जुन्या आणि नव्या काळची गोष्ट

- अन्यत्र पूर्वप्रकाशित (६ वर्षापूर्वी. गेले ते दिन गेले Wink )-

लहानपणी एक मस्त गोष्ट वाचली होती काहीशी अशी की एका शेतकर्‍याची बायको अतिशय असंतुष्ट असते आणि तिला मोठं घर हवं असतं. मग शेतकरी १ युक्ती करतो त्याच्या लहान घरातच कोंबड्या, बकर्‍या, गाय आणून बांधतो. खूप दिवस जातात बायको त्रागा करते करते पण शेवटी रुळते. असह्य दुर्गंधी, अजीबात जागा नसणे या गैरसोईंमध्ये दोघे रहात असतात. पुढे शेतकरी परत सगळी जनावरं गोठ्यात नेऊन बांधतो आणि बायको जाम खूष होते तिला आता तेच घर मोठं, ऐसपैस वाटू लागतं, नवरा तालेवार वाटू लागतो आणि सर्व काही आलबेल होतं.
.
गोष्ट नव्या काळातील -
.
मुलीची आई मुलीच्या खोलीमध्ये प्रवेश करते आणि भिंतीवरील मुलीच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी पाहून तिच्या पोटात खड्डा पडतो. थरथरत्या हाताने, धडधडत्या हृदयाने ती चिठ्ठी वाचू लागते.-
.
" आई, तू ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा माझ्या स्वप्नांच्या राजकुमाराबरोबर मी खूप खूप दूर गेले असेन.
खरं तर हे लिहीताना मला दु:ख होत आहे पण काय करू, राकेश शिवाय जगणं मला शक्य नाही. आमचे प्रेम अमर आहे.
राकेशला जरी गुटखा आणि दारूचे व्यसन आत्ता असले तरी मी त्याला त्यापासून सोडवेन याबद्दल तू निश्चिंत रहा.
राकेश फक्त सलमान खानसारखा दिसतच नाही तर सलमान खानसारखीच त्याच्यामध्ये लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची हिंमत आहे आणि या जगात फक्त मी हे जाणते.
मी फक्त १५ वर्षाची असले तरी मला बर्‍या वाईटाची चांगली जाण आहे. राकेश आत्ता जरी १२ वी पास असला तरी त्याला पुढे डॉक्टर होऊन एडस वर औषध शोधायचं आहे आणि त्याच्या या संशोधनात मी त्याची सहचारीण बनून साथ देणार आहे.
आम्हाला खूप मुलं हवी आहेत. आम्ही दोघं लवकरच तुझं नातवंड घेऊन येऊ तेव्हा आमचं स्वागत तू आणि बाबा कराल ना ग?
अरे हो एक सांगायचं राहीलं मी तिजोरीमधून तुझी मोहनमाळ, ठुशी आणि हीर्‍याच्या कुड्या घेऊन जात आहे नाहीतरी त्या तू मलाच दिल्या असत्यास याची मला खात्री आहे."

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

ता. क. - आई वरील सर्व गोष्टी खोट्या आहेत. मी शेजारी शुभांगीकडे गेले आहे. माझं निकालपत्र कपाटाच्या खालच्या कप्प्यात आहे. माझ्या निकालपत्राखेरीजही वाईट गोष्टी जगात आहेत हे सांगण्याकरता हा पत्रप्रपंच.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ऐसीवरील अ‍ॅव्हरेज आय क्यु च्या मानाने अगदी बालीश आहे. पण Did that stop me from publishing? Wink
.
मुख्य म्हणजे विरंगुळा म्हणुन मला ओके वाटली. म्हणुन टाकलेली आहे. दर वेळेला काय पंतोजीचा चष्मा चढवुन चर्चा करत बसायचं नाहीतर कवितेवर चर्वणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीपर बाय द डझन मधला नवीन घर दाखवण्याचा प्रसंग आठवला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंतोतंत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

हेच पत्र परंतु एका मुलाने लिहिलेले वाचले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहा..

शब्द जरा जडबंबाळ झाले आहेत. निकालपत्र वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राज्ञ परीक्षा असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

भावना पोचल्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मौजमज्जा स्पष्टीकरणासह छान.
आनंद मानण्याचा मोठा भोपळा पाठीवर बांधला की बुडायची भीती नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0