"पॅलेस ऑन व्हील्स "

तीन कोटी टिऱ्या* / आभाळ देखती
नाके ती टेकती/ धरतीला
फाटलेली चड्डी/ शर्ट असे, नसे
लढावे ते कसे/ हिवाळ्याशी
हातातले त्यांच्या / गंजके खुरपे
झपाझप कापे/ गवताला
डोक्यावर त्यांच्या /नसे ते छप्पर
फुटके खप्पर / आईबाप
शाळेमाजी त्यांना/ नसे ते शिक्षण
"रात्रीला भक्षण / काय करू?"
वाढदिवसाचे / फुगलेले फुगे
रंगीत नी झगे / कोठून ते
तीन कोटी पोरे/शेतांत राबती
भयाण सोबती/ दारिद्र्य ते
दुख्खाचीच कढी /दुख्खाचाचि भात
जेवोनिया तृप्त / कोणी नसे
मधूनच जाई / नवी आगगाडी
शहरची जाडी/ पोरेबाळे
हाती त्या सर्वांच्या / थंड कोकाकोला
ऑर्डरही केला / पिझ्झा मस्त
दोन्ही बाजूंमध्ये / नसे तो संवाद
आपुलाचि वाद / आपणासी
अशा त्या गाडीत / जपूनच बसा
खिडकीशी असा/ सदा दक्ष
काय त्या पोरांच्या / मनात घुसळे
संताप उसळे/ भयानक
झूकूनचि बसा/ दारही ते लोटा
घालतील गोटा / टकुर्यात
---
(*जसे:
बोलू जाता सोपे वाटे,
करणी करता टिरी फाटे :
: तुकाराम )

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता आवडली. एक्दम जो कॉन्ट्रास्ट दाखवला आहे तो लाऊडही वाटतो थोडासा(जाडी वगैरे), पण अंतर्मुखही करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Hope is for sissies.