'गरीब' पन्नास टक्क्यांकडची संपत्ती

ऑक्सफॅम नावाची संस्था जवळपास दरवर्षी आकडेवारी प्रसिद्ध करत असते. त्यातली आत्ताची बातमी अशी 'जगातल्या सर्वात श्रीमंत ८ माणसांकडची निम्म्या गरीब जगाकडे असलेल्या संपत्तीइतकी आहे' (सुमारे ४२६ बिलियन डॉलर्स). ही सनसनाटी बातमी आहे. जगात इतकी प्रचंड विषमता! वाचून धडकी भरते. खरं वाटत नाही. पण असेलही, कोणास ठाऊक? त्यांनी एवढा अभ्यास करून आकडे काढलेले आहेत तेव्हा ते खरेच असणार, नाही का?

सुदैवाने ऑक्सफॅम हे आकडे दरवर्षी प्रसिद्ध करते. गेल्यावर्षी जगातल्या सर्वात श्रीमंत ६२ लोकांकडे सर्वात गरीब पन्नास टक्क्यांइतके पैसे होते. (सुमारे १७६० बिलियन डॉलर्स) आता हा आकडा आठवर आला! बापरे!

पण या आकड्यांकडे नीट बघितलं तर लक्षात येतं की गरीब पन्नास टक्क्यांकडे गेल्या वर्षी १७६० बिलियन होते, ते घसरून एकदम ४२६ बिलियन डॉलर झाले. म्हणजे त्यांची तीन चतुर्थांश संपत्ती नष्ट झाली! तेही एका वर्षात. असं काहीतरी विचित्र चित्र दिसायला लागलं की आपल्याला प्रश्न पडायला लागतो, की नक्की हे आकडे बरोबर आहेत का? ती संस्था हे आकडे कसे काढते?

त्यांची पद्धत अशी - तुमच्याकडे अॅसेट्स किती आहेत, त्यांची किंमत काय आहे हे काढायचं. मग त्यातून तुम्हाला कर्ज किती आहे हे वजा करायचं - त्यातून तुमची संपत्ती येते. ज्याच्याकडे कमी संपत्ती तो गरीब, अधिक संपत्ती तो श्रीमंत. ठीकठाक वाटतं. पण गरीबी आणि श्रीमंती यांच्याशी अर्थाअर्थी संबंध नसलेले आकडे यातून निघतात.

ऑक्सफॅमच्या मते, अमेरिकेत चीनपेक्षा अधिक गरीब लोक राहातात. का? कारण त्यांच्याकडे मोठी कर्जं असतात. म्हणजे नुकतीच डॉक्टर झालेली, जिला जवळपास लाख डॉलर वर्षाला नोकरी लागली आहे अशी व्यक्ती पाहू. तिचे स्वतःचे अॅसेट्स मामूली आहेत, पण शिक्षणासाठी काढलेलं दोन लाख डॉलरचं कर्ज आहे. ही व्यक्ती ऑक्सफॅमच्या मते काही हजार रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या विदर्भातल्या गरीब शेतकऱ्यापेक्षा गरीब आहे.

पुढची गणिती गंमत अशी की जर जगातल्या संपत्तीची बेरीज करताना सर्वात खालच्या लोकांची संपत्ती वजा असते. त्यामुळे पहिल्या पंचवीसेक टक्क्यांपर्यंतच्यांची बेरीज ऋण असते. पन्नास टक्क्यांपर्यंत आलं की ती थोडीशी धन होताना दिसते. त्यामुळे ही बेरीज किती लोकांकडे किती कर्ज आहे, त्यावर अत्यंत सेन्सिटिव्हली अवलंबून असते. १४ साली कमी कर्जं मिळायची. याउलट १५ साली कर्जं जास्त मिळायला लागली. त्यामुळे अर्थातच अॅसेट-कर्ज ही बाजू अधिक ऋण झाली. म्हणून पन्नास टक्क्यांपर्यंतची बेरीज १७६० बिलियनवरून धाडकन ४२६ बिलियनपर्यंत खाली आली.

थोडक्यात, ही पद्धतच भीतीदायक आकडेवारी तयार व्हावी या उद्देशाने तयार केलेली आहे. तेव्हा त्यातून निघणारी आकडेवारी ही दुर्लक्ष करण्याच्या लायकीची आणि निरर्थक आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

बहुतेक राजेशनी निरर्थक म्हणण्यापूर्वी मागच्या माझ्या लेखात मी अनु रावांना वार्षिक उत्पन्न, मागची संपती, डिप्रिसिएशन, कंजप्शन सगळे अ‍ॅडजस्ट करून किती % लोकांकडे किती % संपत्ती असा रेशो दिला आहे तो पाहिला नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सोशल स्टॅटितिक्समधे असो, धर्मग्रंथांत असो, अजोंनी म्हटलेले असो वा ऑक्सफॅमने म्हटलेले असो, नव्या जमान्याच्या विरोधातले सगळे निरर्थक नि दुर्लक्षनीय ते निरथक नि दुर्लक्षणीयच!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय राव गुर्जी
आजच सकाळी आमच्या सोलापुरातील कै.आप्पासाहेब वारद (म्हणजे ज्यांचे घर इंद्रभवन आज महापालिका आहे) त्यांचे नाव त्या काळातील (इस १९०० साधारण)जगातील १८ सर्वाधिक श्रीमंत लोकात होते असे वाचले. जरा अभिमान वाटायला होता की तुम्ही टाचणी लावली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हायला विनोदीच प्रकार आहे.

एखाद्याने कर्ज घेतलं म्हणजे त्याला ते कोणीतरी दिलं असणार. तो देणाराही गडगंज श्रीमंत आहे आणि आपल्या पोतडीत हात घालून थोडे चव्वल काढून देतोय असं नसतं. सीआरार+एसेलार बाजूला काढून उरलेलं कर्जरूपात देतात.

म्हणजे : ऑक्सफॅम पद्धतीत ब्यांका तळाजवळ कुठेतरी तडफडल्या असतील. कारण डिपोझिट झालेल्या रु. १०० मधून (अ‍ॅसेट) ते दीडदोन टक्के सीआरार+एसेलार बाजूला ठेवून रु. ९८ कर्जरूपात देतात. त्यामुळे त्या ब्यांकांची ऑक्सफॅम लायकी रु. -२!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एखाद्याने कर्ज घेतलं म्हणजे त्याला ते कोणीतरी दिलं असणार.

ती आणखीन एक गंमत आहे. म्हणजे समजा माझ्याकडे १००० रुपये कॅश आहेत आणि तुमच्याकडे ० रुपये आहेत. मी श्रीमंत तुम्ही गरीब. आता हेच १००० रुपये मी तुम्हाला कर्जाऊ दिले. माझी संपत्ती १००० रुपयेच राहिली. कारण कर्जरोखा हा माझा अॅसेट आहे. याउलट तुमची संपत्ती -१००० रुपये झाली. आपल्या दोघांच्या जगातली एकंदरीत संपत्ती १००० होती, ती आता शून्य झाली. आहे की नाही मज्जा!

म्हणजे कर्ज घेतल्याने 'गरीबांची' संपत्ती कमी होते. पण श्रीमंतांची कमी होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओ मालक,अकाउंटिंग समजून घ्या !!

तुम्ही आबांना १००० रु कर्ज दिल्यावर आबांची लाएबिलिटी १००० रु पये झाली तशी आबांकडे (तुमच्याकडून आलेली) असलेली क्याश ही त्यांची अ‍ॅसेट आहे. आबांचा नेटवर्थ शून्य (मायनस १००० नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरोबर आहे थत्तेचाचा तुमचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचं बरोबर आहे. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या प्रतिसादावरचा उपप्रतिसाद हा मुद्दा हिशोबात घेऊन बदलता येईल का? मी उप-उप-प्रतिसाद दिल्यास बूच बसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही आबांना १००० रु कर्ज दिल्यावर आबांची लाएबिलिटी १००० रु पये झाली तशी आबांकडे (तुमच्याकडून आलेली) असलेली क्याश ही त्यांची अ‍ॅसेट आहे. आबांचा नेटवर्थ शून्य (मायनस १००० नाही).

हे म्हणणे बहुतेक बाबतीत योग आहे.
शैक्षणिक कर्ज या अपवादात्मक बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागते. ज्या कर्जानंतर व्यक्तीपासून बाजूला काढून बाजारात विकता येईल असे कुठले अ‍ॅसेट कर्जदाराच्या हातात येत नाही. (घर, मोटार, फर्निचर, वगैरे विकत घेतल्यावर त्या-त्या वस्तू हातात असल्यामुळे नेटवर्थ - डिप्रिशियेशन पूर्वी - ० बदलते.)
हे ओळखून ऑक्सफॅम रिपोर्टवाल्यांनी आपल्या हिशोबातली ही त्रुटी स्पष्ट उघड केलेली आहे, आणि त्या त्रुटीमुळे येणारी चूक (~१% लोकसंख्येच्या आसपास) अंजाज करून सांगितलेली आहे. माझ्या मते, इतपत बर्‍यापैकी पारदर्शक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शैक्षणिक कर्ज या अपवादात्मक बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागते. ज्या कर्जानंतर व्यक्तीपासून बाजूला काढून बाजारात विकता येईल असे कुठले अ‍ॅसेट कर्जदाराच्या हातात येत नाही.

भारतातून शै० कर्ज एका मर्यादेपलिकडे (बहुदा साडेसात लाख रुपये) घेतल्यास कोलॅटरल द्यावं लागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तारणाबाबत वैयक्तिक अनुभव आहे Sad
म्हणून ऑक्सफॅमच्या अहवालात संभाव्य चुकीचे उदाहरण म्हणून उच्चशिक्षित आणि भरपूर आमदनी लगेच मिळू लागेल, असा हार्वर्ड विद्यापीठाचा स्नातक (पण सध्या कर्ज मोठे, साधारणपणे तारण नाही) दाखवलेला आहे. म्हणजे ही गुंतागुंत उदाहरणात तरी टाळता यावी.

कर्जाकरिता पूर्ण "क्ष" रकमेचे तारण दाखवले, आणि कर्जाची पूर्ण रक्कम फी-म्हणून खर्च केली समजा. तर बँकेच्या-हक्काचे-तारण, कर्ज, खर्च, इतके सर्व हिशोबात घेतले, तर कालच्या बॅलन्स शीटमधल्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा आजच्या बॅलन्स शीटमध्ये "क्ष" वजा होणार, नाही का? आणि तारणाशिवाय "क्ष" कर्ज घेतले, तरी वैयक्तिक कालच्या बॅलन्स शीटमधल्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा आजच्या बॅलन्स शीटमध्ये "क्ष" वजा होणार. तारणाचा मुद्दा नेटवर्थ हिशोबाच्या वजाबाकीच्या पद्धतीकरिता काहीसा अवांतर आहे, असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजय, शैक्षणिक कर्ज इ इ हा कोणताही अपवाद नाही. कॉर्पोरेट फायनान्स आणि प्रोजेक्ट फायनान्स अशा दोन प्रकारच्या पद्धतीने बँका लेंडींग करू शकतात. (भारतात प्रोजेक्ट फायनान्स नाही त्यामुळे भारताचा विकास खुंटला आहे आणि ते विकसित करण्यासाठी विद्यमान आवश्यक ते कायदे करत आहे.) अस्तित्वात असलेल्या असंबंधित असेटच्या आधारावरचे लोन ते कॉर्पोरेट फायनान्स. अस्तिस्त्वात नसलेल्या संबंधित भविष्यात येउ घातलेल्या असेट्स आधारावर दिलेले लोन ते प्रोजेक्ट फायनान्स. कंपनीने पोर्ट टर्मिनल "बांधावयाचा असला" तर त्याच्यापासून येणार्‍या संभाव्य "भविष्यातील उत्पन्नाच्या" आधारावर बँकाचे सिंडिकेट लोन देते. (हे करायला फार कौशल्य लागते म्हणून आपल्याकडचे २५% प्रोजेक्ट भूमिअधिग्रहणामुळे तर जवळजवळ ९०% प्रोजेक्ट फायन्नान्स नीट न करता आल्यामुळे बारगळले आहेत.). या पोर्ट टर्मिनलचे असेट जसे जसे बनत जातात तसे तसे ते प्रायवेट ऑपरेटर एवजी पोर्ट ऑथॉरिटीकडेच असतात पण ऑपरेटरने कर्ज संबंधित वचने पाळली नाहीत तर बँकांना त्याला हटविण्याचा देखिल अधिकार असतो. शिवाय उत्पन्न थेट ऑपरेटरकदे न जाता एस्क्रो थ्रू अगोदर इतर सर्व लायेबिलिटीज मिटवण्यासाठी जातात, डेट सर्विस धरून.
===============
ज्या असेट्स वर प्रोजेक्ट फायनान्स कंपनीचा असा अधिकार असतो ते इंटँजिबल देखिल असतात. पेटंट्स इ. शिक्षण देखिल असाच एक इंटँजिबल असेट आहे. त्याची अंडरलाइंग व्हेल्यू बँकेच्या नावाने असते. आणि हा असेट फिजिकलच असवा असे नाही, कारण इंटॅजिबल वा टँजिबल असेट्स किती व्हल्नरेबल वा क्रेडिबल असतात याचा ते भौतिक असतात कि नाही याचेसी संबंध नसतो.
=================
ऑक्सफॅमवाल्यांनी सांगीतलेला व्हॅल्यू सरळसरळ खोटा आहे. मात्र ते त्यांची संपत्ती मोजायची मेथड चूक आहे म्हणून नाही. तर त्यांनी जगाचे (त्या ५०% लोकांचे) फक्त एकच वर्षाचे उत्पन्न आणि श्रींमंतांची मात्र आयुष्यभराची कमाई तोलली आहे. अनु ताई ना दुसर्‍या धाग्यावर दिलेल्या उत्तरात ही चूक दुरुस्त करून मी रेशो दिला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यांनी जगाचे (त्या ५०% लोकांचे) फक्त एकच वर्षाचे उत्पन्न

हे समजले नाही. सर्वेक्षणामध्ये सर्व घरकुलांकरिता एकच प्रश्नावली होती. सर्वांची शिल्लक संपत्ती (म्हणजे आयुष्यभराच्या कमाईतून शिल्लक) मोजलेली आहे. सर्वेक्षणात तेच प्रश्न असून फक्त काही लोकांचे एका वर्षाचे उत्पन्न मोजले, बाकीच्यांची आयुष्यभराची कमाई मोजली, ते कसे ते समजावून सांगाल काय?

---
साधारणपणे वर्षाच्या सुरुवातीला मागची शिल्लक पुढे असते, आणि वर्षाअंतीच्या शिल्लकीत वार्षिक आवक-जावक हिशोबात घेऊन किती राहिले, ते असते. वर्षासुरुवाती मागून पुढे आणलेला आकडा हिशोबात असतोच. असे दर वर्षी केले, तर प्रत्येक वर्षाच्या शिल्लकीत आदल्या पूर्ण आयुष्याची शिल्लक असतेच. का इथे ऑक्सफॅमचा काही वेगळा हिशोब आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेशजी गंमत उलटी आहे.
तुमच्याकडे १०० रु आहेत. माझ्याकडे शून्य आहेत. म्हणजे दोघाकडे मिळून १०० संपत्ती. तुम्ही मला ते उसने दिले. त्याचे मी आंबे विकत घेतले आणि खावून टाकले. आता भौतिक जगात तुमच्याकडे काही उरलं नाही आणि माझयाकडे देखिल. परंतु, ऑक्सफॅमच्या मते दोघांची मिळून १०० रु संपत्ती आहे. (आता याच्यात कृपया त्या आंबे विकणाराकडे १००रु आले नि टोटल २०० झाले इ इ म्हणता येत नाही. कारण पैसा हे संपत्तीचे डिनॉमिनेशन आहे आणि डबल काउंटींग होऊ शकत नाही. त्या आंबेवल्याकडे आंबे कुठून आले इ इ प्रश्न विचारत पूर्ण इकॉनॉमी फिरून आल्यावर दोघांकडची संपत्ती पुन्हा १०० च निघते, तिघांकडची २०० च निघते. म्हणून आपण पैश्याला आंतरिक मूल्य नसते असे म्हणतो.)
===========
मात्र तुमचे तुमी १०० रु चे आंबे घेतले नि खाल्ले तर मात्र तुम्ही तुमची संपत्ती नष्ट (शब्द अयोग्य आहे, पण चालून जावा) केली असे होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यावर कालच नितिन थत्तेना इथेच उत्तरे दिली आहेत. उगाच कशाचा काही अर्थ नका काढू. १०० रु डिपॉझिट असेल तर बँका १००० रु ते २००० रु लोन देतात. (शून्ये बरोबर आहेत सगळी.)
=========
आणि डिपोझिट किती आहे नि बँकेची संपत्ती किती आहे हे तत्क्षणी ठरत नाही. बँक त्या डिपॉझिटमधून स्वतःला काय कमावते हे महत्त्वाचे. हे डिपॉझिट तिची लायाबिलिटी आहे नि बँकेचे कॅपिटल (जे काही ५-१० रु) ते ओक्सफॅम + पकडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बँकेची संपत्ती किती आहे हे तत्क्षणी ठरत नाही

कर्रेक्ट! हे तत्क्षणी ठरत नाही, पण ऑक्सफॅमसारखे अहवाल हे "पॉईंट स्टेटमेंट मेथडोलॉजी" बनवून केलेले असतात. म्हणजे "अ‍ॅज अ‍ॅट अ पर्टिक्युलर डेट" अ‍ॅसेट वजा डेट. याला "बॅलन्स शीट अ‍ॅप्रोच" म्हणतात.

१०० रु डिपॉझिट असेल तर बँका १००० रु ते २००० रु लोन देतात. (शून्ये बरोबर आहेत सगळी.)

मनी मल्टिप्लायर इफेक्ट मलाही समजतो. पण मनी मल्टिप्लायर इफेक्ट बघण्यासाठी काळाची ब्रॅकेट ताणावी लागते. पण ऑक्सफॅमने "आजच्या तारखेला" अ‍ॅसेट वजा डेट केलं आहे. बँकेला आज मिळालेल्या १०० रुपयांवर तत्क्षणी १००० रुपयांचं कर्ज देता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कारण डिपोझिट झालेल्या रु. १०० मधून (अ‍ॅसेट)

आबा एक ढ शंका. बँकेकडे आलेले डिपॉझिट हे बँकेचे असेट असतात की लायबिलिटी? एक्दा कधीतरी हे प्रकरण समजल असं वाटलेलं त्याच्या एकदम उल्ट वाटलं वरचं वाक्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लाएबिलिटी.

अकाउंटिंग स्पष्टीकरण
डिपॉझिट आल्यावर बँकेच्या पुस्तकात

कॅश अकाउंट डेबिट
..टु ढेरेशास्त्री डिपॉझिट अकाउंट क्रेडिट

पर्सनल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स --> क्रेडिटर --> देणेकरी

सामान्यज्ञान स्पष्टीकरण

ढेरेशास्त्रींनी शंभर रुपये आणून भरले. नोटेचा नंबर अबकड१२३४. ही नोटेचा मी (बँक) विनियोग करू शकतो. म्हणून नोट अ‍ॅसेट.

पण आता ढेरेशास्त्री शंभर रुपये मागायला कधीही येऊ शकतात. पाच मिनिटातसुद्धा. म्हणून "ढेरेशास्त्रींनी केलेलं डिपॉझिट" ही लाएबिलिटी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद! कॉमर्सला गेलो नाही याचा आनंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला वाटते, हा हिशोबांत बँका नाहीत. संपत्ती घरकुलांच्या मध्ये वाटलेली असावी.
काही विवक्षित बाबतीत बँका अमेरिकेत व्यक्ती आहेत (म्हणजे त्यांना मुक्त अभिव्यक्तीचे हक्क आहेत, वगैरे.) परंतु बँकेचे सर्व निव्वळ धन बँकेच्या (घरकुल, सामान्य उपयोगातील "व्यक्ती" अशा) भागधारकांत वाटून हिशोब लावला असावा.

The estimation of wealth levels is based on the information that can be assembled from household balance sheets and sample surveys. Household balance sheets are often compiled in conjunction with the national accounts or flow of funds data while sample surveys derive from household interviews. Available household balance sheet information enables us to construct ‘complete’ financial and non-financial data for 19 countries and financial data for 15 countries, where ‘complete’ is interpreted as full or almost full coverage of financial assets, and inclusion of at least owner-occupied housing on the non-financial side.

अहवालाच्या पद्धतींच्या बाबतीत अधिक माहित्याच्या दुव्यातील संदर्भ, पीडीएफ दुवा.

आणि ऑक्सफॅमच्या अहवालात माहिती :

Each year Credit Suisse gathers the most up-to-date national balance sheet data and household surveys that cover total wealth stocks and within-country wealth distribution. For each country, it evaluates the quality of data ranging from „poor‟ to „good‟; concluding in general that the quality of data is better for richer countries, where the majority of global wealth is held.

पीडीएफ दुवा, पृष्ठ २, खालून दुसरा परिच्छेद.

मला वाटते, की या अहवालाच्या गणितात लेखाजोख्याच्या अगदी-अगदी ढोबळ घोडचुका नसाव्यात. आकडेवारीची साहित्यसामग्री अपुरी असल्यामुळे अंदाज चुकले (की फारसे चुकलेले नाहीत), वगैरे, असे मुद्दे चर्चेसाठी प्राथमिक असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑक्सफॅमच्या मते, अमेरिकेत चीनपेक्षा अधिक गरीब लोक राहातात. का? कारण त्यांच्याकडे मोठी कर्जं असतात. म्हणजे नुकतीच डॉक्टर झालेली, जिला जवळपास लाख डॉलर वर्षाला नोकरी लागली आहे अशी व्यक्ती पाहू. तिचे स्वतःचे अॅसेट्स मामूली आहेत, पण शिक्षणासाठी काढलेलं दोन लाख डॉलरचं कर्ज आहे. ही व्यक्ती ऑक्सफॅमच्या मते काही हजार रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या विदर्भातल्या गरीब शेतकऱ्यापेक्षा गरीब आहे.

व्यक्तिची नेट वर्थ काय आहे आणि क्षमता काय आहे यात फरक आहे. समजा ऑक्सफॅमने असे वरच्यासारखे गणित नाही मांडले तर काय होईल? विदर्भातल्या प्रत्येकच गरीब शेतकर्‍याला २ लाख डॉलर दिले तर तो पुढे कितीतरी लाख डॉलर कमवणारा श्रीमंत डॉक्टर बनूच शकतो ना असे मानल्यासारखे होईल? मोजमाप क्षमतांचे नाही, परिस्थितीचे आहे.
तुमच्यात मोप क्षमता आहे, पण त्यातून येणारे उत्पादन कोण्या अन्य माणसाच्या चरणी वाहून यायचे आहे तर आजची स्थिती काय? तुम्ही श्रीमंत की गरीब?
=======
आणि हा प्रश्न व्यक्तिगत पातळीवर घेण्यात काय वैचित्र्य आहे ते पहा. पुढे काय होईल? आज हे एक समाज म्हणून, दोन लाख लोन देणारा, ही एक लाख पगारवाली, तो शेतकरी हे अनुक्रमे १०^९:१०^५:१०^१ या प्रमाणात संपत्ती बाळगून आहेत. सारे मिळून १०० रु प्रतिवर्ष त्याच प्रमाणात कमवतात. तर पुढच्या वर्षी १०४ रु कमवतात, पुन्हा नविन संपत्तीच्या प्रमाणात. हे असे असते तरी बरे असते, पण हा नविन संपत्ती कमवण्याचा रेशो अगोदरच खूपच स्क्यूड आहे नि वरचेवर अधिकच भयानक स्क्यू होत आहे.
==========
शिवाय , खरी गोम आहे कि अशा पोटेंट डॉक्तरला गरीब शेतकर्‍यापेक्षा गरीब दाखवावयाची पद्धती ऑक्सफॅमने ही केवळ या धनाढ्य लोकांकरता वापरली आहे, गरीबांकरिता नाही!!!!!! गरीबांसाठी सरळ वर्ल्ड जीडीपी बाय वर्ल्ड पॉप्यूलेशन केले आहे. श्रीमंतांचे अजून श्रीमंत बनायचे पोटेंशियल इग्नोर केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऑक्सफॅमचा चार्ट. यात सर्वात 'गरीब' दहा टक्के लोकांत युरोपियन आणि अमेरिकनांचं प्रमाण प्रचंड आहे. आणि चीनी जवळपास नाहीतच.

ऑक्सफॅम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणिती हिशोबाच्या (अकाउंटिंग) दृष्टीने, आणि अर्थी-अर्थीही चित्र चुकलेले आहे, असे स्वयंस्पष्ट लक्षात येत नाही. चीनमध्ये ऋण संपत्ती असलेले लोक अमेरिकेपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत असे अन्य प्रमाण का? जेणेकरून म्हणता यावे, की तक्ता गंडलेला आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या तक्त्यात अजिबात काही गंडलेले नाही. भारत व चीन यांची मिळून लोकसंख्या जगाच्या जितके टक्के होते तितकेच टक्के त्यांचे इथे क्षेत्रफळ आहे. इतरही क्षेत्रफले व लोकसंख्या प्रमाणात आहेत. आफ्रिकेत अत्यल्प अतिश्रीमंत आणि खूप अतिगरीब (प्रॉपर कोन) आहेत. (चीनमधे समतावादी राजवट आहे, म्हणून अतिगरीब नावाचा प्रकार नाही. https://www.quora.com/What-did-China-do-that-India-hasnt-that-brought-a-... चीनमधे भारतासारखे दारिद्र्य नाही हे माहित नसणे हे अज्ञान आहे. ते अज्ञान आहे हे अमान्य करणे हा एक पुरोगामी अट्टाहास आहे, कारण नै म्हटलं तरी भारत चीन पेक्षा तरी पुरोगामी आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चीनच्या शहराच्या झोपडपट्ट्यांमध्ये आणि ग्रामीण एरियात महिन्याला तीस-पस्तीस डॉलर्स मध्ये राहणारे कोट्यवधी लोक आहेत. ते दारिद्र्य भीषण आहे. फक्त सरकारी फुकट खानावळी, हॉस्पिटल्स आणि शिक्षण यामुळे ती गरिबी थोडीफार सह्य होत असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

सध्या मी आकडेमोडीतच आहे.
आणि चीनमध्ये यूएस/कॅनडा इतके अति-गरीब आहेत की नाही, याबाबत आकडेमोड अथवा आकडेओळख करून घेतो आहे. त्यामुळे चीन-भारत तुलनेत पुरोगामित्वाचा गतकालास दोष, वगैरे, सध्या तरी माझ्या विचाराधीन नाही.
तुम्ही बहुधा अन्य उपधाग्यांमधला मुद्दा येथे मांडत आहात असे वाटते आहे, परंतु सर्व उपधागे मी काळजीपूर्वक वाचलेले नाहीत, क्षमस्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नॉर्थ अमेरिकेत यू एस आणि कॅनडा सोडून देश आहेत.
==============
अमेरिकेत बसलेल्या एन आर आय लोकांना आपल्या "खंडात" जगातले सर्वात गरीब आणि आपल्या कंपिटीटर चीन "देशामधे" मधे जगातले सर्वात गरीब नाहीत हे अजब वाटते, पण तस्सेच आहे. पाकिस्तानात भारताबद्दलचा सिलॅबस वाईट दिल्याने भारत वाइट होत नाही तसे गरीबीच्या बाबतीत चीन अमेरिकेने म्हटल्यामुळे त्यांच्या खंडापेक्षा वाईट ठरत नाही. चीन मधे ३० वर्षांत थेट ५० कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले आहे नि मला चिनी यामुळे चिनी पुरोगामित्वाचा (जे काही ते चा) अभिमान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गुर्जी आमचे आवडते विनोदी लेखक आहेत. कधी त्यांचे विनोद स्पष्ट करून सांगावे लागतात, तेव्हा त्यांतला विनोद नष्ट होतो. कधी ते इतरांचे विनोद समजावून सांगतात, तेव्हा मला हसायला येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गरीब पन्नास टक्क्यांकडे गेल्या वर्षी १७६० बिलियन होते, ते घसरून एकदम ४२६ बिलियन डॉलर झाले. म्हणजे त्यांची तीन चतुर्थांश संपत्ती नष्ट झाली!

असे नसावे. पूर्वीपेक्षा अधिक आकडेवारी हाती आल्यामुळे पूर्वी जे खूपच-अंदाजी होते, ते आता तितक्या-खूप-पेक्षा-बरे-अंदाजी झालेले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

The decline in the share of global wealth held by the bottom 50% has fallen largely due to the availability of new data sources from India and China that show a lower amount of wealth in the lower deciles than had previously been estimated. There is more debt in the very poorest group and fewer assets in the 30–50% percentiles of the global population.

पीडीएफ दुवा पृष्ठ ३, खालून तिसरा परिच्छेद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑक्सफॅमच्या मते, अमेरिकेत चीनपेक्षा अधिक गरीब लोक राहातात. का? कारण त्यांच्याकडे मोठी कर्जं असतात. म्हणजे नुकतीच डॉक्टर झालेली, जिला जवळपास लाख डॉलर वर्षाला नोकरी लागली आहे अशी व्यक्ती पाहू. तिचे स्वतःचे अॅसेट्स मामूली आहेत, पण शिक्षणासाठी काढलेलं दोन लाख डॉलरचं कर्ज आहे. ही व्यक्ती ऑक्सफॅमच्या मते काही हजार रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या विदर्भातल्या गरीब शेतकऱ्यापेक्षा गरीब आहे.

त्यांनी जवळजवळ तुम्ही दिलेलेच उदाहरण विशद केले आहे, आणि अशा गणितामुळे कितपत लोकांना अयोग्य "गरीब" ठरवले जाते, त्याबाबत काही अंदाज दिलेले आहेत.

In the global wealth distribution, some people we may not think of as being poor show up among the very poorest, as they are in net debt. These people may be in debt but be income-rich, thanks to well-functioning credit markets (think of the indebted Harvard graduate). A number of such cases will exist. However, in terms of population, this group is insignificant at the aggregate global level. Figure 1 shows that just 1% of people in the bottom 50% are from North America, while 70% live in low income countries.

पीडीएफ दुवा पृष्ठ ३, सर्वात खालचा परिच्छेद.
चुकून खालच्या ५०%मध्ये आलेल्या १% उत्तर अमेरिकनांना बाजूला केले तर काय शीर्षक येईल "४९% लोकांइतकी संपत्ती ८ व्यक्तींकडे आहे" हे शीर्षक "५०% लोकांइतकी..." पेक्षा फारसे वेगळे आहे का? वाटल्यास भारत, चीन, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, या सर्वांच्या नावे प्रत्येकी १% कमी करा, त्या त्या भागांत तितके लोक चुकून गरीब ठरवले, म्हणूया. "४४% टक्के लोकांइतकी..." हे इतके काही वेगळे आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चुकून खालच्या ५०%मध्ये आलेल्या १% उत्तर अमेरिकनांना बाजूला केले तर काय शीर्षक येईल "४९% लोकांइतकी संपत्ती ८ व्यक्तींकडे आहे" हे शीर्षक "५०% लोकांइतकी..." पेक्षा फारसे वेगळे आहे का?

मुद्दा असा आहे, की हे एक टक्का उत्तर अमेरिकन लोक जे स्वतःबरोबर ऋण किंमती आणतात त्यांमुळे सामान्य गरीबांची असलेली जुजबी ऋण किंमत मॅग्निफाय होते. म्हणजे समजा भारतातल्या गरीब दहा टक्क्यांकडे वजा एक अब्ज डॉलर्स आहेत, तर या अमेरिकन आणि युरोपियन कर्जग्रस्त १-२ टक्क्यांकडे वजा दहा अब्ज डॉलर्स आहेत. आणि ते गरीबही नाहीत. थोडक्यात, 'गरीब' या शब्दाची व्याख्या कर्जदार अशी केल्याने प्रचंड घोटाळा होतो. कारण कर्जाचा विचार करताना पतीचा विचार केला जात नाही. जेव्हा तारण म्हणून घर किंवा गाडी असेल, तेव्हाच यांची बेरीज वजाबाकी होत असावी.

पण सर्वात गोंधळाची गोष्ट अशी आहे की या पद्धतीत खूप लोक ऋण किंवा जवळपास शून्य मालमत्ता बाळगणारे ठरतात. त्यामुळे पहिल्या पन्नास टक्क्यांची बेरीज करताना ती बहुतांश ऋण, थोडे धन असं करत जवळपास शून्य येते. 'गरीब' पन्नास टक्क्यांची बेरीज फक्त ४२६ बिलियन येते यातच खूप काही येतं. आज जगाचं उत्पन्नच सुमारे १०० ट्रिलियन आहे. या गरीबांचं उत्पन्नही जगभर असलेल्या जिनी इंडेक्सनुसार २० ट्रिलियन असावं. मग मालमत्ता त्याच्या केवळ २ टक्के कशी? किंबहुना मालमत्तेच्या सुमारे १० टक्के उत्पन्न काढलं जाऊ शकतं असा हिशोब केला, तर या पन्नास टक्के गरीबांची मालमत्ता सुमारे २०० ट्रिलियनच्या आसपास असावी. हे अर्थात बॅक ऑफ द आन्व्हलोप, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेशन झालं. त्यात दोनपाच पटीचा फरक कोणी दाखवून दिला तर मी तो सहज मान्य करेन. पण पाचशेपट लहान आकडा स्वीकारणं कठीण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(उपप्रतिसादाच्या संपादनाला बूच लागू नये, म्हणून प्रतिसाद खाली नाही, पण राजेश घासकडवींचा युक्तिवाद...)

संपत्ती आणि उलाढाल यांच्यात गोंधळ न व्हावा.
जगातील संपत्ती, २०१५ (नॅशनल वेल्थची बेरीज) २५५ ट्रिलियन डॉलर आहे, तर जीडीपीची जागतिक बेरीज ७४ ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजे वेल्थ/जीडीपी ~= ३.५

हा भागाकार वेगवेगळ्या देशांकरिता वेगवेगळे आहे.
यू एस संपत्ती,(२०१५) ८५ ट्रिलियन डॉलर आहे, तर जीडीपी १८ ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजे वेल्थ/जीडीपी ~= ४.७
भारत संपत्ती,(२०१५) ३ ट्रिलियन डॉलर आहे, तर जीडीपी २ ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजे वेल्थ/जीडीपी ~= १.५
(भारताशी तुल्य जीडीपी)
फ्रान्स संपत्ती,(२०१५) १२ ट्रिलियन डॉलर आहे, तर जीडीपी २.४ ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजे वेल्थ/जीडीपी ~= ५

देशांची ही बात, तर घरकुलांचे काय!

ऑक्सफॅमचे विश्लेषण क्रेडिट सुइस्ने जमवलेल्या घरकुल सर्वेक्षणांपासून आणि राष्ट्रीय बॅलन्सशीटमधून आलेले आहे, आणि सर्वात श्रीमंत घरकुलांची माहिती फॉर्चुन मासिकाच्या अंदाजांमधून. मला वाटते जीडीपीच्या आकड्यांतून संपत्तीबाबत ऑर्डर-ऑफ मॅग्निट्यूड कल्पना फारतर पूर्ण देशांकरिता करता येईल - तिथेही काही पटींची चूक होईल. घरकुलांच्या बाबतीत अंदाज ऑर्ड-ऑफ-मॅग्निट्यूड इतपतसुद्धा करता येणार नाही. घरकुलांचे सर्वेक्षणच हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गरीबांचं उत्पन्नही जगभर असलेल्या जिनी इंडेक्सनुसार २० ट्रिलियन असावं.

जिनी कोइफिशियंतवरून हा अंदाज कसा केला?

विकीपीडियावरती काही गणिते सोडून दाखवलेली आहेत :

The proverbial case where the richest 20% have 80% of all income would lead to an income Gini coefficient of at least 60%.
An often cited case that 1% of all the world's population owns 50% of all wealth, means a wealth Gini coefficient of at least 49%.

https://en.wikipedia.org/wiki/Gini_coefficient

जगातील ५०% लोकांकडे ० संपत्ती असली आणि उर्वरित लोकांकडे क्रमाक्रमाने अधिक (लिनियर) संपत्ती असली, तरी जिनी कोएफिशियंट ०.५ इतके येते (म्हणजे नुसता आकडा बघितला तर पुष्कळ चांगले, जगाचे जिनि कोएफिशियंट ०.८९ इतके वाईट आहे). आणि या सोप्या गणिताच्या स्थितीतही जगातील एका श्रीमंत माणसाकडे जगातील ५०% गरिबांइतकी संपत्ती असते. त्यामुळे जिनी कोएफिशियंटच्या आकड्यामधून "५०% गरिबांचे उत्पन्न किती असेल याचा ठोकताळा कसा लावता यावा?

जागतिक जिनी कोएफिशियंट पीडीएफ दुवा :
https://www.wider.unu.edu/sites/default/files/dp2008-03.pdf

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिनी कोएफिशियंटवरून उत्पन्नाच्या टक्केवारीचा अंदाज, आणि त्या उत्पन्नावरून मी वर वापरलेल्या सूत्रानुसार त्यांच्याकडे असलेल्या ह्यूमन कॅपिटलचा अंदाज, असं ते गणित होतं. मुळात, कंपन्यांचं व्हॅल्यूएशन ज्या सूत्रानुसार होतं - प्राइस/अर्निंग रेशो सुमारे १० ते २० योग्य समजला जातो, त्याप्रमाणे मनुष्याच्या अंगी असलेल्या कॅपिटलचा हिशोब करणं योग्य आहे का? हा प्रश्न आहे. मला ते योग्य वाटतं, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर पुढचं गणित एकत्र मिळून करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जागतिक जिनीकरिता ग्राफ

jini

आकडे
आडवा अक्ष उभा अक्ष
0 | 0
.1 | <.001> .2 | .001
.3 | .003
.4 | .006
.5 | .011
.6 | .019
.7 | .033
.8 | .06
.9 | .148
.95 | .293
.99 | .599
1 | 1

https://www.wider.unu.edu/sites/default/files/dp2008-03.pdf

तर असे दिसते, की पन्नास टक्के (आडवा अक्ष ०.५) कडे १.१% (उभा अक्ष ०.०११) इतकी संपत्ती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पॉईंट स्टेटमेंट मेथडोलॉजी" बनवून केलेले असतात.

"पॉईंट स्टेटमेंट मेथडोलॉजी" जर वापरायची तर ती पूर्णपणे तरी वापरायला पाहिजे.

एखादी मालमत्ता त्या पॉइंट ऑफ टाइम ला जी व्यक्ती उपभोगते ती मालमत्ता त्या व्यक्तीची आहे असे धरुन गणित मांडले पाहिजे ऑक्स्फॅम नी. पण असे गणित मांडणे त्यांच्या राजकीय स्वार्थी विचारांना सोईस्कर ठरणार नाही, म्हणुन ते वस्तुस्थिती मोडुन तोडुन लिहीतात.

कळण्यासाठी काही उदाहरणे
-------
कोणाची शेतजमिन जर कुळ कसत असतील आणि ५०% नफा वाटुन घेत असतील तर त्या जमिन मालकाची ५०% जमिन कुळाची आहे असे समजुन गणित मांडले पाहिजे.

म्हणे मुकेशभांईंच्या २३ मजली पॅलेस च्या कामासाठी ६०० लोक आहेत, त्यातली १००-१५० तिथेच रहातात कायमची. कागदावर २३ मजली पॅलेस मुकेशभाईंच्या नावावर दिसतो पण तो खरा तर ६०० लोकांच्यात समान वाटुन दाखवला पाहिजे.

१ कोटी मार्केट व्हॅल्यु असणार्‍या फ्लॅट मधे महिना १५००० रुपये देऊन रहाणारा. भाडेकरुच्या अ‍ॅसेट मधे त्या फ्लॅट्चे डीप्रीशिअएशन दाखवले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या मुकेशच्या घराचं उदाहरण सर्व प्रश्नांची उत्तरं देतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीची चर्चा चालू द्या, पण या सगळ्या आकड्यांत स्थानिक क्रयशक्ती विचारात घेतलेली आहे का?

उदाहरणार्थ, शिकागोमध्ये राहून एक लाख डॉलर्स बाळगणाऱ्यापेक्षा कानपूरमध्ये राहून अडुसष्ट लाख रुपये बाळगणारा (निदान काही बाबतींत तरी) जास्त ‘श्रीमंत’ असतो. याचं उघड कारण म्हणजे धान्यधुन्य, नोकरचाकर, वीजपाणी यांची किंमत कानपुरात कमी असते. हा फरक सगळ्याच बाबतींत नसतो ही गुंतागुंत आहेच - स्कॉचची आणि पेट्रोलची वगैरे किंमत ढोबळ मानाने दोन्हींकडे सारखीच असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

होय - हिशोबाचे एकक आहे पर्चेसिंग पावर पॅरिटी २००५ डॉलर (२००५ मधील डॉलरशी अन्य वर्षांचा चलनफुगवटा अ‍ॅडजस्ट करून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"क्रयशक्ती-समीकृत" हे उत्तम भाषांतर आहे. सध्या अशी "क्रयशक्ती-समीकृत" डॉलरची रुपयात किंमत काय मानली जाते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

~१७ रुपये.

लोक आपल्याकडच्या हजार रुपयांच्या नोटेला (अमेरिकेतल्या १०० डॉलरच्या नोटेच्या तुलनेत) मोठ्ठी नोट म्हणत होते. तेव्हा हा शोध घेतला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्वसाधारणपणे भारतासाठी १ डॉलर = ७० रुपये असा दर असेल तर १ डॉलर = ७०/३ = २३ ते २४ रु इतका मानला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे "चलनफुगवटा अ‍ॅडजस्ट करून" असे सवते लिहियची गरज नाही. एकाच वेळची मोजमापे केली तर हे होतेच. एक्सचेंज रेट हा दोन्ही देशांतील महागाई दर आणि व्याज दर यांच्या एकत्रित परिणामानुसार मार्केट ठरवते. यामधे अर्थव्यवस्था या मुक्त असणे अभिप्रेत आहे. पण वास्तवात तसे नाही. (भारतीय चालक पगार कमी आहे म्हणून अमेरिकेत नोकरीला जाऊ शकत नाही. जसे लेबरचे तसेच गुडसचे.) म्हणून पीपीपी फॅक्टर धरावा लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घेतली आहे. ती घेतली नाही तर आकडे अजूनच वाईट दिसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नुसत्या नेट-वर्थ आकड्यावरून गरीब श्रीमंत ठरवणे नक्कीच दिशाभूल करणारे ठरू शकते. कोणाच्याही आर्थिक परिस्थितीचा अंदाज करताना नेट वर्थ बरोबर कॅश-फ्लो हा ही महत्त्वाचा घटक असतो. विकली न जाणारी कोट्यावधीची स्थावर मालमत्ता रोजच्या अन्नाची व्यवस्था करू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकली न जाणारी कोट्यावधीची स्थावर मालमत्ता

जी गोष्ट विकली जात नाही तिला संपत्ती म्हणतच नाहीत. (कदाचित लायेबिलिटी म्हणत असतील.)
संपत्ती असणे आणि नसणे वेगळे आणि ती लिक्विड असणे आणि नसणे वेगळे.
किंमत घटवत आणली कि लिक्विडिटी सपासप वाढते.
====================
फायनल डेरिवेशन हे नेटवर्थचेच आहे. Fundamentally wealth is a point of time property. Net worth is a point of time property. Cash flow period of time property.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

A bunglow (with land) worth 20 Crore rupees is owned jointly by three brothers. One of the brothers is employed with small income income. He can't sell the bunglow because the other brothers do not agree.

He has net worth of 5 cr but very small cash flow. Is he rich or poor?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जेव्हा कोणताही मालकी हक्क अब्सॉल्यूट नसतो तेव्हा त्याला संपत्ती मानता येणार. मंजे भावांनी घर घेताना असा करार केला कि कितीही डेस्परेशन असून घर विकता येण्याचा मार्गच नाही तर ती निरुपयुक्त संपत्ती (किंवा घरभाडे देणारे व्याज देणारे डिपॉझिट) आहे. म्हणून तो व्यक्ति आज गरीब आहे. त्याची नेट वर्थ पाच करोड आज तरी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते मला तरी समजलं नाहीये.

इथे तुम्ही म्हणता की Net worth is a point of time property, आणि फायनल डेरिवेशन हे नेटवर्थचेच आहे. म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट अ‍ॅप्रोच घेऊन काढलेला ऑक्सफॅम अहवाल मान्य आहे.

पण मग वरती तुम्ही मनी मल्टिप्लायरसारखे फ्लो व्हेरिएबल वापरता, आणि 'संपत्ती तत्क्षणी ठरत नाही' वगैरे लिहिता.

तुम्ही स्टॉक व्हेरिएबलच्या बाजूने आहात की फ्लो व्हेरिएबलच्या? आयाम कन्फ्युज्ड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्टॉक.

संपत्ती तत्क्षणी ठरत नाही

बँकेने (फक्त १०० रु डिपॉझिट असताना) १००० रु लोन दिले तरी या १००० रु तून बँकेकरिता स्वतःकरिता होणारी संपत्ती तत्क्षणी निर्माण होत नाही असे तो संदर्भ आहे. बँकेची वा खातेदाराची संपत्ती म्हणून आपण फक्त त्या १०० रु चीच चर्चा करायची आहे, १००० ची नाही इ इ मला वर म्हणायचे होते. १००० रु तून काही संपत्ती बँकेला कमवायला वेळ लागेल.
============
ऑक्स्फॅमच्या रिपोर्ट मधे गरीब व श्रीमंत लोकांच्या संख्यांचे गुणोत्तर आहे, त्यांच्या संपत्तींचे (!) गुणोत्तर आहे आणि संपूर्ण जगाचे एकत्र आकडे असेही उपलब्ध आहेतच. ते जुळत नाहीत. ऑक्सफॅमने श्रीमंतांची नेट वर्थ आणि गरीबांची एक वर्षाची ग्रॉस कमाई (फ्लो) यांची तुलना केली आहे. हे अर्थातच श्रीमंतांना अजागळ श्रीमंत दाखवेल. तेवढे करेक्शन करून (मंजे दोघांची फक्त नेट वर्थ बघून) रिपोर्ट मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.