"मैफिलीच्या पुढच्या रांगात"

मैफिलीच्या पुढच्या रांगात ते मानाने बसलेले,
बसविलेले असतात: पुरुष आता टक्कलवंत,
स्त्रिया भारदस्त श्वेतकेशा विरागिणी,
दोघेही आदरास सरावलेले.
यांना तरुण लोक "सर" , "मॅडम" म्हणतात,
पळत जाऊन त्यांच्यासाठी पाणी, टॅक्सी घेऊन येतात,
इतर "मोठयांच्या" पाठीत धपाटे मारून हे
खदाखदा हसतात , नवविवाहितांची अश्लील टिंगल
करतात . उभ्या उभ्या लग्ने , नोकऱ्या जमवितात.

अनेकांना मी बघून ओळखतो.
मी देश सोडण्यापूर्वी हे लोक
माझ्याच वयाचे , चाळिशीतले होते.
यूट्यूब पाहताना धक्का बसतो :
माझ्या आईवडिलांची जागा यांनी
कशी काय घेतली?

मी "तिथेच राहून गेलो" की काय!

जॉगिंग , केस बारीक कापणे,
स्नीकर्स , टी शर्ट, जीन्स,
सर्व सोडले पाहिजे मला !
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी "तिथेच राहून गेलो" की काय!

सर्व सोडले पाहिजे मला !

जन्म माझा सफल व्हावा हे मनासी बांधिले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यारों की मोहब्बत का यक़ीं कर लिया मैं ने
फूलों में छुपाया हुआ ख़ंजर नहीं देखा!
: बशीर बद्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

दिल अभी तक पूरी तरहा से टूटा नही
दोस्तों की महरबानी चाहिये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुभानल्लाह! बहोत खूब!

ये कहाँ की दोस्ती है, कि बने हैं दोस्त नासेह
कोई चारासाज़ होता, कोई ग़मगुसार होता...
ग़ालिब

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me