काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत...

काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत..
पैशाने विकत घेता येत नाहीत,
जबरदस्तीने आपल्याशा करता येत नाहीत,
वाट पाहिली म्हणून नशिबी येत नाहीत,
मागून मिळत नाहीत..
तरीही मागितलं...
स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून,
निर्लज्ज ठरण्याची जोखिम पत्करत,
साद घातली तुला!
तुझं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून...!
जग जिंकण्याच्या व्यापात गुंतलेला तू...
कळवळून तुला मारलेल्या हाकेनंतर तुझी नजर वळली खरी,
पण गलिव्हरने पहावं बुटक्यांच्या समूहाकडे, तशी..
त्यात उमटली नाही साधी दखलपण माझ्या आकांताची!
आणि क्षणार्धात पुन्हा बुडून गेलास आपल्या व्यापात..
आता शब्द कायमचे मुके,
हाक कायमची कोंडलेली...
काही गोष्टी मिळत नाहीत!
त्या मिळत नाहीत हेच एकमेव सत्य असतं त्यांचं..
अशावेळी निघून जावं,
वेळ नसलेल्या प्रदेशात
न संपणारी प्रतिक्षा घेऊन
न सरणार्या आयुष्यासोबत...
-----------------------

merakuchhsaman.blogspot.com

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

ही कविता सुद्धा सुंदरच जमून आलीय. दोन्हींचे भाव सारखे असले तरी वेगळी आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण दोन कवितात तुम्ही मला प्रेमात पाडलंत. लिहित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आणि रेड बुल,
Smile खूप मनापासून एवढी मोठी पोच दिलीत त्याबद्दल आभार.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

मस्त ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कविता...वेदना दिसते आहे...म्हणूनच छान आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com