गुरु - मंगळ युती (ज्योतिष)

ज्यांना ज्योतिष या विषयात रस नसेल त्यांनी अन्य धाग्यावरती जावे.
इंग्रजी शब्द अति वापरले आहेत त्याबद्दल खेद आहे. पण सहजतेने जे विचार येत गेले ते तसेच्या तसे ...
प्रत्येक ललीत हे लेखकाचे आत्मचरित्रच नसते हे बरेचजण विसरतात. तेव्हा फक्त एक Reminder Wink
________________
गुरु ग्रह हा खरं तर देवांचा "गुरु" आका ग्रहांमधील - आलोकनाथ ;). -

"बुद्धीभूतं,त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीम|"

मंगळ हा ग्रहांमधील कुमारवयीन, अँग्री यंग मॅन.

"कुमारं शक्तीहस्तं च मंगलम प्रणमाम्यहम|"

तिने यापूर्वी या दोन ग्रहांकडे फारसे लक्षच दिलेनव्हते. हां शुक्र-मंगळ, शुक्र-चंद्र, शुक्र-शुक्र, चंद्र - चंद्र - अरे किती ते feminine, स्त्रैण, नाजूक, साजूक पण. आतापर्यंत तिने प्रेमाचे जे फ्लेव्हर्स अनुभवले होते ते या स्त्रैण पठडीतील. कोमल, काव्यमय, भावनिक, रोमँटीक पण हळूवार होते.
पण ग्रहांनी गोड कॉन्स्पिरसी केली कधी ते आठवत नाही, आणि she was in for Trouble with capital T. एक मनस्वी हवाहवासा chaos .
.
त्या दोघांच्यात मैत्री? - अं हं नव्हती, इन्टेलेक्च्युअल कंपॅटिबिलिटी? - निगेटिव्हच होती, भावनिक जवळीक - खूप होती. आणि लैंगिक आकर्षण - प्र-ह-चं-ड!!!होते.
तिला endless analysis करायची सवय होती. तो मात्र सर्वच गोष्टी easy घेणारा होता. ती बरेचदा बुचकळ्यात पडे, याच्या सहवासात आपण इतके उत्तेजित का होतो? याची प्रत्येक भेट, कटाक्ष त्याने पुरविलेले attention आपल्याला चढते कसे? त्याच्या भेटीनंतर अनेक दिवस टिकणारा ज्वर होय ज्वरच आपल्याला का चढतो?
.

Never know how much I love you
Never know how much I care
When you put your arms around me
I get a fever that's so hard to bear

https://www.youtube.com/watch?v=b4hXyALR9vI
.
तिने त्याला त्याची पत्रिका देण्याची विनंती केली. बघू तरी ही काय mystery आहे! ह्म्म्म! तिचे लक्ष वेधून घेतले ते त्याच्या गुरुने तिच्या मंगळाशी केलेल्या वृश्चिकेतील युतीने. खरं तर दोघे पुरुष ग्रह. पण तिला हे माहीत होते की गुरु ज्या ग्रहाबरोबर संलग्न होतो त्याचे गुण-दोष अनेकानेक पटींनी वाढवतो, magnify करतो. मंगळ हा कामेच्छेचा ग्रह. तेव्हा गुरु त्याच्या स्वभावानुसार कामेच्छा अतोनात magnify करणारच. गुरु मार्गदर्शक असतो म्हणजे मंगळ-गुरु जोडप्यात गुरु-व्यक्ती sets the tone of relationship. नात्याचा रंग, आवेग, दिशा गुरु व्यक्ती ठरवणार .... तो ठरवणार.

Lucky couple! You are likely to be more outgoing, experience an increase in your energies, especially sexual energies. Your romantic partner tends to encourage your self assertion and finds indulging in your desires very pleasurable. When the Mars persons Mar is in conjunction to the Jupiter person they brings friendly competition, energy, an interest in trying new ways to do things as well as a expansive libido into your relationship.

आणि ती जे अनुभवत होती ते तिला लख्ख्कन कळून आले. She was in for a jackpot. लैंगिक आकर्षणाचा jackpot! हे ती जे अनुभवत होती ते फक्त ज्योतिषाच्या, ग्रहांच्या भाषेत translate होत होते. जे तिला जाणवत असे, जे ती मनोमन ओळखून होती ते फक्त शब्दात मांडलेले वाचत होती. त्यांचे नाते mutually, sexually अतोनात satisfying होते. afterglow दिवसभर रेंगाळत ठेवणारे नाते.

कशि केलीस माझी दैना
रे मला तुझ्या बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना,
रे मला तुझ्या बिगर करमेना !

जेव्हा ते भेटत तेव्हा नाना तर्‍हांनी एकमेकांचे होत, एकमेकांना सुखावत. They could hardly keep hands off of each other. बरं दोन्ही ग्रहं पुरुषी असल्याने हळूवारपणा नावालाही नसे. It was a forceful, an assertive attraction of masculine nature.
.
ज्योतिषातील हे गुरु-मंगळ युती प्रकरण अभ्यासायला तिला अतिशय आवडले. Theory तर ती कोळून पीत असे. पण practical ची मजाच काही और होती. Wink आता अन्य कोणतेही नवे नाते यापुढे कंटाळवाणेच होणार होता. एवढी जादू घडून गेलेली होती.त्यांच्या नात्याला गाण्यात बद्ध करायचे असेल तर ते हेच गाणे, अगदी तंतोतंत जुळणारे, perfect! - http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Kelis_Majhi_Daina

तू हकीम हो‍उनि यावे
एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक, मिठीचा लेप, मजसि सजणा,
रे मनमोहना, मला तुझ्या बिगर करमेना !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ललित आवडले.
मानवी नातेसंबंध व व्यक्तिमत्वांची जडणघडण पंचतंत्र हितोपदेश या लोक कथांमधून सांगितली जायची. प्राणी बोलताहेत ही कल्पना किती रम्य! आजही भुभु मंडळी माझ्याशी चक्क बोलतात. ग्रहमैत्री/शैत्री ग्रहयोग अशा संकल्पनातून व फलज्योतिषाच्या माध्यमातून या बाबी प्रगट होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खूप धन्यवाद. खरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0