"झिझेक-ग्रस्त बदकाची कैफियत"

जो हा स्लावोजू झिझकू/ काय सांगे काय ऐकू
कसा पामरे विवेकु / ठेवावा तो?
क्रांती फेल गेली म्हणे /कशामुळे नच जाणे
किंवा त्याच्या विश्लेषणे / मेंदूस फोडी
साम्यवादा शिव्या देई/ पून्जीवादही मान्य नाही
अधले-मधले त्यांच्या काही/ असे म्हणे अपूर्णच
म्हणे मधले हे युग/ बघायचे आपले भाग
साक्षीदार म्हणुनी जाग / केवळ आता सुमित्रा!
पुंजीवाद समर्थक/ प्रचार त्यांचा भ्रामक
"करतील जर शासक / पुनर्वाटप संपत्तीचे
हुकुमशाही त्याने येई/ न्याय सुद्धा होत नाही
गरिबाचे भाग्य काही / बदलत नाही त्यामुळे"
म्हणे याचा प्रतिवाद / कसा करशील तेच सांग
सिद्धान्ताचेही अंग / नीट मांडी त्यामधे
हेच मजला येत असते / मीच पुस्तक लिहिले नसते?
पोटावरी केले असते / खर्च तेही डॉलर
वाचून वाचून झिझेके/ बदकाचा त्या मेंदू दुखे
त्यापेक्षा आता सुखे/ बंद करितो पुस्तक!
: बदक

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

अर्ध्या कच्च्या - अर्ध्या पक्क्या मड्क्यावरची ही कविता तुमची सो फार बेस्टेस्ट!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदकाचा आवाज क्वॅक आणि क्वॅकरीला असलेला निराळा अर्थ, असा काही प्रकार आहे का?

झिझेकचं काहीही वाचलेलं नाही; थेट कवितात्मक समीक्षा/टीका असं काही वाचायचं म्हणजे बाऊन्सर होतोय हा. किमान काही प्राथमिक वाचनासाठी लिंका किंवा पुस्तकांची नावं सांगाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही . मी अनेकदा "बदक" किंवा "बदक-शाह (रंगीले)" या नावाने कविता लिहितो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

इथून सुरुवात करणे :
https://www.youtube.com/watch?v=ShJiiMqEsgA
मग यू-ट्यूब वर शेजारी त्याचे अनेक व्हिदिओ दिसतीलच , त्यातला तुम्हाला कोणता रोचक वाटतोय त्याप्रमाणे पाहणे . सध्याच्या सिरियन निर्वासित समस्येवर त्याची भाष्ये मनोरंजक आहेत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me