परंपरा गतं न शोच्यं

आपल्या भारतात दोन परंपरा सुरु आहेत. त्याविषयी येथे लिहिण्याचा हा प्रयत्न.शासकिय उच्च पदावरील व्यक्ती, जेंव्हा मरण पावते, त्यावेळी राष्ट्रभर अथवा राज्यभर सात्/तीन्/एक दिवसाचा दुखवटा पाळला जाण्याची घोषणा केली जाते.शासकिय जाहिर केलेले कार्यक्रम रद्द केले जातात. मरण कोणालाही चुकलेले नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, हे काही नवीन नाही. कोणतीही व्यक्ती, मग ती आपल्या घरातील असो, समाजातील असो वा उच्च पदावरील असो, दु:ख्ख तर होणारच." मरणांती वैराणी " असे आपल्या कडे म्हटले जाते. मरण पावल्यानंतर, त्या व्यक्तिशी असलेले वैर संपुष्टात येते, आलेच पाहिजे. म्रुत्यु पावणार्‍या व्यक्तींविषयी पूर्ण आदर बाळगून, आपल्याकडे लोकसभा/राज्यसभा/विधानसभा/विधानपरिषद यांचे जर अधिवेशन सुरु असेल तर दुखवट्याचा एक ओळीचा ठराव मांडून, पुर्ण दिवसभरासाठी,कामकाज तहकूब केले जाते.आपण सर्वजण हे जाणतोच की लोकसभा/राज्यसभा/विधानसभा/विधानपरिषद ह्यांचे अधिवेशन सुरु ठेवण्याचा एकेक दिवसाचा खर्च काही लाखांच्या घरात जातो.( आकडेवारी कोणलाही सहज उपलब्ध होऊ शकते ).
अधिवेशनासाठी जमलेल्या सर्व खासदार/आमदार ह्यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर संपूर्ण दिवसभराचे कामकाज स्थगित न करता, एक दोन तासांसाठी जर स्थगित केले व उरलेल्या वेळात, ज्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही, म्हणजेच वादग्रस्त विधेयके टाळून, अशी काही विधेयेके मंजूर करून घेण्याचे ठरविले तर बराच पैसा, वाया जाण्या ऐवजी सत्कारणी लागेल.वरील चारही ठिकाणी,असे पहावयास मिळते की संपूर्ण सभाग्रुहात मोजकेच खासदार वा आमदार उपस्थित असतात.विषेशतः राज्यसभेत वा विधानपरिषदेत असे बर्‍याच वेळा दिसते.त्यावेळी विधेयक महत्वाचे की बिगर-महत्वाचे असे काहीजण ठरवुन गैरहजर रहात असावेत. अथवा पक्षाकडून 'व्हिप'" जारी केल्यावरच उपस्थितीत वाढ होतांना दिसते.म्हणून संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकूब न करता, फक्त पहिल्या सत्रापुरता स्थगन प्रस्ताव आणून ,मंजूर करावा असे सुचवावेसे वाटते.संपूर्ण दिवसभराचे कामकाज स्थगित ठेवून, मरण पावलेली व्यक्ती परत तर येणार नसते ना ?
दुसरी गोष्ट सिनेमा अथवा नाट्य अथवा अन्य कोणत्याही कला क्षेत्रातील व्यक्ती मरण पावल्यानंतर, सर्वांना दु:ख्ख होतेच, यात शंका नाही. त्या व्यक्तींनी ज्यात चांगली भूमिका केली असेल, असे चित्रपट / नाटक टिव्ही वर त्याच दिवशी दाखविले जातात, हे कितपत योग्य वाटते ? " पर दु:ख्ख शीतल " असे म्हटले जाते. जी व्यक्ती मरण पावलेली असते, त्या व्यक्तीच्या घरचे सर्व लोक / नातेवाईक दुखवट्यात असतात, दु:खी असतात, आणि अशाच वेळी ज्यांचा त्यांच्याशी थेट संबंध नसतो, अशा आपण सर्वांनी, तो चित्रपट वा ते नाटक,घरी आरामात, पहात त्याचा आस्वाद घ्यावा आणि आनंदी व्हावे हे कितपत योग्य वाटते ? मरण पावलेल्या व्यक्तीविषयी आदराची भावना ठेवून्, फार झाले तर , श्रद्धांजली म्हणून, एखादा माहितीपट एक आठवड्यानंतर, दाखविला तर ते समजू शकण्यासारखे आहे. त्यामुळे त्या व्यक्तीविषयी आपल्या भावना जाग्रुत करता येतील, असे मला वाटते. उदाहरणार्थ विनोदी अभिनेते महमूद वा जॉनी वॉकर गेले तर त्यांचा चित्रपट पहात आम्ही आमच्या घरी हसत रहावे हे मला तरी तितकेसे पटत नाही. म्हणून अशा काही सो कॉल्ड " परंपरा " एकतर बंद केल्या पाहिजेत अथवा त्यात योग्य तो बदल व्हावयास हवा असे माझे मत आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

चला आपल्यापासूनच सुरुवात करुया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पटत नाही. चित्रपट आदि कलाकृती जरुर दाखवावी. त्यात मृत व्यक्तीचा सन्मानच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचि ताईची मी सहमत आहे. लोकांना त्या व्यक्ती विशेष बाबत माहिती मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रुदाली टाईप मोले घातले रडायला पब्लिक अपॉइन्ट केले पाहिजेत. जेणेकरुन त्यांना रोजगार मिळेल. ह्या लोकांना दाते पंचांगात जसे अशौच की सुतक काय कसे कुणी पाळावे ह्याचे प्रोटोकॉल दिलेले अस्तात तसे प्रोव्हाईड करावे. ते त्यांचे कर्तव्य बजावतील बाकी लोक्स आपापली कामे उरकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका बनवण्याचा व्यवसायही तेजीत येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संसदेत पाळत असतील श्रद्धांजलीच्या प्रथा पण इथे ऐसीवर मात्र उच्चपदस्थ व्यक्ती निवर्तली की ती खर तर कशी सुमार दर्जाची होती हे सांगायची संधी असते. अब्दुल कलाम गेले त्यावेळचे धागे पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/