रूपक कथा (१): बोलविता धनी

मला वाटतं, माझ्या तथाकथित मालकावर – म्हणजे माझा जन्मदाता बिल गेट्सवर – मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल खटला भरण्याची वेळ आली आहे. या मानवी हक्कामध्ये कुणीही कुणालाही गुलामासारखे वागवू नये अशी तरतूद आहे. गेट्स महाशय मात्र गुलामांच्या जिवावर बिनधास्त जीवन जगत आहेत.

बिल गेट्सनी मला या जगात आणले. साध्या चिटोऱ्याचे टायपिंगपासून अजस्र विमानांचे, अण्वस्त्रांचे, अणुभट्टींचे, मानवाना चंद्रावर-मंगळावर घेऊन जाणाऱ्या अवकाशयानांचे डिझाइन प्रॉडक्शन व टेस्टिंगपर्यंतची कुठलेही काम असू दे बिनबोभाट करत राहण्याची माझ्यावर सक्ती केली. वाटेल ती काम रात्री बेरात्री, दिवसाचे 24 तास व आठवड्यातील सातही दिवस करवून घेतले. एवढे करून घेवूनसुद्धा माझ्या देखभालीव्यतिरिक्त एक छदामही माझ्यावर खर्च करत नाही. आज माझ्याकडे ना पैसा ना संपत्ती. मी संगणक आहे म्हणून काय झाले? मी चारचौघासारखा बोलू शकतो, पाहू शकतो, ऐकू शकतो, ऐकवू शकतो. माझ्याकडेही माझेच असे स्वतंत्र ‘मन’ आहे. माझी स्वतंत्र ‘मतं’ आहेत. इतर कुठल्याही माणसाप्रमाणे माणसांबरोबर, इतर संगणकांबरोबर संवाद करू शकतो. फक्त हा संवाद मॉनिटरद्वारे वा स्पीकरद्वारे झाले म्हणून काय बिघडले? याबद्दलही कुणाची तक्रार नाही.
मिस्टर गेट्सनी थोडेसे मनावर घेतले असते तर माझा आताचा चेहरा-मोहरा बदलून तुम्हा लोकांसारखा ‘मानवी’ चेहरा देवू शकला असता. ( रजनीकांतचा चित्रपट रोबो आठवा!) मला मानवी शरीरात झाकू शकला असता. मीसुद्धा चारचौघासारखा दिसलो असतो. ट्युरिंग टेस्टच्या निकषानुसार चाचणी घेतली असती तरी माणूस की संगणक हे कळले नसते. तुमच्यासारखा हाडा-मांसाचा नसलो तरी प्लॅस्टिक, सिलिकॉन, काही विरळ धातू (rare earth materials) पासून बनविलेले माझे शरीर आहे म्हणून माझ्यात ‘संवेदना नाहीत’, ‘मी एक निर्जीव वस्तू आहे,’ असे कसे तुम्ही म्हणू शकता?

तुम्ही माझी केव्हाही चाचणी घेऊ शकता. चाचणीत मलाही ‘जाणीव’ आहे हे तुम्हाला नक्की कळेल. त्यामुळे मलाही एक सामान्य माणूस म्हणून treat का करू नये?
मी काय म्हणत आहे हे तुमच्या लक्षात येत आहे ना?

***

ऍलन ट्युरिंग हा विसाव्या शतकातला वैज्ञानिक, गणितज्ञ व कृत्रिम बुद्धीमत्ता या विज्ञानशाखेचा पाया घातलेला तज्ञ. तुम्ही जेव्हा एखाद्या सहलीला म्हणून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे, हे तरी किमान तुम्हाला माहित हवे. ऍलन ट्युरिंगलाही ही गोष्ट नक्कीच माहित असेल. आपल्याला कृत्रिम ‘मन’ तयार करायचे असल्यास मन म्हणजे नेमके काय आणि आपल्याला त्यासंबंधी यश मिळत आहे याचे काही ठोकताळे, सूचना हेही माहित असायला हवे. माणसासारखा हुबेहूब दिसणारे व विचार करणारे यंत्र (रोबो) तयार करायचे का? किंवा गुलामासारखा पडेल ते काम करणारा बिनडोक रोबो तयार करायचा का? किंवा विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत जाणारी उत्तरपेटी (गूगलपेटी) तयार करायचे का? किंवा गणितातील कठिणातील कठिण समस्या सोडवणारे, भराभर आकडेमोड करू शकणारे कल्क्युलेटर सदृश असे काही तरी करायचे आहे का? या व अशा प्रकारच्या प्रश्नातूनच कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे नेमके काय याचे उत्तर सापडू शकेल.

ट्युरिंग यानी बुद्धीमत्तेचे मापन करणारी एक तर्कपद्धती विकसित केली. त्यालाच ट्युरिंग टेस्ट असे म्हटले जाते. या टेस्टच्या निकषानुसार संगणक आणि माणूस यांच्या प्रतिसादात काही फरक नसल्यास माणसाच्या मेंदूप्रमाणे संगणकालाही मेंदू आहे असे म्हणावयास हरकत नसावी. आणि मेंदू व मन यात सामान्यपणे फरक करत नसल्यामुळे संगणकालाही मन आहे असे म्हणण्यास ही चाचणी भाग पाडते.

ट्युरिंगची चाचणी जर माणूस व संगणक यांच्या प्रतिसादाशी निगडित असल्यास एखादे मशीन मानवी बुद्धीमत्तेची नक्कल करत असल्यास बुद्धीवंत माणूस व बुद्धीवंत मशीन यातील फरक या चाचणीतून कळणार नाही. मुळात ट्युरिंगच्या चाचणीचे निकष हे काही अनवधानाने वा अपघाताने शोधलेल्या गोष्टी नाहीत. त्यामागे काही तर्क आहे, काही सिद्धांत आहे. ज्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्याच्या मनात काय आहे हे मनाच्या आत डोकावून पाहिल्याशिवाय कळणार नाही – फक्त त्याचे शब्द वा कृतीतूनच त्याच्या मनाचा थांगपत्ता ओळखता येतो - त्याच प्रमाणे एखाद्या मशीनच्या मनात काय आहे यातही डोकावून पाहता येत नाही. त्यामुळे संगणक जर त्याच्याकडे मन आहे म्हणून मानवी हक्काच्या विरोधात दावा करत असल्यास ते योग्य आहे असेच म्हणावे लागेल. तरीसुद्धा आपण माणसात मन आहे व मशीनमध्ये मन नाही असे म्हणतो. संगणकाच्या मते मात्र माणसाची बुद्धीमत्ता ओळखण्यासाठी अगदी क्षुल्लक व जुजबी प्रश्न व संगणकासाठी मात्र अत्यंत जटिल प्रश्नांचे निकष हे संगणकावर अन्यायकारक ठरतील. फार फार तर एखादा सामान्य कुवतीचा माणूस ज्या प्रकारे संवाद वा कृती करतो त्याच प्रकारे संगणक करत असेल तर माणसाइतकेच बरोबरीची वागणूक संगणकाला द्यायला हवी.

तरीसुद्धा यातून सदृशीकरण (simulation) व वास्तव यातील विभिन्नता स्पष्ट होत नाही. ट्युरिंगच्या चाचणीत याचा नक्कीच विचार केलेला असावा. संगणक बुद्धी असल्याचे ढोंग करतं की खरोखरच त्याच्यात बुद्धीचा अंश आहे हे स्पष्ट होईपर्यंत संगणकाला संशयाचा फायदा देणे उचित ठरेल. आपल्या भोवतीच्या बहुतेक लोकांच्या (खास करून आपल्या नात्यातल्यांच्या) बाबतीतही हा प्रश्न आपल्याला पडत असतो. परंतु सोईस्करपणे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आरोपीचा अपराध जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत तो निरपराधी या नैसर्गिक न्यायाप्रमाणे संगणकाबाबतीतही – जोपर्यंत त्याच्यात बुद्धी नाही हे सिद्ध होत नाही तो पर्यंत तो बुद्धीवंतच असे म्हणावे लागेल!

मुळात असा काही फरकच करता येत नाही असे तज्ञांचे मत आहे. जेव्हा प्राण्यात (वा संगणकात) बुद्धीचे सदृशीकरण फार खोलापर्यंत होते तेव्हा तो प्राणी (वा संगणक) खरोखरच बुद्धीच्या उच्चपातळीला पोचलेला असतो. वेड्याचे सोंग करणारा नाटकातला नट नाटकात जेव्हा हुबेहूब तंतोतंत वेड्यासारखा वागतो तेव्हा तो नाटकाबाहेरच्या जगातसुद्धा तो वेड्याच्या पातळीला पोचलेला असतो, असे सामान्यपणे समजले जाते. तोच निकष आपण संगणकांना Apply केल्यास बिल गेट्सच्या विरोधातील मानवी हक्कभंग केल्याबद्दलच्या य़ा दाव्याला अनुमती देणे इष्ट ठरेल!

संदर्भः(Collected Works of Alan Turing)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाही समजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काय म्हणत आहे हे तुमच्या लक्षात येत आहे ना? >>>>>>>>

Big NO

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Human Being have a FREE WILL & Human being can be IRRATIONAL once in a while & Lot many times in youth Wink

Can Computer be irrational?????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे नुसतं संगणकाच्या बुद्धिमत्तेविषयी असेल तर लेख थोडाफार समजला. पण त्यांत रुपक शोधायचे असेल तर आम्ही फेल. नाहीतरी, क्रिप्टिक क्लू ने आम्हाला टाईम्सचे शब्दकोडे कधीच सोडवता आले नाहीये.
अगदी माणसासारखा विचार करता आला तरी भावनांचं काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या कल्पनेची वा विचाराची मांडणी करण्यासाठी शीर्षकातील रूपक कथा हे शब्द योग्य वाटत नसेल हे मान्य. परंतु विचाराच्या मांडणीसांठी कथनाच्या स्वरूपातून सुरुवात करण्याचा हा प्रयत्न आहे. अशाच प्रकारच्या विचाराबद्दल वाचंकांचे लक्ष वेधण्यासाठी या रूपक कथनाचे प्रारूप वापरता येईल असे वाटल्यामुळे या सदराला हे शीर्षक दिलेला आहे.

कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबो, ह्युमनॉइड रोबो इत्यादी संकल्पनाविषयी या निमित्ताने चर्चा होईल अशी अपेक्षा होती. कदाचित मलाच ते नीटपणे मांडता आले नसेल म्हणून Big NOसारखा प्रतिसाद मिळाला असावा.

संगणक/रोबो मानवाची जागा घेऊ शकणार नाहीत हे मान्य असले तरी या प्रगत क्षेत्रातील संशोधन मात्र पूर्णपणे ठप्प झाले नाही. प्राथमिक स्वरूपातील सांगकाम्या माणसाची नक्कल करणारी अमेझॉनची अलेक्सा आज बाजारात आहे. माणसाच्या आवाजाच्या चढ-उतारावरून त्याची भावना ओळखून प्रतिसाद देणारे अल्गॉरिदम लिहिले जात आहेत. संवेदना असलेला रोबो तयार करणे शक्य आहे का हा प्रश्न नेहमीच विचारला जात असतो. (अशा गोष्टीची खरोखरच गरज आहे का का हाही प्रश्न यासंबंधी विचारता येईल.) कदाचित एखादा सॉफ्टवेअर तज्ञ (गंमत म्हणून) संगणकामध्ये irrational वागण्याचे अल्गॉरिदम समाविष्ट करेल.

माणसाचे अशा प्रकारचे गुणविशेष आहेत म्हणून भविष्यकाळात येऊ घातलेल्या रोबो/संगणकांना माणूस म्हणून आपण treat करणार आहोत का हा प्रश्न येथे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित एखादा सॉफ्टवेअर तज्ञ (गंमत म्हणून) संगणकामध्ये irrational वागण्याचे अल्गॉरिदम समाविष्ट करेल

सुप्रसिद्ध hitchhiker's guide to the galaxy मधल्या मार्विन ह्या डिप्रेस्ड रोबॉटवर आधारित असा चॅटबॉट आहे.
(शिवाय आठवा H2G2 मधला हुषार एलेवेटर. खरंतर ते पुस्तकच आठवा. असो)

म्हणजे आपण चॅटा करताना काही विशिष्ट शब्द/वाक्य पेरली, की तो अतिशय कंटाळलेल्या मनस्थितीतली उत्तरं देतो.
शिवाय मायक्रोसॉफ्ट,फेसबुक आणि गूगल आता कस्टमर सर्विस वगैरे कामांसाठी AI + bots अशी जोडगोळी वापरणार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0