"तातू, डुकऱ्या आणि बकबक"

तातू, डुकऱ्या आणि बकबक एकवीरा देवीच्या देवळाकडे चालले असताना शेजारून कुंपणातून तुपेवकिलांचा रॉनी कुत्रा त्यांच्यावर भडभडा ओरडला त्यातील अनेक शिव्या तातूला अजिबात पटल्या नाहीत तातूने भयानक गोटा उचलला जाऊ दे रे हा कुत्रा चांगला आहे मुलींवर भुंकत नाही बकबक म्हणाला अरे हा एकदम भेंचोत कुत्रा आहे भेंचोत परवा शांताक्काला चावला शांताक्का जाडी आहे रे बकबक म्हणाला अरे पुरणपोळ्या काय फसक्लास बनवते चीकण पण तातूने झापकन गोटा रॉनीला हाणला रॉनी केकाटत बाकाखाली लपला मागून तुपेवकिलांनी तातू व डुकऱ्याची मानगूट धरून फरफटत कोंडून ठेवले बकबक पळत सुटला व डुकऱ्याच्या आईला जाऊन भेटला फोन ऐकून तातूचे वडील सॉरी म्हणत त्याला दोन कानाखाली देत घेऊन गेले त्या गाढवाला आणायला मी अजिबात जाणार नाही त्या नालायक तुप्याचे पाय धरायला डुकऱ्याचे वडील म्हणाले डुकऱ्याची आई रडू लागली अन्तामामा बकबक डुकऱ्याला घेऊन आले हे शेवटचे समजा यानंतर पोलिसात देईन पोलिसात तुपेवकील म्हणाले तातूने शांताक्काचा घेतलेला सूड वस्त्यांमध्ये पसरला कामवाल्या बाया तातूला मटण,कोळंबी,अंड्याच्या पोळ्या देऊ लागल्या तातू वस्तीची कामे करू लागला मोठा झाला त्याची दाभण नजर मेहता साहेबांनी हेरली तातूचा तात्यासाहेब देशमुख मुख्यमंत्री झाला तेंव्हा त्याने डुकऱ्यास गृहमंत्रीपद दिले शांताक्का पांढरे केस व पातळ नेसून त्याच्या मुंबईच्या बंगल्याची बॉस बनली सर्व लोकांनी मागच्या खोलीत तिला दिलेले पैसे ती मोठ्या खाकी पिशवीत जमवून गोद्रेजमध्ये ठेवते स्वैपाकही करते रॉनी कुत्र्याचे वृद्धापकाळाने निधन झाले बकबक मात्र वडिलाची पिठाची गिरणी चालवितो ह्या कोण जाणार त्या बेकार मुंबईत म्हणत म्हणत तोंडाचे पीठ पुसतो अशी गोष्ट.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मजेशीर आहे. खूप हसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0