"विजय असो , विजय असो !"

भुरुभुरु बर्फ पडत असताना
परग्रहावरून आलेल्या विजीगिषु जमातीसारखे
भारीतले पायघोळ काळे लोकर-कोट घालून
भारतीय संगणक अभियंते झपझप सर्वत्र फिरतात .
फ़ाइव्ह स्टार ऑफिस बिल्डींग च्या दारात
"ही बिल्डिंग विकत घ्यायला मी आलोय" असा
त्यांचा आवेश, त्यांचा आवेग असतो . भारतातूनच ते
उत्तम अमेरिकन उच्चार शिकून आलेले असतात . गोऱ्या
रिसेप्शनिस्ट बायकांना ते कॉफी आणायला सांगतात
(त्या चिडतात !) . आपल्या गोऱ्या सहकाऱ्यांना ते भारतीय
जेवायला नेतात, शुद्ध शाकाहारी ऑर्डर देतात व
भारतीय पाककलेवर बौद्धिक घेतात , अर्थव्यवस्थेवरही.
"असेच चालू राहिले " तर
भारत काही वर्षात अमेरिकेला "टारेल"
असे त्यांचे विवेचन असते .
अभिनिवेश पाहून मी खुश होतो व
स्वप्ने रंगवीत व्हिस्की पितो !
विजीगिषु , युयुत्सु , चंद्रगामी हिंदू संस्कृती !
विजय असो , विजय असो !
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाही हो आमच्या ऑफीसातले सर्वच्या सर्व भारतिय किंचीत कळकट, बरेचसे दीन-गरीब आणि मनाने चांगले पण सेक्युरिटी कॉन्शस आहेत. कोणी बिल्डिंग विकत घेण्याच्या आवेशात दिसत नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कल्पना तशी चांगली आहे. पण चंद्रमा तर बेचारा दुसर्याच्या प्रकाशाने चमकतो. सूर्यगामी लिहिले असते तर विकत घेण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न शक्य होता...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विविध विषय विविध धागे , सगले तितकेच रोचक. हां पहिला प्रतिसाद तुमच्या लिखाणाला पण शेवटचा नाही बरंका अजुन खुप लिहायच आहे बघू जशी सवड, इशय अन वेळ मिळेल तसं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

इशय अन वेळ मिळेल तसं...

चुकून 'इश्य' वाचलं. रेड बुलचा परिणाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.