भारताची प्रगती - ३: महिला कल्याण

मी कॉलेजात असताना गोविंदा आणि करिश्मा कपूर फॉर्मात होते.
"मेरी चाल भी सेक्सी, मेरे बाल भी सेक्सी" असं म्हणून आपले अंग थरथरवण्यात गोविंदा आणि "सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले" या गाण्यावर थिरकण्यात करिश्मा दंग होते आणि त्यांच्यामागे बराचसा तरूणवर्ग पागल झाला होता. छपरीपणाला कधी नव्हे ती अपार प्रतिष्ठा प्राप्त व्हायच्या मार्गावर होती.
पण कोण्या नतद्रष्टाची नजर या गाण्यांना लागली आणि समाजहिताच्या नावाखाली त्यातला "सेक्सी" हा शब्द काढून टाकण्यात आला. "सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले" हे गाणं ऐकताना कमनीय बांध्याची टंच भासणारी लाल आखूड ड्रेसमध्ये लवलवणारी करिश्मा आता "बेबी बेबी बेबी मुझे लोग बोले" या ओळींवर अंगठा तोंडात धरून लाल झबल्यात हातपाय हलवणार्‍या बाळीसारखी भासायला लागली. आधीच्या गाण्याने तोंडाला पाणी सुटल्याने पचापचा थुंकणारी टपरी-टपरीवरची छपरी पोरं नंतर थुंकण्यासाठी गुटख्याचा आधार घ्यायला लागली.
गणपतीच्या मांडवात किंवा मिरवणुकीत घराघराच्या खिडक्या-गॅलर्‍यांतून पाहणार्‍या पोरींसमोर चेकाळून कंबर हलवण्यातली मजाच गेली. रस्त्यावरून जाताना समोरून सुंदर मुलगी येताना पाहून हे गाणं गुणगुणून तिच्या कपाळावरच्या आठ्या आणि गालावरचे गुलाब पाहून खूश होणारी पोरं आता काय म्हणायचं अशा विचारात पडून पोरगी निघून गेल्यावर वळून वळून नुसतं पाहातच राहू लागली.
अशा या भयाण परिस्थितीत एक तारूण्याचा अभूतपूर्व उत्सव अनुभवण्याच्या मार्गावर असणारी पिढी अकाली म्हातारी झाली.
भारताच्या महान संस्कृतीच्या आत्यंतिक अधःपतनाची ती काळरात्रच म्हटली पाहिजे.
पण हिर्‍यावर दगड-माती-शेणाचे कितीही थर चढवले तरी त्याची चकाकी जशी किंचितही कमी होत नाही आणि तो सुप्तावस्थेत अभंगच राहतो तशी आपली ही महान भारतीय संस्कृती या सगळ्या जुलमी संस्कारांच्या थरांखाली सुप्तावस्थेत अभंग राहिली.
आणि अंधाराची काळी चादर कितीही जाड असली तरी सूर्याचा एकच किरण ती सहजी चिरत जातो, तसा जाणिवेचा एक क्षण हे फालतू संस्कारांचे थरच्या थर कसे उध्वस्त करू शकतो त्याची प्रचिती जगाला लवकरच येणार होती.
त्यानंतरच्या दहा-बारा वर्षांत भारताची चहू अंगाने प्रगती व्हायला लागली. या सर्वांगीण प्रगतीमुळे स्त्रियांचीही बरीच प्रगती झाली. स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. साडी सोडून पंजाबी ड्रेस आणि पंजाबी ड्रेस सोडून लो-राईझ जिन्स घालू लागल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करू लागल्या. किंबहुना काही क्षेत्रांमध्ये तर स्त्रियांनी पुरुषांनाही मागे टाकले. यात महत्वाची भूमिका बजावली ती आपल्या सरकारने आणि नॅशनल कमिशन फॉर विमेन या संस्थेने. केवळ दहा-बारा वर्षांतच स्त्रियांची इतकी प्रगती झाली की आता पुढे करण्यासारखे काय राहिले आहे असा प्रश्न या आयोगाला पडला. स्त्रियांचे सगळे प्रश्न सुटले असे जाहीर करून आयोग बरखास्त करायची वेळ येते की
काय असा प्रश्न पडला होता. पण नाही, एका स्त्रीच्याच हाती संस्कृतीच्या उद्धाराची नाडी असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि ही नाडी खेचून आपल्या सुप्तावस्थेतल्या संस्कृतीच्या उद्धाराचे महान कार्य केले आयोगाच्या नुकत्याच अध्यक्ष झालेल्या एका अत्यंत दूरदृष्टीच्या स्त्रीने!
धुळीत पडलेल्या हिर्‍याप्रमाणे दुर्लक्षित असलेल्या सेक्सी शब्दाला तिने त्याची योग्य ती जागा मिळवून दिली. सेक्सी म्हणजे भोग्य असा जो पुर्वीच्या लोकांनी लावलेला विकृत अर्थ होता तो बदलून सतेज, सुंदर आणि भोग्य असा जास्त चांगला अर्थ तिने या शब्दाला मिळवून दिला. भारताच्या संस्कृतीचा बोळा तिने अशारीतीने एका झटक्यात काढून टाकला.
आता इथून पुढे स्त्रियांच्या कल्याणाचा वारू दौडत जाईल. चुकीच्या समजुतींमुळे हा शब्द ऐकून पूर्वी मुलींच्या कपाळावर आठ्या पडत असत, त्या जाऊन आता फक्त गालावरचे गुलाबच उरतील. भारताच्या प्रगतीमुळे स्त्रियांची प्रगती होत होती तिथे आता स्त्रियांच्या प्रगतीमुळे भारताची प्रगती होईल. मोकळेपणाने सेक्सी म्हणता आल्याने तरूण पिढीला गुटख्याच्या प्राणघातक विळख्यातून मुक्ती मिळेल, चवदार गाणी आल्याने गणपती, नवरात्र दांडिया वगैरे उत्सवांना आलेली मरगळ नष्ट होऊन सांस्कृतिक प्रगतीचा उच्चांक गाठला जाईल.
हा शब्द म्हणजे स्त्रीसाठी सन्मानदर्शक उपाधीच आहे असे त्यांनी जाहीर केल्याने कुमारी, सौभाग्यवती अशा पुरुषांनी दिलेल्या हीनत्वदर्शक उपाध्या मागे पडून जसे पुरुषांना श्री म्हटले जाते तसे स्त्रियांना सेक्सी म्हटले जाणे दूर नाही. किंबहुना महान पुरुषांना जसे आजकाल श्री श्री श्री म्हटले जाते तसे महान स्त्रियांनाही सेक्सी सेक्सी सेक्सी म्हटले जावे असेच या नव्याने जन्मलेल्या महान संस्कृतीच्या पाईकांना वाटत असणार यात शंका नाही.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

वा वा वा! (खरंतर हा हा हा! Smile )
सेक्सी शब्दावरची बंदी दूर झाली हे वाचून लय बरां वाटलं.. मात्र आता सेक्सी हे पालुपद श्री सारखे लावायचे झाल्यास ममता, जयललिता इथपासून ते सुप्रिया पर्यंत सार्‍यांना लावावे लागणार या भितीने गपगारही झालो आहे

अन केवळ स्त्रियांनीच सेक्सी दिसावे - पुरुषांना मात्र श्री ने हिणवावे या मागासलेपणाचा (स्वतःचे पुरोगामित्त्व सिद्ध करण्यासाठी) निषेध! ;

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

महान संस्कृती मग ती कोणत्याही काळातली असो, तिचे पाईक हे नेहमी असे महानच असतात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुसखुशीत (की सेक्सी?) झालाय लेख.
बादवे, अशीच कथा "बिच" ह्या उपाधीचीही आहे(http://en.wikipedia.org/wiki/Bitch_(insult)).
सार्‍याच "मनीमनीच्या" गुजगोष्टी . अजून काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"बिच" ही उपाधी देणे किंवा घेणे हा स्त्रियांचा आपापसातला मामला आहे अशी माझी समजूत आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारताची प्रगती अशा प्रकारे होत आहे हे काही जीवजंतूंना रूचत नाही. त्यामुळे प्रगतीची चुकीची मानकं दाखवून ते पुरोगामी से. स्त्रियांवर आणि ननिंसारख्या सत्यशोधक लेखकांवर टीका करण्यातच धन्यता मानतात. अशा सर्वांचे बुसरटपणाचे बुरखे पाण्यात बुचकाळून त्यांचे चेहेरे खर्‍या अर्थाने आमच्यासमोर आणणार्‍या ननिंचे आभार.

काहीसे* व्यक्तीगत: तुम्ही अकाली वृद्ध होण्याबद्दल खेद आहे.

से. अदिती

*या से चा त्या से शी काहीही संबंध नाही.

(लेखनामागची प्रेरणा खरंतर समजली नाही. पण तो मुद्दा गौण आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही अकाली वृद्ध होण्याबद्दल खेद आहे.

सहानुभूतिबद्दल धन्यवाद. पण दु:ख वृद्धत्वाबद्दल नाही. नोकरी करणार्‍या सुनेकडे पाहून आयुष्यभर गृहिणी असलेल्या सासूच्या पोटात दुखावं तसं ही बंदी उठल्याची बातमी वाचून आमच्या पोटात दुखलं.
शाळा-कॉलेजात से. पदवीला पात्र असलेल्या कित्येक कु. ना आम्ही त्यांच्यासमोरच काय आपापसातही कधी से. न म्हणून त्यांच्यावर (आणि स्वतःवर) किती घोर अन्याय केला असे वाटून काळजातही कळ उठली. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेरे, मी 'से' अदिती असं लिहीण्यासही थोडा (म्हणजे बराच) उशीर केला आहे याच्या जाणीवेने तुमच्या पोटदुखीची सह-अनुभूती घेत आहे.

लेखाची प्रेरणा उशीराने का होईना समजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गणपतीच्या मांडवात किंवा मिरवणुकीत घराघराच्या खिडक्या-गॅलर्‍यांतून पाहणार्‍या पोरींसमोर चेकाळून कंबर हलवण्यातली मजाच गेली

त्या दिवसांच्या आठवणीने अंमळ हळवा झालो! गणपतीच्या मिरवणुकीत थोडीशी (जास्तच) घेऊन नाचणारे, 'तालमीत' जाऊन 'कमावलेले', ते तरूण पाहताना आम्हाला "मोठा झाल्यावर काय होणार आहेस रे बाळ" या प्रश्नाचं उत्तरच मिळायचं. त्यातला एक आपली पिळदार छाती भुवया उडवतात तसं एकेक करून उडवायचा ते तर अजून लक्षात आहे! (पण पुढे आम्ही पुण्याला गेलो आणि.... असो!)

लेखाचा संदर्भ मात्र कळला नाही.. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दांवर प्रेम करणारी फार थोडी लोकं शिल्लक राहिलेली आहेत. सेक्सी या शब्दाला गेलेली मान्यता परत मिळवून देणाऱ्या त्या अध्यक्षा आणि त्याची रंगतदार बातमी देणारे तुम्ही त्या मोजक्या लोकांपैकीच असावात.

एका स्त्रीच्याच हाती संस्कृतीच्या उद्धाराची नाडी असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले

हे वाक्य काळजाला भिडलं.

कुमारी, सौभाग्यवती अशा पुरुषांनी दिलेल्या हीनत्वदर्शक उपाध्या मागे पडून

या अर्थातच मालकीहक्क (किंवा त्याचा अभाव) दर्शवणाऱ्या पदव्या आहेत. त्या टाकून दिल्या हे उत्तमच.

मात्र लेखाचं नाव पाहून यात काहीतरी भन्नाट ग्राफ असतील अशी आशा होती. मला एकदोन फर्माइशी सुचतात, इतरांनी भर टाकावी.
- हिंदी सिनेमांत दाखवण्यात आलेल्या चुंबनदृश्यांची संख्या
- हिरॉइननेच आयटम सॉंग करण्याचं वाढतं प्रमाण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबर्‍या. असल्या काही समाजोन्नती घडवणार्‍या सुधारणा घडत आहेत, हे वाचून बरे वाटले.

पण हिर्‍यावर दगड-माती-शेणाचे कितीही थर चढवले तरी त्याची चकाकी जशी किंचितही कमी होत नाही आणि तो सुप्तावस्थेत अभंगच राहतो तशी आपली ही महान भारतीय संस्कृती या सगळ्या जुलमी संस्कारांच्या थरांखाली सुप्तावस्थेत अभंग राहिली.
आणि अंधाराची काळी चादर कितीही जाड असली तरी सूर्याचा एकच किरण ती सहजी चिरत जातो, तसा जाणिवेचा एक क्षण हे फालतू संस्कारांचे थरच्या थर कसे उध्वस्त करू शकतो त्याची प्रचिती जगाला लवकरच येणार होती.

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय संस्कृती आता प्रगतीच्या मार्गाला लागली आहे हे वाचून धन्य वाटले.

फ्क्त माहिती मधे एक सुधारणा - 'तो' शब्द इतका काही वाईट नाही असे म्हणणार्‍या त्या विदुषींना, आपले म्हणणे मागे घेण्याचे फर्मान काही स्त्री संघटनांनी दिले आणि त्यांनी ते मान्य करून आपले शब्द मागे घेतले आहे. त्यामुळे ती 'बंदी' की काय म्हणतात, ती अजून उठली नाहीये म्हणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

त्यामुळे ती 'बंदी' की काय म्हणतात, ती अजून उठली नाहीये म्हणे.

Smile अर्रर्रर्र..पुन्हा एक सांस्कृतिक क्रांती चुकली म्हणायची.
असो. आमची पोटदुखी मात्र थांबली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय संस्कृतीची प्रगती, संस्कृतीचा उद्धार याची हीच व्याख्या आहे का ?मग या भारतिय पुरुषांना स्वतःच्या कुटुंबातील स्त्रियांसाठी सेक्सी सारखे शब्द वापरलेले चालत असतील तर नक्कीच भारतीय संस्कृतीचा उद्धार झाला आहे म्हणायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतिहासाच्या आकलनात घोटाळा आहे साहेब. ज्या काळात कपूर खानदान की करिश्मा के तोंडसे हा शब्द ब्यान झाला होता त्याच काळात आमच्या दीक्षितांची माधुरी एक दो तीन, धक धक करने लगा, हमको आज कल है इंतजार वगैरे गाण्यांत 'सेक्सी' म्हणजे काय असतं याचे धडे आबालवृद्धांना देत देत टॉपला पोहोचली हा आमचा सुर्वणाक्षरांनी लिहिला जावा असा देदीप्यमान इतिहास आहे. तिच्यामुळे झालेलं समाजप्रबोधन शाब्दिक नसून प्रात्यक्षिक होतं म्हणून अगदी निरक्षरांपर्यंत झिरपलं (ट्रिकल डाऊन सिंड्रोम म्हणजे हाच का?), पण ते आज कुणाच्या लक्षात नाही. सगळ्यांना मेल्या कपूर अन् शर्मा लक्षात राहतात. आपला मराठी माणूस लॉबिंग करण्यात कमी पडतो हेच खरं. राज ठाकरेला जाऊन सांगायला हवं की बाबारे जरा इकडे पण लक्ष दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाब्बो ! किती, कित्त्ती अन कित्त्त्त्ती महान विचार हो तुमचे !
मरगळलेल्या समाजाला प्रबोधन करुन पुनर्जागरण करणे हे थोडेथोडके काम नव्हे.. व्वाह !व्वाह ! हे महान कार्य तुमच्या सारखे ज्वलंत विचारवंतच करु शकतात.

बाय द वे 'सेक्सी' या शब्दाला सतेज, सुंदर आणि भोग्य असा अर्थ मिळवून देणार्‍या या महानआत्मा कोण हे समजू शकेल काय ?
मला तर यात काही तरी गोम..गौडबंगाल अन ’किसी बाहरी शक्ती का हाथ’ असंच दिसत आहे :-? आता ही बाहेरची शक्ती 'ती' की 'तो' हे पहावे लागेल ...

~ वाहीदा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0