SoulMates - Thomas Moore

या पुस्तकातील आवडलेले भाग माझ्या शब्दात याच धाग्यावर देत राहीन. याच धाग्याचे संपादन करेन

______
"Spirituality & Detachment" -
अनुरक्तता - ओढ - आकर्षण - आणि त्यातून नाते निर्माण होते. या झाल्या नाते जुळणी च्या पायर्‍या.
परंतु हळूहळू नात्यात साचेबद्धपणा, तोचतोचपणा येतो, एकमेकांपासून दूर जाण्याची, स्वातंत्र्य उपभोगण्याची मनीषा निर्माण होते. एकमेकांचा कंटाळ येतो असे नाही पण स्वातंत्र्याकडे मन ओढा घेउ लागते. हे जे मनाचे मूड्स आहेत, मनाचे longing आहे, त्याबद्दल Thomas Moore काय म्हणतात. एक निष्णात लेखक याबद्दल काय म्हणतो हे पहाणे रोचक ठरते. मूर म्हणतात, मनाला essentially , जोड, लळा , attachment हवी असते. परंतु एक भाग असाही असतो ज्याला अतिबद्धतेपासून सुटका हवी असते. मग हे कसे? तर ते ग्रीक पुराणातील एक अतीव सुंदर कहाणी सांगतात.
.

http://www.jwwaterhouse.com/paintings/images/waterhouse_apollo_and_daphne.jpg
.
Diana म्हणजे Artemis ही कुमारी देवता. ही उंच आहे. तिची ऊंची ही आत्मिक उन्नतीची ओढ, spiritual longing दर्शविते. समाजापासून फटकून वागणारी, एकांतातील , जंगलातील जीवन पसंत करणारी. तिची मुलगी Daphne ही सुद्धा आईसारखीच, सुंदर स्त्री. पण ही अधिक स्वच्छंद, मुक्त, मनस्वी, रानोमाळ भटकणारी. निसर्गाच्या सान्निध्यात काळ व्यतीत करणारी.

Daphne shares the great Goddess's mobility, spirit of adventure, solitary ways, exclusive femininity and virginity, chaste beauty & tendency to retreat from human contact.


हे जे Daphne चे अनाघ्रात आणि नात्यापासून दुराव्याचे गुणविशेष आहेत हे म्हणजे व्यक्तीचे आत्मिक रूप. attachment च्या जंजाळा पासून मुक्त अशी जिजीविषा किंवा longing .
अपोलो हा महापराक्रमी देव आहे. खरं तर तो Diana चा भाउ म्हणजे Daphne चा मामा आहे. याच्याकडे काय नाही? तो पंडीत आहे, त्याने संगीताचा शोध लावलेला आहे, तो वैद्यकशास्त्र जाणतो. अर्थात भौतिक जगाचे "पांडित्य -कला-ज्ञान" यांचा तो परिपाक आहे. त्याचे मन Daphne वरती येते. तो अनुरक्त होतो व तिचा पाठलाग करू लागतो. पण ती मात्र दूर पळते. apollo मूर्तीमंत भौतिक कर्तुत्व , महत्त्वाकांक्षा आहे तर Daphne मूर्तीमंत आत्मिक समाधान , शांती आहे. ग्रीक पुराणातील या कथेचा अर्थ अनेक लेखक, विद्वानांनी या दोन वृत्तींमधील द्वंद्व असा लावला आहे .

कोणत्याही रोमॅन्टिक नात्यामध्ये स्वातंत्र्य आणि प्रेम यांच्यात द्वंद्वच असते, रस्सीखेच असते त्याचे ही गोष्ट प्रतीक आहे. The story speaks of many dimensions of life.One way to look at it is to see Daphne as the virgin soul fleeing from the spirit of cultural, Appolonic achievements of intellect, art & even healing.


मनाच्या मागण्या अजब असतात. कधीकधी तर मनाला स्वातंत्र्य इतके हवेसे वाटते की मन healing ही नाकारते. उदा - एक मित्र आहे जो आपल्या भल्याचाच सल्ला देतो, आपण न सांगताही त्याला सारे कळते. पण हे आपल्याला जाचक वाटते. मला तुझा सल्ला नको असे आपण सांगतो. कारण आपल्याला बद्धता नको असते, स्वातंत्र्य हवे असते.
.
Daphne जितकी दूर पळते तितकी ती Apollo ला आकर्षक, हवीशी भासते. Apollo पाठलाग करतो. शेवटी Daphne थकून जाते व त्याच्या कक्षेत येते. तिला कळते Apollo तिला कह्यात घेणार तेव्हा ती तिच्या वडीलांचा नद्यांचा देव Ladon यांचा धावा करते. तिचा धावा ऐकून Ladon तिचे रुपांतर वृक्षात करतात. आणि तरीही ............ कथेचा अतिशय सुंदर भाग म्हणजे, Apollo ला Daphne त्या रूपातही आवडते. It's a brilliant brilliant story!!!

Norman O Brown points out, an illusion to sublimation in the Freudian sense : changing of sexual impulse into artistic. Our desires for literal experience like lust may be fulfilled unexpectedly at a more refined level.


.
Thomas Moore म्हणतात प्रत्येक जोडप्याची ही जी साहचर्य मिळवण्याची तडजोड असते ही खोल प्रतालावरती, एकमेकांबरोबर मिळणार्या भौतिक (महत्त्वाकांक्षा, स्वप्ने, भौतिक सुख, यांची Upward flight Or Yearning ) आणि एकांतात स्वतःबरोबर मिळणार्‍या आत्मिक शांती, समाधान (Downward need ) यांतील द्वंद्व असते.

Our resistance to attachment might come from the place in us that wants our lives to be clear & ordered, morally clean, unfettered, essentially virgin .

किती सुंदर विचार आहे. काव्यमय , अतिशय भेदक आणि intuitive पातळीवर अगदी पटणारा. या वाक्यावर मी टोटल फिदा झाले.
.
Moore म्हणतात Daphne जरी वृक्ष झाली तरी त्या वृक्षाच्या फांद्या या स्वर्गाकडे झेपावणार्‍या, प्रार्थानेकरता हात उंचावलेल्याच राहिल्या. Apollo ला हे स्वीकारावे लागले. आणि तरी तो तिच्यावर प्रेम करत राहिला. अर्थात हे प्रत्येक व्यक्तीतील, मानवी स्वभावातील द्वंद्व आहे , paradox (विरोधाभास)आणि हा विरोधाभास embrace करुनच एक एकीकृत आयुष्य जगता येते. ना आत्मिक ना भौतिक ना लळा ना दुरावा कोणत्याच एका गुणविशेषाला महत्त्व देता येत नाही, तसे दिले तर असंतुलन होते.
__________________________________________________________________________________________________

दुसरी कथा

__________________________________________________________________________________________________
याच पुस्तकातील "The magic & alchemy of marriage " हे अजून एक जादूचे आणि भेदक ( insightful ) प्रकरण. हे प्रकरण "विवाह" या विषयाला अर्थात वाहिलेले आहे.
.
https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/5a/a1/1d/5aa11d72d4f7da1b59a02a4822e16145.jpg
.
आपण पहातो अनेकानेक विवाह इतके दु:खदायक, वेदनामय आणि अपयशी ठरतात की मंतरलेल्या, काव्यमय दृष्टीने त्यांच्याकडे बघताच येत नाही. विवाहात काही जादू असेल हे मनाला पटतच नाही. काव्य शोधून विवाहाचे गौरवीकरण करणे निव्वळ अशक्य होउन बसते.
.

It's more difficult to look at marriage as we actually experience it taking note of it's deep fantasies , it's hidden emotions & it's place in the life of the soul : not looking for perfection but asking what the soul is doing when it entices us toward such a demanding form of relationship.


आणि मग रुक्ष , तर्कशुद्ध शास्त्रीय प्रेरणान्मधुन लग्न या विषयाचा शोध घेण्याऐवजी, लेखक एका लोककथेमधुन आपला अद्भुत प्रवास घडवून आणतो. ही लोककथा आहे न्यू मेक्सिकोमधील Cochiti लोकांमध्ये प्रचलित असलेली. लोककथा अथवा दंतकथा या थेट संवाद साधत नाहीत, सल्ले देत नाहीत तर त्यांच्यातील प्रतिकात्मक अर्थ मानसिक पातळीवरून जाणून घ्यावा लागतो.
.
एक गरीब घरात जन्माला आलेली मुलगी असते.जी चरख्यावरती सूत विणत असे.ती सुंदर कपडे विणण्यात इतकी निष्णात होती की पंचक्रोशी मध्ये तिचे नाव झाले. गावातील अनेक उपवर तरुण तिला मागणी घालत. पण ती फक्त तन्मयतेने आपले विणकाम करत असे. तरुण म्हणत मी तुझ्या पायाशी अमके आणून टाकेन, तमक्याची रास रचेन पण ती काही चरख्यावरुन आपली नजर हलवत नसे.
लेखक म्हणतो ही जी विणकाम कला आहे ते प्रतिक आहे प्रत्येक व्यक्तीमधील एकमेव कौशल्याचे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी एकमेव, अतुलनीय असे कौशल्य, कला, गुण असतो. तो अगदी फार भव्यदिव्यच पाहिजे असे नाही तर लहानसेही असू शकतो. विवाह होण्यापूर्वी या स्वत:च्या वेगळेपणाचे आत्मभान जाणीवेच्या पातळीवर झालेले असणे आवश्यक असते. आता विणकाम हेच प्रतिक का तर -

A person too is woven from many influences, many fateful events and many raw thematic materials.


विवाह हा फक्त त्या दोन व्यक्तीन पुरता मर्यादित नसून, तर ती एक सामाजिक विण असते. कुटुंबाची , शेजार्‍यांची, समाजाची विण म्हणता येईल.

The soul is com-plicated, a word whose literal meaning is "woven together. Marriage itself is a kind of weaving, not only of two individuals, but of every aspect of personal, social & even cosmic life."


लेखकाचे हे सर्व बोलणे मला तरी आत्तापर्यंत एक मस्त लावलेले निरर्थक पाल्हाळ (spinning yarn )वाटत होते पण खरा जादूचा भाग आणि तितकाच मंतरलेला अर्थ आता येतो आहे.
कोयोटे हा प्राणी नेटिव्ह अमेरिकन लोककथांमध्ये नेहमी असतो. याचे वैशिष्ट्य हे की तो खोडकर आणि बुद्धीमान आहे. तर कोयोटेच्या नजरेस ही मुलगी पडते व त्याचे मन तिच्यावर येते. कोयोटे म्हणतो मी हिला माझी बायको नाही केली तर नावाचा कोयोटे नाही. तो रानात जाउन मूठभर काळ्या मनुका गोळा करतो. अंगावर मनुष्याचा वेश परिधान करतो. पण पाय तर उघडेच म्हणून ४ वेळा जमिनीवर पायाचा आघात करून, जादूने हरणाच्या कातड्याचे बूट निर्माण करतो. व मनाशीच म्हणतो "हां आता कसा मी देखणा, राजबिंडा दिसतो आहे."
आता याचा प्रतिकात्मक अर्थ पहायला गेले तर विवाह ही जरी अतिशय mundane , व्यावहारिक, रुक्ष पातळीवरची गोष्ट असली तरी कोयोटे हा जादूगार दाखविला आहे.कोणत्याही सामीप्यात, मिलनात एक जादूचे अंग आवश्यकच असते.

Marriage is accomplished not only by design and will but also by grace and magic. This mythical story also reveals that marriage is also more mysterious that it is a strange but fulfilling union with the world of dream and fantasy. Genuine marriage takes place in the realm that is not identical with outward life: our soul partner is always of another species - an angel, animal or phantom .


हा कोयोटे गावात मध्यभागी जातो व डाव्या हातात मूठभर मनुका धरून नृत्य करतो जे पाहून ती मुलगी मंत्रमुग्ध होते व त्याच्याकडे मनुकांची मागणी करते. ज्या की कोयोटे आनंदाने देतो व तिच्याबरोबर तिच्या घरी जातो. पुढे कालांतराने तिला बाळे होतात.
लेखकाच्या मते अनेक तरुणे हे त्या मुलीच्या पायाशी धन-दौलत-कातडी-शिंगे अशा नानाविध भौतिक वस्तूंची रास ओतण्यास तयार असतात पण तिला मोह पडतो क्षुल्लकशा मनुकांचा.

In this story,the ultimate seduction is not accomplished by something obvious, rather it's achieved by what is dark, sweet & in the seed form rather than fully matured. We are drawn into intimacies by possibilities rather than by realities.


अर्थात ती मुलगी म्हणजे आपणच विवाह किंवा स्त्री-पुरुष मिलनात बीजाकडे, संधीकडे आकृष्ट होतो. मौल्यवान पण निर्जीव वास्तविक गोष्टींकडे नाही.
हे काळ्या मनुकांचे प्रतीक मला फारच आकर्षक वाटले.

In marriage we may not all need a fully functioning home, several children, a hefty bank account. These human goals may even stand in the way of more mysterious needs of the soul for an interior home.


पुढे एकदा कोयोटे तिला व त्यांच्या बाळांना घेउन रानातील एका ढोलीपाशी जातो व तिला आत येण्यास सांगतो . मुलगी म्हणते आपण एवढे सारजण या इवल्याशा ढोलीत कसे मावणार? तो सांगतो "मावू" व बाळांना घेउन आत शिरतो. मुलगी आत डोकावून पहाते. तिला ते घर अतिशय आवडते. ती आत जाते व सारेजण सुखाने रहातात.
शेवटचे प्रतिक आहे झाडाची ढोल. तर कोयोटे त्या मुलीला त्याच्या बायकोला आपल्या गर्भ गृहात , अंतरंगात प्रवेश देतो. तिला तिचे "घर" देतो.

In several places in his writing, Jung discusses the "little people" - gnomes, dactyls,elves, Tom thumbs - the ones who do the work of soul. The soul of marriage is no exception : it is created by small acts, small words, and small everyday interactions.


या सर्व प्रतिकात्मकतेमुळे तसेच "विवाह" या प्रचंड अवघड विषयाचे जादूमय कथेत रुपंतर केल्यामुळे ही कथाही मला आवडून गेली.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मला वाटतं अतिशय आवडणारी पुस्तके ही मित्रासारखी असतात. योग्य वेळी आपली समजूत घालायला, पाठीवरुन हात फिरवायला येतात. I am not sure SoulMates - Thomas Moore is not one of them. किंबहुना हे पुस्तक वाचताना अतिशय मेडिटेटिव्ह अनुभव येतो आहे. योग्य वेळी हे पुस्तक माझ्याकडे झेपावले आहे. I am grateful to God for this book's revisit.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thomas Moore म्हणतात प्रत्येक जोडप्याची ही जी साहचर्य मिळवण्याची तडजोड असते ही खोल प्रतालावरती, एकमेकांबरोबर मिळणार्या भौतिक (महत्त्वाकांक्षा, स्वप्ने, भौतिक सुख, यांची Upward flight Or Yearning ) आणि एकांतात स्वतःबरोबर मिळणार्‍या आत्मिक शांती, समाधान (Downward need ) यांतील द्वंद्व असते.
हे डोक्यावरुन गेलं पुर्ण
साहचर्य मिळवण्याची तड़जोड केल्यावर मग पुन्हा द्वंद्व कसे शिल्लक राहते ?
स्वत:बरोबर आत्मिक शांती मिळत असेल तर ती डाउनवर्ड नीड कशी ?
माफ करा तरलतेची चिरफाड करु नये पण कळल नाही म्हणुन विचारतोय.
हे म्हणजे एकीकडे
कौन आयेगा यहॉ कोइ ना आया होगा
मेरा दरवाजा हवाओ ने हिलाया होगा.
साहचर्याची अपेक्षा
दुसरीकडे
आज पुरानी राहोसे कोई मुझे आवाज न दे
अस एकाच वेळेस शक्य आहे पण ते वेअर्ड वाटत पण मग माणुस आणी त्याच मन हे
वेअर्डच असत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कौन आयेगा यहॉ कोइ ना आया होगा
मेरा दरवाजा हवाओ ने हिलाया होगा.
साहचर्याची अपेक्षा
दुसरीकडे
आज पुरानी राहोसे कोई मुझे आवाज न दे

एका तरल आणि सूक्ष्म पातळीवरती तुम्हाला हे कळलय. Smile
.
ज्योतिषात मेष ही राशी पहीली राशी आहे. जी जन्म, उदय, मीपणा, स्व, सुरुवात दर्शविते. "मी-मी-मी". लहान बाळ जन्माला येतं तेव्हा फक्त त्याच्याभोवती जग फिरावं अशी अपेक्षा त्याची असते किंबहुना अन्य कोणाचेही अस्तित्व त्याच्या खिजगणतीतही नसते. मी-मी.
याच राशीच्या १८० अंशात येते तूळ रास. साहचर्य, पार्टनरशिप, जोडीदार, विवाहाची रास.
हा जो अक्ष आहे यावर आपली सर्वांची तारांबळ उडत असते. मेष राशीचे स्वातंत्र्य आणि तूळेची तडजोड पण तडजोडीतून मिळणारे फायदे. या अक्षावरती दोलायमान अशी आपली सर्वांचीच कसरत चाललेली असते.
.
जरुर प्रश्न विचारा. मला जमेल तशी उत्तरे देइन.
___

साहचर्य मिळवण्याची तड़जोड केल्यावर मग पुन्हा द्वंद्व कसे शिल्लक राहते ?

लग्नानंतर बायको माहेरी जावी व आपण तात्पुरते बॅचलर व्हावे वाटते की नाही Smile
तेच जास्त काळ तिकडे राहीली, की ओढ सतावते की नाही?
.
लग्न जुळल्यानंतर विवाह जसा जवळ येऊ लागतो तसतसा "cold feet" syndrome, "commitment anxiety" वाढतो अगदी अनावर होतो हे मला वाटतं बर्‍याच बर्‍याच जणांच्या पारिचयाचे असेल फक्त रामदासस्वामी नाही भल्याभल्यांची विवाहवेदीवर चढण्यापूर्वी गाळण उडते.
.
Thomas Moore यांच्या भाषेत -

If we have a strong desire to have family, live with another person, or join a community but find, after these desires have been satisfied, that we are drawn exactly to the opposite direction, then we might remember that this complexity is a simple way of soul. We may have to look for concrete ways to give life to both sides of spectrum, both enjoying our intimacies & solitude.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांचे काही ग्रह सातव्या घरात आहेत त्यांना हे पटेल कारण अनुभव. धनु राशी (स्वातंत्र्यभोक्ती रास) च्या लोकांना पटेल.
आमच्या सारखे ट्रिपल व्हॅमी (सातव्या घरात ते ही धनुत तीन तीन बिंदू/ग्रह असणारे) लोकं तर मग विचारायलाच नको. हे पुस्तक आमच्या सारख्यांसाठीच लिहीलय.
.
हा एक सुंदर उतारा . थांबा भाषांतर देते - अनेक लोक हे अवघड आणि वेदनामय अशा साहचर्यात राहून, स्वातंत्र्याच्बद्दल मनोराज्ये (फँटसीज) रंगवत असतात तर काही लोक हे एकाकी असतात पण साहचर्याची मधुर स्वप्ने रंगवितात. हे असे दोलायमान आणि दोन डगरींवर पाय ठेवणे त्रासदायक होत असते. ना इथले ना तिथले. पण दोलायमानता, हाच मनाचा स्थायीभाव आहे. In the end the only answer in all matters of soul is polytheistic one. Honor BOTH Gods!Daphne & Apollo. Pursue & Run away. Be lustful & chaste.
.
बहुतेक हे कन्या राशीच्या लोकांनाही पटेल. माझ्या ज्योतिषविषयक ज्ञानाप्रमाणे कन्येच्या लोकांमध्ये काहीतरी essentially virgin, uncontaminated असते. ज्याला लिंडा गुडमन व्हाईट फ्लेम ऑफ हार्ट म्हणते. ती म्हणते सर्वस्व अर्पण केल्यानंतरही कन्येत काहीतरी होल्ड बॅक केले जाते. काहीतरी रिझर्व्हड असते. हा डायलेमा कन्येच्या लोकांना कळेल असे वाटते. : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरी कथा टाकली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0