"अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला"
अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला
वाइन थोडी चढली , चंद्र धुंद झाला
पलीकडच्या कोपऱ्यामधला रुंद छातीवाला
सूट बूट दाढीदिक्षित गोरा नजरी आला!
"कोण ग तो?" विचारे ती प्रिय मैत्रिणीला ,
"मार्केटिंग चा नवा व्हीपी , कालच रुजू झाला,
"येल" मधला एमबीए, गोल्ड मेडल वाला
"मार्क" असे नाव त्याचे , बॉस्टनवरून आला.
लाल लाल असे त्याची नवी लोम्बार्घिनी,
हातामधले घड्याळ जणू आय-पॅड मिनी ,
भले थोरले "डील" दिले, पर्क्स आणि मनी ,
आणि नसे गर्लफ्रेंड , गोरी किंवा चिनी"
अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला
बायोडेटा ऐकून चंद्र महा धुंद झाला,
"आता कमाल बघ माझी" म्हणे मैत्रिणीला
वरची दोन बटणे सोडी, शर्ट ढीला झाला.
हळू हळू सरकू लागे ती त्याच्या दिशेला,
दोन तीन पाय, अंगठे शिव्या देती तिला,
तीन-चार वाइन पेले धक्का खाऊन पडले,
सगळे मेले दारुवाले वाटे मध्ये नडले!
अखेर जेंव्हा पोचली ती आपल्या "मार्क" वरती,
धुंद होता चंद्र तिचा , धुंद होती धरती,
"हाय मार्क, आय एम लीना !" हात पुढे केला,
"ओ हलो !" मार्क म्हणे " "मार्क" म्हणती मला!"
"काय करता तुम्ही, कुठे आहे तुमचे गाव,
हा माझा जोडीदार, क्लार्क त्याचे नाव,
नुकतेच केले लग्न आम्ही, नव्या कायद्याखाली.
कमाल आहे, अचानक ही निघूनच का गेली?"
नव्या नव्या स्वर्गांमध्ये नव्या शोकांतिका,
तळ्यामधून "बदक" म्हणे "दूर राहून बघा"!
---
प्रतिक्रिया
कल्पना लगेचच आली होती. पण छान
कल्पना लगेचच आली होती. पण छान आहे. आवडली.
हाहाहा! मस्तच. तुमच्या
हाहाहा! मस्तच. तुमच्या यमकबद्ध कवितांना निराळीच खुमारी आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
खिक अंदाज आधीच आलेला पण
खिक
अंदाज आधीच आलेला पण कवितेचा घाट आवडला!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मस्तं!
मस्तं!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अच्छा. येलच्या कुलुपाला
अच्छा. येलच्या कुलुपाला निराळीच किल्ली लागली तर.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अर्र उत्क्रांतीला नव्याने खीळ
अर्र उत्क्रांतीला नव्याने खीळ की हो बसली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बघ ना. उगंच त्या धाग्यावर
बघ ना. उगंच त्या धाग्यावर गोंधळ घालून घेतला.
तिने
तिनेही शोधिली असती अशी कुणी बाला
मुळांत, 'येल-गार' करावाच नसता लागला
हाय हाय
कविता तुझी वाचुन मिलिन्द कलिजा खल्लास झाला
त्या इंडियन बालेसाठी माझा उर भरुन आला.
An archaeologist is the best
वा म्हणजे बायकोला इन्टरेस्ट त्याच पुरुषात रहाणार हे गृहीत धरलय
ए नॉय चॉलबे.
कमाल है भई
आता अगाथा ख्रिस्तीच्या विधानांची जबाबदारी आमच्या शिरावर आहे का ?
आम्ही कोट चा शिरा बघितला फक्त बाकी काय जबाबदारी नाही हो आमच्या
शिरावर. म्हणुनशानी नाव पण दिल की.
मला वाटते बायकोला
ऑप्शन्स काय उरणार जसे वय वाढेल याचा विचार आगाथा नामक सुज्ञ कल्पक हुशार यशस्वी स्त्रीने नक्कीच करून विधान केले असणार
actions not reactions..!...!
अगाथाबाईंचा नवरा सर मॅक्स
अगाथाबाईंचा नवरा सर मॅक्स मॅलोव्हान आर्कियोलॉजिस्ट होता. त्यासंदर्भात हे वाक्य आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मस्त छान माहीती.
मस्त छान माहीती.
मैत्रिणीने लिनाची मस्तच गम्मत केली की
actions not reactions..!...!
(No subject)
हाहा!
मजेदार आहे.
(लय चांगली जमली आहे, ही पोच.)
विथ फ्रेन्डस लाईक दीज....
महत्वाचं सोडून बाकीची सारी माहिती देणारी ती मैत्रिण म्हणायची की वैरीण?

फरक असतोय होय?
फरक असतोय होय?