नजर भर के जिसे तुम देख लो वो खुद ही मर जाये....
आपल्या प्रेयसीने आपल्याकडे एक नजर टाकावी म्हणुन जीवाचे रान करणार्या, युगानु युगे ताटकळणार्या आपल्यासारख्या सामान्यांचे प्रेम आणि बा भ बोरकर यांसारख्या दिग्गज, प्रतिभाशाली कविंचे प्रेम या दोहोत तसा दर्जात्मक फरक काहीच नसतो. फरक असतो तो अभिव्यक्तीत. प्रेमपात्राच्या एका नजरेने जसे आपण जायबंदी होतो, घायाळ होतो तसेच कविही होतात. आपणही तोच eternity च्या डोळ्यात डोळे घालून पहाण्याचा क्षण अनुभवलेला असतो, ज्या क्षणी, काळ ही चवथी मितीच लोप पावलेली असते. फक्त हा क्षण आपल्याला शब्दबद्ध करता येत नाही. जरा सावरल्यानंतर आपण हिंदी गाणे गुणगुणतो-
"जरा नजरोंसे कह दो जी निशाना चूक ना जाये,
मझा जब है तुम्हारी हर अदा कातिलही कहलाये
.
ये भोलापन तुम्हारा ये शरारत और ये शोखी
जरुरत क्या तुम्हे तलवारकी तीरोंकी खंजरकी
नजर भर के जिसे तुम देख लो वो खुद ही मर जाये.."
.
तर बा.भ. मात्र सहजसुंदर प्रकटनामध्ये प्रेयसीच्या याच नेत्रकटाक्षाचे वर्णन करुन जातात की-
सखे तुझ्या डोळ्यांच्या पापण्या किंचित हलल्या आणि माझे पार पर्वताच्या टोकावरती आलेल्या माझ्या मनाचा कडेलोट झाला. तू डोळ्यांच्या पाकळ्या किंचीत उचलून कटाक्ष काय टाकलास, जसे कमलपत्रावरील जलबिंदू डहुळतो तसे माझे आख्खे त्रिभुवनच डळमळून गेले. यात कोणती अतिशयोक्ती आहे बरे. जर कविच्या हृदयातूनच गोड कळ उमटली असेल, कवि देहभान पुरते विसरला असेल तर त्याचे विश्वच डाळमळल्याचा त्याला भास झाला यात नवल ते काय! आणि मग त्रिभुवन डळमळाल्यानंतर काय उत्पात घडून आला तर तारे तारका झाडावरुन फुले टपटपावीत तसे गळून पडू लागले, आपापल्या वाहनांवरती आरुढ होऊन गगनी विहार करणारे देव गंधर्व त्या नेत्रकटाक्षाने धरणीवर कोसळून पडले. एवढेच नाही तर काय आश्चर्य!राखुंडे, सन्यस्त आणि विवेकचूडामणी असे तपस्वी, योगी, मुनी चळले. हां हां म्हणता त्यांची युगानुयुगांची तपश्चर्या भंग पावली. ऋतुचक्राचा आस गर्र्कन फिरला, पृथ्वीवरती पार उलथापालथ झाली, पर्वतोत्पात घडले आणि मग आकाशातून घनगंभीर शब्द उमटले - हे सुंदरी,
"आवर आवर अपुले भाले,
मीन जळी तळमळले ग!"
आवर तुझ्या मासोळीसम डोळ्यांची भाले, रुपेरी वर्खाचे, जळामधील मासे तळमळले, विव्हल झाले की आपल्याहूनही सुंदर, तेजस्वी हे कोण दोन मासे धरणीवर प्रकटले!
.
या आकाशवाणीनंतर सलज्ज प्रेयसीने नजर जमिनीकडे वळवली आणि हुश्श! पुनरपि जग सावरले, भानावर आले. अर्थात कवि भावसमाधीतून जागा झाला. पुनः ऋतु पूर्ववत सुरु झाले, सृष्टीचक्र परत अव्याहत चालू झाले, तपोभ्रष्ट ऋषीमुनी परत पहील्यापासून तपश्चर्या करण्यास सुसज्ज झाले आणि मुख्य म्हणजे या नजरेच्या चकमकीनंतर, जादूनंतर कविच्या हृदयी जी ठिणगी पडली, जी चकमक घडली त्यामुळे प्रेमज्वाला दुप्पट तेजाने तेजाळली.
किती सुंदर काव्यमय वर्णन! अफाट प्रतिभा. उत्तुंग कल्पकता.
.
दुसरे कवि, आदि शंकराचार्य घ्या, महान तत्ववेत्ते, अद्वैत सिद्धांताचे जनक आणि प्रणेते, अतिशय बुद्धीनिष्ठ आणि तरीही हृदयाने कवि,त्यांना सुद्धा रमणीच्या या सलज्ज कटाक्षांचे, विभ्रमांचे वर्णन चुकले नाही. त्यांची प्रणयभावना, अत्युच्च भक्तीमध्ये लीन (transcend) झालेली दिसते.कनकधारा स्तोत्रातील पहीले ३ श्लोक -
.
.
शेषशायी , समाधीस्त श्रीविष्णू हे जणू काळ्याशार तमाल वृक्षासम दिसत आहेत आणि ज्याप्रमाणे बहरलेल्या तमालवृक्षाकडे काळे भुंगे आकर्षित होतात त्याप्रमाणे क्षीरसमुद्भवा महालक्ष्मीचे भुंग्यासारखे नेत्र परत परत , श्रीविष्णूंच्या ध्यानस्थ, सुंदर मुखकमलाकडे वेधले जात आहेत. निद्रीस्त, समाधीस्त शांत मुखकमल किती न्याहाळू आणि किती नाही असे रमेस होत आहे आणि ती परत परत मुखाकडे तिरपे कटाक्ष टाकत आहे. ध्यानस्थ मुकंदास कल्पनाही नाही, आणि या संधीचा फायदा घेण्यात रमेकडून कोणतीही कुचराई नाही. तिच्या काळ्याभोर डोळ्यांनी टाकलेले हे कटाक्ष म्हणजे जणू निळ्या कौस्तुभ मण्यांची वैजयंतीमालाच आहे जी की श्रीविष्णूंच्या वक्षावरती रुळते आहे. हे कटाक्षही कसे आहेत तर साक्षात श्रीहरींचे मनोरथ पूर्ण करु शकण्यासारखे, त्यांची कामनापूर्ती करु शकण्याइतके प्रासादिक आहेत.
.
बा भं ची विलक्षण सुंदर कविता आणि प्रासादिक कनकधारा स्तोत्र ही दोन्ही काव्ये वाचल्यानंतरची असीम शांती फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे ती शब्दात मांडता येत नाही. त्यांच्या सौंदर्याने हृदय फक्त उमलून येते आणि ही अनुभूती उपभोगणे, एवढेच रसिक वाचकाच्या हातात रहाते
प्रतिक्रिया
निरागस
आपण खरच "निरागस" आहात.
मला या विधानाचे प्रयोजन
मला या विधानाचे प्रयोजन अजिबात कळलेले नाही. स्पष्ट करावे ही विनंती.
आवर आवर अपुले भाले,
याचा जो अर्थ आपण लावला त्यावरुन आपल्यातली निरागसता जाणवली.
का हो मारवाजी अन्य काय अर्थ
का हो मारवाजी अन्य काय अर्थ आहे?
माफ करा उतावळा घाईत प्रतिसाद दिला मी समजण्यात चुकलो.
अहो नाही तुम्ही म्हणताय तसाच अर्थ आहे मी घाईत चुकलो.
जरुरत क्या तुम्हे तलवारकी
हे वर्णन बॅसिलिस्कला तंतोतंत लागू पडतं....
हाण्ण!!
हीच का ती बॅसिलिस्क?
.
.
अरारा!!
____
तेजायला की ही -
.
____________________
नाही ती पालच असावी ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!!!
हरी पोत(दा)र भाग दोन -
हरी पोत(दा)र भाग दोन - रहस्यमय तळघर यातला बॅसिलस्क.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
दोन्ही पैकी कुठलाही एक घेतला
तरी
भयंकरच प्रकार आहे.