखेर काय होते? ती तशी होऊ नये म्हणून तिनं प्रयत्न करायचे की इतरांनी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यात आर्चीच अनही पर्श्याही तसे स्वातंत्र्य घेतो. हा फक्त स्त्रीचा प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. यात स्त्रीचं स्वातंत्र्य कुठे आलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> त्यात आर्चीच अनही पर्श्याही तसे स्वातंत्र्य घेतो. हा फक्त स्त्रीचा प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. यात स्त्रीचं स्वातंत्र्य कुठे आलं?

त्यांच्या लग्नाला विरोध पर्श्याच्या घरून असतो की आर्चीच्या? आणि तो का असतो? मराठ्याच्या घरी जर स्त्री खरी स्वतंत्र असती, तर आर्चीच्या घरचे तिच्यावर इतक्या टोकाच्या पातळीवर उखडले असते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आर्ची स्त्री आहे म्हणून विरोध असतो का तिच्या जातीमुळे/वर्गामुळे?
उदाहरण द्यायला इतकं बेसिकमध्येच फॉल्ट असलेलं देऊ नका राव... दुसरं उदा द्यायची मुभा देतो, घ्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> आर्ची स्त्री आहे म्हणून विरोध असतो का तिच्या जातीमुळे/वर्गामुळे?

मराठा जातीच्या पुरुषाला त्याचे कुटुंबीय असं वागवत असतील का? त्याला आर्चीपेक्षा अधिक स्वातंत्र्य असतं की नसतं?
किंवा वेगळ्या शब्दांत, बुलेट आर्चीच्या मर्जीनुसार वापरण्यासाठी बापानं घेऊन दिलेली असते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्यामते स्वातंत्र्य दोघांनाही सारखंच असतं. मोठ्या संख्येने स्त्रिया त्या घेत नाहीत.
जर प्रत्येक स्त्रीने ते घेतलं तर किती स्त्रियांना मारले जाईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> माझ्यामते स्वातंत्र्य दोघांनाही सारखंच असतं. मोठ्या संख्येने स्त्रिया त्या घेत नाहीत.

म्हणजे सगळा दोष पुन्हा स्त्रियांचाच. आणि तरीही स्त्री-पुरुष सारखेच. बरं. तुमचं म्हणणं कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दोष नव्हे कमतरता!
ती कमतरता झुगारतील तेव्हा त्यांन कळेल की त्या स्वतंत्रच आहेत!

स्वातंत्र्य देणारा पुरुष कोण लागून गेलाय? जे आहेच ते द्यायचं कोणी? ज्या अर्थी त्यांना कुणीतरी स्वातंत्र्य द्यायचं म्हणता तेव्हा तुम्ही ते देण्याचा अधिकार कोणाकडे आहे हे मान्य करता! अतिशय दांभिक मनोवृत्ती आहे ही. अर्थात स्त्रीवादी कंडिशनिंग मुळे वेळ लागेल जायला Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> ज्या अर्थी त्यांना कुणीतरी स्वातंत्र्य द्यायचं म्हणता तेव्हा तुम्ही ते देण्याचा अधिकार कोणाकडे आहे हे मान्य करता! अतिशय दांभिक मनोवृत्ती आहे ही.

तुमच्यामाझ्यासारख्यांना काय मान्य आहे हे विचारायला येत नाहीत आर्चीचे बापभाऊ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला इतकंच म्हणायचंय स्त्री हाही सामाजिक प्रश्नाचा एक भाग आहे. तिच प्रश्न बै वेगळाय असं म्हणून उपयोग नाही. प्रश्न सामाजिक आहे. स्त्रीयांचा प्रश्न असे काही नसते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> प्रश्न सामाजिक आहे. स्त्रीयांचा प्रश्न असे काही नसते!

आर्ची मराठा स्त्री आहे म्हणून आणि परश्या दलित पुरुष आहे म्हणून 'सैराट'मध्ये काही कळीच्या गोष्टी घडतात. अगदी 'टाइमपास'मध्येसुद्धा पोली साजुक तुपातली असते म्हणून तिला लागलेल्या म्हावऱ्याच्या नादाचा सिनेमा होतो. जात, लिंग, प्रांत, धर्म वगैरे identities अस्तित्वात असतात. त्यांच्यापायी अभिमान, दुराग्रह, राजकारण आणि अनेक गोष्टी जन्म घेतात. त्या सगळ्यामुळे काही प्रश्न उभे राहतात. ते प्रश्न 'सामाजिक' असतात असं म्हणता येतं, पण म्हणून त्यांचा जन्म ज्या identitiesमुळे होतो त्यांना नाकारता येत नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कित्येक प्रश्नांचा परिणाम या ओळखीवर अवलंबून आहे असं असलं तरी त्यावर उत्तर शोधताना त्या त्या गटापुरती उत्तर शोधायला जाता येत नाही. समाज नावाची गुंतगुंत असा कोणताही गट वेगळा काढून त्याला वेगळं बघायची मोकळीक देत नाही. म्हणून तर फक्त स्त्रियांचाच/हिंदूचाच/मुसलमानांचाच/मराठ्यांचाच/समलैंगिकांचाच/तब्राह्मणांचाच असा काही प्रश्न नसतो. या जन्माधारीत आयडेन्टीटीवर आधारीत कळपात बसलं की पुर्ण चित्र दिसेनासं होत. स्रीवाद हा सुद्धा जात/धर्म/प्रांत/भाषा वगैरे जन्माधारीत ओळखीवर तयार झालेला कळप आहे. (त्याअर्थाने स्त्रीवादी मानसिकताही उजवीच!) त्याचीही अस्मिता तितकीच घातक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समाज नावाची गुंतगुंत असा कोणताही गट वेगळा काढून त्याला वेगळं बघायची मोकळीक देत नाही

याच्याशी सहमत.
पण:

स्रीवाद हा सुद्धा जात/धर्म/प्रांत/भाषा वगैरे जन्माधारीत ओळखीवर तयार झालेला कळप आहे. (त्याअर्थाने स्त्रीवादी मानसिकताही उजवीच!)

उद्या तुम्ही आंबेडकरांना जातीयवादी म्हणाल. स्त्रीवाद जन्माधारित स्त्रीत्व कुरवाळत नाही, उलट त्याचा विरोध करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी स्त्रीवाद किंवा पुरुषवाद अश्या दोन्हीचा विरोधक आहे.
काही जैविक बाबी वगळल्या तर सामाजिक व कायदेशीर निती-नियमांमध्ये लिंगनिरपेक्षतेचा समर्थक आहे.

स्त्रीवाद काही स्त्रीप्रधानतेचं समर्थन करत नाही. माझ्या समजुतीनुसार तरी, तुम्ही म्हणताय तसा लिंगनिरपेक्ष समाज निर्माण होणं, किंवा लिंगनिरपेक्ष वागता येईल अशी परिस्थिती निर्माण होणं हे स्त्रीवादाचं ध्येय असावं.

कायदेबाह्य नसलेले सामाजिक नियम तोडायला परवानगी कशाला हवी? हिंमत दाखवा नि तोडा! स्वतंत्र आहातच! समाजाचा नियम बदला नियम बदला असा ओरडा करून नियम बदलत नाहीत. कारम तुम्ही आम्हीच समाज आहोत. तुम्ही बदला नियम काळाच्या ओघात आपोआप बदलेल

असं म्हणण्यामागे एक गृहीतक दिसतं की स्त्रियांवर असलेली सामाजिक बंधनं जाचक आहेत, किंवा त्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत, याची जाणीव सर्व स्त्रियांना असते. पण वस्तुतः तसं नसतं. स्वतंत्र आहातच म्हणजे काय? केवळ स्त्रियाच नाही, तर पुरुषही या सामाजिक नियमांच्या बंधनात असू शकतात.
दुसरी गोष्ट, ओरडा करून नियम बदलत नाही, हे कसं? मी एकटीनं सामाजिक बंधनं तोडली, तर मी स्वतंत्र होईनही. पण त्याबरोबर समाज बदलण्यासाठी मी आरडाओरडा करणं गरजेचं नाही का? नियम आपोआप कसा बदलेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं म्हणण्यामागे एक गृहीतक दिसतं की स्त्रियांवर असलेली सामाजिक बंधनं जाचक आहेत, किंवा त्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत, याची जाणीव सर्व स्त्रियांना असते. पण वस्तुतः तसं नसतं. स्वतंत्र आहातच म्हणजे काय? केवळ स्त्रियाच नाही, तर पुरुषही या सामाजिक नियमांच्या बंधनात असू शकतात.

एक्झॅक्टली! स्त्रियांना मुळातच स्वतंत्र असण्याची जाणीव करून देणं वेगळं आणि तुम्ही पारतंत्र्यात आहेत, कोणाकडून तरी स्वतंत्र व्हा - स्वातंत्र्य मिळवा - आम्हाला कोणाकडून तरी स्वातंत्र्य हवं हे सांगणं वेगळं!

दुसरी गोष्ट, ओरडा करून नियम बदलत नाही, हे कसं? मी एकटीनं सामाजिक बंधनं तोडली, तर मी स्वतंत्र होईनही. पण त्याबरोबर समाज बदलण्यासाठी मी आरडाओरडा करणं गरजेचं नाही का? नियम आपोआप कसा बदलेल?

पुन्हा एकदा मी काय केलं / 'आपण' काय करायला हवं हे सांगणं वेगळं आणि तुम्ही (तेच ते वैट्ट वैट्ट दुष्ट ज्यांच्यातून स्त्रियांना सोडवायचंय) त्यांनी काय केलं पाहिजे आणि कसं स्वातंत्र्य "दिलं" पाहिजे याच्या मागण्या करणं वेगळं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्त्रिया स्वतंत्र आहेतच, त्यांना ते द्यायचे म्हणजे काय? कुणी? कसे? स्वातंत्र्य हे मानण्यावर असते ते कुणी दिले म्हणजे घेता येतेच असे नव्हे!

नक्की मुळ समस्या काय आहे हे न कळलेल्याचा रिप्रेझेंटेटीव्ह प्रतिसाद. वेळेअभावी, तुर्तास इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

कोणताही विचार 'वादा' कडे वाटचाल करू लागला की विचार संपतो आणि चौकटीची अपरिहार्यता सुरू होते. कोणत्याही विचारसरणीत टोकाला जाणारा विचार आणि तो मानणार्या व्यक्ती असतात आणि त्यांच्या असण्यामुळे दुसर्^या टोकाला असलेल्यांना फरक ओलांडता नाही आला तरी विरोध करण्याचे, मध्यापर्यंत येण्याचे तरी बळ येते.

अवांतर (खुसपट):

हुशार मुलीही स्वतःला उघडपणे "स्त्रीवादी " म्हणवून घेणे नाकारू लागल्या

म्हंजे काय ब्वा, 'ढ" मुलींनी स्त्रीवादी म्हणवून घेऊ नये का? इथे 'विचारी' हा शब्द चांगला वाटला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोद म्हणून वाचला तर Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

समाजाने केलेल्या पद्धतशीर वंचनेमुळे स्त्रियांना आजतागायत आपले योग्य स्थान मिळू शकलेले नाही .

स्त्रीया समाजाचा भाग नसतात काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

समाजाचा भाग असणे ही मांडणी जेव्हा फायदेशीर असते तेव्हा असतात नैतर नसतात. सोयीस्करपणे पक्ष बदलणे हे उत्क्रांतीतूनच आलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक-दोन गमतीशीर वाक्य दिसली, अर्थ काही लागला नाही.

समाजाने केलेल्या पद्धतशीर वंचनेमुळे स्त्रियांना आजतागायत आपले योग्य स्थान मिळू शकलेले नाही .

१.ह्या समाजात ५०% स्त्रीयाच असणार ना? समाज म्हणजे आपण सर्व नाही का?

२.दुसरे कोणी अशी आपली कारण नसताना वंचना करु शकतो का? आपण वंचना होण्याच्याच लायकीचे असलो तर वंचनाच होणार, त्यात चुक काय?

मुख्य प्रवाहातील पुरुष-सत्ताक माध्यमांनी स्त्रीवाद्यांचे "कर्कश

हे काहीतरीच आहे. खरेतर सर्वच माध्यमांच्या मुख्य ग्राहक स्त्रीयाच जास्त असतात. त्यांचा रोष कोणीही शहाणा पुरुष संपादक ओढवुन घेणार नाही. असतील च जर स्त्रीवादी स्त्रीया कर्कश्श तर माध्यमांचा काय दोष?

लिपस्टिक , सेक्सी ड्रेस, उंच टाचांचे बूट यांना त्यांचा विरोध नाही . हे पाहून दुसऱ्या लाटेतल्या स्त्रिया जरा बुचकळ्यात पडल्या आहेत . त्यांच्या दृष्टीने हे सर्व करणे म्हणजे पुरुषी नजरेला अवास्तव महत्व देणे आहे.

आपल्याला एखादी गोष्ट शोभुन दिसत नसली तर ती कशी खालच्या पातळीवरची आहे हे दाखवुन द्यायला स्त्रीयांना फारच आवडते.

देव-धर्म हेही पुरुषांच्या ताब्यात असल्यामुळे हे होत नाही आहे .

कोणा पुरुषांनी आमचा देव-धर्म तुम्ही पाळा/माना अशी जबरदस्ती केल्याचे गेल्या काही वर्षात हाम्रीका युरोप मधे तरी बघितले नाही. इतकेच देव हवे असतील तर स्त्रीयांना स्वताचे तयार करावेत. त्या सो कॉल्ड पुरुषसत्ताक शनिच्या चौथर्‍यावर जायचा लाळघोटे पणा कशाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या समाजात ५०% स्त्रीयाच असणार ना? समाज म्हणजे आपण सर्व नाही का?

कोणा पुरुषांनी आमचा देव-धर्म तुम्ही पाळा/माना अशी जबरदस्ती केल्याचे गेल्या काही वर्षात हाम्रीका युरोप मधे तरी बघितले नाही

पुरुषच स्त्रियांची वंचना करतात असं नाही. स्त्रियाही पुरुषप्रधान व्यवस्थेच्या पाईक असू शकतात. दर वेळेस उघड जबरदस्ती असतेच असं नाही. व्यवस्था ही शोषितांच्या अंगातही मुरलेली असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यवस्था ही शोषितांच्या अंगातही मुरलेली असते

शोषित आहे की नाही कोण ठरवणार.
नैसर्गीक फरक लक्षात घेतला तर जी काही सिस्टीम ( त्यात वंचना वगैरे सर्व आलेच ) काही देशांमधे( हाम्रीका, युरोपसारख्या ) देशांमधे ३०-४० वर्षापूर्वी पर्यंत इव्हॉल्व झाली आहे ती ऑप्टीमम नसावी का?

कदाचित बरोबर मधे असणे शक्यच नसावे. हा स्वीकार करता येऊ नये का?

मतदानाचा अधिकार वगैरे खरे सांगायचे तर पुरुषांमुळेच मिळाला. कारण तो कायदा करणारे फक्त पुरुषच होते. नसता दिला मतदानाचा हक्क तर काय करणार होतो तुम्ही आम्ही चार्वी तै. कीती दिवस मोर्चे काढणार, पोलिस पण पुरुष, सैन्य पण पुरुष.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणा पुरुषांनी आमचा देव-धर्म तुम्ही पाळा/माना अशी जबरदस्ती केल्याचे गेल्या काही वर्षात हाम्रीका युरोप मधे तरी बघितले नाही.

अनुताई, तुमच्या लाडक्या ट्रंपोबांनी 'मी गर्भपात करण्याचा निर्णय त्या स्त्रीचा असेल याचं समर्थन करतो' असं मुद्दाम का बरं म्हटलं असेल? तुम्हाला बरंच काही माहिती असेल म्हणून विचारलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>लिपस्टिक , सेक्सी ड्रेस, उंच टाचांचे बूट यांना त्यांचा विरोध नाही .

पण त्या सेक्सी ड्रेसमधून दिसणार्‍या गोष्टी [उत्क्रांतीचं अपत्य असलेल्या] पुरुषांनी पहायला मात्र त्यांचा विरोध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काळजी नको. अजून चौथी लाट बाकी आहे. त्यानुसार लिपस्टिक , सेक्सी ड्रेस, उंच टाचांचे बूट हे पुरुषांनी पण वापरायला सुरुवात करावी हा स्रीवादाचा मूळ हेतू आहे. त्यानेच खरी समानता येणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि अजून एक उत्क्रांती च्या थियरीवर तुमचा विश्वास आहे तर ह्या तिसर्‍या/चौथ्या लाटेतल्या जैविक बाबतीतही डोकावू पाहणारा स्त्रीवाद करूण प्रसंगी हास्यास्पद वाटाण्यात फार काही गैर नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्त्रीवाद जैविक बाबतीतच का, फिजिक्समध्येही डोकावतो. इरिगाराय वगैरेंसारखे अडाणचोट (हे विशेषण जैविकदृष्ट्या अस्थानी आहे पण ते एक असो) स्त्रीवादी काय म्हणतात ते पाहिलं तर हसून हसून निर्वाणच प्राप्त व्हावं. e = mc^2 हे इक्वेशन म्हणे सेक्सिस्ट आहे, कारण प्रकाशाच्या वेगालाच फक्त यात स्थान दिलंय. बाकी तितक्याच महत्त्वाच्या वेगांना यातून डावललं गेलंय. झालंच तर न्यूटनचा तो प्रिन्सिपिया नामक ग्रंथ म्हणजे एक रेप मॅन्युअल आहे. एरवी रेप या शब्दाचा अस्थानी वापर केला की त्यामुळे रेपचे गांभीर्य कमी होते म्हणून बोंबलणार्‍यांची आता इथे का दातखीळ बसतेय ते यांची देवी बोव्हारीणबाईच जाणे. झालंच तर फिजिक्समध्येही फ्लुईड मेकॅनिक्स हे सॉलिड मेकॅनिक्सच्या तुलनेत इतकेसे डिव्हेलप्ड नाही कारण म्हणे बहुसंख्य पुरुषांची जननेंद्रिये 'सॉलिड' असतात, स्त्रियांसारखी 'फ्लुईड लीकिंग' नसतात वगैरे वगैरे विकृत विचार कसल्या सडक्या मेंदूतून डोकावलेत काय माहिती.

हे मी पदरचे सांगतोय असे वाटत असेल त्यांनी व्हिडिओ बघावा आणि काय ते ठरवावे. डॉकिन्स हा पुरुष असल्याने बाय डिफॉल्ट एमसीपी ठरेलच पण त्याअगोदर मुद्दे बघा काय ते.

https://www.youtube.com/watch?v=JNzLeZEZ9fU

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL व्हिड्यो हाफिसातून बघता नै येणार पण विधाने भयंकर रंजक आहे. तेवढी करमणूक केल्याबद्दल तरी स्त्रीवाद्यांचे आभार मानलेच पाहिजेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

इतकी उच्च दर्जाची करमणूक अजून कुठे बघायला मिळणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> तेवढी करमणूक केल्याबद्दल तरी स्त्रीवाद्यांचे आभार मानलेच पाहिजेत

थांबा, स्त्रीवाद्यांचे इतक्यात आभार मानू नका. त्यांपैकी काहींनी तुमच्या आभारांचं दायित्व नाकारण्याचा हरामखोरपणा केलेला आहे.

इथून साभार -

Many feminists seek to criticize the perceived essentialist positions of Luce Irigaray.

सरसकटीकरणातून बदनामी थांबवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उलट अशा गोष्टींमुळे त्यांच्याकडे अजून लोकांचे लक्ष जातेय, सबब ही सो कॉल्ड बदनामी पथ्यावरच पडत नैये का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे वाचून मला धर्मवादीच आठवले.
उदा. दाखल आरेसेस!
जरा गडबड झली की लगेच "ते (बजरंगद, विहिंप वगैरे) वायले, आम्ही वायले" म्हणायचे आणि एरवी कोणीही काही बरे केले की तो एक "परिवार" असतो! ROFL

किंवा कुठे मोठमोठे स्फोट झाले की पाकिस्तानने तालिबानी कट्टार आहेत ते वायले म्हणायचे आणि एरवी.. असो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी अगदी....इथे तालिबानची उपमा अजून लागू पडतेय, कारण तिथे जसे 'खरा धर्म' इ. ची व्याख्या सोयीस्करपणे बदलूनही तसे काहितरी अस्तित्वात असते असे सांगितले जाते तोच प्रकार इथेही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> जरा गडबड झली की लगेच "ते (बजरंगद, विहिंप वगैरे) वायले, आम्ही वायले" म्हणायचे आणि एरवी कोणीही काही बरे केले की तो एक "परिवार" असतो!

एक सोपी पाककृती :
१. समस्त मराठा स्त्रियांमध्ये आर्ची अपवाद आहे की प्रातिनिधिक ते आधी ठरवा.
२. इरिगारे अपवाद की प्रातिनिधिक ह्याचं उत्तर मग तुम्हाला कदाचित सापडून जाईल.
३. 'प्रातिनिधिक' म्हणजे समस्त का हा प्रश्न पुढच्या भागात ऐरणीवर घेतला जाईल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रभाव कुणाचा किती असावा याचा त्या त्या सरणीच्या पुरस्कर्त्यांच्या बहुसंख्य्/प्रातिनिधिक असण्यानसण्याशी काही संबंध असतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> प्रभाव कुणाचा किती असावा याचा त्या त्या सरणीच्या पुरस्कर्त्यांच्या बहुसंख्य्/प्रातिनिधिक असण्यानसण्याशी काही संबंध असतो का?

तुमच्या मते जगभरातल्या स्त्रीवाद्यांवर इरिगारेच्या E=mc2विषयक विचारांचा प्रचंड प्रभाव वगैरे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जगभरच्या स्त्रीवाद्यांपेक्षाही आमच्या प्रतिवादाचा तुमच्यावर इतका प्रभाव का आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> जगभरच्या स्त्रीवाद्यांपेक्षाही आमच्या प्रतिवादाचा तुमच्यावर इतका प्रभाव का आहे?

प्रभाव पडला तरच प्रतिसाद देण्याची पद्धत मराठी संस्थळांवर कधीपासून रुळली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रभाव झाकण्यासाठी प्रतिप्रश्नात्मक प्रतिसादाची पद्धत जेव्हा रुळली तेव्हापासूनच झाली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही म्हणताय तर असेलही. माझा काही इतिहासाचा अभ्यास नाही बुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एक सोपी पाककृती :
१. समस्त मराठा स्त्रियांमध्ये आर्ची अपवाद आहे की प्रातिनिधिक ते आधी ठरवा.
२. इरिगारे अपवाद की प्रातिनिधिक ह्याचं उत्तर मग तुम्हाला कदाचित सापडून जाईल.

अच्छा म्हणजे आर्ची जशी बदलत्या मराठा स्त्रियांची प्रतिनिधी आहे तसे इरिगारे बदलत्या स्त्रीवाद्यांची प्रतिनिधी आहे असे तुम्हाला म्हणायचंय! मग तेच ना कुठे चाललाय बघा स्त्रीवाद तुमचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अपवाद म्हणजे बदल आणि बदल म्हणजे पुरोगामीपणाच असा काही ग्रह आहे का तुमचा?

इरिगारे आणि तत्सम लोकांना प्रातिनिधीक समजून एका विचारसरणीला झोडपणाऱ्या डॉकिन्सकाकांबद्दल अन्य काही लोक काय म्हणतात? द गार्डियनने साधारण दोन वर्षांपूर्वी छापलेला हा लेख - Richard Dawkins has lost it: ignorant sexism gives atheists a bad name (by) Adam Lee
(अवांतर - अॅडम हे पुरुषाचं नाव असतं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे फिंगर पॉइंटिंग्/व्हॉटबाउटरी आहे. "आमच्या माणसाला" शिव्या घालतो म्हणून त्याचे कैतरी उकरून काढले की मोठे मैदान मारल्याच्या आविर्भावात पाहून लैच करमणूक झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छे! स्त्रीवाद माझा, भौतिकशास्त्र माझं आणि नास्तिक्यही माझं. यांतल्या कशावरही डॉकिन्स, इरिगारे किंवा माझ्यासकट इतर कोणाचाही मक्ता नाही.

फालतूपणाला फालतू म्हणावं, पण एका फालतूपणाला फालतू म्हणण्यासाठी दुसऱ्या फडतुसाची साक्ष काढू नये एवढंच म्हणायचं होतं. काहीशा अफालतू शब्दांत सांगायचं तर, डॉकिन्सवर केलेले स्त्रीद्वेष्टेपणाचे आरोप डाव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या वृत्तपत्राने छापलेले आहेत. त्या विशिष्ट व्हीडीओत डॉकिन्सने स्त्रीवादाच्या नावाखाली काहीच्या काही बरळ स्त्रीवादाची प्रतिनिधी म्हणून उचललेली आहे. (शुचिही तिच्या प्रतिसादात हेच म्हणत्ये आणि चिंतातुर जंतूसुद्धा.) एखाद्या विचारसरणीला हीन ठरवायचं असेल तर त्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी सगळ्यात मूर्ख विधानं उचलायची आणि त्यावरून संपूर्ण विचारसरणीची बदनामी करायची अशी पारंपरिक पद्धत डॉकीन्सने वापरलेली आहे. स्त्रीवादाबद्दल चित्रविचित्र ग्रह करून त्यांचा प्रसार करण्याचा डॉकिन्सचा इतिहास आहे, तेव्हा स्त्रीवादासंदर्भात चर्चेत डॉकिन्सचे दाखले देऊ नयेत.

किंबहुना 'आमचा डॉकिन्स फालतू तर तुमची इरिगारे फालतू' एवढी बाळबोध चर्चा स्त्रीवाद काय, कोणत्याही संदर्भात करण्यात मला रस नाही, ह्या कारणास्तव अॅडम लीचा लेख उद्धृत केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फालतूपणाला फालतू म्हणावं, पण एका फालतूपणाला फालतू म्हणण्यासाठी दुसऱ्या फडतुसाची साक्ष काढू नये एवढंच म्हणायचं होतं.

ओहो, म्हणजे डॉकिन्सची साक्ष काढल्याने झोंबलेलं दिसतंय! मुद्दा न पाहता कोण बोलतंय इकडेच लक्ष दिलं की असंच होणार. हा रडीचा डावही अजूनच पारंपरिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रीवादी काय म्हणतात ते पाहिलं तर हसून हसून निर्वाणच प्राप्त व्हावं. e = mc^2 हे इक्वेशन म्हणे सेक्सिस्ट आहे, कारण प्रकाशाच्या वेगालाच फक्त यात स्थान दिलंय. बाकी तितक्याच महत्त्वाच्या वेगांना यातून डावललं गेलंय. झालंच तर न्यूटनचा तो प्रिन्सिपिया नामक ग्रंथ म्हणजे एक रेप मॅन्युअल आहे. एरवी रेप या शब्दाचा अस्थानी वापर केला की त्यामुळे रेपचे गांभीर्य कमी होते म्हणून बोंबलणार्‍यांची आता इथे का दातखीळ बसतेय ते यांची देवी बोव्हारीणबाईच जाणे. झालंच तर फिजिक्समध्येही फ्लुईड मेकॅनिक्स हे सॉलिड मेकॅनिक्सच्या तुलनेत इतकेसे डिव्हेलप्ड नाही कारण म्हणे बहुसंख्य पुरुषांची जननेंद्रिये 'सॉलिड' असतात, स्त्रियांसारखी 'फ्लुईड लीकिंग' नसतात वगैरे वगैरे विकृत विचार कसल्या सडक्या मेंदूतून डोकावलेत काय माहिती.

हे खतरनाक आहे.

डोक्याला मार लागुन इतका परीणाम होत असेल तर तो अँगल शोधलाच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ धागा राहिला बाजूला, चर्चा वाचून तुफान करमणुक झाली. बॅटमनचा तर अगदी विराट कोहली झालाय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

स्त्रीवादी काय म्हणतात ते पाहिलं तर हसून हसून निर्वाणच प्राप्त व्हावं. e = mc^2 हे इक्वेशन म्हणे सेक्सिस्ट आहे, कारण प्रकाशाच्या वेगालाच फक्त यात स्थान दिलंय. बाकी तितक्याच महत्त्वाच्या वेगांना यातून डावललं गेलंय. झालंच तर न्यूटनचा तो प्रिन्सिपिया नामक ग्रंथ म्हणजे एक रेप मॅन्युअल आहे. एरवी रेप या शब्दाचा अस्थानी वापर केला की त्यामुळे रेपचे गांभीर्य कमी होते म्हणून बोंबलणार्‍यांची आता इथे का दातखीळ बसतेय ते यांची देवी बोव्हारीणबाईच जाणे. झालंच तर फिजिक्समध्येही फ्लुईड मेकॅनिक्स हे सॉलिड मेकॅनिक्सच्या तुलनेत इतकेसे डिव्हेलप्ड नाही कारण म्हणे बहुसंख्य पुरुषांची जननेंद्रिये 'सॉलिड' असतात, स्त्रियांसारखी 'फ्लुईड लीकिंग' नसतात वगैरे वगैरे विकृत विचार कसल्या सडक्या मेंदूतून डोकावलेत काय माहिती.

बॅट्या हे म्हणजे उत्तमोत्तम मसिके सोडून श्रीचा दिवाळी अंक वाचून त्यावरती लेख टाकून सगळे अंक कसे रद्दड आहेत असे म्हणण्यासारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचिमामी, बाकीचे चांगले अंक आहेत त्यांना कोणी शिव्या घालतच नैये ओ. पण सडक्या मालालाही प्रतिष्ठा मिळतेय ते दाखवून देतोय फक्त. शेवटी यात ग्राहकाचाच फायदा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उलट अशा गोष्टींमुळे त्यांच्याकडे अजून लोकांचे लक्ष जातेय, सबब ही सो कॉल्ड बदनामी पथ्यावरच पडत नैये का?

सर्व दिवाळी अंकांचा खप वाढतोय असे तू म्हणतोयस. जे चूकीचे गृहीतक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबरै +१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीवाद्यांना फिजिक्स कळत नाहीत म्हणून त्यांचा स्त्रीवाद फोल हे वाचूल करमणूक झाली. (म्हणूनच आम्ही वेळात वेळ काढून हे असले धागे वाचतो.) त्यातही, इतरवेळी धार्मिक लोकांची बाजू घेऊन विज्ञानच कसा चूक हे म्हणणार्‍या लोकांनी हा स्टँड घ्यावा हे पाहून तर फुटलोच! असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

स्त्रीवाद्यांना फिजिक्स कळत नाहीत म्हणून त्यांचा स्त्रीवाद फोल हे वाचूल करमणूक झाली. (म्हणूनच आम्ही वेळात वेळ काढून हे असले धागे वाचतो.) त्यातही, इतरवेळी धार्मिक लोकांची बाजू घेऊन विज्ञानच कसा चूक हे म्हणणार्‍या लोकांनी हा स्टँड घ्यावा हे पाहून तर फुटलोच! असो.

तरीच हा प्रतिसाद आलाय. नो वंडर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किती अडाणी ग्रह स्त्रीवाद्यांना मोडून काढायचे आहेत हे हा धागा वाचून समजलं. मिलिन्द, लिहीत रहा कारण हे ग्रह मोडून काढणं हे आपल्यासारख्या स्त्रीवाद्यांचं काम आहे. त्यासाठी प्रसंगी आरडाओरडा करावा लागला तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झाल्यावरच स्त्रिया पूर्ण मुक्तपणे, स्वतंत्रपणे, पुरुषांबरोबर एक बरोबरीची सहचरी म्हणून संबंध ठेवण्यास मोकळ्या होतील .

उच्चशिक्षित व सुखवस्तु पुरुषांपैकी ज्याने स्त्रीबरोबर विवाहसदृष कोणत्याही (म्हणजे बॉयफ्रेंड, लिव्हिनसकट) नातेसंबंधाचा प्रोबेशन (पन अनइंटेन्डेड) पिरीयड पूर्ण केला आहे त्याने "बरोबरीची" हा शब्द वाचून कपाळात गोट्या फिरवून आणायला हरकत नाही.
स्त्री तुमच्याकडे प्रॉब्लेमचं भुणभुणं घेऊन आली तर बरोबरीच्या मित्राला देता तसे सल्ले द्यायचे नाहीत. ते खपवून घेतले जाणार नाहीत. फक्त ऐकून घ्यायचं आणि अधूनमधून "अच्चं जालं तल" असं म्हणायचं. तिला त्रास देणारी व्यक्ती कोणीही असली (बहुतेकदा तुमच्या नात्यातलीच असते) तरी ती कशी वाईट्ट आहे आणि तू कशी छकुली आहेस हेच सांगायचं. बरोबरीच्या माणसाला देता तसं प्रामाणिक मत द्यायचं नाही. किंवा अगदी "जाऊ दे गं. नसेल तसा उद्देश" असं सुद्धा म्हणायचं नाही. रस्त्यात गाडी पंक्चर झाली किंवा बंद पडली की आपल्याला फोन येणार आणि आपण लगेच काळजी दाखवायला हातातलं सगळं टाकून पळत जाऊ अशी अपेक्षा केली जाणार. एकांत हवा असताना बरोबरीच्या लोकांना "फूट आता" असं सांगता येतं ते सांगायची सोय नसते. ह्यांना नोकरी करायची असते पण पूर्ण जबाबदारी घ्यायची नसते. नवरा म्हणाला की मी घरी बसून घर सांभाळतो तर बहुतेकांची फाटते.
ह्यांच्याशी वागण्याचे इतके प्रोटोकॉल असतात की बरोबरी ह्या शब्दाला "जे ह्यांना बरं वाटेल ते आणि तेवढंच" असा अर्थ प्राप्त होतो.
ऑफिसमधल्यांचे तर आणखी वेगळेच प्रकार. त्यांच्यासमोर बोलताना विशिष्ट विषय टाळूनच बोलायचं. भलताच अर्थ निघाला तर गेलात बाराच्या भावात. हात बित लावणे तर फारच लांबची गोष्ट. ह्यांच्या आवडीच्या (बहुतेकदा उच्चपदस्थ व गोरा-गोमटा) माणसाशी लाडे-लाडे बोलणार पण नावडत्या माणसाने नुसतं हाय म्हटलं तरी "बघतोय बघ कसा मेला" असा लूक मैत्रिणीला देणार. थोडक्यात ह्यांना गेम्स सगळे खेळायचे असतात पण विजय ह्यांचाच झाला पाहिजे म्हणजे बरोबरी! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही ज्या अभ्यासावरून हे निष्कर्ष काढले त्या अभ्यासातल्या स्त्रियांचा (आणि पुरुषांचाही) सांपल साईझ काय होता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझे सगळे विवाहित मित्र. म्हणूनच युनिव्हर्सही उच्च्शिक्षित आणि सुखवस्तु लोकांचाच निवडलाय.
इतर बायका बरोबरीची भाषा करत नाहीत. त्यांचे प्रश्न वेगळे असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संख्या किती याचा अंदाज आला नाही. आणि यांत 'अच्च होतं' असं ठरवणारे लोक ठराविक विषयांमध्ये शिक्षण-प्रशिक्षण घेतलेले असतीलच असं नाही, हे समजलं.

किंवा साधारण बायकांची टिंगल करणारे जोक्स जसे पसरतात (उदा: देवळात आंदोलन करून शिरल्या, आता पुरुषांच्या संडासात शिरायचं असेल) तशाच प्रकारच्या ह्या तक्रारी, ह्या पलिकडे काही लक्ष देऊ का नको, असा प्रश्न होता. तो बहुदा सुटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एखादी गोष्ट अगदीच झोंबली की विदाविदारक व्हायचं हे नेहमीचंच; पण बहुतेक "सेल्फ हेल्प" पुस्तकात "असे सल्ले देऊ नका; त्यांना फक्त कोणीतरी ऐकण्याची गरज आहे" असं लिहीलेलं असतं त्या पुस्तकांत तर कधी मला डिस्ट्रिब्युशन आणि बेल कर्व्ह वगैरे काढलेला दिसला नाही.
मेन आर फ्रॉम मार्स ॲन्ड विमेन आर फ्रॉम व्हिनस वगैरे टाईपची पुस्तके वाचलीत थोडीफार आपल्या बाजूने प्रयत्न म्हणून; त्यातही स्टॅटिस्टिक्स काही दिसले नाही. "द सेकंड सेक्स" वाचणार आहे लवकरच; त्यात मात्र भरपूर सांख्यिकी असेल अशी अटकळ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सांगोवांगीच्या गोष्टी गफ्पा म्हणून छान वाटतात. शास्त्र म्हणून त्यांना काहीही महत्त्व देऊ नये, एवढं बेशिक कोणी पुरुषबी सांगेल हो तुम्हाला! विचारा आपल्या आकडेबाज धनंजय किंवा राजेश्रावांना!

'द सेकंड सेक्स' जरूर वाचा. त्यातल्या मला फार न पटलेल्या भागाबद्दल कधीतरी चर्चा करण्याची मला इच्छा आहे. मेघना आणि रुचीशी याबद्दल सांगोवांगी छाप देवाणघेवाण नकळत झालीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'द सेकंड सेक्स' जरूर वाचा.

गुरुदेवांचं "इन ट्यून विथ द ट्यून" एकदा वाचाच, त्याशिवाय प्रचिती येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उच्चशिक्षित व सुखवस्तु पुरुषांपैकी ज्याने स्त्रीबरोबर विवाहसदृष कोणत्याही (म्हणजे बॉयफ्रेंड, लिव्हिनसकट) नातेसंबंधाचा प्रोबेशन (पन अनइंटेन्डेड) पिरीयड पूर्ण केला आहे त्याने "बरोबरीची" हा शब्द वाचून कपाळात गोट्या फिरवून आणायला हरकत नाही. स्त्री तुमच्याकडे प्रॉब्लेमचं भुणभुणं घेऊन आली तर बरोबरीच्या मित्राला देता तसे सल्ले द्यायचे नाहीत. ते खपवून घेतले जाणार नाहीत. फक्त ऐकून घ्यायचं आणि अधूनमधून "अच्चं जालं तल" असं म्हणायचं. तिला त्रास देणारी व्यक्ती कोणीही असली (बहुतेकदा तुमच्या नात्यातलीच असते) तरी ती कशी वाईट्ट आहे आणि तू कशी छकुली आहेस हेच सांगायचं. बरोबरीच्या माणसाला देता तसं प्रामाणिक मत द्यायचं नाही. किंवा अगदी "जाऊ दे गं. नसेल तसा उद्देश" असं सुद्धा म्हणायचं नाही. रस्त्यात गाडी पंक्चर झाली किंवा बंद पडली की आपल्याला फोन येणार आणि आपण लगेच काळजी दाखवायला हातातलं सगळं टाकून पळत जाऊ अशी अपेक्षा केली जाणार. एकांत हवा असताना बरोबरीच्या लोकांना "फूट आता" असं सांगता येतं ते सांगायची सोय नसते. ह्यांना नोकरी करायची असते पण पूर्ण जबाबदारी घ्यायची नसते. नवरा म्हणाला की मी घरी बसून घर सांभाळतो तर बहुतेकांची फाटते.

खरंच? तुमच्या विवाहीत 'मित्रांचा' हा सँपल असेल तर (मित्र बदला असं सांगायचा मोह होतोय) अशा स्त्रिया आपल्या सहचारिणी म्हणून स्विकारणार्या पुरुषांच्यानाही त्या सोईच्या असतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजे एकीकडे आपल्या बायका कस्ल्या आठराव्या शतकातल्या आहेत असे म्हणून आपण पुढारलेले आहोत अशी बढाई मारत आपल्या आठराव्या शतकातल्या अपेक्षा त्यांच्याकडून पुरवून घेता येण्याची सोय हो! अशा स्त्रिया स्त्रीवाद सोयिस्करपणे वापरत नाहीत असे म्हणायचे नाहीय पण अशा स्त्रिया सहचारिणी म्हणून स्विकारणारे पुरुषही स्त्रीकडून पारंपारिक अपेक्षा ठेवणारेच असतात असं माझंही लिमिटेड सँपलसाईझवालं निरिक्षण आहे. आणि हो, 'सेकंड सेक्स' नक्की वाचाच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुदा नगरीनिरंजन यांचा प्रतिसादामागचा सँपल साईज किमान भारतीय समाजात अपवाद म्हणण्याइतका निश्चितच कमी नसावा. इतकंच नाही तो प्रातिनिधिक असण्याची शक्यता मोठी आहे.
कितीही कटू असलं तरी हे वास्तव आहे.

आपली गाडी बंद पडली तर स्वतः ती दुरूस्त करणारी (किंवा तिच्या परिचयातील नराला फोनही न करता स्वतःच काय ते निस्तरणारी) स्त्रिया अत्यंत कमी पाहण्यात आहेत (माझी बायको ते करू शकते म्हणून ती प्रातिधिक आहे असे मी म्हणू धजावण्यासारखी परिस्थिती मला आजुबाजूला दिसत नाही). (परदेशात एकतर दुचाक्या नाहीत आणि चारचाक्यांना बंद पडल्यास ठिक करायला काही नंबर फिरवले, भरपूर पैसे टिचवले की झाले असे असल्याने श्रीमंत स्त्रियांना आपण स्वतंत्र असल्याचे भासते. भारतात आपले स्वातंत्र्य भासवायची ती चैन नाही)

त्याचबरोबर "रात्री कुठे एकटी जाउ कुणीतरी सोडा की" किंवा "एकट्या बायांना कुठे इतक्या लांब ड्राईव्ह करत जाऊ द्यायचं आडवाटेला गाडी बंद बिंद पडली तर - नै बै एक तरी पुरुष सोबत हवाच" अशी वा तत्सम टोनची मुक्ताफळे आजवर किमान शंभरता ऐकली असतील - सर्व जाती धर्म वर्गातील बाया-बाप्यांकडून - अगदी स्वत:ला मुक्त स्वतंत्र स्वयंपूर्ण म्हणवणार्‍या स्त्रियांकडूनही! यात सुरक्षेचा प्रश्न आहे आणि बायकांसा स्वतंत्र होण्यात ही सुरक्षा मध्ये येते असे जर म्हणणे असेल तर बायकांचे सुरक्षित असणे पुरुषांच्या हातात आहे हे मान्य करून त्या कशा काय स्वतंत्र होणार? असा प्रश्न पडतो.

दुसरे अशी वक्तव्ये पुरुषाबद्दल करायला ऑलमोस्ट बंदी आहे. "तुला दुचाकी येत नाही?" याबद्दल माझ्यकडे इतक्या दयाभावाने बघितले जाते की दुचाकी येत नाही म्हणजे हा पुरूषच नाही (त्यात बायकोला येते आणि हा सतत पिलियन... अरारारारा -- हे सगळे नजरेत). वर चार्वी म्हणाल्या तसं पुरुषांनाही लिंगभेदाचा भयंकर सामना करावा लागतो - पण ते त्यातून स्वत:च मार्ग काढतात - कोणीतरी येऊन आपल्याला स्वतंत्र करेल अश्या भ्रमात ते नसतात.

तेव्हा हा स्त्रीवादाचा प्रश्न नाही. माझ्या मते तो प्रश्न लिंगनिरपेक्षतेचा आहे (नोट लिंग'समानता' म्हटलेले नाही. असे घाऊकदृष्ट्या काही समान वगैरे नसते. सर्वधर्मसमानता, लिंगसमानता वगैरे मिथके आहेत. फारतर आचरणात निरपेक्षता आणली तरी पुरे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"रात्री कुठे एकटी जाउ कुणीतरी सोडा की" किंवा "एकट्या बायांना कुठे इतक्या लांब ड्राईव्ह करत जाऊ द्यायचं आडवाटेला गाडी बंद बिंद पडली तर - नै बै एक तरी पुरुष सोबत हवाच"

अमेरिकेतल्या दुसऱ्या पिढीतल्या स्त्रीवाद्यांचं म्हणणं असं होतं की एका स्त्रीवर बलात्कार होतो तेव्हा ती एकटीच नव्हे, तर त्या घटनेमुळे कितीतरी पटीने जास्त स्त्रिया घाबरून, दबकून राहतात. बलात्कार करणारे पुरुष असतात आणि ज्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं ते ही पुरुषच असतात. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य मिळतच नाही आणि मिळालं तरी त्या ते उपभोगू शकत नाहीत. अमेरिकतेला दुसऱ्या पिढीतल्या स्त्रीवादाबद्दल वाचताना सतत सध्याच्या भारताची आठवण होत राहते.

लिंगनिरपेक्ष समाज असावा ही अपेक्षा काही गैर नाही; किंबहुना स्त्रीवादाची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. उदाहरणार्थ, सर्व सज्ञान व्यक्तींना मतदानाचा अधिकार मिळावा, स्त्री असेल तर तिचं लग्न झालेलं असलं पाहिजे किंवा तिच्या नावावर मालमत्ता असली पाहिजे असं चालणार नाही यासाठी १९ व्या शतकाच्या शेवटी, २० व्या शतकाच्या सुरुवातीला पाश्चात्य, सफ्रेजिस्ट स्त्रियांनी आंदोलनं केली होती. त्यातून समाज बदलला आणि आंदोलनांचं स्वरूप बदललं.

आपण जे लोक इथे चर्चा करतो त्यांत घरी किंवा व्यक्तिगत पातळीवर कोणी अन्याय (सहन) करत असेल असं नाही, पण आता अन्याय संस्थात्मक पातळीवर होतो.* पण आपण ज्या समाजात राहतो, नोकरी करतो, सिनेमे बघायला जातो, त्या समाजात असं चित्र आहे असं सांगोवांगीच्या गोष्टी ऐकून मला दिसत नाही. तुला लोकांच्या नजरेत 'अरारा, पिलियन रायडर!' हे दिसतं तेव्हा मला अनेकदा माझं नाव, कपडे, केसांची लांबी याबद्दल शाब्दिक स्पष्टीकरणं द्यावी लागतात. ही तुलना 'बघा स्त्रिया किती अन्यायग्रस्त' असं म्हणण्यासाठी नाही. जेंडर रोल्सच्या कल्पना खूप घट्ट असतात; १९८५ साली प्रकाशित झालेल्या मास्टर्स आणि जॉन्सनच्या पुस्तकात जे जेंडर रोल्स मिथ्या असल्याचं लिहिलेलं आहे, त्याच कल्पना बाळगणारे, त्याबद्दल विनोद करणारे, तक्रारी करणारे लोक आजूबाजूला दिसतात. हे जेंडर रोल्स मोडणं हे स्त्रीवादाचं एक लक्ष्य आहे. (म्हणूनच जेव्हा स्त्रीवादी LGBTQ चळवळीला पाठिंबा देत नाहीत तेव्हा त्यांच्यावर टीका होते.) ज्या समाजात आपण राहतो त्यातली माणसं, काहीही कारणांमुळे का होईना, मुक्त नसतील तर ती तीन पायांची शर्यत होणार. 'मी मुक्त आहे म्हणून मी अडखळणार नाही आणि जोरात पळणार' हे शक्य होत नाही. जोरात पळायचं असेल तर माणसांपासूनच लांब जावं लागतं.

*मला आलेला एक अनुभव - माझं आणि बऱ्या अर्ध्याचं एक संयुक्त खातं आयसीआयसीआय बँकेत आहे. माझं नाव पहिलं. खातं उघडलं तेव्हा माझ्या दुसऱ्या खात्यात चिकार पैसे होते म्हणून ह्या खात्यालाही त्यांनी 'गोल्ड स्टेटस' दिलं. मग कधीतरी आम्ही देशांतर केलं आणि बँकेत पत्ता बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली. आयसीआयसीआयने पत्र पाठवताना पाकिटावर फक्त बऱ्या अर्ध्याचं नाव लिहिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी जाऊ द्या! आता टंकाळा आला आहे

किंबहुना स्त्रीवादाची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे.

भारतातील स्त्रीवादाची वाटचाल लिंगनिरपेक्षतेच्या दिशेने चालली असल्याची कोणती लक्षणे समजावीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्त्रीवाद ही विचारसरणी देशानुरूप बदलते का, याचं मला समजलेलं उत्तर नाही असं आहे. पण परिस्थितीनुरूप तपशील बदलतात. एका समाजासाठी पोटगीच्या मुद्द्यावरून भांडावं लागतं, दुसऱ्या समाजात पोटगीचा प्रश्न सुटलेला असतो, तिसऱ्या समाजात पोटगी कोणी कोणाला द्यायची याचा विचार करावा लागतो. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या आणि विविधता असणाऱ्या देशाबद्दल काही एकचएक विधान करता येईल का, याबद्दल मला शंका आहे. उदाहरणार्थ, स्त्रियांचा जीडीपीमधला वाटा वाढत असेल तर त्याला लिंगनिरपेक्षतेकडे वाटचाल म्हणता येईल. हे एक उदाहरण; आणखी बरंच काही लिहिता येईल. पण 'जाऊ द्या, टंकाळा आलाय... आता तुम्ही निबंध लिहा' म्हटलं की मला फार उत्साह वाटत नाही हे खरंच.

---

अपडेट - लोकांसमोर आपली मतं मांडणाऱ्या आणि सार्वजनिक आयुष्य असणाऱ्या स्त्रियांना चारित्र्य, संभोग, कपडे, सौंदर्य या कोणत्याही विषयांवरून शिवीगाळ होण्याजागी मतं, विचार यांच्यावरून अपमान केला गेला तर ती सुद्धा लिंगनिरपेक्षतेकडे भारताची वाटचाल असं म्हणता येईल. अर्थात, हा मुद्दा फक्त भारतापुरता मर्यादित नाही; जगभरात स्त्रियांना असा अनुभव येतो.
“R**di TV ki R**d Anchor...”: Barkha Dutt, Trolls & Sexual Slurs

Only in a culture so warped by casual misogyny does a troll’s psyche become clearer. Disagree with a female activist? Threaten to rape her. Don’t like a female political candidate? Accuse her of sleeping around. Find a female journalist annoying? Organise a mass campaign to circulate her number on the internet so you can call her a whore. Now that you have dragged her sexuality out into the world and made free with it, you have destroyed her personhood, because those two are clearly one and the same thing.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जेंडर रोल्स घट्ट असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते काही पुरुषांनी ठरवून घट्ट केलेले नाहीत. ते सिव्हिलायझेशनच्या अनेक फीचर्सपैकी एक आहे आणि सिव्हिलायझेशन बरोबरच इव्हॉल्व्ह झालेले आहेत. एखाद्या माणसाला एखाद्या व्यवस्थेत दुय्यम वागणूक मिळत असेल तर ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यवस्था बदलायची म्हणजे दुय्यम वागणूक ज्यातून तयार होते ते फीचर नष्ट करणे. पण त्यात बायकांना रस असतो का? नाही.
दुय्यम वागणुकीचे मूळ आहे सत्ताकेंद्रीकरण, खाजगी मालकीहक्क आणि एककेंद्री समाजव्यवस्था. ह्यातल्या एकाही फीचरविरुद्ध एकाही बाईने कधीही आवाज उठवलेला मी तरी पाहिलेला नाही. सिव्हिलायझेशनच्या पॉवर स्ट्रगलमध्ये शारीरिक बळाच्या जोरावर पुरुषांनी आघाडी घेतली आहे. बायकांना हा पॉवर गेम आणि बाकी सगळी फीचर्स तशीच ठेवून त्या पॉवरमधला निम्मा वाटा हवाय. कशाच्या बदल्यात? घंटा.
मी बाई असतो तर पहिली गोष्ट म्हणजे सिव्हिलायझेशनच्या ह्या फीचर्सवर हल्ला चढवला असता (बाई नसलो तरी ह्या फीचर्सचा मला राग आहेच पण वैयक्तिक त्रास काही नाही उलट फायदाच आहे). पण प्रत्यक्षात काय दिसतं? फीजिकल अल्फामेल्सची जागा आता इकॉनॉमिक अल्फामेल्सनी घेतली आहे. ज्या सत्तासंपत्तीच्या अतोनात महत्त्वाचा विरोध करायचा त्याला सर्वात जास्त खतपाणी स्त्रिया घालत आहेत. चांगला पैसेवाला, स्वतःला स्थिर आयुष्य, मुलंबाळं आणि घरकाम करायला मोलकरीण देऊ शकेल असा व तोंडी लावायला म्हणून नोकरी करण्याचे स्वातंत्र्य देईल असा पुरुष मिळवणे हे बहुसंख्य स्त्रियांचे पहिले जीवनध्येय असते. जोपर्यंत हे असे आहे तोपर्यंत फेमिनिष्टांनी कितीही आदळआपट केली तरी शष्प फरक पडणार नाही. तरीही बर्‍याच बायकांनी बरीच प्रगती केली ह्यात आनंद मानला पाहिजे व पुरुषांचे आभार मानले पाहिजेत.
जाता जाता:
On balance, the study of hunting-gathering peoples in the world today suggests that there probably was no ancient matriarchy because there was no "archy" (power concentration) at all. We are not likely to find a mirror image of the modern patriarchy in the Paleolithic world because hunting-gathering society was fairly egalitarian. There was little private property, and thus no one was richer than anyone else. Food was distributed to all because everyone was related, mutual support was expected, and to refuse support was unthinkable. There was relatively little variation in wealth or power, because everyone did much the same work, hunting and gathering, and all worked together. This general level of equality carried over into the relations between men and women as well.
- West and the World: A History of Civilization from the Ancient World to 1700 (Kevin Reilly)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुय्यम वागणुकीचे मूळ आहे सत्ताकेंद्रीकरण, खाजगी मालकीहक्क आणि एककेंद्री समाजव्यवस्था.

एकेकाळी दुय्यम वागणुकीची मुळं जीवशास्त्रात होती. वीस वर्षांच्या काळात सात बाळंतपणं करायची तर स्त्रीला घरी राहून, घरकाम, बालसंगोपन वगैरे करण्याला आर्थिक पर्याय नव्हता. विशेषतः हंटर गॅदरर समाजांत. नागरीकरणानेही परिस्थिती काही बदलली नाही. कारण समीकरण तेच होतं. कित्येक सहस्र वर्षं हे समीकरण बदललं नाही. त्यात नागरीकरणातून निर्माण झाली अतिरिक्त संपत्ती, व्यापक सत्ता या पुरुषांच्या हाती गेल्या.

गेल्या शतकात हे समीकरण बदलत आहे. फर्टिलिटी रेट जवळपास सर्वच ठिकाणी ७ वरून कमी होत होत २ कडे येतो आहे. अनेक देशांत तो दोनच्याही किंचित खाली गेलेला आहे. स्त्रियांचा कार्यक्षेत्रातला वाटा वाढतो आहे, शिक्षणाची पातळी पुरुषांच्या जवळ येते आहे. या मूलभूत बदलत्या समीकरणामुळे स्त्रीला कसं वागवलं जातं हे बदलतं आहे. त्याच अनुषंगाने सत्ताकेंद्रीकरण आणि मालकीहक्क यांतही समानता वाढत आहे. थोडक्यात या बाबी कारण नसून परिणाम आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वीस वर्षात सात बाळंतपणं हे शेती करणार्‍या नागर समाजात होतं जिथे एकाच प्रकारचे पिष्टमय पदार्थ खाऊन व सिडेन्टरी लाईफस्टाईलमुळे फर्टिलिटी भरमसाठ वाढली. सध्याच्या काळात हंटर-गॅदरर असलेल्या लोकांमध्येही वीस वर्षात सात बाळंतपणं होत नाहीत. आकडेबाज अशी प्रसिद्धी असताना विनाविदा वाक्यं फेकू नका. जीवशास्त्रामुळे दुय्यम वागणुकीची सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा शेतीसाठी प्रचंड अंगमेहनतीची गरज भासू लागली आणि पुरुषांना अतोनात महत्त्व आले. हंटिंग-गॅदरिंगसाठी अंगमेहनत लागत नाही शेतीइतकी.
तसंही पुढे जे काही झालं तेही पुरुषांमुळेच झालं. आणि कार्यक्षेत्रातला वाटा वाढतोय तसा पुरुषांना वाईट वागवणार्‍या स्त्रियांचेही प्रमाण वाढतेच आहे. पॉवरबाज पुरुषाच्या आधाराने राहणार्‍या स्त्रियासुद्धा खालच्या पायरीवरच्या पुरुषांना फार चांगलं वागवत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विदा
- हंटर गॅदरर्सच्या वेगवेगळ्या गटांमध्ये दिसणारे फर्टिलिटीचे आकडे हे २.६ ते ८.० पर्यंत दिसलेले आहेत. त्यांची साधारण सरासरी ६.०

या दुव्यावर असंही म्हटलेलं आहे की कमी फर्टिलिटी रेटचं कारण हे सेक्श्युअली ट्रान्समिटेड डिसीज हे आहे.

मुद्दा असा आहे की हंटर गॅदरर्समध्येही शारीरिक श्रमांना महत्त्व होतं. त्या काळातही स्त्रिया घरात, किंवा घराच्या आसपास गॅदरिंग करणं, मुलांचं संगोपन करणं, स्वयंपाक करणं, ही कामं करत तर पुरुष बाहेर जाऊन हंटिंग करणं, थोडं गॅदरिंग करणं अशी कामं करत.

थोडक्यात, गेली काही हजार वर्षं स्त्री-पुरुष लिंगभूमिका या अर्थशास्त्रीय-जीवशास्त्रीय-समाजशास्त्रीय कारणांमुळे ठरल्या - त्यातून सामाजिक उतरंड ठरली - आणि त्यातून सत्तेचं केंद्रीकरण पुरुषांच्या हाती झालं - आणि गेल्या शतकातच ही जीवशास्त्रीय मर्यादा तंत्रज्ञानामुळे गळून पडली आहे - हा सिद्धांत शिल्लक राहातोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यू आर मिसींग द पॉईंट. सिद्धांत काहीही असला तरी हंटर-गॅदरर समाज जास्त इगॅलिटेरियन असतो ही फॅक्ट उरतेच कारण फर्टिलिटी असो वा नसो, त्या समाजात स्त्री-पुरुषांच्या संपत्तीत फारसा फरक नसतो.
मधल्या काळात सत्तासंपत्तीला अतोनात महत्त्व आले आणि ती पुरुषांच्या ताब्यात गेली. आता स्त्रिया अर्थार्जन करायला लागल्या म्हणून लगेच सत्तासंघर्ष संपुष्टात येईल असे नाही. मुळात असलेली सत्ता सोडायला काही सबळ कारण तर हवे ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं यू आर मिसिंग माय पॉइंट. जेव्हा सर्वत्र दारिद्र्य असतं तेव्हा सर्वांनीच समानतेने दरिद्री असणं यातल्या समानतेला काही फारसा अर्थ नसतो. जेव्हा समृद्धी मिळायला लागते तेव्हा तुम्ही तिचं डिस्ट्रीब्यूशन कसं करता यावरून इक्वॅलिटी ठरते. आणि ज्या शेतीप्रधान समाजव्यवस्थेत ही सुबत्ता वाढायला सुरूवात झाली तीतही स्त्रियांना घरी राहायला लागण्याची जीवशास्त्रीय बंधनं होतीच. हे हजारो वर्षं चालू राहिलं आणि गेल्या शतकातच ही बंधनं गळून पडली आहेत. तद्वतच, त्यांचे परिणाम म्हणून दिसणारं सत्ताकेंद्रीकरण, खाजगी मालमत्तेचं समानीकरण वगैरे सुधारायला सुरूवात झाली.

मी नेहेमी विचारतो तो प्रश्न पुन्हा विचारतो - मी काय विदा दिला तर माझं म्हणणं सत्य सिद्ध झालं असं मान्य होईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या शतकातच ही बंधनं गळून पडली आहेत. तद्वतच, त्यांचे परिणाम म्हणून दिसणारं सत्ताकेंद्रीकरण, खाजगी मालमत्तेचं समानीकरण वगैरे सुधारायला सुरूवात झाली.

हजारो वर्षांचे बाकीचे आर्टिफॅक्ट्सही गळून पडतीलच हळूहळू. मग प्रॉब्लेम काय आहे? संपत्ती समान होत असेल तर समानता येईल हाच मुद्दा आहे त्यात दारिद्र्य की सुबत्ता हा प्रश्न नाही.

(संपत्ती समानीकरण सुधारतंय ह्याच्या आणि दारिद्र्य-सुबत्तेच्या वादग्रस्ततेत न जाता तुमचं म्हणणं सत्यच मानलं आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हजारो वर्षांचे बाकीचे आर्टिफॅक्ट्सही गळून पडतीलच हळूहळू. मग प्रॉब्लेम काय आहे?

ते आपोआप गळून पडत नाहीत हाच तर प्रॉब्लेम आहे. सुंभ जळला तरी पीळ बराच काळ राहातो. जवळपास समान उत्पन्न असणाऱ्या आणि समान कष्ट करणाऱ्या नवराबायकोंतही नवरा घरी आल्यावर टीव्ही बघणार आणि बायको स्वयंपाकाला लागणार हे अजूनही दिसतंच. तेव्हा मूळ संपत्तीच्या मालकीत नसून इतर कारणांत आहे एवढंच सांगायचं होतं. जेव्हा पुढे ही परिस्थिती बदलेल तेव्हाही खाजगी मालकी असेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला विचारलं गेलं तसं किती घरांत हे चित्र दिसतं असं मी विचारणार नाही. पण नवरे हाणूनमारुन बायकांना स्वयंपाकाला लावतात की काय घरोघरी? नवर्‍याने निम्मा स्वयंपाक केला तर बायको स्वतंत्र झाली असे म्हणायचे का? बर्‍याच पुरुषांना नोकरी करुन स्वयंपाक करायला लावला तर कदाचित ते सरळ नकार देऊन निघून जातील. स्त्रियाही तसे करायला स्वतंत्र आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एग्झॅक्टली!
नक्की करायचंय काय? नक्की दुखणं काय आहे? बहुतांश उच्चमध्यमवर्गातील आर्थिक स्वतंत्र स्त्रिया हल्ली संध्याकाळचं जेवण वगैरे कामं आउटसोर्स करतात आणि नवराबायको दोघेही टिव्ही बघत बसतात हे पुण्यातले उच्चमध्यमवर्गाचे (आयटी वा तत्सम पातळीचा पगार मिळाणार्‍या नोकरी करणार्‍या जोडप्यांचे) सध्याचे प्रातिनिधिक चित्र आहे. पण याचा अर्थ पुण्यातले उच्चमध्यमवर्गात स्त्रीपुरुष समानता आली असे म्हणायचे का? (चला बाबा सुटले बिचारे या स्त्रीवाद्यांच्या जाळातून!)
---
की हे आउटसोर्स केलेले काम बायकांनाच का आउटसोर्स करता पुरुषांना का नाही म्हणजे समानता नाही? (आता काय तर्क काहिहि लावता येतो एकदा स्त्रीवादी झालं की Wink )
---
भारतातील मध्य्मवर्गात "लिंगसमानता" आल्याची दहा लक्षणे सांगा म्हटल्यास कोणती सांगाल? मला लिंगसमानता म्हणजे काय तेच कळत नाही हे मी कबूल करतो.
---
मुळात स्त्रीवादी असणं हे सेक्सिस्ट नाही का? मग स्त्रीवादी सेक्सीझमच्या विरोधात कसे?

(तुला फार बेसिक कळत नाअहि बेसिक कळात नाही हे अनेकांनी सांगून झालं आहे. बेसिक काय आहे ते इथे स्वच्छ मराठीत लिहा तर प्रतिवाद शक्य आहे. हे विंग्रजी पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा / ही लिंक वाचा/ती लिंक वाचा करायचा मक्ता फक्त गब्बरने घेतलाय ;). तुमचा तर्क इथे लिहा आम्ही त्यातील दोष दाखवून देऊ!

जर स्त्रीवादात खरोखर दम असेल तर हे वाचा ते वाचा करण्यापेक्षा- ऐसीवरच मुद्देसुद मराठीत स्त्रीवादावरील लेखमालाच येऊ दे! आणि त्यातील प्रत्येक लेखांकावरील आमच्या आक्षेपांची व्यवस्थित उत्तरे द्या! तर स्त्रीवाद्यांच्या बोलण्यात दम आहे असे मी समजेन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात स्त्रीवादी असणं हे सेक्सिस्ट नाही का? मग स्त्रीवादी सेक्सीझमच्या विरोधात कसे?

ROFL

बेसिक काय आहे ते इथे स्वच्छ मराठीत लिहा तर प्रतिवाद शक्य आहे.

सॉरी, पण मला तरी प्रतिवाद वगैरे नकोय.

तुमचा तर्क इथे लिहा आम्ही त्यातील दोष दाखवून देऊ!

ही ऑफर बघून दिल टोटे टोटे हो गया.

जर स्त्रीवादात खरोखर दम असेल तर हे वाचा ते वाचा करण्यापेक्षा- ऐसीवरच मुद्देसुद मराठीत स्त्रीवादावरील लेखमालाच येऊ दे!

स्त्रीवादात दम असण्यानसण्यापेक्षा ऐसीवर लिहिणाऱ्यांच्यात दम असेल तर ते लिहितील ना! ऐसीवर लिहिण्यासाठी मूळ विधानात दम असण्याची आवश्यकता नसते, हे या धाग्यावरही सिद्ध होतंय. मूलभूत आकलनाचा अभाव असताना मेगाबायटी प्रतिसाद येताहेत.

छे! माझ्या बोलण्यात काही दम नाही असं म्हटलं तरी मला काही अडचण नाही. कोणीतरी 'दाखव तुझ्यात किती दम आहे' असलं मर्दानगीपूर्ण आव्हान दिलं म्हणून मी तरी ढिम्म काही करणार नाही. बाकीचे स्त्रीवादी स्वतः स्वतःची भूमिका ठरवतीलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवराबायको दोघेही टिव्ही बघत बसतात हे पुण्यातले उच्चमध्यमवर्गाचे (आयटी वा तत्सम पातळीचा पगार मिळाणार्‍या नोकरी करणार्‍या जोडप्यांचे) सध्याचे प्रातिनिधिक चित्र आहे.

त्यांना सोयीस्करपणे उच्चमध्यमवर्गीय म्हटलेलं आहे, पण आर्थिक-शैक्षणिक-सामाजिक दृष्टीने आयटी पगारवाली ही जोडपी सर्वात वरच्या एक टक्क्यात येतात. त्यामुळे त्या स्त्रियांपुरता तुमचा युक्तीवाद बरोबर आहे - त्या स्त्रियांकडे स्वातंत्र्य आहे, ते घेण्याची धमक काहींच्यात आहे काहींच्यात नाही. त्या वर्तुळात काही विशेष प्रॉब्लेम नाही.

भारतातील मध्य्मवर्गात "लिंगसमानता" आल्याची दहा लक्षणे सांगा म्हटल्यास कोणती सांगाल?

वरच्या एक टक्क्याला जर तुम्ही नुसताच उच्चमध्यमवर्ग म्हणत असाल तर मध्यमवर्गाची व्याख्या नक्की काय हा प्रश्न पडतो. मला खरं तर वर्गसापेक्ष लिंगसमानतेचे निकष आवडत नाहीत. पण असे निरपेक्ष दहा निकष सर्वांसाठीच करणं हे किचकट आहे हेही समजू शकतो.

तरीही काही निकष मांडण्याचा प्रयत्न करतो. मुख्य ग्लोबल निकष असा आहे की जवळपास समान संधी.

१. स्त्री व पुरुष या दोन्ही गटांची शैक्षणिक पातळी सारखी असावी. यात प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात हुबेहुब सारखं असावं असं म्हणत नाही. म्हणजे इंजिनियरिंग क्षेत्रात कदाचित जास्त पुरुष दिसतील, बायका जास्त प्रमाणात डॉक्टर होतील वगैरे मायनर भेद चालतील. पण बॅचलर्स, मास्टर्स, पीएचडी आणि प्रोफेशनल कोर्सेस यांमध्ये सुमारे पन्नास पन्नास टक्के वितरण दिसावं.
२. समान अनुभव/क्षमता असल्यास स्त्री व पुरुष या दोघांनाही मिळणाऱ्या वेतनात फरक नसावा.
३. एकंदरीत लेबर फोर्समध्ये स्त्रीपुरुषांचं जवळपास समान वितरण दिसावं. मुद्दा क्रमांक १ प्रमाणेच ते प्रत्येक क्षेत्रात असावं असं नाही. पण या दोन गटांचं जीडीपीमधलं योगदान समान असावं.
४. लग्न करणं व लैंगिक संबंध ठेवणं याबाबतीत स्त्रिया व पुरुषांना समान न्याय असावा.
५. लैंगिक आक्रमणाचा धोका स्त्रियांना अधिक असतो, त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यांवर (बाहेर जाणे, विशिष्ट वेळी जाणे, विशिष्ट ठिकाणी जाणे) बंधनं येतात. ही बंधनं शिथिल होऊन पुरुषांइतकंच स्वातंत्र्य मिळण्यासाठी विशेष सुरक्षेची व्यवस्था असावी.

मला वाटतं ही परिस्थिती दोनेक पिढ्या राहिली की पूर्वी जळलेल्या सुंभांचे पीळही संपतील. मग 'प्रॉब्लेम नक्की काय आहे?' असा प्रश्न विचारत स्त्रीमुक्ती चळवळ विसर्जित करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी सुरापेक्षा मुद्द्यांना महत्व दिल्याबद्द्ल मनःपुर्वक आभार. (बहुदा या प्रतिसादानंतर मी विकांताला जालावर नसेन त्यामुळे पुढिल प्रतिसाद सोमवारी देईन आगाऊ माफी)

१. स्त्री व पुरुष या दोन्ही गटांची शैक्षणिक पातळी सारखी असावी. यात प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात हुबेहुब सारखं असावं असं म्हणत नाही. म्हणजे इंजिनियरिंग क्षेत्रात कदाचित जास्त पुरुष दिसतील, बायका जास्त प्रमाणात डॉक्टर होतील वगैरे मायनर भेद चालतील. पण बॅचलर्स, मास्टर्स, पीएचडी आणि प्रोफेशनल कोर्सेस यांमध्ये सुमारे पन्नास पन्नास टक्के वितरण दिसावं.

हे स्वच्छेने व्हावं असं तुमचं मत असेल अस मी मानतो. मग प्रश्न येतो की सध्या कोणता कायदा हे होण्यापासून रोखतो? जर तसे होत असेल तर स्त्रीवाद्यांची थोडी गरज आहे हे खरे. पण माझ्या माहितीत भारतात असा कोणताही कायदा नाही.

तुम्ही म्हणाल समाज रोखतो. समजा अगदी गरीब घरातील मुलाला असे शिक्षण घ्यायची इच्छा असतानाही रोखले तर तो काय करतो? तेच स्त्री का करू शकत नाही? इथे समानता आहेच फक्त स्त्रियांनी स्वतः ती बजावण्यासाठी स्वतंत्र असल्याचे भान येणे गरजेचे आहे असे मला वाटते. स्त्रियांना आरक्षण वगैरे देऊन हे भान येईल का? तर आधीच शिक्षणात स्त्रियांना भारतात आरक्षण आहे. मग समाजाने आणखी काय करायला हवं. जबरदस्तीने उच्चशिक्षण देणं हाच एक पर्याय उरतोय (अशाच निरुपायाने प्राथमिक शिक्षणात कायदेशीर जबरदस्ती करणं ऑलरेडी सुरु करावं लागलं)

२. समान अनुभव/क्षमता असल्यास स्त्री व पुरुष या दोघांनाही मिळणाऱ्या वेतनात फरक नसावा.

यात स्त्रीवादापेक्षा लिंगनिरपेक्षतेचाच मुद्दा आहे. वेतन ठरवताना एम्प्लॉईच्या लिंगावर सापेक्ष निर्णय नकोत. हे मान्य आहे. पण स्त्री एम्प्लॉइजवर कंपन्यांना अधिक खर्च करावा लागतो हे सत्य आहे (जो करणे योग्यच आहे असे माझे मत आहे). जर पगारात लिंगनिरपेक्षता हवी असेल तर महिलांच्या सुरक्षेसाठी, फुल पे सुट्ट्यांसाठी (डिलिव्हरीच्या सुट्टीसकट) लिंग निरपेक्षता हवी की नको? (पुरुषांनाही आपल्या पत्नीस मुल झाल्यावर पुर्णपगारी ३ महिने सुट्टी, पुरुष पगारदारांना रात्री होम ड्रॉप इत्यादी) तुमचे काय मत? मग यात स्त्रीवादाचा मुद्द कुठे आला?

३. एकंदरीत लेबर फोर्समध्ये स्त्रीपुरुषांचं जवळपास समान वितरण दिसावं. मुद्दा क्रमांक १ प्रमाणेच ते प्रत्येक क्षेत्रात असावं असं नाही. पण या दोन गटांचं जीडीपीमधलं योगदान समान असावं.

लेबर फोर्समध्ये नक्की काय काय धरायचं? घरच्याच शेतीत केलेलं कामं, घरीच केलेलं विणकाम शिवणकाम वगैरे धरायचं का? जीडीपीतलं योगदान धरताना शेती/घर्गुती कुक्कुटपालन/दुध दुभतं वगैरे नक्की कोणाच्या नावावर धरायचं?जर समाजाने आरक्षण देऊनही स्त्रिया शिक्षण घेत नसतील नि त्यामुळॅ त्यांना वरच्या अधिक पगाराच्या जागा मिळत नसतील तर समाजाने नक्की काय करावं?

४. लग्न करणं व लैंगिक संबंध ठेवणं याबाबतीत स्त्रिया व पुरुषांना समान न्याय असावा.

म्हणजे नक्की कळलं नाही. आणि हे लिंगनिरपेक्षतेचं उदा. झालं स्त्रीवर ती स्त्री आहे म्हणून नक्की कोणता हक्क कायदा डावलतो? समाज डावलतो? मला हा मुद्दा खरोखरच कळलेला नाहिये.

५. लैंगिक आक्रमणाचा धोका स्त्रियांना अधिक असतो, त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यांवर (बाहेर जाणे, विशिष्ट वेळी जाणे, विशिष्ट ठिकाणी जाणे) बंधनं येतात. ही बंधनं शिथिल होऊन पुरुषांइतकंच स्वातंत्र्य मिळण्यासाठी विशेष सुरक्षेची व्यवस्था असावी.

हे झाल्याने लिंग'समानता' येईल का असमानता? एखाद्याला विशेष सुरक्षा देणे हे लिंगसमानतेत कसे बसते? मी नेमक्या अश्याच तरतुदींच्या विरोधात आहे. हक्क हवेत पण जबाबदार्‍या नकोत हे काय? जर तुम्हाला समान पगार हवा तर अशी सुट का हवी? असा प्रश्न समाजाने विचारला तर त्यात नक्की गैर काय? माझे मत स्त्रीवादापेक्षा सर्वत्र लिंगनिरपेक्षतेला नेमक्या याच कारणासाठी आहे आणि याच कारणाने मी स्त्रीवादाला सेक्सिस्ट म्हणतो. सेक्झिझमच्या विरुद्ध लिंगनिरपेक्षता आहे स्त्रीवाद नव्हे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>समजा अगदी गरीब घरातील मुलाला असे शिक्षण घ्यायची इच्छा असतानाही रोखले तर तो काय करतो? तेच स्त्री का करू शकत नाही? इथे समानता आहेच फक्त स्त्रियांनी स्वतः ती बजावण्यासाठी स्वतंत्र असल्याचे भान येणे गरजेचे आहे असे मला वाटते.>>

काय शुक्रवार संध्याकाळचा परिणाम की काय? Wink (ह घ्या).

अहो, गरीब मुलाच्या पालकांकडे त्याला शिकवण्यासाठी पुरेसे पैसे असतील तर त्याला कोणी शिक्षणापासून रोखत नाही. कायदा नाही/समाज नाही/पालक नाही.

मात्र मुलीच्या पालकांकडे पैसे असतील तरी तिला शिक्षणापासून रोखले जाते. पालकांकडूनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्त्रीवाद वेगळा आणि लिंगनिरपेक्षता वेगळी असे कप्पे केल्यामुळे वरच्या प्रतिसादात बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. एखाद्या विचारसरणीला नाव काय द्यायचं याबाबतीत वेगवेगळ्या लोकांची मतं वेगवेगळी असतात. पण म्हणूनच मला ते विचार बरण्यांमध्ये भरून ठेवून त्यांना लेबलं लावणं फारसं पसंत नाही. सोय म्हणून उल्लेखण्यासाठी उपयुक्त आहे, पण लेबलांपोटी मतमतांतरंच अधिक होतात.

तुम्ही ज्याला लिंगनिरपेक्ष विचार म्हणत आहात तेच विचार अनेक स्त्रीवादी म्हणवल्या जाणारांनी मांडले आहेत. आता पुन्हा त्यांना स्त्रीवादी म्हणावं की लिंगनिरपेक्षतावादी? पुन्हा नावाने काय फरक पडतो?

मग प्रश्न येतो की सध्या कोणता कायदा हे होण्यापासून रोखतो?

कायद्याने जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते सर्वत्र उपलब्ध नसतं, वापरलं जात नाही, वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसते, सामाजिक बंधनं असतात - हे अनेक बाबतीत दिसून येतं. 'मुलीला शिकवून काय करायचं आहे? शेवटी तिला पोळ्याच भाजायच्या आहेत ना!' अशी विचारसरणी प्रचलित असेल तर ती बदलण्यासाठी चळवळ आवश्यक असते.

स्त्रीवर ती स्त्री आहे म्हणून नक्की कोणता हक्क कायदा डावलतो? समाज डावलतो?

उदाहरणं बरीच देता येतील.
- मुस्लिम स्त्रियांना सामाजिक परंपरांमुळे आणि कायद्यामुळे नवरा केव्हाही तलाक देऊ शकतो.
- लैंगिक संबंध ठेवल्यामुळे पुरुष अपवित्र होत नाही, पण स्त्रीचं शील म्हणजे काचेचं भांडं हे भाषेतच प्रस्थापित आहे.
- संबंध जाऊदेत, लैंगिक सुखाची इच्छा करणाऱ्या तरुणींकडे 'वेश्या, हलक्या प्रतीची' वगैरे नजरेने पाहिलं जातं.

एखाद्याला विशेष सुरक्षा देणे हे लिंगसमानतेत कसे बसते?

समानतेत एक 'लेव्हल प्लेयिंग फील्ड' नावाची संकल्पना असते. समानता आणण्यासाठी दुर्बळ घटकांना इतर सबळ घटकांच्या बरोबरीस यायला मदत करावी लागते. हेच तत्त्व मांडून आंबडेकरांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची संकल्पना मांडली. या तत्त्वालाच विरोध असेल तर हरकत नाही, मात्र ऋषिकेश आयडीकडून असे विचार आले तर मला खूप आश्चर्य वाटेल. कारण या तत्त्वाचं समर्थन इतर प्रतिसादांमधून करताना पाहिलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी मुद्द्यांचा प्रतिवाद करतो आणि मग स्त्रीवाद आनि लिंगनिरपेक्षता "हे साधारण तेच हो" म्हणणे कसे गैर आहे ते सांगतो. तुम्ही त्याला कप्पे म्हणा मला ते मतांतरे अधोरेखीत करण्यासाठी सुयोग्य वर्गीकरण वाटते.

तर आधी तुम्ही मांडलेले मुद्दे अधिक समजून घेतो:

'मुलीला शिकवून काय करायचं आहे? शेवटी तिला पोळ्याच भाजायच्या आहेत ना!' अशी विचारसरणी प्रचलित असेल तर ती बदलण्यासाठी चळवळ आवश्यक असते.

आता भारत या टप्प्याच्या पुढे गेला आहे.
मुलींनाच का तर प्रत्येक अपत्याला आठवी पर्यंत शिक्षण देणं हे आता कायद्याने अनिवार्य आहे आणि तो आता प्रत्येक विद्यार्थाचा घटनात्मक 'हक्क' आहे. इतकेच नाही तर गरीब व एरवी वंचित राहू शकतील अशांसाठी आता प्रत्येक शाळेत २५% आरक्षण आहे. (अगदी लहान खेड्यांतही अंगणवाड्या, प्राथमिक शाळा पोचल्या आहेत व प्रत्येक मुल शिकेल याकडे लाखो सरपंच जातीने लक्ष घालत आहे. काही अपवादात्मक खेड्यांना नियम समजून भुई धोपटल्याने हा प्रश्न मोठा भासवता येईल. पण प्रत्यक्षात तसे नाही. समाजाला शिक्षणाचं महत्त्व कळत नाही असा जो काही स्त्रीवाद्यांचा समज आहे तो किमान भारतीय समाजासाठी तितकासा लागू नाही.

- मुस्लिम स्त्रियांना सामाजिक परंपरांमुळे आणि कायद्यामुळे नवरा केव्हाही तलाक देऊ शकतो.

सहमत आहे. हा कायदा बदलायला हवा. व त्यासाठी योग्य ती लढाई लढली तर माझा त्याला पाठिंबा असेल.

- लैंगिक संबंध ठेवल्यामुळे पुरुष अपवित्र होत नाही, पण स्त्रीचं शील म्हणजे काचेचं भांडं हे भाषेतच प्रस्थापित आहे.

मुळात असा कोणताही कयदा भारतात नाही. स्त्रीचं शील काचेच भांड आहे की नाही हे स्त्रीने स्वतःनेच ठरवायला हवं, यात समाज/सरकारने नक्की काय करणे अपेक्षित आहे? असा विचार करणार्‍या स्त्रियांना या विचारांपासून मुक्ततेची गरज आहे. यासाठी स्त्रीवादी नक्की लढणार कोणाशी?

- संबंध जाऊदेत, लैंगिक सुखाची इच्छा करणाऱ्या तरुणींकडे 'वेश्या, हलक्या प्रतीची' वगैरे नजरेने पाहिलं जातं.

मग? मला आक्षेपच समजत नाहीये. याला एकतर कायदेशीर बंधन काहीच नाहीत. कोणी कसंही बघितलं तरी तशी इच्छा व्यक्त करायका किंवा तसे संबंध ठेवायला कायदा अडवत नाही. नवरात्री असो वा आजकाल मोठ्या शाहरात सहज ऐकू येणारे 'वन नाईट स्टँड' असो मुलगे व मुली या नजरांना भीक घालताहेत असे दिसत नाही. गावांमध्येही लग्ना आधी शरीरसंबंध ठेवणार्‍यांची संख्या बरीच मोठी आहे. मग या बघण्याला महत्त्व नक्की देतो तरी कोण?

समानतेत एक 'लेव्हल प्लेयिंग फील्ड' नावाची संकल्पना असते. समानता आणण्यासाठी दुर्बळ घटकांना इतर सबळ घटकांच्या बरोबरीस यायला मदत करावी लागते. हेच तत्त्व मांडून आंबडेकरांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची संकल्पना मांडली. या तत्त्वालाच विरोध असेल तर हरकत नाही, मात्र ऋषिकेश आयडीकडून असे विचार आले तर मला खूप आश्चर्य वाटेल. कारण या तत्त्वाचं समर्थन इतर प्रतिसादांमधून करताना पाहिलेलं आहे.

मी आरक्षणाचा समर्थकच आहे. पण गंमत अशी की भारतात स्त्रियांना अनेक क्षेत्रांत आरक्षण आहे, शालेय शिक्षण फुकट आहे, उच्चशिक्षण पुरुषांपेक्षा स्वस्त आहे. आता आठवीपर्यंतचे शिक्षण अनिवार्यही आहे. सरपंचपदापासून नगरसेवकांपर्यंत सर्वत्र आरक्षण आहे. गावांतील सामान्य स्त्रियांना मदतीला अनेक बचतगट, अनेक एन्जीओज त्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी मदतही करत आहेत. समाजाने स्त्रियांना मागे डांबून ठेवलं आहे असे काही चित्र दिसत नाही. मग आणखी काय करणे अपेक्षित आहे?

'लेव्हल प्लेयिंग फिल्ड'साठी 'मदत' करणे वेगळे आणि 'संधी'देणे वेगळे. सरकारने समाजाने तशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याही पुढे जाऊन समाज त्यांना विविध माध्यमांतून मदत करत आहे. पण त्याच समाजासोबत भांडत बसायचे आणि वर तुम्ही मदत करत कशी नाही तुम्ही स्त्रीद्वेष्टे आहात असा बोभाटाही करायचा इतकंच स्त्रीवादी करताना दिसतात.

स्त्रीवाद वेगळा आणि लिंगनिरपेक्षता वेगळी असे कप्पे केल्यामुळे वरच्या प्रतिसादात बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. एखाद्या विचारसरणीला नाव काय द्यायचं याबाबतीत वेगवेगळ्या लोकांची मतं वेगवेगळी असतात. पण म्हणूनच मला ते विचार बरण्यांमध्ये भरून ठेवून त्यांना लेबलं लावणं फारसं पसंत नाही. सोय म्हणून उल्लेखण्यासाठी उपयुक्त आहे, पण लेबलांपोटी मतमतांतरंच अधिक होतात.
तुम्ही ज्याला लिंगनिरपेक्ष विचार म्हणत आहात तेच विचार अनेक स्त्रीवादी म्हणवल्या जाणारांनी मांडले आहेत. आता पुन्हा त्यांना स्त्रीवादी म्हणावं की लिंगनिरपेक्षतावादी? पुन्हा नावाने काय फरक पडतो?

वर म्हटल्याप्रमाणे, तुम्ही त्याला कप्पे म्हणा मला ते मतांतरे अधोरेखीत करण्यासाठी सुयोग्य वर्गीकरण वाटते. कारण स्त्रीवाद हा "स्त्रियांच्या बाजूने" किंवा "स्त्रीयांच्या कल्याणासाठी' आहे. माझ्यासाठी 'फक्त स्त्रियांच्यासाठी' म्हणून धोरणे ठरवणे आणि पुर्वी/धर्मात फक्त पुरुषांना विचारात घेऊन किंवा स्त्रियांन दुय्यम ठरवून ठरवलेल्या धोरणांत/नियमांत/कायद्यात गुणात्मक फरक करता येत नाही. स्त्रीवाद्यांसाठी समाज/ (अनेकदा पुरुष) आणि पुरुषप्रधान व्यवस्था ही स्त्रियांच्या प्रगतीसाठी मारक, त्यांना अवरोध करणारी आणि त्यांच्यामुळे स्त्रियांना कसा त्रास होतोय अशी मांडणी करणारी. लिंगनिरपेक्षता म्हणताना स्त्रियांचे किंवा पुरुषांचे प्रश्न अशी विभागणी न करता हा प्रश्न आहे आणि त्यावर 'सगळ्यांना मिळून' काय उपाय करता येतील, 'स्वत:त" काय बदल करता येतील हे बघायचा प्रयत्न असतो. स्त्रियांना संधीत समानता देणं वेगळं आणि त्यांना 'अधिकच्या' सवलती देणं वेगळं. सर्वांना समान संधी मिळत असतानाही आम्हाला ती घेऊच दिली जात नाही वैट्ट वैट्ट दुष्ट कुठले अशी मांडणी करून स्वतःचे अपयश झाकता येते पण त्यातून काही सकारात्मक बदल घडत नाही. आत्मपरिक्षण वगैरे काय ते समाजाने करावे, स्त्रीवाद्यांना ते करायचं तशीही गरज नाही असे स्त्रीवाद्यांना इतक्या खात्रीने वाटत असते की त्यांची अनेकदा कीवही येत नाही! सामान्य माणसांना (ठराविक पुस्तके वाचलेली नसल्याने) समजावण्याच्या फंदात न पडता "आम्हीच हुशार! आम्ही जे म्हणू तेच स्त्रियांसाठी योग्य!" असा तर्कहीन आणि तथ्यहीन हेका धरणे हीच स्त्रीवाद्यांची ओळख होत चालली आहे.

समाजाला तुम्हीकोणीतरी वेगळे म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून लढा देऊन प्रश्न सुटतात का जटिल होतात हे स्त्रीवादीच जाणोत.

====

बाकी एक महत्त्वाचा प्रश्न, हे हवं ते हवं असं स्त्रीवादी म्हणतात. जे आहे त्याचा किती उपयोग स्त्रीवादी करून घेताना दिसतात. एखादी मुलगी शाळेत जात नाही ,म्हणून किती तक्रारी स्त्रीवाद्यांनी भारतीय पोलिस स्टेशनला दाखल केल्या आहे. समाजाने शस्त्र दिली आहेत, कायदे मजबूत केले आहेत. त्याचा वापर न करता फक्त "तो बग ना मला मारतो" असं रडत मदतीसाठी कोणा दुसर्‍यावर अवलंबून रहाणे स्त्रीवादी कधी सोडणार आहेत? मुळात स्त्रीया स्वतंत्र आहेत असे समजून त्यांनी आचरण सुरू केल्याशिवाय मुळ प्रश्न आणि त्यावरील उपाय पुढे येणार नाहीत.

पुरुष आ नि पुरुषप्रधान व्यवस्था हे धोपटायला सोपे टारगेट आहे, ते कधीही धोपटता येईल पण त्याने प्रश्न सुटतोय असे दिसत नाही कारण मुळात अनेक प्रश्नांचे कारण फक्त वैट्ट वैट्ट वैट्ट दुष्ट पुरुष आणि तसाच समाज याच्यापेक्षा कितीतरी जटील आणि गहन आहे. त्या कारणां भिडण्याची हिंमत स्त्रीवाद्यांमध्ये नाही. ते या 'पुर्षी' बुजगावण्याला धोपटण्यात मग्न आहेत आणि हीच खेदाची बाब आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मार्मिक श्रेणी देऊन समाधान होईना म्हणून हा प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकीच्या भागाबद्द्ल लिहायचा कंटाळा आलाय.

----

पुरुषप्रधान व्यवस्था हे धोपटायला सोपे टारगेट आहे, ते कधीही धोपटता येईल पण त्याने प्रश्न सुटतोय असे दिसत नाही कारण मुळात अनेक प्रश्नांचे कारण फक्त वैट्ट वैट्ट वैट्ट दुष्ट पुरुष आणि तसाच समाज याच्यापेक्षा कितीतरी जटील आणि गहन आहे. त्या कारणां भिडण्याची हिंमत स्त्रीवाद्यांमध्ये नाही. ते या 'पुर्षी' बुजगावण्याला धोपटण्यात मग्न आहेत आणि हीच खेदाची बाब आहे!

साफ अमान्य.

स्त्रियांसाठी "पुरुषप्रधान व्यवस्था हे धोपटायला अत्यंत अवघड टार्गेट आहे". प्रत्येक स्त्री ला ते युद्ध घरात लढावे लागेल. स्त्रियांना घरातल्या पुरुषांसमोर एक क्रेडिबल थ्रेट निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण आजतरी अस्तित्वात नाही.

कारणे खालीलप्रमाणे -

(०) कुटुंब ही एक hierarchy आहे. स्त्री दुसर्‍या कुटुंबातून या कुटुंबात येते. She leaves behind her parental home and comes to this home. So she begins with a natural disadvantage. जोडीला ती ज्या कुटुंबात येते त्यांचे नाव तिला स्वीकारावे लागते. तसेच मंगळसूत्र. हे सगळे hierarchy ही तिच्या मनात स्थापित करण्यासाठी असते. स्थापित हा खूप सॉफ्ट शब्द झाला.

(१) स्त्रिया ह्या घरकामात गुंतवल्या असल्यामुळे त्यांच्याकडे नॉन मार्केटेबल स्किल्स असतात. म्हंजे त्यांना घराच्या (नॉन मार्केट् मधून) बाहेरच्या मार्केट मधे ट्रांझिशन करायला खूप कमी वाव असतो. पुरुषांच्या तुलनेत. The non-marketable skills she has developed (at home) can be usefull mainly in other home (which means divorse). Not so much in market.

(२) पति पासून फारकत घेणे हे (१) मुळे कठिण असते. व जोडीला (पतिपासून फारकत घेऊन) माहेरी जाण्यासारखी स्थिती नसते कारण माहेरची आर्थिक स्थिती सॉलिड नसण्याची शक्यता आणि घटस्फोटाचा स्टिग्मा.

(३) hierarchy मोडून बाहेर पडणे हे प्रचंड संघर्ष केल्याशिवाय होत नाही. तोसुद्धा प्रथम स्वतःशी, नंतर पति शी व इतरांशी (उदा सासू सासरे). This often means risk of disconnection from kids (if any).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रियांसाठी "पुरुषप्रधान व्यवस्था हे धोपटायला अत्यंत अवघड टार्गेट आहे". प्रत्येक स्त्री ला ते युद्ध घरात लढावे लागेल.

पण मी पुरुषप्रधान व्यवस्था ही धोपटायला सोपे टार्गेट आहे म्हणालो ते स्त्रियांसाठी नव्हे तर स्त्रीवाद्यांसाठी. स्त्रीवादी अनेक सामाजिक प्रश्नांचे खापर वैट्ट वैट्ट पुरुषांवर टाकून (शांतपणे विडी शिलगावत Wink ) बसतात. प्रत्यक्षात या प्रश्नांचे मुळ आणि उपाय दोन्ही इतक्या वरवरचे नाही.

तेव्हा तुमचा अख्खा प्रतिसाद मी जे म्हणालेलोच नाही त्याचा प्रतिवाद आहे. स्त्रियांना तसेच पुरुषांना लिंगभेदामुळे अनेक गोष्टींशी दैनंदिन आयुष्यात झगडावे लागते हे कोणी नाकारतच नाहीये. पण त्यातून त्यांना स्वतःच किंवा परस्पर सहकार्याने मार्ग काढायचाय. "तुम्ही सारे दुष्ट आहात, तेव्हा आम्हाला या या या या सवलती दिल्याच पायजेलाय!" असे काहितरी स्त्रीवादी बोलत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके. ठीकाय. माय बॅड. मी मिसरीड केलं.

---

पण त्यातून त्यांना स्वतःच किंवा परस्पर सहकार्याने मार्ग काढायचाय. "तुम्ही सारे दुष्ट आहात, तेव्हा आम्हाला या या या या सवलती दिल्याच पायजेलाय!" असे काहितरी स्त्रीवादी बोलत असतात.

आता मी खालील प्रतिवाद करतो. बघ पटतोय का. (म्हंजे इथे मी माझा "सरकारने बेलआऊट करता कामा नये" हा माझा आवडता मुद्दा बाजूला ठेवत आहे.)

(सगळ्या सवलती मिळतीलच असे नाही पण अनेक सवलती मागितल्या तर त्यातल्या काही मंजूर होतील) व सवलती मागण्यामुळे स्त्रियांना काही सूट मिळेल व त्यांना मार्केटेबल स्किल्स विकसित करण्यासाठी जी संधी मिळायला हवी आहे ती मिळेल. त्या मार्केटेबल स्किल्स विकसित करतील व नंतर त्यातून त्यांच्याकडे जास्त विकल्प येतील (म्हंजे बाजारात त्यांच्या स्किल्स ना मागणी येईल) व त्यांची बार्गेनिंग पॉवर (viz a viz पति, पुरुष) वाढेल. व त्याच्या जोरावर - they will be able to negotiate and obtain better co-operation from their husbands / men.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं असं म्हणणंय की त्यांना ऑलरेडी काही सवलती मिळाल्या आहेत. आरक्षण आहे, फी माफी आहे, नगरसेवक/सरपंच/ग्रामसभा लेव्हलवर राजकारणातही आरक्षण आहे. महिला विधेयक सरकारांनी मांडले आहे व त्या द्वारे विधानसभा व लोकसभेतही आरक्षण मिळेल. त्याबद्दल काही ऑब्जेक्शनच नाहीये. सरकार व कायदे याद्वारे समाज आपला कल स्पष्ट करत असतो कारण सरकार समाजाचा अधिकृत प्रतिनिधी आहे. अजुन सरकारने नक्की काय केल्याने महिला स्वतंत्र होतील? का आता स्त्रीयांनाच या सुविधांचा लाभ घ्यायची गरज आहे? स्तीयांनाच बदल घडवायची गरज नाहीये का?

का कोणी काहीही केले तरी स्त्रीवाद्यांना ते पुरेसे वाटणार नाही? आणि तसे असेल तर स्त्रीवाद्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? असा प्रश्न पडणे मला अवाजवी वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"सरकारने बेलआऊट करता कामा नये" हा माझा आवडता मुद्दा बाजूला ठेवत आहे

गब्बु, हे असे चालत नाही. जर तू तुझा आवडता मुद्दाच असा मधेच फॉर सेक ऑफ अर्ग्युमेंट बाजुला ठेवणार असशील तर तुझ्या विश्वासार्ह्तेचे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर तू तुझा आवडता मुद्दाच असा मधेच फॉर सेक ऑफ अर्ग्युमेंट बाजुला ठेवणार असशील तर तुझ्या विश्वासार्ह्तेचे काय?

नाय ओ...

विश्वेश्वर घट्ट आहे तिकडे राजिवड्यावर. एक खेळ करून दाखवलान त्याने...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येक क्षेत्रात असावं असं नाही

का नाही? भेदभाव कशाला? खाणकामातही स्त्रियांची संख्या जास्त हवी फक्त बोर्डरुममध्येच का? सैन्यातही समान संधी हव्यात फक्त आयटीमध्येच का? प्रत्येक क्षेत्रात समान जबाबदारी उचलली पाहिजे. उगीच इतरवेळी ५०%-५०% करायचं आणि वेळ आली की मग प्रत्येक क्षेत्रात नको. घरकामात नवर्‍याने बरोबरीची मदत करायला हवी असते ना?
जर भेदभाव करायचाच आहे तर घर सांभाळणे, स्वयंपाक वगैरे केलं बायकांनी तर काय वाईट? ती कामे हलकी व कमी महत्त्वाची आहेत असं ठरवूनच टाकलंय. ठीक आहे; हलकी तर हलकी. मी तर म्हणतो पुरुषांना करु द्या ती कामं काही दिवस आणि करु द्या बायकांना खाणकाम वगैरे. फालतू भेदभाव नको. जीवशास्त्रीय भेदभाव मिटवल्याचा पुरुषांनाही काही फरक दिसला पाहिजे की नको? की फक्त क्रिमी लेयर बायांना आणि पुरुष ओझ्याची गाढवं?
सगळं सोयीस्कर आहे. उच्चवर्गातल्या बायांचा शक्तिसंघर्ष आहे हा फक्त. उगीच "समस्त स्त्रीवर्गा"ची झूल पांघरुन.
घरातल्या मोलकरणीला पैसे, सुटी, इन्शुरन्स, प्रॉव्हिडंट फंड वगैरे देताना जीवावर येतं आणि समस्त स्त्रीवर्गाच्या वल्गना. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा गांधीवाद (खरंतर त्याचा छोटा भाग) आहे.

मैला साफ करण्याचं काम भंग्यांनीच का, ब्राह्मणांनीही करावं असं म्हणायचं. त्यापेक्षा मैला साफ करण्याचं काम यंत्रांकडून करवून घेता यावं आणि कोणत्याही मनुष्यावर असं काम करण्याची वेळ येऊ नये असं नाही म्हणायचं. चाललंय ते काही लोकांसाठी वाईट असेल आणि तंत्रज्ञान वापरून पूर्ण मोडायची शक्यता असेल तरीही तंत्रज्ञान नाकारून सगळ्यांना (घटकांना) असं काम करायला भाग पाडायचं.

मग प्रश्न असा पडतो, स्त्रियांनीही खाजगी मालमत्तेची संकल्पना का सोडावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नका सोडू. पण ह्या सगळ्या "प्रगतीत" पुरुषांच्या अंगमेहनतीचा व तांत्रिक डोक्याचा फार मोठा वाटा आहे. पुरुषांनी घुसळलेल्या ताकातल्या लोण्याच्या गोळ्याचा अर्धा वाटा मागून मिळेल ही आशा मात्र सोडा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ताक लोणी

पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक काळात बनलेलं बहुतेकसं ताक घुसळून लोणी काढणाऱ्या व्यक्ती बहुतांशी स्त्रिया असतात. तेव्हा ही उपमा वापरणं सोडाल तर भूमिकेत किमान कन्सिस्टंसी दिसेल. Tongue

मी भेदाभेद अमंगळ मानते, मला काही फरक पडत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile
म्हणूनच कळेल अशी उपमा वापरली. Blum 3
(मला तर कधीच राहवत नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तांत्रिक डोक्याचा फार मोठा वाटा आहे.

Girls outscore boys on inaugural national test of technology, engineering skills

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The test was designed to measure students’ abilities in areas such as understanding technological principles, designing solutions and communicating and collaborating. Girls were particularly strong in the latter. (i.e. communicating and collaborating)

बाकी परिक्षा पास करण्यात, मॅच्युरिटीत व बौद्धिक कुवतीतही किशोरवयीन मुली समवयीन मुलांपेक्षा पुढेच असतात. दुर्दैवाने पुढे प्रत्यक्ष tinkering मध्ये त्यांना रस नसतो आणि मुले नंतर मुलींच्या पुढे जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टिंकरिंगमध्ये रस नसतो म्हणण्यापेक्षा घेऊ दिला जात नाही अशी मांडणी आहे बॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मार्मिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातील मध्य्मवर्गात "लिंगसमानता" आल्याची दहा लक्षणे सांगा म्हटल्यास कोणती सांगाल?

(१) मुलगा असल्यास भॄणहत्या करत नाहीत, मुलगी असल्यास करतात. ही असमानता आहे. जर स्त्रीभॄण पाडले नाही तर समानता आली.
(२) अवंती यांनी लिहीलेल्या कवितेमधूनच - जर मुलगा असेल व त्याने लग्न करायचे नाकारले तर फारसा दबाव टकला जात नाही, कंपेअर्ड टू मुलीने नाकारला तर. ही विषमता दूर व्हावी.
(३) मुला-मुलींत जरी वडीलोपार्जित संपत्तीचे समान वाटप व्हावे असा कायदा असला तरी मुलाला झुकते पारडे दिले जाते. ही विषमता नष्ट व्हावी.
(४) बर्‍याच घरात स्वयंपाक हा डेडिकेटेडली मुलीलाच शिकविला जातो. मुलास नाही.
(५) अत्यंत सूक्ष्म पातळीवरही भेदभाव चालतो उदा - पुरुषांना अन्न जास्त वाढणं. स्त्रीला कमी वाढलं, उरल्यावर जेवायला बसलं तरी चालतं ही भावना अजुनही दिसून येते.
(६) आवाज बायका चढवत नाहीत, पुरुषच चढवतात. कोणीच चढवु नये ही साधी गोष्ट झाली.
(७) डोमेस्टिक हिंसेचे बळी बायकाच असतात. पुरुष नसतात किंवा असल्यास फार कमी असतात.

हे सारे जेव्हा बंद होइल तेव्हा लिंगसमानता आली असे थोडेफार म्हणता येइल. थोडेफार कारण अजुनही लक्षणे असतील म्या पामराच्या बुद्धीची मर्यादा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला लिंगसमानता म्हणजे काय तेच कळत नाही हे मी कबूल करतो.

च्यायला सगळं रामायण झालं अन हे आता विचारताहेत!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

उशीरा तर उशीरा. जो विचारतोय त्याला बायजवार सांगा तर
ही बघा मी वाचलेल्या पुस्तकांची यादी आता तुम्ही ती वाचेस्तोवर मी सांगतो/ते म्हणून माझं ऐक (नाहितर मी नुसतं लोलेन!) हा काय तर्क झाला! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कशाला पुस्तकं वाचता, फक्त डोळे उघडे ठेवा म्हणजे कळेल.

समाजात लिंगाधारीत भेदभाव आहेत का नाहीत? जर असतील तर असमानता आहे, नसतील तर नाही. हे भेदभाव किती रुजलेले आहेत, किती जाचक आहेत त्यावरून त्या असमानतेची तीव्रता जाणवते. समाजात सबल-दुर्बल घटक आहेत का? सबल घटक ही असमानता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लादत आहेत का? ही सगळी निरीक्षणं कोणालाही करण्यासारखी आहेत. जिथे सर्रास लिंगसापेक्ष भृणहत्या होतात तिथे असमानता आहे का हे विचारणंच हास्यास्पद आहे. उद्या कोणी म्हणेल जातिनीहाय भेदाभेद सुद्धा नाहीतच भारतात म्हणून. आता काय काय वाचायला द्यायचं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

छे हो! प्रतिवाद करायचा असेल तर किमान अभ्यास करा नाहीतर माझी करमणूक झाली असं मी समजते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मार्मिक....

इंग्रजी मजकूरातील There was no 'archy' हे पटलं नाही. अल्फा मेल्स होते म्हणजेच आर्की होती (जी आजला प्राण्यांच्या कळपांतून दिसते). त्याकाळची प्रॉपर्टी म्हणजे गायी, शेळ्या, मेंढ्या (आणि बायका).....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हंटर-गॅदरर लोक प्राणी पाळत नसत. ती शेतीच्या थोडी पूर्वीची अवस्था आणि तेही गवताळ व सपाट प्रदेशात. जंगलात राहणारे शेळ्या-मेंढ्या पाळत नसत.
अगदी आफ्रिकेच्या मैदानी प्रदेशातही फार थोड्या ट्राईब्ज शेळ्या-गाई वगैरे पाळत.
इन एनी केस, जिथे मालकी आली तिथे बायकांना दुय्यम केले गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुय्यम वागणुकीचे मूळ आहे सत्ताकेंद्रीकरण, खाजगी मालकीहक्क आणि एककेंद्री समाजव्यवस्था. ह्यातल्या एकाही फीचरविरुद्ध एकाही बाईने कधीही आवाज उठवलेला मी तरी पाहिलेला नाही.

'द सेकंड सेक्स' वाचाच. (प्रकाशनसाल १९४६. ते जुनं झालं आणि मागे पडलं.)

सिमोनने तिची काही डावी मतं, किंवा डाव्या विचारसरणीच्या लोकांवर दर्शवलेला विश्वास नंतर बदलला खरा. पण तरीही ... तिच्या एका मुलाखतीतला हा भाग -

प्रश्न - हल्ली सगळे स्त्रीवादाच्या परेडमध्ये सामील होत आहेत. उदाहरणार्थ, पश्चिम जर्मनीतली सध्या वाढणाऱ्या शांतता चळवळीत काही स्त्रियाही आहेत, ज्या स्त्रीवादी असण्याच्या झेंड्याखाली जमा झाल्या आहेत; उदा. "उद्याचं जग आपल्या मुलांसाठी वाचवू पाहणाऱ्या माता", "आयुष्यधारक स्त्रिया" (Women, the bearer of life) आणि अगदी, "निसर्गाशी पुरुषांपेक्षा जास्त एकरूप होणाऱ्या स्त्रिया" - म्हणजे जसं काही पुरुष स्वभावानेच 'नासपाडे' असतात.

सिमोन - हे बिनबुडाचं आहे! बिनबुडाचं कारण स्त्रियांनी शांततेसाठी लढा देताना माणूस म्हणून लढलं पाहिजे, स्त्री म्हणून नाही. या प्रकारचं विधान अर्थहीन आहे; स्त्रिया जर माता असतील तर पुरुष पिता आहेत. असो, आत्तापर्यंत बाकी काही नाही तर स्त्रिया मुलं वाढवण्याच्या क्षमतेला फार चिकटून बसल्या होत्या, त्यांची 'मातृत्वाची उपज्ञा' (maternal instinct) हा तर स्त्रियांच्या भूमिकेच्या दैवतीकरणाचा नवा अवतार आहे. याला पहिलं प्राधान्य असू नये. पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही लढू शकतात जेणेकरून पुढच्या पिढ्यांना त्यांचं आयुष्य वेचायला लागू नये. पण मग त्यात त्या स्त्रिया किंवा माता असण्याचा काही संबंध नाही. थोडक्यात, लोकांनी स्त्रियांना स्त्रीत्व किंवा त्यांच्या मातृत्वाची शपथ घालून शांततेसाठी लढा द्यायला प्रोत्साहन दिलं तरीही स्त्रियांनी हे 'स्त्रीत्वा'चा कारण देऊन लढा देणं थांबवलं पाहिजे. स्त्रियांना त्यांच्या गर्भाशयापुरतं मर्यादित ठेवण्याची ही पुरुषी क्लृप्ती आहे. तुम्ही इंदिरा गांधी, गोल्डा मायर, श्रीमती थॅचर आणि इतर उदाहरणं पाहू शकता. त्या काही अचानक शांतता आणि दयेचा संदेश देणाऱ्या संत बनल्या नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद वाचला. अगदी बेसिकातच घोळ दिसतोय.

१. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याशी कसे वागतात यात तुमचे स्वतःचे परस्परसंबंधातील यशापयशही अवलंबून आहे याचा विसर पडलेला दिसतो. (प्रतिसादातील अनेक उदाहरण कोणत्याही लिंगाला, नात्याला लागू पडतील अशी आहेत.)
२. कार्यकारण भाव- आज समाजात स्त्री-पुरुष संबंध जे काही आहेत त्याला आज(वर) जी काही लिंग समानता-असमानता आहे ती ही कारणीभूत आहे.
३. (तुमच्या परिचयाच्या) एखाद दुसर्‍या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा अन स्त्रीवाद या चळवळीचा जोडलेला बादरायण संबंध गमतीदार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

स्त्रीवाद चळवळीचा आणी सर्वसामान्य रोज दिसणार्‍या स्त्रियांचा काही संबंध नाही हे खरे आहे. Smile त्याच्याशी सहमत.
वागणुकीचा मुद्दा सगळ्यांना लागू होतो हेही अगदी खरे. पण पुरुष चळवळ करत नाहीत कारण ते सत्ता व स्वातंत्र्य मिळवतात (किंबहुना ते असल्यासारखेच वागतात).
वर दिलेल्या वागणुकीच्या उदाहरणात तसे दिसत नाही एवढेच. दुसर्‍यावर, भावनिक असो वा आणखी कोणत्याही प्रकारची, डिपेंडन्सी असेल तर स्वातंत्र्याला बायबाय करावा.
प्रत्येक गोष्ट नॅगिंग करुन मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीवाद चळवळीचा आणी सर्वसामान्य रोज दिसणार्‍या स्त्रियांचा काही संबंध नाही हे खरे आहे

मुद्दा ३ निसटला वाटतं. तुम्हाला रोज दिसणार्‍या स्त्रिया एकाच प्रकारच्या असतील तर तो दोष समस्त स्त्रीवर्गाचा नाही. (अन स्त्रीवाद चळवळीत केवळ स्त्रीयाच येतात असेही नाही.) असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

बुलेट पॉईंटला मुद्दा म्हणू नका राव. म्हणे एखाद-दोन :-). माझ्या हवेतल्या गप्पांना खोडून काढणारी स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स असती तर मुद्दा म्हटलं असतं. तुम्ही तर आणखी हवेत गेलात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही स्टॅटिष्टीक द्या मग आम्ही खोडणारी श्टीक्स देऊ. तुम्ही हवेत गप्पा मारताय आम्ही फक्त त्यातील हवा काढून घेतोय, तेव्हढं पुरेसं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

अगा बाबौ! ८३ प्रतिसाद !धुव्वाधुव्वी ! गरीबाची कीर्ती दिगंत झाली !
"मै तेरी हातोंपे कुर्बान , वाह क्या मारे हैं तीर,
के हर दहाने-जख्म* मुहसे "मरहबा" कहनेको हैं
!
दहाने-जख्म: जखमेचे तोंड

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आता तुम्ही आरतीच तशी निवडलीत ना!

तुम्ही जर "गरूडावर बैसोनिऽऽऽ" असा सूर आळवलांत तर मग,
"स्त्रीचा कैवारी आला!!" हे चोहोबाजूने उमटणारच ना!! त्यात ऐसीकरांचा काय दोष?
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मिलिंदजी गरुडावरुन कोण येतो? - विष्णु.
विष्णुचे वस्त्र असते? - पीतांबर
म्हणजे आपले पिडांच गरुडावर बसुन आलेले आहेत ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्षत सकळ मंगळी / स्त्री-द्वेष्ट्यांची मांदियाळी
उतरून भूमंडळी / भेटली भूते !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ल्यूस इरिगारायची भाषाविषयक मुक्ताफळे अजून पहायची असतील तर इथे पाहता येतील.

https://monoskop.org/images/5/53/Sokal_Alan_Bricmont_Jean_Fashionable_No...

पान क्र. १०६ ते १२४ पहा.

आणि लेखात तिचा उल्लेख आलेला आहे म्हणून तिच्याबद्दल "चरचा तर होनारच." तस्मात रिकामडोक्यांनी भावना दुखावल्या वगैरे रडत बसू नये. किंवा रादर रडावे, कारण डोक्यावर पडलेल्यांची तळी उचलणारेही डोक्यावर पडलेलेच असतात. त्यांच्या चाळ्यांमुळे फुकट इतरांची करमणूक होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तस्मात रिकामडोक्यांनी भावना दुखावल्या वगैरे रडत बसू नये. किंवा रादर रडावे, कारण डोक्यावर पडलेल्यांची तळी उचलणारेही डोक्यावर पडलेलेच असतात. त्यांच्या चाळ्यांमुळे फुकट इतरांची करमणूक होते.

हो ना मेले! किती नाटकं करतात. रडून संस्थळं सोडून काय जातात, धागेच काय उडवतात! किती रडावं एखाद्याने काय लिमिटचं नाय! जाऊ द्या, आपण आपलं दुर्लक्षचं करावं अन काय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

सॉरी हां तुमच्या भावना दुखावल्या. पण बादरायण संबंध आणि गरळ यांचे एकीकरण करून अल्पच प्रतिसादांत जी करमणूक करून दिलीत त्याबद्दल मंडळ आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील पुस्तकाचा लेखक व तत्सम लोक हे "humorless scientistic pedants who correct grammatical errors in love letters" अस्तात हे वाचून मजा आलि.
३१३ पाने वाचाय्ला वेळ लागेलच . पण दुव्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

स्त्रिया(काही अपवाद) आणि स्त्रीवादी लोक जाम डोक्यात जातात.
रामायण स्त्रीमुळे घडले,महाभारत स्त्रीमुळे घडले.
शिवाय घराघरांमध्ये होणार्या कलहांचे मूळ या स्त्रियाच असतात,एकमेकींशी फालतू निरर्थक चर्चा करत बसतात मग काडीला काडी लागते आणि पुरूषलोक एकमेकांची डोकी फोडत बसतात.
एकत्र कुटूंबामध्ये फाटे फोडण्यामध्ये स्त्रीचा मोठा हात असतो,
सासूला छळणारी सून किंवा सूनेला छळणारी सासू ही देखील एक स्त्रीच आहे,मीठ-मसाला लावून नवर्याचे/मुलाचे कान भरून काड्या सारणारी स्त्रीच असते.
फुक्कटच्या बाजारगप्पा आहेत सगळ्या!
एखादी सुशील,समजूतदार,कमी बोलणारी,कटकट न करणारी,फालतू हट्ट न करणारी,नखरे न करणारी,इकडचे तिकडे न करणारी स्त्री आयुष्यात कधी भेटलीच तर तिच्या पायावर लोटांगण घालेन म्हणतो!
.
.
(मी स्त्रीविरोधी नाही,फक्त वास्तव सांगितले,काहींना रूचणार नाही पण सत्य कटू असते.आणि पुरूषी मानसिकता म्हणून कोणी ढोल पिटणार असतील तर जरूर पिटा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

हनमानाने रामायणात मारल्या नसतील त्याही पेक्षा मोठाला तर्काच्या उड्या पाहून करमणूक झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

पाने