फ्यूनरल ब्लूज - डब्ल्यू. एच. ऑडेन

२१ फेब्रुवारी हा डब्ल्यू. एच. ऑडेन या कवीचा जन्मदिवस. त्या निमित्तानं त्याच्या 'फ्यूनरल ब्लूज' या कवितेचं मी केलेलं भाषांतर इथे देत आहे. मूळ कविता इथे वाचता येईल.

'फ्यूनरल ब्लूज'

थांबवा सगळी घड्याळं, बंद करा टेलिफोन
गप्प करा कुत्र्याला रसदार हाडूक देऊन
करा मूक पियानो अन् धीरगंभीर ड्रम्सच्या साथीनं
आणा बाहेर शवपेटी, येऊ द्या शोकाकुल लोकांना

घालू द्या विव्हळत घिरट्या माथ्यावर विमानांना
खरडतील ती आकाशात हा संदेश: ‘तो मेला आहे
बांधा कागदी रिबिनी कबुतरांच्या शुभ्र मानांना
घालू देत काळे सुती हातमोजे वाहतूक पोलिसांना

तो होता माझी उत्तर, माझी दक्षिण, माझी पूर्व, माझी पश्चिम
माझा कार्यमग्न आठवडा आणि माझी रविवारची विश्रांती
माझी मध्यान्ह, माझी मध्यरात्र, माझं बोलणं, माझं गाणं
मी समजलो प्रीती टिकेल अनंतकाळ. पण मी चुकलो.

नकोसे आहेत तारे आता; विझवून टाका प्रत्येकाला
आवरून ठेवा चंद्राला अन् विखरून टाका सूर्याला
ओतून द्या महासागर अन् आवरून ठेवा जंगलं
कारण उगवणार नाही आता कधीही काहीही चांगलं

- डब्ल्यू. एच. ऑडेन (१९३८)

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (4 votes)

प्रतिक्रिया

पूर्ण मुक्त करण्याऐवजी मध्येच थोडी लय आणण्याचा प्रयत्न का केला कळलं नाही. कारण, त्यामुळं रसास्वाद गंडतो. कवितेतील कल्पनाचित्र कळते, प्रतिमा कळतात. पण बाकी गडबड होते, असा याचा अर्थ घ्यावा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा आणि कवितेचा फारसा संबंध नाही, पण मुळ कविता आणि तुमचं भाषांतर वाचून वाटलं आपण पण करावा प्रयत्न, अर्थातच, छंद वगैरे सगळ टांगून फक्त त्यातली भुमिका आणि थोडंफार यमक जमवण्याचा प्रयत्न, आणि ते करताना शक्य तेवढं स्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न.

प्रयत्न -

थांबवा काळ, बंद करा कान,
द्या ते हाड चघळायला, ओरडतो आहे श्वान,
शांत करा ती पेटी,घुमू द्या गंभीर ढोल,
बाहेर आणा ती शवपेटी, येउ द्या ती दुखःद ओल.

घालू द्या घिरट्या विमानांना डोक्यावर,
खरडू दे त्यांना येणार नाही तो आता कट्ट्यावर,
बांधा पांढर्‍या रिबिनी शुभ्र गळ्याला पारव्याच्या,
घालू द्या सुती काळे मोजे हाताला पोलिसांच्या.

तोच होता माझ्या दाही दिशा,
माझे सारे काम, आणि आराम;
माझी दुपार, माझी मध्य-रात्र, माझे बोलणं, माझे गाणं,
वाटलं मला प्रेम अमर असतं, ते होतं माझं चुकणं.

नको ते तारे, घालवा ते सारे,
आवरा तो चंद्र, विखरा तो सुर्य,
ओतुन द्या तो समुद्र, कापा ती जंगले,
आता काहीच होउ शकत नाही चांगले.

प्रेरणा - डब्ल्यू. एच. ऑडेन (१९३८) + चिंतातुर जंतू

टीप - (अ)शुद्धलेखनासाठी माफी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> कारण उगवणार नाही आता कधीही काहीही चांगलं >>
अल्टीमेट दु:खद, शोकाकुल पंच लाइन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदर छान आहे भाषांतर/अनुवाद. ही माझी एक आवडती कविता आहे. मूळ कवितेचे एक चांगले आणि लोकप्रिय वाचन इथे ऐकता येईल. एकंदर तूर्तास एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"फोर वेडींग्ज अँड अ फ्यूनरल" चित्रपटामधे ही कविता ऐकलेली होती. भाषांतर आवडलं. त्याच्या लयीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

स्मशानवैराग्य
असं होईल नं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

असं होईल नं?
असले आशा बगे टाईप (गैरसमज नसावा, त्या माझ्या आवडत्या लेखिका आहेत!) शब्दप्रयोग समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अय्या ही नवीन पैठणी वाटतं, नाहीतर काय, वाट्टेल ते बोलायचं अगदी जिभेला हाड नसल्यासारखं, दहावी नं त्याची, चार बदाम पाण्यात भिजवून देत जा नेमानं, काय झालं गं पुढे मग, ती जाते का घर सोडून? आलं लसूण पेस्ट ना? दोन चमचे अगं...असले काहीसे मनात येत आहे. 'आडकित्ता' या नावावरुन मनात येणारे ' केसाळ मांडीवरुन वर सरकणारे धोतर खाली ओढत सरपंच पाच्चकन थुंकले आणि म्हणाले,"मायला, ह्या मास्तरणीला वाड्यावर घेतली पायजे एकदा"' असले काहीसे बाजूला सरकवून नं, शी, इश्श असली भाषा कशी वापरता येईल याचा विचार करतो आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

>>पूर्ण मुक्त करण्याऐवजी मध्येच थोडी लय आणण्याचा प्रयत्न का केला कळलं नाही. कारण, त्यामुळं रसास्वाद गंडतो. <<

शक्य आहे. मूळ कवितेत नाद आणि यमकं दोन्ही आहेत. भाषांतर करताना त्यांचा अट्टहास कवितेच्या आशयाला मारक ठरेल असं वाटलं; त्यामुळे दोन्हींसाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. काही ठिकाणी मात्र ते विनासायास साधले. मग असा प्रश्न पडला की जे विनासायास साधलं आहे ते काढून कविता मुद्दाम मुक्त करावी का? पण मग असं वाटलं की तो मुक्ततेचा अट्टहास होईल. म्हणून ते तसंच राहू दिलं.

स्मशानवैराग्य - 'वैराग्य' या शब्दाला आपल्याकडे चांगला अर्थसुद्धा आहे. इथला भाव पाहता तो 'नैराश्य'मध्ये मोडणारा अधिक आहे असं वाटतं. तसंच 'स्मशान' या शब्दात गूढपणा/भय असे अनेक भाव आहेत. त्यापेक्षा अंत्ययात्रा हे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे मराठी शीर्षक द्यायचं झालंच तर मी कदाचित 'अंत्ययात्रेतलं नैराश्य' असं देईन.

प्रतिसाद देणार्‍या न देणार्‍या सर्व वाचकांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी यांचे 'इंप्रोवाइझेशन' आवडले! हे कवितांवरचे धागे अजब आहेत, बहुभाषिक शब्दजालात, आणि जालविश्वात तासंतास गुंतवून ठेवतात!

बोर्हेसच्या धाग्यावरच्या कविता वाचून पुन्हा नेरुदांची आठवण झाली. धनंजय ने केलेला अनुवाद वाचला, आणि सिल्सिलातल्या अमिताभ ने वाचलेली "मैं और मेरी तन्हाई" आठवली, आणि नंतर दुसर्‍या चित्रपटात वाचलेली साहिरची ही कविता आठवून पुन्हा वाचली.

ऑडन ची ही कविता वाचल्यावर त्याची द मोर लविंग वन वाचली, आणि पुश्किन ची आय लव्ड यू कविता डोक्यात बसली. तिचे अनेक वेगवेगळे अनुवाद शोधून वाचले, आणि पुन्हा साहिरनंच लिहीलेलं (तलतच्या कापर्‍या आवाजातलं) "मेरे ख्वाबोंके झरोकोंको सजानेवाली" आपोआप ऐकू येऊ लागलं.

ऑडन ची भारताच्या फाळणीवरची कविता (फाळणीच्या कामासाठी नेमलेल्या सीरिल रॅडक्लिफ वर) मस्त आहे:

Partition

Unbiased at least he was when he arrived on his mission,
Having never set eyes on the land he was called to partition
Between two peoples fanatically at odds,
With their different diets and incompatible gods.
"Time," they had briefed him in London, "is short. It's too late
For mutual reconciliation or rational debate:
The only solution now lies in separation.
The Viceroy thinks, as you will see from his letter,
That the less you are seen in his company the better,
So we've arranged to provide you with other accommodation.
We can give you four judges, two Moslem and two Hindu,
To consult with, but the final decision must rest with you."

Shut up in a lonely mansion, with police night and day
Patrolling the gardens to keep the assassins away,
He got down to work, to the task of settling the fate
Of millions. The maps at his disposal were out of date
And the Census Returns almost certainly incorrect,
But there was no time to check them, no time to inspect
Contested areas. The weather was frightfully hot,
And a bout of dysentery kept him constantly on the trot,
But in seven weeks it was done, the frontiers decided,
A continent for better or worse divided.

The next day he sailed for England, where he could quickly forget
The case, as a good lawyer must. Return he would not,
Afraid, as he told his Club, that he might get shot.

साहजिक आहे, या नंतर फैज़ यांचे सुबह-ए-आजा़दी वाचणे आलेच...

असेच अजून अनुवाद आणि धागे येऊ द्यात..... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या निमित्ताने मूळ कवितासुद्धा वाचली.

मला वाटते की विशेष प्रयत्न केला असता, तर आशयाला मारक नसलेली लय जमली असती. मुळात लय आशयाला पोषक आहे.

"विव्हळत" शब्दाची निवड आवडली खास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळ कविता अधिक आवडली. अनुवाद अधिक 'अकृत्रिम' हवा होता असे वाटते..
ऑडेन ला आदरांजली.

वर रोचना यांनी दिलेली फाळणीवरील कविताही अतिशय आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेवटचं कडवं (मुळ कवितेतही) इतर कडव्यांच्या मानाने थोडंसं सौम्य वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अन / प्रीती वगैरे सुडो रोंम्यांटीक कवितेतले हुकुमाचे एक्के निदान अनुवाद करताना तरी वापरू नयेत असे माझे बापुडे मत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अन / प्रीती वगैरे सुडो रोंम्यांटीक कवितेतले हुकुमाचे एक्के निदान अनुवाद करताना तरी वापरू नयेत असे माझे बापुडे मत<<

I thought that love would last for ever: I was wrong हे पाहिले तर लक्षात येईल की मूळ कवितेच्या भावातच रोमँटिकपणा आहे. तो काढून टाकल्यास कवितेचा आत्माच हरवेल. असे असता केवळ आपल्याला पटत नाही म्हणून तो रोमँटिकपणा टाळण्याचे स्वातंत्र्य भाषांतरकाराने घेऊ नये असे माझे प्रांजळ मत आहे. त्यापेक्षा वेगळी कविता निवडण्याचे स्वातंत्र्य भाषांतरकाराला असते. त्याने ते घ्यावे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

I thought that love would last for ever: I was wrong हे पाहिले तर लक्षात येईल की मूळ कवितेच्या भावातच रोमँटिकपणा आहे.

असहमत.
मूळ कवितेत शाब्दिक रोमँटिक भावनांचा विपर्यास केलेला आहे.

उघड-उघड सॅटायरला बिगरसॅटायर-रोमँटिक करायचे स्वातंत्र्य तर भाषांतरकाराला मुळीच नाही. (त्या सॅटायरवरून स्वतःच्या मनात स्वतंत्रपणे रोमँटिक भावना उद्भवली, तर साधारण त्या धर्तीची रोमँटिक कविता स्वतंत्रपणे जरूर लिहावी. पण ते स्वप्रतिभ कवित्व आहे. भाषांतर नव्हे.)

हे रोमँटिक नसून व्यंग्य आहे याची जाहिरात कवीने अगदी सुरुवातीला केलेली आहे :

Prevent the dog from barking with a juicy bone,

आणि त्यानंतर कुठलेच वाक्य खरेखुरे रोमँटिक नाही. पण अर्थात "ज्यूसी बोन" इतक्या कर्कश व्यंग्याच्या ओळी थोड्याच आहेत. पण व्यंग्य कर्कश नसले, तरी ओरखडे अधिक-अधिक खोल होत जातात : public doves!!!

बेंजामिन ब्रिटनने या कवितेला संगीत दिलेले आहे :
http://www.youtube.com/watch?v=9UzEPQhtzWc
या संगीतातही कडवट व्यंग्य आहे. (ब्रिटनने संगीत ऑडेनच्या जीवनकाळात त्याच्या अनुमतीने दिले होते.)

"फोर वेडिंग्स अँड अ फ्यूनरल" या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात एक पात्र ही कविता एका श्रद्धांजली-प्रसंगात वाचते. ही कविता अप्रस्तुत आहे, हा त्या उद्धरणातला विनोद आहे. मॅथ्यू नावाचे पात्र आपल्या मृत प्रियकराच्या (गॅरेथच्या) श्रद्धांजलीकरिता ही कविता म्हणतो. पण पटकथेत श्रद्धांजलीची सुरुवात अशी आहे :

Garreth used to prefer funerals to weddings. ... I rang a few people, to get a general picture of how Garreth was regarded by those who met him. Fat seems to be a word people most connected with him. Terribly rude also rang a lot of bells.... You remember his fabulous hospitality...his strange experimental cooking. The recipe for 'Duck a la Banana' fortunately goes with him to his grave. ... But joyful is how I hope you'll remember him. Not stuck in a box in a church ... (पूर्ण संवाद)

अप्रस्तुत व्यंग्यपूर्ण कविता या प्रास्ताविकातल्या भावनांकरिता उत्तम आहे.

(कविता अहंमन्य हुकुमशहा किंवा नेत्याच्या मृत्यूनंतरच्या डामडौलाने लदलेल्या अप्रामाणिक दुखवट्याबाबत आहे. ती वैयक्तिक रोमँटिक कविता म्हणून बळेच वाचायची म्हणजे एक उत्तम कसरत आहे. होर्हे लुईस बोर्हेसने असे काहीसे अर्धवट गंभीरतेने म्हटलेले आहे : This technique [of deliberate anachronism and erroneous attribution] fills the most placid works with adventure. To attribute the Imitatio Christi to Louis Ferdinand Céline or to James Joyce, is this not a sufficient renovation of its tenuous spiritual indications? परंतु हे तंत्र क्वचितच वापरावे असे मला वाटते. बोर्हेस खुद्द जेव्हा रसग्रहणे लिहितो, तेव्हा "डेलिबरेट अ‍ॅनाक्रॉनिझम" किंवा "एरोनियस अ‍ॅट्रिब्यूशन" वापरणे कसोशीने टाळतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषांतर खूपच शब्दशः झाल्यासारखं वाटलं. रसदार हाडूक, कार्यमग्न आठवडा, पण मी चुकलो हे कानाला बरोबर वाटत नाही. वृत्तात किंवा वाक्यरचनेत बदल करणंही फायद्याचं ठरेल बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर मला जे म्हणायचं होतं ते बहुधा मला नीट मांडता आलं नाही. I thought that love would last for ever: I was wrong ही ओळ संदर्भाविना पाहिली तर रोमँटिक वाटते. Prevent the dog from barking with a juicy bone ही ओळ संदर्भाविना पाहिली तर रोमँटिक वाटत नाही. हा विरोधाभास मूळ कवितेत आहे. त्यामुळे भाषांतरकारानं 'हाडूक'मधला अरोमँटिकपणा गाळण्याचं स्वातंत्र्य घेऊ नये आणि 'प्रीती'मधला रोमँटिकपणा गाळण्याचंही स्वातंत्र्य घेऊ नये असं मला वाटतं. अर्थात हे तत्त्व पाळत इतर सुधारणा केल्या जाऊ शकतातच. त्यामुळे राजेशला भाषांतर खूप शब्दशः वाटलं, कानाला बरोबर वाटलं नाही किंवा लय पाळता आली असती असं धनंजयला वाटलं वगैरे बाबतीत माझी असहमती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी प्रयत्न केलाय.

फ्युनरल ब्लुज

बंद करा ती घड्याळं, विसरा ते फ़ोन,
थांबवा त्या लाळेलं हाडुक खाणार्‍या कुत्र्याचं भुंकणं,
चुप करा पियानोला, आणि दाटुन वाजणार्या ड्रम्सबरोबर
आणा बाहेर तो कफ़िन, येऊ देत मातम करणार्‍यांना.

विमानांना रिंगण घालु द्या हळहळणार्‍यांच्या माथ्यावर
आकाशात ‘तो मेलाय’ अशा रेघोट्या मारत.
वस्तीवरल्या कबुतरांच्या शुभ्र गळ्याभोवती बांधा रिबनी,
रस्त्यावर पहारा देणार्‍या पोलिसांना पहनु द्यात त्यांच्या हातात शोकमोजे.

तो होता माझी उत्तर, माझी दक्षिण, माझी पूर्व आणि पश्चिम,
माझा धामधुमीचा आठवडा आणि माझा निवांत रविवार,
माझी दुपार, मध्यरात्र, माझं बोलणं, माझं गाणं;
वाटलं की प्रेम असेल चिरंतन: मी चुकलो.

नको आहेत आता तारे; ठेवा सर्वांना बाहेर,
आवरा त्या चंद्राला आणि विस्कटा तो सूर्य,
ओतुन टाका तो समुद्र आणि झाडून टाका ते जंगल;
आता काहीच नाही हाताशी लागणार भलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा धामधुमीचा आठवडा आणि माझा निवांत रविवार

विस्कटा तो सूर्य

हे विशेष आवडलं. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||