इस्राईल, पॅलेस्टाईन, स्थानिक अरब, इ.

(संपादक : इथे सुरू झालेली चर्चा स्वतंत्र धाग्यात हलवली आहे.)

त्या काळात ज्यू लोकांवर भयानक अत्याचार झाले ..... युरोपात . पण परिणाम स्वरूप ( ?) इस्राएल चे पॅलेस्टाईन मध्ये अस्तित्वात येणे याला बऱ्याच गोऱ्या मंडळींचा भावनात्मक पाठिंबा ( होता का ?) . आणि हे करताना स्थानिक अरबांवर कमालीचा अन्याय झाला होता का वगैरे विषय दुर्दैवाने फार चर्चिले जात नाहीत . (आणि त्यात गेले काही दशके उफाळून आलेल्या इस्लामिक दहशतवादामुळे एकंदरीतच अरब आणि इस्लाम यांच्याबद्दल अतोनात घृणा सर्वसामान्य पब्लिक च्या मनात असते ) या विषयावर काही महत्वाची पुस्तके प्रसिध्ध आहेत का ?
मुद्दाम मुद्दा उपस्थित करण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्य भारतीय समाजात आढळतात त्याप्रमाणे इस्राईल च्या ओजस्वी वगैरे पणाचे चे काही भक्त या ग्रुप वरही आहेत . चुकून त्यांच्या निदर्शनाला हि पुस्तके आली तर ... वगैरे

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

>> सर्वसामान्य भारतीय समाजात आढळतात त्याप्रमाणे इस्राईल च्या ओजस्वी वगैरे पणाचे चे काही भक्त या ग्रुप वरही आहेत . चुकून त्यांच्या निदर्शनाला हि पुस्तके आली तर ... वगैरे <<

अपेक्षा खूप आहेत एवढंच म्हणतो.

खरं सांगायचं तर इस्राएल-पॅलेस्टाईनचा मुद्दा खूपच गुंतागुंतीचा आहे. कामानिमित्त ज्यू उदारमतवाद्यांशी संपर्क येत राहतो. परिस्थिती वाईट आहे आणि तोडगा दृष्टिपथात नाही ह्याविषयी त्यांचं एकमत होतं. कट्टर धार्मिक ज्यू विरुद्ध उदारमतवादी हे झगडे त्यांच्या निकटवर्तियांत होत राहतात ते अगदी आपल्याच घरचे किंवा दारचे वाटतात. प्रत्यक्ष इस्राएलमध्येही अनेक प्रकारे ह्या मुद्द्यांभोवती वादविवाद घडत राहतात. 'इस्राएल म्हणजे ओजस्वीच' किंवा 'इस्राएल म्हणजे क्रूरकर्माच' ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठे तरी ह्या राष्ट्राचं अस्तित्व आहे हे पुन्हापुन्हा दिसत राहतं. आपल्याकडच्याही दोन विचारसरणीटोकांना त्यातून शिकण्यासारखं काही तरी आहे.

ह्यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही इस्राएली चित्रपट आले होते. त्यापैकी दोन चित्रपटांचा इथे उल्लेख करेन -
बार बहार (इन बिटवीन) आणि
पर्सनल अफेअर्स

समकालीन इस्राएलमध्ये बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक लोकांच्या जगण्याचं चित्रण आणि इस्राएलच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य दोन्हींमध्ये होतं. पहिला चित्रपट तर एका मुस्लिम स्त्रीनं दिग्दर्शित केला होता आणि इस्राएल फिल्म फंडनं निर्मिलेला होता. गुंतागुंतीची परिस्थिती समजून घ्यायला तत्त्वज्ञान किंवा कलाकृती दोन्ही उपयोगी पडतात हे असे चित्रपट पाहून लक्षात येतं. गुंतागुंत समजून घेण्याची इच्छा मात्र हवी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी काही वेगळे म्हणत आहे .

१. अपेक्षा खूप आहेत : सहमत
२. इस्राएल-पॅलेस्टाईनचा मुद्दा खूपच गुंतागुंतीचा आहे.: सहमत
३. ज्यू उदारमतवाद्यांशी संपर्क, कट्टर धार्मिक ज्यू विरुद्ध उदारमतवादी, 'इस्राएल म्हणजे ओजस्वीच' किंवा 'इस्राएल म्हणजे क्रूरकर्माच' , :

या सर्व विधानांना उद्देशून : घाऊक भावात कुठलाच समाज वाईट किंवा चांगला नसतो हे वैयक्तिक मत. सर्वसामान्य ज्यू नागरिक यांच्याबद्दल काहीच लिहिले नाहीये, ज्यू किंवा इस्राएल चे नागरिक असलेले कोणीही यांच्याबद्दल कुठेच काहीच म्हणत नाहीये.

इथे समाज म्हणजे आपला समाज , भारतीय , मध्यमवर्गीय , यांच्याबद्दल मी लिहिले आहे . आणि मी पुस्तके आहेत का असा प्रश्न विचारला आहे

सामनातील मास्तर चा डायलॉग ( धोंडे पाटलाच्या द्राक्षाच्या बागेमधला ) इथेही लागू पडतो असे वाटते : कि इथल्या मूळ छोट्या शेतकऱ्यांचं काय झालं ? उडून गेले ? वगैरे

४. गुंतागुंत समजून घेण्याची इच्छा मात्र हवी. (स्माईल) : हेच्च म्हणतोय ना मी !!!

अवांतर : आता पॅलेस्टाईन मधील अरब हे शेतकरी नव्हतेच , नोमॅड्स होते असा युक्तिवाद आज भारतीय दिवसा येणार का रात्री ? Smile ( know what I mean ...;)
तर असो पुस्तके असल्यास कळवल्यास आभारी असेन .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकं तर खूप आहेत. सध्या ही तीन -

Noam Chomsky and Ilan Pappé
ON PALESTINE

The desire to turn the mixed ethnic Palestine into a pure ethnic space was and is at the heart of the conflict that has raged since 1882. This impulse [...] led to the massive expulsion of 750,000 people (half the region’s population), the destruction of more than five hundred villages, and the demolition of a dozen towns in 1948.

Atlas of Palestine, 1917-1966
by Salman H. Abu-Sitta
650 colour pages (24 x 34 cm) containing information on : 1,600 towns and villages 16,000 land marks 30,000 place names 65 tables 125 illustrative maps, diagrams and photos Including 150 Pages of analysis of the Mandate, Partition Plan, Palestine borders, land ownership, population composition, the 1948 war, al Nakba, Armistice Lines, war crimes, destruction of landscape, disposition and confiscation of Palestinian property, water and agriculture and re-transformation of Palestine landscape. AND 500 Atlas pages covering all Palestine.

All That Remains: The Palestinian Villages Occupied and Depopulated by Israel in 1948
by Walid Khalidi (Editor)

This authoritative reference work describes in detail the more than 400 Palestinian villages that were destroyed or depopulated by Israel in 1948. Little of these once-thriving communities remains: not only have they been erased from the Palestinian landscape, their very names have been removed from contemporary Israeli maps. But to hundreds of thousands of Palestinians living in their diaspora, these villages were home, and continue to be poignantly powerful symbols of their personal and national identity.
https://electronicintifada.net/ हेही पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद .
यापैकी कुठली पुण्यात कुठल्या लायब्रऱ्यात वगैरे उपलब्ध आहेत वगैरे अशी काही माहिती सांगितलीत तर बरे होईल ( नाहीतर विकत घेऊ ....)
आपण हि सर्व वाचली आहेत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्नांची माळका वाढते आहे. सगळी उत्तरं मी नाही देणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही इस्राएली चित्रपट आले होते. त्यापैकी दोन चित्रपटांचा इथे उल्लेख करेन

त्याच बरोबर २०१४ची उद्घाटनाचा सिनेमा 'अ‍ॅना अरेबिया' हा सुद्धा फार अवांतर ठरू नये.

मिळाला तर अजिबात चुकवू नका. फार्फार थोर ए अशातला भाग नाही पण एकदा नक्की बघावाच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>प्रश्नांची माळका वाढते आहे. <<<
प्रश्न .. प्रश्न ... काय करणार , जुनी खोड ...स्वतःलाही सोडलं नाही .... (काही आठवतंय ?)

जाऊ दे हो , जमेल तेव्हडी द्या , बाकीचं सोडून द्या . ( एनीवे , तुम्ही जो गृहपाठ दिलाहेत तो आता बराच काळ पुरेल )

मायला , नवीन धागाच काढलात , बरेच विचारलेले दिसते मी . असो .
आता हाय दंगा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सांगता राव, उलट इस्राएलचे अस्तित्वच कसे पिळवणुकीवर आधारित आहे वगैरे सांगणारा डिस्कोर्स लिबरल वर्तुळात लै तगडा आहे. माध्यमांवरही त्यांचाच पगडा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक शाळामास्तरी प्रश्न आहे -

मूळ प्रश्न आहे -
मुद्दाम मुद्दा उपस्थित करण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्य भारतीय समाजात आढळतात ...

त्याला उत्तर आलंय -
... लिबरल वर्तुळात लै तगडा आहे. माध्यमांवरही त्यांचाच पगडा आहे.

प्रश्न असा - सर्वसामान्य भारतीय समाज याचा अर्थ लिबरल वर्तुळ आणि माध्यमं असा का लावतात? सर्वसामान्य भारतीय समाज उदारमतवादी आहे असं का समजलं जातं? (डेली सोप मालिकांचं पेव वगळता) माध्यमांवर भारतीय समाजाचा कितपत पगडा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी जनतेच्या मताला तसेही कोण विचारतो? अनभ्यस्तांचे आक्रस्ताळे मत म्हणून पालीगत झिडकारणारे विचारवंत जे आहेत त्यांचे मतच काय ते योग्य आहे असे कैक माणूसघाण्यांकडून प्रतिपादिले जात असते. ते सांगितले तर अडचण काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... पण प्रश्न असा - सर्वसामान्य भारतीय समाज याचा अर्थ लिबरल वर्तुळ आणि माध्यमं असा का लावतात? सर्वसामान्य भारतीय समाज उदारमतवादी आहे असं का समजलं जातं? (डेली सोप मालिकांचं पेव वगळता) माध्यमांवर भारतीय समाजाचा कितपत पगडा आहे?

(इथे पुरेशी चर्चा झाल्यास हवं तर त्याचा निराळा धागा बनवू.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कारण

१. लिबरल मतेच काय ती चांगली असतात असा लिबरल वर्तुळात प्रबळ मतप्रवाह आहे म्हणून.

२. एस्टॅब्लिश्ड चॅनल्समधून लिबरल वर्तुळातील मतेच बाय & लार्ज समोर येतात म्हणून. सोशल मीडियाच्या उदयानंतर हे चित्र बदलू लागलेय पण सुंभ जळूनही पीळ गेलेला नाही अजूनही. तो जाईल तेव्हा सर्वसामान्य भारतीय समाजाबद्दलची मते बदलतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं नीटशी मिळालेली नाहीत. सोशल मिडीयामुळे तुमची मतं बदलून, लिबरलांची आणि माध्यमांची मतं म्हणजे सामान्य माणसांची मतं नाहीत, असं तुम्ही म्हणणार का कसं? किंवा सामान्य भारतीयांची मतं म्हणजे लिबरल आणि/किंवा माध्यमांची मतं, असं सध्या कोण समजतं?

१. लिबरल मतेच काय ती चांगली असतात असा लिबरल वर्तुळात प्रबळ मतप्रवाह आहे म्हणून.

अवांतर - कोणत्या वर्तुळात इतरांना (त्रिकोण, चौकोन, दीर्घवर्तुळ इत्यादी) चांगलं समजतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारत सरकार हे सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करत असतं. भारताचा पंतप्रधान इस्राईलमध्ये जात नाही. अजून तरी गेलेला नाही. राजकीय संबंध नरसिंहारावांनी पहिल्यांदा प्रस्थापित केले. ९२ का ९३ साली. स्वातंत्र्यानंतर आणि इस्राएलच्या जन्मानंतर इतक्या वर्षांनी

सो सर्वसामान्य भारतीयांना इस्राएल आवडत नाही( इतके दिवस आवडत नव्हता. ) असं म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री , सरकारी स्टॅन्ड तुम्ही सांगताय आणि म्हणून लोकांना आवडत नाही असे म्हणताय . ( या न्यायाने पहिली ६० वगैरे वर्षे लोकांना 'समाजवाद 'वगैरे आवडायचा का काय ? ) तुमचं काय मत आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजवाद बहुसंख्य लोकांना तेव्हाही आवडत असावा आणि अजूनही आवडतो असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असहमत . निवडणुकीत कुठल्या एका पक्षाला मत देणे आणि त्याची विचारसरणी आवडणे या दोन वेगळ्या गोष्टी असाव्यात .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिबरल किंवा ऑर्थोडॉक्स डिस्कोर्स जाऊ दे . तुम्हाला काय वाटते ? ( गेल्या शतकातील इतिहास वगैरे !!! : ) )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जडजड पुस्तकं वाचून झाली की मला थोडी करमणूक लागते. संबंधित विषयावर चांगला चित्रपट बघायचा असेल तर 'लेमन ट्री' नावाच्या इस्रायली चित्रपटाबद्दल मागे ऐसीवरच कल्पनानं लिहिलं होतं. हा दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इस्राएल-निर्मितीला अमेरिकेला, रशिया, इंग्लंड आणि यूरोप यांचा नाझी-प्रणित ज्यू कत्तल होऊ दिल्याच्या अपराधगंडातून मोठा पाठिंबा होता. (अमेरिकेला अर्थातच खनिज तेलाच्या प्रदेशात एक कायमस्वरूपी लष्करी अस्तित्वही हवे होते!). १९४८ मध्ये सात लाख अरब निर्वासित केले गेले होते, (पण त्याच्याच आसपास तितकेच ज्यूही निर्वासित केले गेले होते: आसपासच्या मुस्लिम देशांमधून ).
सध्या चालू असलेल्या वाटाघाटींमध्ये पॅलेस्टिनी विस्थापितांचा "आमची जुनी घरे आणि जमिनी जशाच्या तशा आम्हाला परत द्या " (“Right of return”) या मागणीमुळे मुख्य घोडे अडत होते (https://electronicintifada.net/content/right-return-heart-palestines-str...(), पण २००८ साली उभयपक्षी चर्चेत यावरही तोडगा निघाला होता असे ऐकतो. सध्या हामासचा इस्लामी-पुरुज्जीवनवादी आडमुठेपणा हा एक मुख्य अडसर मला दिसतो आहे, आणि त्या अनुषंगाने येणारा इस्रायली दक्षिणपंथी कडवेपणाही. इस्राईलने वादग्रस्त प्रदेशात वसाहती बांधत एक सलग पॅलेस्टिनी देश निर्माण होण्याची शक्यताच नष्ट करून टाकली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आकडेवारीबद्दल व मताबद्दल धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यपूर्वेत राहात असताना अनेकानेक पॅलेस्टिनींशी अगदी जवळून संबंध आला. हे सगळे विस्थापित पॅलेस्टिनी. मुळातच इस्राएल व अरब या संघर्षावर बरंच काही वाचलं गेलं होतंच, त्यात या मंडळींशी संबंध येत राहिल्यामुळे बरंच भान येत गेलं.

अन्य काही ऐतिहासिक भूप्रदेशांप्रमाणेच मूळात पॅलेस्टाईन हा एका विशिष्ट सीमारेखांनी बद्ध असलेला असा प्रदेश नव्हेच. अरबांमध्येही अनेक प्रकार आहेत. अरेबियन भूशीर (पेनिन्सुला)वाळवंटातील अरब स्वतःला मूळ अरब म्हणवतात. त्यातही वाळवंटातील टोळ्या या अस्सल. इस्लामसोबत अरब भाषा, संस्कृती संपूर्ण मध्यपूर्व आशियात पसरली. स्थानिक संस्कृतींचे अरबीकरण झाले. त्यात, पॅलेस्टाईन, सिरीया, जॉर्डन हा सगळा भाग येतोच. हा भाग इतिहासाने समृद्ध. युद्धं वगैरे नेहमीचीच. विशिष्ट सीमारेषा नसली तरी ढोबळमानाने भूमध्य समुद्र ते जॉर्डन नदी यांच्यामधील प्रदेशाला पॅलेस्टाईन असे म्हणले जाई. याचेच पुढे फिलिस्तीन असे अरबीकरण झाले.आजचे पॅलेस्टाईन, जॉर्डन, सिरीयाचा काही भाग यातील लोकांमध्येही तसे काही विशेष फरक दिसून येत नाहीत. त्यांची चेहरेपट्टी, बांधा, खाण्यापिण्याच्या सवयी बहुतेक सारख्याच आहेत. आजही वेगवेगळे अरबी जनसमूह दिसण्यावरून ओळखता येतात, पण 'हा पॅलेस्टिनी, हा जॉर्दानी' असं नाही सांगता येत.

इस्राएलच्या स्थापनेपूर्वी काही काळ या प्रदेशातील बराचसा भाग ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्यालाच आज पॅलेस्टाईन म्हणून म्हणले जाते. त्यातील एक भाग ज्यूंनी ताब्यात घेऊन तिथे इस्राएल हे राष्ट्र वसवले. आजच्या इस्रएलामधून जे अरब बाहेर पडले ते मूळ निर्वासीत. ते कधीच परत जाऊ शकणार नाहीत. ६७ च्या युद्धात जो भूभाग बळकावला गेला (ज्याला गाझा पट्टी आणि वेस्ट बँक म्हणतात) तेथून बाहेर पडलेले निर्वासीत हे मात्र आपण कधी तरी परत जाऊ या आशेवर राहू शकतात. माझा संबंध दोन्ही प्रकारच्या लोकांशी आला. (पहिल्यांदा जेव्हा युद्ध झाले आणि लोकांना परागंदा व्हावे लागले, त्या घटनेला 'अन्-नक्बा' असे म्हणतात. म्हणजे एखादी प्रचंड मोठी आपत्ती.)

या लोकांच्या मनात साहजिकच इस्राएलविषयी प्रचंड राग, संताप आहे. स्वाभाविकही आहे. एकंदरच इस्लाममध्ये यहुदींबद्दल बराच राग आहे. त्यात परत यांनी आपली जमीन बळकावली, निर्वासीत केले, इतक्या युद्धांमध्ये हरवले यामुळे तो राग पराकोटीला जातो. सध्याच्या पॅलेस्टाईनचीही जी काही कोंडी / कुचंबणा होते आहे, तेथील अर्थव्यवस्था बोंबलली आहे, तरूणांना रोजगार नाही, शिक्षण नाही यामुळे परिस्थिती अधिकच चिघळते. हे लोक मग काहीही करून तेथून बाहेर पडायच्या मार्गावर असतात. इथेच खरी गोची आहे...

"इस्राएल तर काय बोलून चालून शत्रू राष्ट्रच. पण आमच्या अरब भाऊबंदांनीही आम्हाला मदत केली नाही. उलट, अवमानकारक वागणूकच दिली कायम. आम्हाला दुय्यम दर्जाचे रहिवासी (नागरीक नाही हं... रहिवासी) म्हणूनच वागवलं. आजही आमच्याकडे तुच्छतेनेच पाहिलं जातं. आम्हाला सामावून घेतलं जात नाही. आम्हाला संधी दिल्या जात नाहीत. आमचा धर्म एक, भाषा एक तरी असं. यांच्याकडे पैसाही आहे भरपूर. पण दानत मात्र अशी." .... हे मी घनिष्ठ संबंध असलेल्या प्रत्येक पॅलेस्टिनीकडुन ऐकलं आहे. आजही पॅलेस्टिनी लोक स्टेटलेस म्हणूनच गणले जातात. त्यांच्याकडे पासपोर्ट नसतो. जॉर्डन, सिरीया, लेबनॉन, क्वचित इजिप्त अशा देशांनी दिलेलं 'ट्रॅव्हल डॉक्युमेंट' असतं. हे सर्व त्यांना खूपच खुपत राहातं.

स्थानिक अरबांनाही पॅलेस्टिनींचं काही फार प्रेम दिसून येत नाही. 'ते असेच असतात, तसेच वागतात' असे सामुदायिक ताशेरे कायमच ओढले जातात. कुवेतमध्ये तर पॅलेस्टिनींबद्दल विशेष राग दिसून येतो. सद्दाम हुसेनने कुवेत बळकावले तेव्हा तेथील पॅलेस्टिनींनी त्याचे स्वागत केले होते. तो इस्राएलचा कडवा विरोधक. सौदी अरेबीया, कुवेत वगैरे देशांचा इस्राएलविरोध तसा बेगडीच आहे. अमेरिकेवर अवलंबून असल्यामुळे तसे करावेच लागते. सद्दामने थेट अमेरिकेलाच आव्हान दिले म्हणून तो या लोकांच्यात लैच पॉप्युलर होता. त्यामुळे, कुवेत मुक्त झाल्यावर बहुतेक सर्वांना हाकलून देण्यात आले. त्या आधी कुवेतमध्ये पॅलेस्टिनी खूपच होते. (सध्याची जॉर्डनची राणी नूर हिचे बालपण कुवेतमध्येच गेले आहे.)

हे निर्वासीत पॅलेस्टिनी कोणालाच नको आहेत.

असे सगळे असले तरी 'हजार वर्षं लागली तरी चालेल, पण आम्ही इस्राएलला नष्ट करूच', अशीच भावना बव्हंशी दिसून येते.

(मध्यंतरी भारतातील काही डाव्या मंडळींनी पॅलेस्टीनमुक्ती यात्रा काढली होती. हे लोक लेबनॉन, सिरीया, जॉर्डन वगैरे काही भागात फिरून आले होते. इस्राएलद्वेषाने भारून गेलेल्यांना बोलताना ऐकताना गंमत वाटत होती. प्रचारकी थाटाची काहीच कमी नव्हती. 'अरेरे! आपण कैत्तरी केलंच्च पाहिजे' वगैरे भावना फारच जाणवत होत्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

पर्स्पेक्टिव्ह दिल्याबद्दल धन्यवाद हो कार्यकर्ते साहेब !!! ( एका तरुण पॅलेस्टिनी उबर चालकांकडून त्याच्या आजोबांच्या बळकावून पाडलेल्या घराबद्दल ते कसे अजून डोळे लावून बसले आहेत अशी दर्दभरी दास्तान ऐकल्यापासून हा कीडा डोक्यात होता म्हणून हा धागा सुरु झाला )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त पोस्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हटलं समस्या भारतात देखिल आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.